﻿
म.वि.सोवनी
03-07-25
Marathi
एकूण पाने :- 19
From 9 to 76

+
पान नं. - 9

1: रेखाकला परीक्षांची माहिती

महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाद्वारा ह्या परीक्षा प्रतिवर्षी एकदा ( बहुधा ऑक्टोबर
महिन्यात ) घेतल्या जातात. पहिल्या परीक्षेचे नाव 'एलिमेंटरी ग्रेड ड्रॉईंग' असे असून दुसरी परीक्षा
'इंटरमीजिएट ग्रेड ड्रॉईंग' परीक्षा या नावाने संबोधली जाते. कलाशिक्षणाच्या कोणत्याही शाखेच्या उच्च
शिक्षणासाठी इंटरमीजिएट ग्रेड परीक्षा उत्त्तीर्ण असणे ही आवश्यक अट असते. त्याचप्रमाणे वैद्यकीय.
अभियांत्रिकी अथवा त्यासारख्याच तांत्रिक शाखांमधून इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा उत्तीर्ण असणे ही जादा
गुणवत्तेची बाब समजून त्याला प्राधान्य दिले जाते.

शासनमान्य शिक्षणसंस्थातील ( बहुधा माध्यमिक शिक्षणाच्या शाळा ) विद्यार्थ्यांना तसेच इतर
कोणाही खाजगी उमेदवारांना या परीक्षेसाठी प्रवेश दिला जातो. मात्र शासनमान्य शिक्षणसंस्थेतील अधिकृत
विद्यार्थी सोडून इतर सर्वजण ह्या परीक्षांसाठी 'खाजगी उमेदवार' म्हणूनच मानले जातात. ( त्यांचा
पारितोषिकांसाठी विचार केला जात नाही.)

कोणत्याही परीक्षार्थ्यास एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत उत्तीर्ण न होताही एकदम इंटरमीजिएट ग्रेड
परीक्षेस बसता येईल. परंतु कोणासही एकाच वर्षी दोनही परीक्षांना बसता येणार नाही.

सर्वसामान्यतः महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील बहुतेक तालुक्यांच्या व इतर प्रमुख गावांतून ह्या
परीक्षांची केद्रे ठेवलेली आहेत. व त्या 'परीक्षा केंद्र संचालकांना' परीक्षार्थीचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची
परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे खाजगी उमेदवारांनी आपल्या नजीकच्या संबंधित
केंद्रसंचालकांकडे याबाबत
विचारणा करावी कोणत्याही सराकारमान्य माध्यमिक शाळांतून अशी माहिती मिळू शकेल. मुंबईच्या
कला-
संचालनायलाकडे प्रवेश अर्ज परस्पर पाठविता येणार नाही. ते कोणत्याही अधिकृत परीक्षाकेंद्र
संचालकांच्या तर्फेच गेले पाहिजेत. परीक्षा सुरू होण्याच्या दिनांकाच्या (सामान्ययतः) साहा आठवडे
आधी प्रवेश अर्ज परीक्षा फीसह स्वीकारले जातात. एलिमेंटर परीक्षेची फी 6 रूपये आहे व
इंचरमीजिएट परीक्षा फी 8 रूपये आहे.

दोनही परीक्षांसाठी प्रत्येकी सहा विषय असून ते सर्व आवश्यक आहेत. एलिमेंटरी परीक्षेचा
कालावधी 2 दिवसांचा असून इंटरमीजिएट परीक्षा 3 दिवसांची असते. सर्व विषयांसाठी उत्तर पत्रिका
(1/4) इंपिरिअल आकारचा डॉइंगपेपर (38 सें.मी. 28 सें.मी.) शासनाकडून पुरविली जाते. इतर
आवश्यक ते सर्व साहित्य उमेदवाराने स्वतःचेच वापरावयाचे असते.

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराने सर्वच्या सर्व सहाही विषयांना बसणे आवश्यक आहे. एखाद्य.ा
विषयांत तो गैरहजर असेल तर त्याला अनुत्तीर्ण ठरविण्यात येते.

परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करताना तो, विद्यार्थ्याच्या परीक्षेतील संकलित कामानुसार अ,ब,क
अशी श्रेणी देण्यात येऊन, त्यांसह जाहीर केला जातो. उत्तरपत्रिकेला इतर विषयांप्रमाणे गुण देण्यात येत
नाहीत. तसेच वेगवेगळ्या विषयांचे निकालही जाहीर केले जात नाहीत, एकूण परीक्षेत श्रेष्ठ
गुणवत्तेनुसार
येणाऱ्या पहिल्या पंचवीस क्रमांकाची यादी सर्व परीक्षाकेंद्रातून जाहीर केली जाते. पंचवीसच्या पुढचे
क्रमांक
देण्यात येत नाहीत. हे पहिले पंचवीस क्रमांक सर्वसाधारण गुणवत्ताक्रमांकानुसार असतात. त्यांत
अधिकृत व
खाजगी असा भेदभाव केला जात नाही. मात्र खाजगी उमेदवार शासकीय पारितोषिकांसाठी पात्र ठरत
नसतो.

शासकीय पारितोषिकाच्या गुणवत्तेसाठी पात्रतच्या अटी अशा आहेत.

अ) उत्तीर्ण परीक्षार्थी महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही शासनमान्य माध्यमिक शाळेचा अधिकृत
विद्यार्थी असलाच पाहिजे.

पान नं. 10

ब) एलिमेंटरी परीक्षेस बसताना अशा विद्यार्थीचे वय 17 पूर्णतेच्या आत व इंटरमीजिएट परीक्षेस
बसताना हे वय 18 पूर्णतेच्या आत असले पाहिजे.

सर्व यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या कलासंचालनालयातर्फे प्रमाणपत्रे देण्यात येतात.
ह्या रेखाकला परीक्षांतील विषयांचा तपशील व आकृतिबंध पुढीलप्रमाणे आहे.

एलिमेंटरी ग्रेड ड्रॉइंग परीक्षा

विषय : 1) स्थिर चित्र (स्टिल लाइफ)
परीक्षेचा कालावधी : 2 1/2 तास.
माध्यमे. पेन्सिल व इतर कोणत्याही स्वरूपाचे रंग.
विषयाचे स्वरूप : परीक्षार्थीप्रमाणे ठेवलेल्या 3 ते 5 वस्तूंचा एका साध्या मांडणीच्या वस्तु-
संचाचे रेखांकन व रंगीत चित्रण करणे.
2) निसर्ग चित्र (नेचेर ड्रॉइंग )
परीक्षेचा कालावधी : 2 तास
माध्यमे : पेन्सिल आणि जलरंग
विषयाचे स्वरूप : अ) मध्यम आकाराची 3 ते 5 पाने व एक दोन फुले असणाऱ्या
डहाळीचे रेखांकन व रंगीत चित्रण करऑणे. ब) डहाळीच्या विशिष्ट भागावंचे (सांधे, पाने
मुगारे इ. ) मोठ्या आकारात रेखांकन करणे.
3) स्मरण चित्र (मेमरी ड्रॉइंग)
परीक्षेचा कालावधी : 1 तास
माध्यमे : पेन्सिल व रंग
विषयाचे स्वरूप : दिलेल्या सजीव व निर्जीव वस्तूंच्या आधारावर चित्रनिर्मिती करणे व रंगवणे
4) संकल्प चित्र (डिझाइन)
परीक्षेचा कालावधी : 2 1\2 तास.
माध्यमे : पेन्सिल व रंग.
विषयाचे स्वरूप : विशिष्ट उद्देशासाठी भौमितिक अथवा अलंकरणात्कम वा केवल अमूर्त
आकारांची रचना करणे, चित्र निर्माण करणे व रंगवणे.
5) मुक्त हस्त चित्र ( फ्री हँड ड्रॉईंग)
परीक्षेचा कालावधी : 1 1/2 तास
माध्यमे : पेन्सिल.
विषयाचे स्वरूप : दिलेल्या आकृतीची नेटकी व प्रमाणबद्ध प्रतिकृती यांत्रिक उपकरणांची
मदत न घेता केवळ हाताने रेखांकित करणे.

कर्तव्य भूमिती ( प्लेन प्रॅक्टिकल जॉमेट्री )
परीक्षेचा कालावधी : 1 1/2 तास.
माध्यमे : पेन्सिल किंवा शाई.

पान नं. - 11

विषयांचे स्वरूप : सांगितलेल्या भौमितिक रचना नेटकेपणाने व काटेकोर मापांत काढणे

इंटरमीजिएट ग्रेड ड्रॉईंग परीक्षा

ह्या परीक्षेलाही वरील सहा विषयच आहेत. मात्र प्रत्येक विषयात जरा अधिक उच्च पातळीवरचे
काम अपेक्षित आहे. काही अधिक गोष्टीही परीक्षार्थीनी कराव्यात असे सांगितले आहे. त्यासाठी प्रत्येक

विषयाच्या परीक्षेचा कालावधीही वाढवून दिलेला आहे. हे बदल पुढे थोडक्यात दिले आहेत.

1) स्थिर चित्र : वेळ 3 तास. चित्रात वस्तूंवरील छायाप्रकाश, पोत इत्यादी दाखवणे अपेक्षित
आहे.
2) निसर्ग चित्र : वेळ 3 तासच आहे. चित्रात पाने व फुले यांचे अलंकरणात्मक आकृतिबंध
दाखवणे अपेक्षित आहे.
3) स्मरण चित्र : वेळ 1 तासच आहे. तथापि प्रसंगचित्रातील एकंदर संयोजन. हावभाव व कृती
यांना अधिक प्राधान्य आहे.
4) संकल्प चित्र : वेळ 3 तास. दोन्ही परीक्षांच्या स्वरूपात बदल नाही, फक्त अधिक उच्च
दर्जाचे काम अपेक्षित आहे.
5) मुक्तहस्त चित्र : वेळ 2 तास. चित्र दिलेल्या नमुन्याबरहुकूम रंगवून पूर्ण करावयाचे आहे.
6) भूमिती आणि अक्षर लेखन : वेळ 3 तास. पहिल्या परीक्षेप्रमाणेच या परीक्षेसाठी नियोजित
भूमिती रचना करण्याबरोबरच अधिक म्हणजे (1) दिलेल्या घन आकाराचे अनुविक्षेप आणि
उद्विक्षेप काढता येणे. (2) दिलेल्या मापांची प्रमाणपट्टी करणे व (3) दिलेल्या जागेत नाव
किंवा शीर्षक वळणदार, नीटनेटक्या अक्षरात लिहिणे, ह्या गोष्टी अपेक्षित आहेत.

2: तयारीसाठी आवश्यक साहित्य

रेखाकला परीक्षेसाठी जे विषय नेमलेले आहेत त्यांमध्ये काही विषयांची चित्र रंगवून पूर्ण
करावयाची तर काही विषयांत फक्त पेन्सिलीचेच काम अपेक्षित आहे. काही विषयांत पट्टी, कंपास
इत्यादी यांत्रिक साहाय्य घ्यावयाचे नसते तर भूमितीसारखा विषय केवळ यांत्रिक सांधनांनीच
सोडवावयचा असतो. एवढयासाठी, आपणांस चित्रकलेचे म्हणून समजले जाणारे सर्वच साहित्य
आवश्यक आहे असे समजण्यास हरकत नाही. त्याची माहिती अशी -

कागद : कार्ट्रिज किंवा ड्रॉइंग पेपर म्हणून जो बाजारात मिळतो तो 76 सेमी 56 सेमी अशा
आकारात मिळतो. या आकाराला इंपिरियल साईज असे नाव आहे. परीक्षेसाठी प्रत्येक चित्र आपणास
1/4 इंपिरिअल आकाराच्या ( 38 सेंमी X 28 सेंमी) कागदावर काढावे लागते. तेव्हा सरावासाठी
सुद्धा तेवढ्याच आकाराचे कागद वापरणे आवश्यक आहे. म्हणजे कागदाच्या आकाराच्या मानाने
आवश्यक तेवढे मोठे चित्र काढण्याची सवय आपणांस आपोआपच होऊन जाईल.

भूमितीची कृत्ये सोडवून पाहण्यासाठी साधी एक्सरसाइज वही साधे पाठकोरे कागद वापरले तरी
हरकत नाही. तेवढयाकरिता महाग ड्रॉईंग पेपरचा उपयोग टाळला तर अधिक बरे होईल.

याशिवाय आणखी एक साध्या , कोऱ्या कागदांची वही कच्ची रेखाटने करण्यासाठी म्हणून
अवश्य. असावी. माणसांच्या वा जनावरांच्या विविध हालचालींची जलद रेखाटने या वहीत करणे
फायदेशीर ठरते.

पान नं. - 12

पेन्सिल : बाजारात कठीण आणि मऊ शिशाच्या दोन्ही तऱ्हांच्या पेन्सिली विकत मिळतात. H हे
अक्षर शिशाचा कठीण पणा दाखविण्यासाठी पेन्सिलवर लिहिलेले असते. एच्् पासून 6 एच्् पर्यंत
वेगवेगळ्या काठीण्याच्या ह्या पेन्सिली असतात. अशा पेन्सिलींनी कागदावर अगदी पुसट रेघा येतात.
भूमितीच्या आकृती मध्ये रचनेचे सर्व काम H किंवा 2H पेन्सिलीने केले तर फार फायदेशीर ठरते
म्हणून अशी एक कठीण (H) पेन्सिल अवश्य जवळ हवी.

नेहमी आपण जी साधी म्हणून HB अशी अक्षरे लिहिलेली असते. त्याचा अर्थ ती मध्यम प्रकारची
किंवा फार कठीण नसणारी. तेव्हा अशी HB पेन्सिल तर सदैव सर्व कामासाठी हवीच.

पेन्सिलवर नुसतेच B असे अक्षर असेल तर ती मऊ शिशाची व अधिक काळी उठणारी अशी
असते. B पासून 6B पर्यंत अधिकअधिक काळेपणा व मऊपणा वाढत जाणाऱ्या पेन्सिली असतात.
आपणांला उपयुक्त ठरणारी 2B ची एखादी पेन्सिल जवळ ठेवण्यास हरकत नाही. केवळ पेन्सिलीच्याच
कामात अधिक ठळकपणा दाखविणे आवश्यक अशते तेव्हा 2B पेन्सिल फारच उपयुक्त ठरते.

ह्या सर्वच पेन्सिलीचा वापर करताना एकच्या एक सलग लांब मोठी पेन्सिल वापरण्याऐवजी दोन
तुकडे करून अर्ध्या लांबीची पेन्सिल वापरण्याचा सराव ठेवावा. लांब पेन्सिलच्या हालचालीपेक्षा आखूड
पेन्सिलीच्या हालचाली अधिक सफाईदारपणे होतात. तसेच वापरतेवेळी सर्वच पेन्सिलीची टोके लांब,
निमुळती व टोकदार असावीत. आखूड व जाड टोके असतील तर रेषा बोजड येतात.

रबर : मऊ आणि पेन्सिलीचे काळे कण चटकन दूर करील असे रबर असावे. अलीकडे
चांगल्या दर्जाची रबरे सर्वत्र मिळतात. म्हणून त्याबद्दल विशेष लिहीत नाही.

कंपासपेटी : कर्कटक ( कंपास ) तीक्ष्ण टोकांचा असावा. तसेच तो आवश्यक तेवढा द्दढ
असावा त्याच्या केंद्रबिंदूची यंत्रणा सैल नसावी. कोनमापकावरील सर्व कोन सुस्पष्ट रेखाटलेले असावेत.
गुण्ये खरोखरच काटकोनात कापलेले असावेत. 6 इंची पट्टीवरील मापांच्या सर्व रेखा स्वच्छ
दिसाव्यात. एक चांगली फूट पट्टी( 30 सें.मी. लांबीची ) ही अतिशय आवश्यक आहे. आता सर्व
मापन मीटरपद्धतीचेच असल्यामुळे डेसिमीटर, सेंटिमीटर ही मापने त्यावर अचूक दिसावीत. पट्टीची
कड सरळ, एकाच पातळीत व गुळगुळीत पृष्ठभागाची असावी.

रंग : बहुतेक सर्व ठिकाणी उपलब्ध असणारे जसरंग म्हणजे वडया किंवा ट्यूब्जच्या पेटया.
पूर्वी पारदर्शकपणा जाणवणारे जलरंग मिळत असत. हल्ली ते लुप्त झाले असून सगळीकडे एकाच
पद्धतीचे जलरंग वडयांच्या अथवा ट्यूब्जच्या स्वरूपात मिळतात. ते काहीसे अपारदर्शक असतात.
पोस्टर कलर्स म्हणून मिळणारे जलरंग बाटल्यांतून भरलेले असतात. सर्वसामान्यपणे विद्यार्थ्यांनी वड्यांची
अथवा टयूब्जची पेटी घेणे योग्य ठरेल. सर्वसाधारणपणे पुढील प्रकारचे रंग आपणाजवळ असणे इष्ट
ठरेल. 3 पिवळे ( क्रोम यलो, लेमन यलो आणि यलो ऑकर ) , 3 निळे ( कोबाल्ट ब्लू,
अल्ट्रामरीन, प्रशियन ब्लू ), 3 लाल ( कारमाइन, क्रिमझन लेक आणि व्हर्मिलिअन), 2 हिरवे (
व्हेरिडियन, डीप ग्रीन) 1 काळा व 1 पांढरा . इतर रंगाच्या मानाने पांढरा रंग
अधिक लागतो म्हणून, पोस्टर व्हाइट रंगाची 1/2 औसांची बाटलीच वापरावी असा मी आग्रह धरीन.

हल्लीच्या परीक्षेत वेळ थोडा आणि रंगकामाचे क्षेत्रफळ वाढलेले असा प्रकार, शिवाय त्यात पोत (
टेक्श्वर) या मूलतत्वालाही बरेच प्राधान्य मिळाल्यामुळे वर सांगितलेल्या जलरंगाच्या जोडीला मी रंगांच्या
कांडयाही ( पेस्टल््स््) वापराव्यात असे आग्रहाने सुचवितो. अलीकजे बऱ्याच कंपन्यांच्या ऑइल
पेस्टल्स््च्या

पान नं. - 13

स्वरूपात दर्जेदार रंगकांडया आहेत. मूळ जलरंगाचा एक थर दिल्यानंतर त्यावर ह्या कांडयांचा वापर
करून झटपट आणि उठावदार परिणाम साधता येतो. म्हणून अशा ऑइल पेस्टल्सचीही एक पेटी
आपल्या साहित्यात अवश्यमेव हवी. क्रेयॉन ( मेणकांडया) चे रंग वापरू नयेत. ते अडचणीचे ठरतात.
त्याऐवजी ऑईल पेस्टल््स््च वापराव्यात.

ब्रश : जलरंगाने रंगवण्यासाठी चांगले ब्रश किंवा कुंचले अत्यावश्यक आहेत. ह्या ब्रशांचे केस मऊ
असावेत. तसेच रंगात बुडवून काढल्यावर त्याला एकच एक टोक आलेले असावे. ह्या दोन
कसोटयांनी युक्त असणारे ब्रश चांगले आहेत असे समजावे. मग ते खारीच्या केसांचे असावेत, उंटाच्या
केसांचे असोत किंवा सेंबलच्या केसांचे असोत. पूर्वी चित्राचा आकार जेवढा लहान होता तेव्हा 3 नंबर
आणि 5 नंबरचे ब्रश ठीक होते. आता तेवढयाने भागणार नाही. 9 किंवा 10 नंबरच्या एखादा मोठा
ब्रश असणे फार जरुरीचे आहे. त्याचा वॉश देण्यासाठी किंवा मोठा आकार चटकन भरण्यासाठी
मोठाच उपयोग होतो. या कामासाठी मऊ केसांचे चपटे ब्रशही मिळतात. वाटल्यास त्यांचाही वापर
करावा. पण ती अत्यावश्यक गरज नाही.

स्केच पेन : काळ्या रंगाचे एक स्केच पेनही आपल्या साहित्यात अवश्य पाहिजे. चित्रांच्या आकृतींना
बाह्यरेषा झटपट काढण्यासाठी ते फार उपयुक्त ठरते. कंपासमध्ये वापरून सुरेख वर्तुळेसुद्धा त्याने
रेखता येतात.

वरील अत्यावश्यक साहित्याशिवाय जे पूरक साहित्य आवश्यक आहे. त्यात पाणी ठेवण्यासाठी
रुंद तोंडाचे भांडे ( मोठी वाटी किंवा वाडगा ) रंग तयार करण्यासाठी किंवा कालवण्यासाठी थाळी, (
पॅलेट किंवा डिश ) आणि रंग अथवा ब्रश पुसून स्वच्छ करण्यासाठी एकादे मऊ फडके या गोष्टी
हव्यातच. आणि मुख्य म्हणजे उत्तरपत्रिका म्हणून मिळणाऱ्या ड्रॉइंग पेपरच्या खाली धरण्याकरिता
तेवढ्याच आकाराच जाड कार्डबोर्ड किंवा
लाकडाचा पाट(बोर्ड) हाही हवाच कारण एरवी आपण घरी कशीही प्रॅक्टिस करतो. परीक्षेत जी बैठक
आपल्या वाटयाला आलेली असते ती उत्कृष्ट आणि सर्वस्वी अनुकूल असेलच असे नाही. म्हणून योग्य
आणि
आवश्यक ते ते सर्व साहित्य आपलेच आपणांजवळ असले पाहिजे. त्याशिवाय बोर्डावर कागद पक्का
करण्या-
करिता ड्रॉइंग पिन्स किंवा क्लिप्स् (चाप) हव्यात.

(परीक्षेच्या वेळी आपले नाव क्रमांक, विषय , इ. माहिती उत्तरपत्रिकेवर लिहिण्यासाठी, शाई
भरलेले एक साधे पेनही न विसरता जवळ ठेवावे.)

3. सरावासाठी उपयुक्त सूचना

रेखाकला परीक्षतीलप्रत्येक विषयाचे काम त्या त्या विशिष्ट तंत्रबद्ध चौकटीत, विशिष्ट वेळात, आणि
विशिष्ट आकारात, करावे लागते. ती सवय तर प्रथमपासून हवीच, परंतु त्या त्या विषयाची काही
पूर्वतयारी, प्राथमिक
ज्ञान, याचीही प्रथम ओळख करून घेणे फार आवश्यक आहे. परीक्षापद्धतीने सराव चालू असतानासुद्धा
त्याच्याशी
संबंधित असणाऱ्या अनेक गोष्टींचे प्रयोग करून पाहणे, सतत चालू ठेवणे, हे फार फायद्याचे ठरते.
तेव्हा
तशा तऱ्हेच्या सर्व सूचना या प्रकरणात मुद्दाम विस्ताराने दिल्या आहेत. त्यांपैकी काही त्या त्या
विषयाची
पूर्वतयारी म्हणून उपयुक्त आहेत, तर काही तंत्राचे वा पद्धतीचे अधिक ज्ञान होण्याच्या दृष्टीने उपयुक्त
आहेत.
ही सर्व माहिती वारंवार वाचून विद्यार्थ्यांनी आत्मसात केली तर फारच चांगले.

पान नं. 14

कागदावर चित्राचा आकार : कोणत्याही विषयाची परीक्षा असली तरी त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक
महत्त्वाचा इषारा दिलेला असतो की, "चित्र पुरेशा मोठ्या आकारात काढा. फार लहान चित्राला गुण
मिळणार नाहीत." सराव करातानासुद्धा हे वाक्य सदैव नजरेसमोर ठेवून प्रथमपासूनच प्रत्येक चित्र
भरपूर मोठे काढण्याचा
परिपाठ ठेवावा. मोठे म्हणजे नेमके केवढे चित्र व फार लहान म्हणजे केवढ्या आकाराचे हे नक्की
काटेकोरपणेसांगता येणे कठीण आहे. तथापि ढोबळमानाने असे खास म्हणता येईल की कागदाच्या एकूण
क्षेत्रफळाच्या
निम्म्या क्षेत्रफळापेक्षा तरी चित्र लहान काढू नये. चित्राचा आकार निम्म्यापेक्षा अधिक असला तरी
चालेल. परंतु तो कमी मात्र कधीही असू नये. (सेंमी मापाच्या लांबीरूदींत बोलायचे म्हटले तर
परीक्षेचा
कागद 28 38 सें.मी या मापाचा असतो. अर्थात त्याच्या निम्म्या क्षेत्रफळाचा आयत 19 28
सें.मी एवढ्या
आकाराचा होईल. तर 19 20 सें.मी. एवढा तरी कमीतकमी तुमच्या चित्राचा आकार असणे
आवश्यक आहे.) ह्या मापात विषयानुरूप लांबीत अथवा रूंदीत कमीजास्त बदल होईलही परंतु
सर्वसाधारणतः ही मर्यादा
कायमपणे पाळली जावीच.

कागद उभा धरावा का आडवा धरावा. : हेही त्या त्या विषयाच्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे
ठरवावे लागते. नेचरसाठी दिलेली झाडाची फांदी उंच असून तिच्या दोन्ही बाजूंची पाने छोटी असतील
तर
चित्र उभे, अधिक उंचीचे काढणे योग्य म्हणून कागद उभा धरावा लागेल. त्याउलट
कण्हेरीसारख्या-ज्याची
पाने खूपच खूप लांब असून फांदीच्या दोन्ही बाजूला पसरलेली असतात अशा- झाडाची छोटी फांद9ी
असेल
तर एकंदर विस्तार आडवा जास्त असतो म्हणून कागद आडवा धरणेच अधिक योग्य. वस्तुचित्राचा
संच अगदी
समोर बसलेल्या विद्यार्थ्याला उंची जास्त व रूंदी कमी असा उभा दिसतो. त्यामुळे तेथेही कागद उभा
आडवा अशा दोन्ही पद्धतीनी वापरलेला आपणांस आढळून येईल. तीच गोष्ट फ्री हॅण्ड या विषयाच्या
बाबतीत
म्हणावी लागेल. डिझाइन या विषयासाठी बहुधा निश्चित मापे सांगितलेली असतातच तिथे हा प्रश्न
येत नाही. जॉमेट्री या विषयात कागदाच्या एका बजूवर भूमितीची रचना कृत्ये आणि दुसऱ्या बाजूवर
घनभूमिती व
अक्षरलेखन असे भाग सोडावयाचे असतात तेव्हा सोयीच्या दृष्टीने कागद आडवाच धरणे जास्त योग्य
ठरते.
स्मरणचित्राच्या बाबतीतही कागद आडवा धरणे इष्ट आहे. कारण की समूहदृश्यांतील माणसांचे आकार
पुरेसे
मोठे असून शिवाय योग्य तेवढी पार्श्वभूमी मिळविण्याच्या दृष्टीने आडवा कागदटच फायदेशीर ठरतो.
आकार
उभा घेतला तर जमीन व आकाश यांना विनाकारण फारच मोठी जागा मिळते व पार्श्वभूमीवर काढलेली
माणसे
चित्राच्या मानाने फार लहान वाटू लागतात. ती वाजवीपेक्षा मोठी काढली तरीही ते विसंगत दिसते.
म्हणून
स्मरणचित्रासाठी सहसा उभा कागद न धरता आडवाच धरावा. अर्थात हे सर्व तारतम्याने ठरवावयास
हवे.
परंतु सराव करतानाच योग्य ती सवय प्रथमपासून ठेवली तर त्याचा फायदा परीक्षेच्या वेळी हमखास
होतो म्हणून
हे आधीच सांगितले आहे.

मापे घेण्याची योग्य पद्धत :- पट्टी किंवा यांत्रिक मापे असलेल्या साधनांचा उपयोग न करता
नुसत्या अंदाजाने मापे मोजून त्यांचा उपयोग मुख्यत्वेकरून स्थिर चित्र (स्टिल लाइफ) व त्या
खालोखाल
मुक्तहस्त चित्र (फ्री हॅण्ड) या विषयांच्या वेळी करावा लागतो. आपल्या जवळच्या पेन्सिलीने अशी मापे
घेण्यास
परवानगी आहे. आपला हात, डोळा आणि पेन्सिल यांचा एकत्रित उपयोग करून ही मापे मोजतात.
मोजण्याची योग्य पद्धत कोणती ते येथे सविस्तर सांगितले आहे.

पान नं. 15

1) पेन्सिल फक्त हाताच्या बोटांच्या साहाय्याने हाताळा.

आकृती 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे उजवा हात पालथा धरा. क्रम. 1 व 4 बी बोटे ताठ ठेवा. व क्रम.
2
आणि 3 ही बोटे मिटा. ताठ बोटांच्या खाली एक पेन्सिली आडवी ठेवा. 2 व 3 ही बोटे ताठ करा.
म्हणजे
चारही बोटांच्या पकडीत पेन्सिल धरली जाईल. (आ. 2प्रमाणे.) व शिवाय अंगठा मोकळाच राहील.
आडवे
माप मोजायचे असेल तर मनगटापासून हात वळवून आडवा (आ. 3) किंवा उभा (आ. 4) हात केला
की झाले. या पद्धतीत चारही बोटांच्या दोन्ही बाजूंनी होणाऱ्या घट्ट पकडीमुळे पेन्सिल अजिबात न
हलता घट्ट
खिळल्याप्रमाणे पक्की बसते. शिवाय मागेपुढे फिरवून कमीजास्त माप घ्यायला अंगठा मोकळाच राहतो,
हे
मुख्य फायदे आहेत.
2) हात नेहमी ताठ ठेवा - ताठ हाताची लांबी ठरलेली असल्यामुळे आपण पुढे झुकलो अगर
मागे झालो तरी डोळ्यापासून हाताच्या टोकापर्यंत ताठ हाताचे अंतर न बदलता सदैव कायमच राहते.
हात कोपरात वाकवून मापे घेऊ लागलो तर हे अंतर क्षणोक्षणी बदलत जाऊन मापांतही फरक पडू लागतो.

3) कोणता तरी एकच्या एकच डोळा मिटवून दुसऱ्या उघडया डोळ्यानेही मापे घ्या. एकदा डावा व
एकदा उजवा डोळा उघडून मापे घेऊ लागलो तर वस्तू जागच्या जागी सरकल्यासारख्या भासतील व
मापांतही फरक पडेल. म्हणून एकाच ठराविक उघडया डोळ्याने माप मोजण्याची सवय ठेवा. अशा
रीतीने प्रत्यक्ष वस्तू आणि आपला डोळा यांच्या मध्ये ताठ हाताने पेन्सिल धरून वस्तूंची आडवी किंवा
उभी मापे मोजा. पेन्सिलच्या टोकापासून अंगठयाने जेथे टेकवले असेल तिथपर्यंतचे अंतर म्हणजे
अचूक माप असते. अंगठा खाली अगर वर सरकवून माप आवश्यकतेप्रमाणे कमीजास्त करता येते.

मापे नेहमी फक्त उभी किंवा आडवीच मोजा. पेन्सिल कधीही तिरकी धरू नका. अशी मापे
हमखास चुकीची ठरतात.

पान नं. - 33

निसर्गचित्र [नेचर ड्रॉइंग ]

नेचर ड्रॉंइंग हा प्रत्यक्ष नैसर्गिक वस्तुस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण-अवलोकन-करून अनुकरण
करण्याचा विषय आहे शंख, शिंपले, छोटया मोठया वनस्पती, रंगीबेरंगी फुले, फुलपाखरे,विविधरंगी पक्षी, मासे
इत्यादी मोहक हालचाल करणारे प्राणी वेडयावाकडया आकारांचे वृक्ष आणि वेली, आकाशातील विविध
रूपात विहरणारे ढग, सप्तंरगी इंद्रधनुष्य, या साऱ्यांच्या रूपांचे, आकारांचे, रंगांचे माणसाला
अनादिकाळापासून आकर्षण वाटत आले आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यास , त्यांचे अनुकरण हा
मानवाच्या जिव्हाळ्याचा भाग बनून गेला आहे. निसर्गचित्रण या विषयाला कला परीक्षेत स्थान आहे ते
त्यामुळेच.

जेव्हा हजारो विद्यार्थ्यांची , वेगवेगळी ठिकाणी परंतु एकाच वेळी परीक्षा घेतली जाते तेव्हा त्यातील
प्रत्येकाला स्वतंत्रपणे देण्याजोगा, नैसर्गिक वस्तूचा नमुना म्हणून पाने व फुले असणारी एखादी झाडाची
फांदीच निवडली जाते. कारण की तीच एक गोष्ट सर्व ठिकाणी विपुलतेने असू शकते. त्यामुळेच
या विषयाच्या पूर्व अभ्यासासाठी झाडाची डहाळीच घेण्याची पद्धत आहे.

साधारणतः एक वीतभर लांब( 20-25 सेमीपर्यंत) असणारी झाडाची एक फांदी निवडा. तिला चार
पांच पाने व एक तरी फूल असावे. फुलाशिवाय कळ्या वगैरे असल्या तर फारच चांगले. ही फांदी
एखाद्या बाटलीत खोचून अथवा चिखलाच्या गोळ्यात रोवून तुमच्यासमोर ताठ उभी राहील अशी ठेवा.
प्रत्यक्ष रेखाटनाला सुरुवात करण्यापूर्वी ह्या फांदीचे बारकाईने निरीक्षण करा.

पान नं. - 34

फांदी , पाने व फुले असे तीन वेगवेगळे घटक समजून प्रत्येकाने सूक्ष्म निरीक्षण करा. फांदी
जाड सरळ ताठ आहे का बारीक, लवचिक वाकलेली आहे ? तिला पाने एकाच सांध्यातून फुटत
गेलेली आहेत का एका आड एकेक पान फुटले आहे ? सांध्याच्या ठिकाणी गाठ असून त्यातून पान
बाहेर आले आहे का खांच आहे ? डोळा फुटून त्यातून पान आले आहे का ? इत्यादी सर्व गोष्टींचे
बारकाईने व सूक्ष्म निरीक्षण करावयास हवे. पानांचे निरीक्षण करताना एकंदर बाह्य आकार, पानांची
रुंदी आणि लांबी, तसेच त्या रुंदीचे लांबीशी प्रमाण, याचे सर्वसाधारणपणे अवलोकन. प्रथम करा पानांची
जास्तीत जास्त रुंदी देठाकडे आहे, का मध्यावर आहे, का शेडयाकडे आहे, हे नीट पहा. पानांच्या
आडव्या फुटणाऱ्या शिरा एकाच बिंदूतून दोन बांजूना गेल्या आहेत का त्या एका आड एक अशा गेल्या
आहेत हेही लक्षपूर्वक पाहणे जरुर आहे.

जी गोष्ट पानांची तीच फुलांचीही. फुलांच्या पाकळ्यांची संख्या , प्रत्येक पाकळीचा आकार,
पाकळीची ठेवण, फुलांच्या प्रमाणेच देठाची लांबी व जाडी इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक पाहाव्यात.

पान नं. - 35

हे सर्व निरीक्षण झाले म्हणजे मग कागदावर प्रत्यक्ष रेखाटनाला सुरुवात करावयाची. फांदीची
एकूण ठेवण आडवी वाटली तर कागद आडवा धरायचा आणि उभी वाटली तर कागद उभा धरायचा. कागदावर
पुरेशा मोठया आकारात प्रथमतः फांदीची स्थिती ( दिशा आणि जागा ) दर्शवणारी एक मध्यवर्ती रेघ
काढून घ्या. त्या फांदीला जेथे आणि जशी पाने फुटलेली आहेत त्याचप्रमाणे तुमच्या चित्रातील फांदीलाही
त्या त्या जागी पानांच्या दिशेप्रमाणे झुकणाऱ्या पानांच्या मध्यवर्ती रेषा काढा ( पान 36 आकृती एक )
ह्या मध्य शिरेभोवती पानांचा बाह्य आकार रेखांकित करावायाचा हे पुढचे काम . प्रथमतः केवळ
सरळ रेषात व अगदी ढोबळ आकारात केवळ पानांची स्थिती दाखविणारे रेखाटन करा. त्यासाठी सोपा
उपाय म्हणजे एक डोळा मिटून केवळ एकाच उघडया डोळ्याने प्रत्यक पान पाहा म्हणजे त्यातील
घनता नाहीशी होऊन ते ते पान फुलांचेही असेच ढोबळ रेखाटन करा . ( आकृती 2) एवढे झाले
म्हणजे तुमचे कच्चे रेखाटन झाले.

पक्क्या रेखाटनाची सुरुवात फांदीपासून करा, फांदीची दिशा, तिची वळणे, तिचे सांधे, जाडी या
सर्वांचे काळजीपूर्वक अचूक रेखाटन करावयाचे. हे रेखाटन वरच्या टोकापासून खाली उतरत्या दिशेने
करणे फायदेशीर असते. रेखाटन नितळ, ओघवत्या, ठोसदार रेषेने करा. सांधे, डोळे, गाठी इत्यादी
भाग स्पष्टपणे दाखविण्यास विसरू नका. ( आकृती 3) पाने व फुले रेखाटतानाही वरून खाली अशाच
क्रमाने काम करा. पाकळ्यांचा बाह्य आकार, त्यांवरील सुरकुत्या . देठाचे बुडखे या गोष्टी
काळजीपूर्वक दाखवाल तशाच पानांचे बाह्य आकारही प्रवाही वक्र रेषांनी अचूक पणे रेखाटा. एखादे पान
तुटके असेल, किडीने वेडेवाकडे खाल्लेले असेल तर ते तसेच अर्धेमुर्धे रेखाटण्यात गंमत असते. मात्र
त्यामुळे पानांचा बाह्य आकार चुकीचा होणार नाही हही पाहणे जरुर आहे. प्रत्येक पानाची एक
मध्यवर्ती शीर व तिच्या दोन्ही बाजूंना जाणाऱ्या निदान चार पाच तरी आडव्या शिरा तुम्ही
रेखाटावयास हव्यात. पाने अथवा फुले मुख्य फांदीतून फुटून बाहेर आल्याप्रमाणे दिसली पाहिजेत. ती
फांदीला चिकटवली आहेत असे दिसून उपयोगी नाही. पाने, फुले, कळ्या, तुरे इत्यादी सर्व रेखाटन
झाले म्हणजे तुमचे रेखाटन संपले.( आकृती 4) त्यानंतर रंगकामाचा विचार करावयाचा.

पान नं. - 46

6 : स्मरण चित्र [मेमरी ड्रॉइंग]

चित्रकलेतील सर्वांत आकर्षक आणि महत्वाचा विषय म्हणजे स्मरणचित्र. पूर्वीच्या परीक्षेतही हा
विषय महत्वाचा होताच, परंतु त्याचे स्वरूप बरेचसे रुक्ष ल अनाकर्षक होते . ससा किंवा बेडूक
किंवा चरणारी गाय काढा. एखादा वाद्यांचा अथवा हत्यारांचा संच काढा असे सांगितले जाई. वेळ फक्त
अर्धा तास असे व काम पेन्सिलीने पुरे करावयाचे असे. आता वेळ वाढवून एक तास केला आहे. चित्र
रंगाने रंगवायचे आहे आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातला, त्यांच्या रोजच्या
अनुभवातील एखादा प्रसंग त्यांना चित्रित करावयाचा आहे. साहजिकच चित्रविषयात मुले रंगून जातात व
वेळ किती भरकन निघून जातो हे ध्यानातही येत नाही.

योग्य ते निरीक्षण करणे, ते ध्यानात ठेवून वेळेवर आठवणे, त्याच्या सहाय्याने स्वतंत्र आणि
आकर्षकता वाढेल असे नवीन रचनचे सुरेख चित्र निर्माण करणे व काळजीपूर्वक रंगयोजना करणे ह्या
सर्व गोष्टी पाहिल्या तर वस्तुचित्र आणि संकल्पचित्र ( प्रत्यक्ष निरीक्षण आणि स्वतंत्र निर्मिती) ह्या
चित्रकलेतील दोन महत्वाच्या मूलभूत घटकांचे मिश्रण होऊनच हा विषय तयार झाला असावा इतके
महत्व ह्या विषयाचे आहे. ह्या विषयाची तयारी कऱण्यासाठी खूप निरीक्षण करणे आणि रचनातंत्राचे
नियम पाळून चित्रनिर्मिती करणे ह्या दोन्ही अंगांचा भरपूर सराव झाला पाहिजे.

त्यासाठी एक महत्वाची गोष्ट तुम्ही अंमलात आणायला हवी. केवळ ह्या परीक्षेपुरतीच नव्हे
तर पुढे आयुष्यभर चांगली चित्रकला हस्तगत व्हावी असे वाटत असेल तर रोजच्या रोज, सतत
थोडासा फावला वेळ मिळेल त्या वेळी तुमचे रेखाटन सदैव चालत राहिले पाहिजे. हे रेखाटन-कच्चे
रेखाटन , शीघ्र रेखाटन या स्वरूपातच असावे, परंतु ते सदोदित, थोडेथोडे, अखंडपणे चालू राहिले
पाहिजे. एक टिपणवही ( स्केच बुक) आणि एक पेन्सिल, एवढया साहित्यानिशी तुम्ही कुठेही असलात
तरी जे योग्य दिसेल ते ते पाहून रेखाटावयाची सवय लागली पाहिजे. एस.टी. स्टेशन, बाजार, मंडई,
धर्मशाळा, सिनेमागृहे, जत्रा, दुकाने, उपहारगृहे , शाळा आणि क्रीडांगणे, रस्ते, घरे, देवळे, घरातल्या
खोल्या, घराबाहेरचा परिसर ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही पाहून तुमच्या वहीत, कच्च्या स्वरूपात,
जलदपणे काढून ठेवायला हव्यात. त्याचप्रमाणे माणसांच्या हालचाली बसलेली माणसे निजलेली माणसे,
कामात गुंतलेली माणसे, धावणारी-गर्दी करणारी , अशा वेगवेगळ्या माणसांची रेखाटने, वेगवेगळ्या
हालचाली करणारे प्राणी, घरगुती पाळीव पशू व पक्षी इत्यादी तुमच्या हातून प्रत्यक्ष निरीक्षणाने गिरवले
जावे. प्रत्यक्षात पाहावयाला नाही मिळाले तर खुशाल मासिकातली , वर्तमानपत्रातली,

पान नं. - 4

पुस्तकातली चांगली चित्रे पाहून, कच्च्या रेखाटन स्वरूपात ती नकलून ठेवा. एकदा ती तुमच्या हातून
गिरवली गेली. रेखाटली गेली की ती तुमच्या स्मृतीत आणि तुमच्या हातात, द्दढपणे जाऊन
बसल्याशिवाय राहात नाहीत. रोजच्या रोज, थोडा वेळ का होईना, पण एखाद्या व्रताप्रमाणे शीघ्ररेखाटनाचे
काम चाललेले पाहिजे 'गाता गळा' सुधारतो, तसाच रोजच्या रेखाटनांनी 'हात' तयार होतो ही फार
महत्वाची गोष्ट नेहमी स्मरणात ठेवावी.

ही पूर्वतयारी पुरेशी झाली म्हणजे परीक्षा विषयाचा अर्धा टप्पा तुम्ही हस्तगत केल्याप्रमाणे होईल,
निरीक्षण , स्मृतीप्रतिमांची धारणा, आणि त्या प्रतिमांचे प्रत्यावाहन करण्याची क्षमता तुमच्या अंगी आली
असे समजण्यास हरकत नाही. आता प्रश्न येतो ह्या स्मृतीप्रतिमा कशा तऱ्हेने तुम्ही लोकांसमोर मांडू
शकता त्याचा परीक्षकांची अशी अपेक्षा आहे की तुमच्या स्मृतीप्रतिमा मांडताना तुम्ही त्यातून एक सुरेख
संयोजनचित्र तयार करावे. या चित्रातून दिलेला विषय तर स्पष्टपणे दिसावाच परंतु त्याबरोबर त्याला
चित्राचे गुणविशेष म्हणजे आकारांचा मेळ आणि तोल, लय, रंगाचा मेळ हेही जडलेले आहेत, ते एक
चांगले रचनाचित्र निर्माण झाले आहे, असेही त्यातून व्यक्त व्हावे. त्यामुळे चांगले चित्र म्हणजे काय ?
चित्ररचनेची काही वैशिष्टये असतात का ? याचाही विचार करणे भाग पडते. चांगल्या चित्ररचनेचून
(1) आकार घटकांचा सुसंबंध (2) महत्वाच्या घटकाला प्राधान्य, (3)आकार घटकांचा एकसंधपणा
(4) रचनेच्या योगाने चित्राच्या सर्व क्षेत्रभर लक्षवेध व्हावा, (5) रचनेतील तोल आणि लय, यांची
जाणीव व्हावी.

ही वैशिष्टये साधावयाची असतील तर चित्ररचनेचे काही ढोबळ नियम पाळले पाहिजेत, त्यांचा
आपण क्रमाने विचार करू.

(1) चित्रघटकातील आवश्यक ते आकार एकमेकांशी निगडीत असावेत, सुटे किंवा अलग रेखाटू नयेत.

पान नं. - 48

(2) मध्यवर्ती कल्पना व्यक्त करणारा घटक चित्राकाराच्या शक्यतितका मध्यबिंदूनजिक ठेवावा.

(3) अगदी सरळ रेषांत नजर फिरण्याऐवजी चित्रघटकांचा वेध लयबद्ध वक्र रेषेने घेणे प्रेक्षकाला अधिक
सुखावह ठरते.

हा वक्र रेषांचा नजरेचा प्रवास साधण्यासाठी एक नियम समजावून देतो. तो असा की चित्रात
एका कोणत्याही जागी एखाद्या माणसाचे डोके काढले तर त्या डोक्याच्या सरळ आडव्या पट्टयात
किंवा सरळ उभ्या

पान नं. - 49

पटटयात दुसरे कोणाचेही डोके येता उपयोगी नाही. ते जरासे वर अथवा खाली किंवा जरासे बाजूला
असावे. असे झाले तर आपोआपच सर्व व्यक्ती सरळ रेषेत न येता वर्तुळाकारात येतील.

द्दष्टी सर्व चित्रभर फिरावी, ती वर्तुळाकारात फिरावी, तशीच

(4) ती चित्राकारातच फिरावी, चित्राच्या बाहेर जाऊ देऊ नसे.

पान नं. - 50

वरील नियम पाळले तर आपोआपच चित्रघटकांचा एकसंधपणा, आकाराचा सुसंबंध, नजरेचा क्षेत्रभर वेध
चित्रातली तोल व लय , या गोष्टी जमून येतात. म्हणूनच सरावासाठी ज्या ज्या वेळी तुम्ही असे
चित्र काढावयास घ्याल त्या त्या वेळी वरील नियमांचे पालन करून चित्र अधिकाधिक निर्दोष करण्याचा
प्रयत्न करा.

पान नं. - 74

8 : मुक्तहस्त चित्र [फ्री हॅण्ड ड्रॉइंग]

सराव होण्यासाठी ज्या काही गोष्टी कवायतीसारख्या पुनः पुनः कराव्या लागतात त्याही महत्वाच्या
असतात. चित्रकलेमध्ये फ्री हॅण्ड ड्रॉइंग हा विषयही असाच महत्वाचा आहे. सफाईदार,लयबद्ध,
ओघवती रेषा सहजपणे काढता येणे हा चित्रकलेतील कौशल्याचा भाग असतो. आणि हे कौशल्य केवळ
सरावानेचे येऊ शकते. आपल्या भारतात दोन अडीच हजार वर्षापूर्वीच्या अजंठयाच्या लेण्यांपासून तो
थेट अगदी नव्या दिल्लीतील आधुनिक संसदगहापर्यतच्या अनेक शिल्पाकृती आणि वास्तू पाहिल्या तर
त्यातील नक्षीकाम आणि शोभाकृती, आपल्या कसबी कारागिरांनी, केवळ हातांनीच-कसल्याही यांत्रिक
किंवा कृत्रिम किंवा कृत्रिम साधनांची मदत न घेता अतिशय सफाईदारपणे आरेखित केल्याचे आपणांला
आढळून येते. मग त्या धावत्या किनारपट्टया असोत, पानाफुलांचे विविध आकार असोत किंवा प्राणी,
पशुपक्षी अथवा मानवाकृती असोत. रेषेचील ओघ,लय आणि सहज वळणांचा डौल आपले मन आकर्षित
करून घेतल्याशिवाय राहात नाही. 'सौदर्यपूर्ण रेषांचा मनोहर विलास' ही भारतीय कलाकारांची परंपरा
आहे. तीच परंपरा, तोच वारसा, जिवंत ठेवण्यासाठी, निदान त्याची ओळख ठेवण्यासाठी, फ्री हॅण्ड
ड्रॉइंग हा विषय चित्रकला परीक्षेत ठेवण्यात आला. हा विषय तसा महत्वाचा नाही. गौणच आहे. परंतु
म्हणून तो दुर्लक्षून चालत नाही. त्यातही आपल्याला चांगली कामगिरी दाखवता आली पाहिजे.

लयबद्ध रेषा काढण्याच्या सरावाप्रमाणे आणखीही काही गोष्टी या विषयात पाहिल्या जातात. एक
म्हणजे तुमचे अचूक निरीक्षण. लयबद्ध रेषाकृतींनी जे आकार तयार होतात त्यांचे क्षेत्र, त्यांचे
एकमेकांशी पाहिले जाते. पहिल्या परीक्षेत चित्रकाम फक्त पेन्सिलीनेच पुरे करावयाचे असते. दुसऱ्या
परीक्षेत ते रंगवून पूर्ण करावयाचे असते. त्यामुळे त्या परीक्षेसाठी जी नमुन्याची आकृती तुम्हांला
नकलण्यासाठी दिलेली असते. तीही रंगीतच असते. ते रंग आणि त्या रंगछटा तुम्ही अचूकपणे
तंतोतंतपणे तुमच्या कामात दाखवू शकता काय, हेही तेथे पाहिले जाते.

थोडक्यात म्हणजे फ्रीहॅण्ड विषयाच्या परीक्षेत -
1) रेषेतील सहजता, लयबद्धता, सफाई -
2) एकदंर आकृतीबंधाच्या लहान लहान आकारांचे एकमेकांशी तुलनात्मक प्रमाण, त्यांची
बांधणी त्यांचे निश्चित स्थान याची जाणीव आणि -
3) अचूक रंग व रंगछटांची समज- या तीन कसोटया असतात हे लक्षात ठेवले पाहिजे.
या तीनही गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे.
ह्या अभ्यासाला लागण्याच्या आधी केवळ प्राथमिक तयारी म्हणून हात वळण्याचे ,
वळवण्याचे काही काम करणे आवश्यक आहे. हे काम किंवा सराव पाटीवर पेन्सिसीने केला तरी
चालेल. परंतु तो रोज निदान 15 ते 20 मिनिटे असा सतत एक आठवडाभर तरी केला पाहिजे.

पान नं. - 75

1) सरळरेषा - मग त्या आडव्या उभ्या, तिरप्या, कोणत्याही दिशेने असोत-पट्टी न वापरता
काढणे, प्रत्येक रेघ कमीत कमी 15 सें.मी. लांबीची तरी असलीच पाहिजे.

2) पाव व अर्ध आकाराची वर्तुळे पूर्ण वर्तुळे, इंग्रजी S आकाराचे वर्तुळाकार हेही उलटसुलट वाटेल
त्या दिशेने काढणे. हे वर्तुळकार उगाच लहान लहान काढू नयेत. साधारणतः 7 ते 10 सें.मी. व्यास
तर कमीत कमी असावाच.

पाटीवर पेन्सिलीने गिरवण्याबरोबर कागदावरही अधिक मोठया प्रमाणात या विविध आकारांच्या रेषा
गिरवण्याचा काही दिवस सराव करावा.

3) एका कागदावर मध्यभागी सरळ रेषा आखून घ्यावी. त्या रेषेच्या एका बाजूला, रेषेला खेटून
कशाही वर्तुळाकार रेषांनी काहीही आकार काढावेत. मग त्या रेषेच्या दुसऱ्या बाजूस तेच आकार
आरशातील प्रतिमेप्रमाणे उलट काढावेत. ते लहान मोठे येतील. कदाचित समतोलही चुकेल. परंतु
मुळीच घाबरू नये. कारण हा सरावाचा भाग आहे.

याप्रमाणे काही दिवस सराव झाल्यावर या विषयाच्या अभ्यासाला लागायचे. अभ्यासासाठी पान 81
वर
जे नमुने दिले आहेत, ते क्रमवार काढावयाचे आहेत. हे सर्व नमुने लहान प्रमाणात आहेत परंतु त्यांचे
रुपांतर मात्र मोठया प्रमाणात करणे आवश्यक आहे. ( लहान नमुन्याचे मोठया प्रमाणात चित्र किंवा या
उलट मोठया नमुन्याचे लहान प्रमाणात चित्र काढता आले पाहिजे.) ते कसे करावयाचे ते आता पाहू.

फ्री हॅण्ड विषयाच्या चित्रीकरणासाठी जे नमुने देण्यात येतात ते प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात.
एक प्रकार समअंगचित्र व दुसरा विषम अंग चित्र. समअंगचित्र म्हणजे चित्राच्या मध्यावर रेघ मारली
असताना

पान नं. - 76

रेघेच्या एका बाजूकडील रेषांचे आणि आकृतींचे दुसऱ्या बाजूस असणारे तंतोतंत सारखे परंतु उलट (
आरशातील प्रतिमेप्रमाणे) चित्रीकऱण. अशा पद्धतीच्या आकृतीत उलट सुलट बाजू अचूक काढणे हेच
अधिक महत्वाचे ठरते. याउलट विषमअंग आकृतीत एकच एक आकृती विशिष्ट लयीत. विशिष्ट
आकारात काढलेली असते. तिला मध्य, दोन बाजू असा काही भाग नसतोच. या दोन्ही प्रकारांपैकी
कोणताही एक प्रकार परीक्षेत काढावयास दिला जातो. पूर्वीच्या काळी नेहमी प्रमाणे सम अंग
आकृतींनाच प्राधान्य असे. हल्ली विषम अंग आकृतींना प्राधान्य आहे. आपण विषमअंग आकृतींचा
अभ्यास करू आणि नंतर समअंग आकृतीकडे वळू.

*
﻿
मनोहर चंपानेर'र
03-07-25
Marathi
एकूण पाने :- 47
FROM 1 TO 47
किंमत - 15 रुपये

पान नं. - 1

1. उत्साही सायकलस्वार

एक उत्साही सायकलस्वार दादर ते वाई हा लांबचा प्रवास
सायकलीने सर्व काळ एकच वेग ठेवून करतो. ज्यावेळी तो नेरळला
पोहोचतो त्यावेळी तो एकूण अंतराच्या 1/5 अंतर जातो. आणि त्यावेळी
त्याच्या घडयाळात सकाळचे 10 वाजून 2 मिनिटे झालेली असतात.
तो ज्यावेळी तळेगावला, जे बरोबर एकूण अंतराच्या अर्धमार्गावर आहे,
तेथे पोहोचतो त्यावेळी त्याच्या घडाळ्यात सकाळचे 10 वाजून 50
मिनिटे झालेली असतात. त्याची सायकल कोठेही नादुरुस्त झालेली नाही.
कोणत्याही कारणास्तव त्याचा वेळ वाया गेलेला नाही. हे सर्व अध्याह्त
धरून तो त्याच्या इच्छित स्थळी वाईला पोहोचला , तर

वाईला त्याच्या घडयाळात किती वाजलेले असतील ?
पान नं. - 2

2 . चार चित्रे

एका चित्र-प्रदर्शनातील चार चित्रांविषयी मला फारच आकर्षण
वाटले. म्हणून या चार चित्रांविषयी आपण बोलू. या चार चित्रांचे
क्रमांक 1,3,9,14 असे होते.

चित्र 'वसंत ऋतु' हे जलरंगात ( वॉटर कलरने) रंगविले होते.
चित्र क्रमांक 14 हे 'श्री दलाल' या चित्रकाराने रंगविले होते.
ज्या चित्राची चौकट ( फ्रेम) पांढरी होती. त्याचे माप होते 15"X8" .

खडूने काढलेल्या चित्राचे माप होते 9"X 20" .

क्रमांक 3 चे चित्र एक फोटोग्राफ होता.

तैलचित्र ( ऑईल-पेन्टिंग) हे श्री. हळदणकर या चित्रकाराने
काढले होते. चित्र महायुद्ध हे काळ्या फ्रेमचे असून त्यामध्ये खडूने
काम केले नव्हते. क्र 9 या चित्राचे माप होते. 27"X19" . चित्र
'शांति' हे श्री. गांगल या चित्रकाराचे होते. या चार चित्रांपैकी एका
चित्राला फ्रेम नव्हती. चित्र संशोधन याचे माप 14"X 14" होते.
श्री जोशी या चित्रकाराने काढलेले चित्र सोनेरी फ्रेम बसविले होते.
ही माहिती अभ्यासा आणि सांगा. :

प्रत्येक चित्राचा क्रमांक, माप, मथळा, वापरलेले
माध्यम, फ्रेम, चित्रकाराचे नाव काय ?
पान नं. - 4

4. कापडाच्या ताग्याचे तुकडे

एका गृहस्थाजवळ 90 वार कापड गुंडाळलेला असा एक तागा
असून त्याला प्रत्येकी एक वार लांबीचे असे तुकडे कापावयाचे आहेत.
प्रत्येक तुकडा कापताना त्याला 3 सेकंद लागतात. सर्व 90 तुकडे
कापावयाचे आहेत.

तर एकूण किती वेळ लागेल ?
पान नं. - 5

5 . ब्रिजचा खेळ

शाम, सुहास आणि राहुल या तीन पुरुषांचे विवाह वंदना, मयुरी
व हेमा यांच्याबरोबर झालेले आहेत. पण ही नावे अर्थातच अनुक्रमे
नाहीत.

शामची पत्नी आणि मयुरीचा पती हे वंदनाच्या आणि हेमाच्या
पतींबरोबर ब्रिज हा पत्त्यांचा खेळ खेळतात. कोणतीही पत्नी तिच्या
स्वतःच्या पतीला भागीदार म्हणून घेत नाही. सुहास हा ब्रिज खेळत
नाही. हा सर्व गोष्टींचा विचार करा आणि सांगा ........

कोणाची लग्ने कोणाकोणाशी झाली होती ?
पान नं. - 7

6 . शेताची वाटणी

एका शेतकऱ्याने चौरसाकृती शेत होते. शेतकरी फार वृद्ध झाला
होता. म्हणून त्याने आपल्या या शेताची वाटणी आपल्या चार मुलांमध्ये
करण्याचे ठरविले. अर्थात, या शेताचा एक-चतुर्थांश भाग त्याने
स्वतःसाठी ठेवण्याचे ठरविले. बाकी राहिलेला शेताचा भाग चारही
मुलांमध्ये सारखा वाटण्याचे त्याने ठरविले. त्याच्या मुलांमध्ये भांडण
होऊ नये म्हणून त्याने प्रत्येक मुलाला एकाच ( सारख्या) आकाराची
आणि सारख्याच लांबी-रुंदीची शेतीची जागा देण्याचे नक्की केले व
त्यानुसार वाटणी केली.

तर त्याने शेताची वाटणी कशी केली ?
पान नं. - 8

7. काठीचा प्रश्न

एका गृहस्थाजवळ दोन काठया होत्या. त्यापैकी एक काठी दुसऱ्या
काठीच्या दुप्पट लांबीची होती. त्याने दोन्ही काठया अर्ध्या-अर्ध्या
कापल्या. नंतर लांब काठीचा अर्धा भाग व तोकडया काठीचा अर्धा भाग
घेतला आणि हे दोन्ही अर्धे भाग एकत्र चिकटविले व आणखी एक
काठी तयार केली. ही नवीन काठी पूर्वीच्या (मूळ) तोकडया
काठीपेक्षा 5।। इंच लांबीची होती.

तर सुरुवातीच्या दोन काठया किती लांबीच्या होत्या ?
पान नं. - 9

8 . डेक्कन क्वीन

मी, संदीपबरोबर डोंबिवली रेल्वे स्टेशनाच्या बाकावर गप्पा मारत
बसलो होतो. संध्याकाळी 5-47 वाजता माझ्यासमोरून डेक्कन क्वीन
निघून गेली. मी माझ्या घडयाळात पाहिले. सबंध डेक्कन क्वीन
द्रुतगतीने निघून जायला बरोबर 22 सेकंद लागले. डेक्कन क्वीनला
संपूर्ण डोंबिवली स्टेशनामधून धsड् धssड् करीत द्रुतगतीने जाण्यास
एकूण 66 सेकंद लागले. डोंबिवली स्टेशनाची लांबी 320 मीटर
धरल्यास-

'डेक्कन क्वीन' ची लांबी किती ?
पान नं. - 10

9 काळा चेहरा कोणाचा ?

रेल्वे गाडीचे एंजिन कोळशाच्या साहाय्याने चालणारे होते. दोन
गृहस्थ एकमेकांसमोर त्या गाडीच्या डब्यात बसले होते. गाडी वेगात
चालली होती. गाडीची खिडकी उघडी होती. बाहेरचा देखावा बघत ते
दोघेजण मजेत प्रवास करीत होते. नंतर काही वेळाने गाडी बोगद्यात
शिरली . कोंडलेल्या धुरामुळे त्यांपेकी एकाचा चेहरा काळा पडला . गाडी
जेव्हा बोगदयाबाहेर पडली तेव्हा ज्या गृहस्थाचा चेहरा स्वच्छ होता तो
चेहरा धुण्यासाठी वॉशबेसिनकडे गेला. परंतु, दुसरा गृहस्थ.....

ज्याचा चेहरा काळा पडला तो का बरं बसून राहिला ?
पान नं. - 11

10. तीन कुटुंबे

अनंतराव , बळंवतराव , काशिनाथपंत या तिघांनाही दमयंती , उषा
आणि सुनीता नावाच्या पत्नी आहेत. आणि प्रत्येकाला रोहन, हरीश,
मयूर अशी एकेक मुलं आहेत. पण ही सर्व नावे अनुक्रमानेच आहेत
असे मात्र नव्हे.

उषा आणि काशिनाथपंत यांची मुले शाळेतील क्रिकेटचा संघात
आहेत.

अनंतरावांचा रोहन हा मुलगा नव्हे.
सुनीता बळवंतरावाची पत्नी नाही. तर -

कोण कोणाची पत्नी व कोण कोणाची मुले ?
पान नं. - 13

11. कंपनीचे अधिकारी

'ऑल इंडिया टूल्स' कंपनीमध्ये श्री. राव, श्री . चौबळ, श्री. कर्णिक
व श्री. वाटवे हे जनरल मॅनेजर, चीफ अकाउन्टंट, चीफ कॅशिअर व
सेक्रेटरी असे वरिष्ठ अधिकारी ( ऑफिसर्स) होते. परंतु दिलेल्या
अनुक्रमानेच होते असे मात्र नव्हे.

श्री. कर्णिकांना वाटते की, आता जनरल मॅनेजर लवकरच सेवा-
निवृत्त ( रिटायर्ड) होण्याची वेळ आली आहे. श्री वाटवे यांना पुढे
तेच जनरल मॅनेजर होणार अशी आशा आहे.

श्री. राव आणि सेक्रेटरी यांनी चित्रपट पहायला एकत्र जाणे आवडते.
श्री. कर्णिक हे चीफ अकाउन्टंटना ब्रिज या पत्त्याच्या डावामध्ये
चांगलेच हरवतात.

श्री. राव हे तरूण गृहस्थ असून अतिशय लायक व हुशार आहेत.
श्री. वाटवे हे कधीही चित्रपट पहात नाहीत व कधीही पत्तेही खेळत
नाहीत.

तर कंपनीच्या अधिकाऱ्यांची अनुक्रमे नावे सांगा ?
पान नं. - 14

12 तुपाचे डबे

बेळगावचे एका व्यापाऱ्याकडून तुपाचे 21 डबे आले. ते सर्व
डबे एकाच आकाराचे असून सीलबंद आहेत. त्या व्यापाऱ्याने
श्री. गोविंदरावांना पत्रात लिहिले आहे :" आपल्या इच्छेनूसार हे 21
डबे पाठवीत आहे. पण त्या डब्यापैंकी सात डबे संपूर्ण असे तुपाने
भरलेले आहेत. आणि या प्रत्येक डब्यात 56 किलोग्रॅम तूप आहे.दुसरे
सात डबे अर्धे भरलेले असून त्यापैकी प्रत्येक डब्यात 28 किलोग्रॅम तूप
आहे, बाकीचे सात डबे संपूर्ण रिकामे आहेत त्यामध्ये थोडेसेही तूप
नाही. हे सर्व ध्यानी घ्या." आता , गोविंदरावांना हे सर्व 21 डबे
आपली तीन मुले सुहास, विनय व अनिल यांमध्ये अशा प्रकारे वाटून
द्यावयाचे आहेत- की प्रत्येक मुलाला सारखेच डबे आणि सारखेच तूप
वाटयाला येईल. डब्यांची सीले न उघडता आणि आतील तूप उणे-अधिक
न करता गोविंदरावांना हे करावयाचे आहे.

4 तर, डब्याची वाटणी कशी कराल ?
पान नं. - 15

13. सहा नाणी

वर चित्रात दाखविल्याप्रमाणे एका रांगेत सहा नाणी ठेवली आहेत.
त्यापैकी पहिली तीन नाणी एक रुपयाची आहेत आणि शेवटची तीन
नाणी 50 पैशाची आहेत. आता, यांपैकी कुठलेही एकच नाणे उचला,
आणि तुमच्या इच्छेला येईल त्या नाण्याच्या जागी ठेला व त्या जागेवरचे
नाणे घेऊन उचललेल्या नाण्याच्या जागी ठेवा. आणि रांगेची अशी
रचना करा की एका प्रकारची दोन नाणी एकाजवळ एक येता कामा
नयेत.

नाणी कशी ठेवाल ?
पान नं. - 16

14. मृत्युपत्र

एक हुशार म्हातारी मेली . तिने मृत्युपत्र करून ठेवले होते. ते मृत्युपत्र
वाचले तेव्हा असे समजले की, म्हातारीने 33,300 रुपये ठेवले होते व
व ती रक्कम दोन बाप आणि त्यांची दोन मुले यांमध्ये सारखी
वाटली जावी असे म्हटले होते. याशिवाय असेही म्हटले होते की,
प्रत्येकाला 11,100 रुपये मिळावेत. वकिलाला विस्मय वाटला . तो
गोंधळला. अर्थातच म्हातारीचे गणित चांगले होते व ती हुशार होती.
हे वकिलाला माहीत होते. म्हणून तो विचार करू लागला. त्यामध्ये
काहीही चूक नव्हती.

याचे स्पष्टीकरण करा ?
पान नं. - 20

17. कर्जाची फेड

सुहास फारच विचित्र पण त्याला आत्मविश्वास दांडगा, बोलणे अगदी
मिठ्ठास जिभेवर साखर. सहजगत्या एखाद्याला पैसे द्यावयास लावी.
युक्तीबाज ! प्रथम तो गेला विनयकडे व म्हणाला, "विनय, तर तू
मला माझ्या खिशात जितके पैसे आहेत, तितके पैसे उसने देशील तर
मी तुझ्याकडून पूर्वी उसने घेतलेले 10 रुपये परत देईन." विनय
कबूल होतो आणि त्याचे पूर्वी घेतलेले पैसे त्याला मिळतात.

सुहास, नंतर दुसरा मित्र अनिल याच्याकडे जातो आणि त्याच्या
खिशात जितके पैसे आहेत तितके पैसे तो अनिलकडून कर्जाऊ घेतो.
व त्यालाही त्याच्या पूर्वीच्या संपूर्ण कर्जापोटी 10 रु. देतो.

सुहास नंतर राहुल आणि वसंत यांच्याकडे जातो आणि प्रत्येकाला
पूर्वीच्या संपूर्ण कर्जाच्या पोटी 10 रुपये देतो पण त्याच्या खिशांत
असतील तितके पैसे प्रथम कर्जाऊ घेतो आणि त्यामुळे आता त्याच्या
खिशात एकही पै राहत नाही.

तर सुहासवर एकूण कर्ज किती ?
पान नं. -22

19 . पाच तरुण

मुंबई विद्यापीठातून पदवीदान समारंभास हजर राहून पाच तरुण
विनय , अभिजित, सुहास, राहुल, मोहन हे बाहेर पडले आणि ते
सर्वजण एका हॉटेलमध्ये रांगेने बसले. सर्वजण आज अप््-टु-डेट होते.
आज सर्वांनी सूट, नेक््टाय परिधान केली होती. मी त्यांचे निरीक्षण
करून पुढील मुद्दे लक्षात घेतले.

तपकिरी रंगाचा सूट घातलेली व्यक्ती अभिजितच्या शेजारी बसली
होती. सुहासच्या उजव्या बाजूची व्यक्ती 'गोल्डस्पॉट' पीत होती.
जी व्यक्ती 'थम्स्-अप' पित होती त्या व्यक्तीने लाल रंगाची टाय
परिधान केली होती. विनयने तपकिरी रंगाचा सूट परिधान केला होता.
आणि तो कॉफी पीत नव्हता. ज्या व्यक्तीने सफेद टाय घातली होती ती
व्य्कीत कॉफी पीत होती. अभिजितच्या उजव्या बाजूच्या व्यक्तीने
निळा सूट घातला होता. राहुलने छोटया पट्टयांचा सूट घातला नव्हता.
परंतू बदामी रंगाची टाय घातली होती. राखी रंगाचा सूट घातलेल्या
व्यक्तीने काळी टाय घातली होती. कॉफी पीत असलेल्या व्यक्तीच्या
शेजारी बदामी रंगाची टाय घातलेली व्यक्ती बसली होती. जी व्यक्ती
कॉफी पीत होती ती व्यक्ती हिरवा वुलन सूट घातलेल्याच्या शेजारी
बसली होती. अभिजित 'कोका-कोला' पित होता आणि त्याने लाल

पान नं. - 23

रंगाची टाय घातली नव्हती. छोटया पट्टयाचा सूट घातलेली व्यक्ती
'थम्स-अप्' पीत होती.

या सर्व गोष्टी न्याहाळल्या . या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास
करा आणि त्यावरून प्रत्येकाने कोणता सूट घातला होता, कोणती टाय
घातली होती व कोणते पेय पित होता हे शोधून काढा.

थोडक्यात म्हणजे--

प्रत्येकाचा कोणता सूट,कोणती टाय,कोणते पेय ?
पान नं. - 27

22. रंगीत खांब

विनायकराव हे रसिक गृहस्थ. त्यांच्यामध्ये सौंदर्यद्दष्टी होतीच ! ते
अर्थातच धनाढय होते. त्यांच्या एका शेतात त्यांना दहा खांब लावावयाचे
होते. पण हे वेडेवाकडे कसेही लावावयाचे नव्हते. म्हणून त्यांनी दहा
खांब तयार करविले. सागवानी लाकडाचे उत्त्तम खांब होते ते ! नंतर
त्यांनी ते ऑईल-पेन्टने रंगवून घेतले. पण वाटेल त्या रंगाने नव्हे. पाच
खांब पांढऱ्या रंगांनी रंगवून घेतले. बाकीच्या राहिलेल्या पाच खांबापैकी
एकाला लाल, दुसऱ्याला निळा, तिसऱ्याला नारिंगी, चवथ्याला हिरवा
व पाचव्याला पिवळा असे रंग देवविले. त्याने नेहमीच्या निष्णात
कॉन्ट्रॅक्टरला बोलाविले व म्हटले, हे दहा खांब पुढील अटीनुसार

पान नं. - 28

लावून घ्या : (1) या दहा खांबाच्या पाच रांगा झाल्या पाहिजेत.
(2) प्रत्येक रांगेत चारच खांब आले पाहिजेत. (3) प्रत्येक रांगेतील
या चार खांबापैकी मधले दोन पांढऱ्या रंगाचे व टोकावरचे इतर भिन्न
रंगाचे असले पाहिजेत. तर--

खांबाची रचना कशी कराल ?
प्रत्येक रांगेत कोणकोणत्या रंगाचे खांब आले ?
पान नं. - 29

23. पक्षी आणि पशू

गोविंदराव आपल्या कुटुंबासहीत, नातवांसह बडोदा येथील लहानशा
प्राणीसंग्रहालयात गेले. गोविंदराव फार चिकित्सक होते. ते प्राणी -
संग्रहालयातील कचेरीत गेले. तेथील मुख्य होते मोहनलाल.
मोहनलालना त्यांनी विचारले, "तुमच्या प्राणीसंग्रहालयात किती पक्षी
आहेत ? किती पशू आहेत ?"

मोहनलाल हुशार मनुष्य होता. त्याला सरळ उत्त्तर देणे माहितच
नव्हते. शिवाय, गोविंदरावांशी आल्याबरोबर त्याने गप्पा सुरू केल्याच
होत्या. या सर्व वातावरणाचा फायदा घेऊन त्याने उत्त्तर दिले, "अहो
गोविंदराव, माझ्या प्राणीसंग्रहालयात 106 डोकी आणि 278 पाय
आहेत." गोविंदराव म्हणाले, " मोहनलाल, हो काय ? सांगा ना
नीट !" मोहनलाल म्हणाले, "खाजवा डोके आणि काढा शोधून."
गोविंदरावांनी बरोबर शोधून काढले. सांगा बरे,

किती पक्षी, किती पशू ?
पान नं. - 30

24. गोगलगायीची कसरत

एक गोगलगाय एका विहिरीची भिंत चढत असते. प्रत्येक दिवशी
ती तीन फूट भिंतीवर चढते, परंतू प्रत्येक रात्री ती दोन फूट खाली
घसरते. विहिरीची भिंत वीस फूट उंच आहे.

तर भितींच्या टोकावर पोहचायला तिला किती वेळ लागेल ?
पान नं. - 34

26 . कोणता मोती नकली ?

मनोज फार हौशी ! दिवाळी जवळ आली. शिवाय कंपनीतून बोनस
मिळाला. मग आपली पत्नी वंदना हिला मौल्यवान अशी चीजवस्तू
खरेदी करून द्यावयाची त्याने ठरविले. तो गेला 'सांगलीकर मोतीवाले'
यांचेकडे. मनोजची सांगलीकरांशी चांगलीच ओळख होती. त्याला छोटे
मोती आणि मोठे मोती घेऊन मोत्याचा सर वंदनाला दिवाळीच्या
पाडव्याच्या दिवशी द्यावयाचा होता. त्याने 80 लहान मोती खरेदी
केले, नंतर त्याने वाटाण्यापेक्षाही मोठे असे 9 मोती खरेदी केले. ते मोती
कसे होते ! पाणीदार ! चकाकणारे ! अस्सल ! 80 बारीक व नऊ
मोठे मोती घेऊन मनोज घरी आला. अर्थातच त्याने सांगलीकरांचे
मोत्याचे पैसे देऊन टाकले.

पण दुसऱ्या दिवशी सांगलीकर हे मनोजकडे गेले. कारण त्यांच्या
लक्षात आले की आपण दिलेल्या मोठया मोत्यांमध्ये एक मोती नकली
असून, तो चुकून अस्सल मोत्यांमध्ये मिसळला गेला. सांगलीकर
सचोटीचा माणूस ! ठरलेला, फायदा घेई, पण लबाडी नाही. तो मनोज
कडे गेला व म्हणाला, "मनोज, तू जे काल नऊ मोठे मोती घेतलेस
त्यातील एक नकली आहे. नकली मोती इतर प्रत्येकी आठ मोत्यांच्या

पान नं. - 35

वजनाच्या द्दष्टीने कमी असेल. म्हणून कमी वजन असलेला तो नकली
हे सहज शोधून काढता येईल." एवढे ऐकल्यावर मनोजने सांगली-
करांनी आणलेले तराजू घेतले व मोठया मोत्यातील प्रत्येक मोत्याचे वजन
करत बसला. पण दोन-तीनदा असे केल्यावर मनोज कंटाळला. तेव्हा
सांगलीकर म्हणाले, "फक्त दोन वेळा वजन करून कोणता वजनाने
हलका आहे व पर्यायाने नकली आहे हे मी सांगू शकतो."

त्यांनी वजन कसे केले ?
पान नं. - 36

27 . कोणी कोणाला मागे टाकले ?

अनंत, बाळू, कमलाकर, विनू, दिनू या सर्वांना त्यांच्या वर्गातील
अभ्यासानुसार आलेला क्रमांक माहीत आहे, आणि बाळूलाही दिनूचा
क्रमांक माहीत आहे. वार्षिक परीक्षेचे निकाल लागलेले होते आणि हे
त्यावरून दिलेले क्रमांक होते.

अनंत : "मी वर्गात आलेलो नाही."
बाळू : " मी दिनूपेक्षा दोन क्रमांकाने वर आहे."

कमलाकरने ही सर्व विधाने ऐकली आणि अनंत, बाळूचा खरे-
खोटेपणा त्याला पूर्वीपासून ज्ञातच होता. त्यामुळे त्याने निष्कर्ष काढला
की वरीलपैकी एकाचे म्हणणे खरे होते. पण दुसऱ्याचे खोटे आहे.
( आणि कमलाकरचे हे म्हणणे अगदी बरोबर होते.)

काही वेळाने थांबून कमलाकर म्हणाला, "वार्षिक परीक्षेच्या
निकालानुसार मिळालेले पाचही क्रमांक मी लिहून दाखवितो."
त्याने तसे केले आणि त्याचे ते सर्व बरोबर होते.

कमलाकर याचा क्रमांक 5 वा नव्हता ही आणखी माहिती ध्यानी
घेऊन -

तुम्ही सांगू शकाल काय पाच जणांचे क्रमांक ?
पान नं. - 38

29. दुकाने किती छान !

माझ्याच बाजूला नवीन दुकाने झाली आहेत. किती छान. बरे
सर्वच दुकाने महाराष्ट्रीयन लोकांची आहेत. पाच दुकानांची छोटीशी
इमारत आहे ती ! अतिशय आकर्षक !

त्या दुकानांचे पाच मालक आहेत . त्यांचे वर्णन असे :

श्री. काळे ( तो काही ब्युटिपार्लरवाला नव्हे)
श्री. फणसे ( तो हार्डवेअरवाला नव्हे.),

पान नं. - 39

श्री. पाटील ( तो केमिस्ट नव्हे )
श्री. सुळे ( तो किराणामालवाला नव्हे.)
कुमारी शिंदे ( तिचे कापडाचे दुकान नव्हते)
कुमारी शिंदे हिचे रांगेतील टोकावरचे दुकान आहे. ( अर्थात ते
इमारतीचेही टोक आहे.) श्री.पाटील यांचे दुकान किराणामालाच्या
शेजारी आहे आणि हार्डवेअरच्या मालकाशी दोस्ती आहे, ज्याला अशी
आशा आहे की तो स्वत:चे दुकान त्याला एक दिवस विकेल.

तर प्रत्येक दुकानाचा मालक कोण ?
'
पान नं. - 41

30. साधे बीजगणित

पक्ष : क्ष = आणि य = 1
म्हणून, क्ष = य

प्रत्येक बाजूला क्ष ने गुणून

क्ष2 = क्षय
दोन्ही बाजूतून य2 वजा करून ,
क्ष2 - य2 = क्षय - य2

प्रत्येक बाजूचे अवयव पाडून

( क्ष+ य) ( क्ष - य) = य(क्ष - य)
(क्ष - य) या सामाईक राशीने दोन्ही बाजूस भागून ,
क्ष + य = य

दिलेल्या 'पक्षा' मधील किंमती या समीकरणात घातल्यास ,

1 + 1 = 1
किंवा 2 = 1
सिद्धतेत काय चूक आहे ?
पान नं. - 42

31 . सुखी कुटुंब

रात्री 9.30 च्या ठोक्याला एक सुखी कुटुंब काटकोन -चौकाना -
कृती डायनिंग टेबलावर जेवावयास बसते. त्यांच्या बसण्याच्या जागा
अगदी ठरलेल्या आहेत. वरील चित्रात पहा. मीना कोठे बसली आहे.
ते दाखविले आहे. पपा हे मीनापासून दूर परंतु अगदी टोकाला
बसतात. पपांच्या उजव्या बाजूला शेजारी सुनील बसतो. सुनीलच्या
समोरच्या बाजूकडील व्यक्तीच्या डाव्या बाजूला दोन स्थळे सोडल्यावर
तिसऱ्या बैठकीवर राजश्री बसते. राजश्रीच्या बरोबर समोर प्रदीप बसतो.

पान नं. - 43

प्रदीप आणि सुनीलच्या मध्ये मिलिंद बसतो. रोहन मीनाच्या उजव्या
हाताला एक खुर्ची सोडून , येणाऱ्या खुर्चीवर बसतो. रोहन व पपा
समोरासमोर आहेत. सुनीलच्या बरोबर कल्पना बसते.

तर सांगा -

कोण कोठे बसले आहेत ?
पान नं. - 44

32 . केमिकल्ससाठी मापे

अण्णासाहेबांनी चिंचवडला एक केमिकल्सची लहानशी फॅक्टरी
उघडली. त्या फॅक्टरीत बरोबर 4 लिटरच्या मापाची एक बादली व
बरोबर 3 लिटरच्या मापाची एक बादली होती.

केमिकल्सच्या सोल्यूशनमध्ये नेमके मापांप्रमाणे पाणी टाकावे लागते.
1 लिटर ते 4 लिटरपर्यंत पाणी टाकण्याची वेळ येई. अण्णा हे महा
कंजूष. त्यांनी या दोन बादल्यांच्या सहाय्याने भागवले होते. कारण
1 लिटर पाणी लागावयाचे त्यावेळी ते 4 लिटरची बादली भरून, तीन
लिटरची बादली संपूर्ण भरावयाचे म्हणजे राहिलेले 1 लिटर पाणी
मोठया चार लिटरच्या बादलीत बरोबर राही. अण्णांचे डोकं ते ! परंतु
अण्णांना ज्यावेळी बरोबर दोन लिटर पाणी सोल्यूशनमध्ये घालावे लागे,
तेव्हा ते याच दोन मापांच्या बादलींच्या सहाय्याने कसे करीत ?

दोन लिटर कसे मोजीत ?
पान नं. - 46

33. प्रवासाचा खर्च

दूर दूर जाऊन श्री. महाडीक हे 'शांतिदूत प्रकाशना' ची पुस्तके
विकीत असत. कधी त्यांचा दौरा सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर तर कधी
नागपूर, अकोला तर कधी नगर जिल्हा असा असायचा. याचप्रमाणे
ते आता खिशात थोडे-बहुत पैसे घेऊन दौऱ्यावर निघाले. पहिल्या
दिवशी त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पूर्णांकी रुपयांची व्यापाऱ्याच्या
सहाय्याने दुप्पट करून त्यांतील 30 रुपये खर्च केले. दुसऱ्या दिवशी
त्यांनी शिल्लक राहिलेल्या रुपयांची तिप्पटी एवढी वाढ करून त्यांतील
54 रुपये खर्च केले ; तिसऱ्या दिवशी शिल्लक राहिलेल्या रुपयांची
चौपट एवढी वाढ करून त्यांतील 72 रुपये खर्च केले.

तिसऱ्या दिवशी झोपताना त्यांनी हिशोब केला तेव्हा त्यांना कळले
की बरोबर 48 रुपये शिल्लक आहेत. प्रवासाला निघताना त्यांच्याजवळ
किती रुपये होते म्हणून ते आठवू लागले.

प्रवासाला निघताना किती रुपये होते ?
पान नं. - 44

34 . आगगाडीचा प्रवास

सुरुवातीला आगगाडी रिकामी असताना त्यामध्ये काही उतारू
शिरतात. पहिल्या स्टेशनात असलेल्या उतारूंना 1/3 उतारू उतरतात
व 40 नवे उतारू शिरतात.

दुसऱ्या स्टेशनात जेवढे उतारू होते त्याच्या 14 उतारू उतरतात
व 52 नवे उतारू शिरतात.

तिसरे स्टेशन जेव्हा येते तेव्हा असलेल्या उतारूंच्या 15 उतारू
उतरतात व नवे 35 उतारू शिरतात.

चवथ्या स्टेशनात गाडी रिकामी होते, कारण ते शेवटचे स्टेशन
असते. त्यापुढे गाडी जात नाही. त्यावेळी गाडीतून 163 जण
उतरल्याचे ध्यानी आले.

तर सुरुवातीस गाडीत किती लोक शिरले ?
पान नं. - 45

35 . रस्त्याच्या टोकाशी बसली

सौ. सुनीताबाई श्रीमंतच होत्या . त्यांनी त्यांच्या मुलीला सेन्ट पीटर
हायस्कूलमध्ये इयत्ता 5 वी मध्ये घातले होते. मुलीवर अतिशय प्रेम.
तिचे नाव मयूरी. मयूरीला शाळेत नेण्या-आणण्यासाठी त्या स्वतः
जात. त्या मयुरीला आणण्यासाठी आपल्या फियाट गाडीने निघत व
शाळेत बरोबर 4-45 वाजता संध्याकाळी पोहचत. मयूरी त्यांच्यासाठी
वाट पहात राही व फियाट आल्याबरोबर त्यात लगेच शिरत असे व
नंतर कधीही उशीर न होता दोघी घरी येत. हा त्यांचा नेहमीचा
कार्यक्रम ठरलेला होता.

एकदा, मात्र 7 फेब्रुवारी रोजी मयूरीने सांगितले होते की शाळा
एक तास उशीर सुटणार होती. त्यानुसार सौ. सुनीताबाई
संध्याकाळी नेहमीपेक्षाबरोबर 1 तास उशिरा निघाल्या. अर्थातच,
जितकी उशिरा शाळा सुटणार होती, तितकी उशिरा सुटली नाही
म्हणून , मयूरीने घरी फोन न करता 4-45 वाजता घरी येण्यास
सुरुवात केली. अर्धा तास चालल्यावर मयूरी रस्त्याच्या एका टोकाला
आपल्या फियाट गाडीची वाट पाहत बसली, जेव्हा ती गाडी आली तेव्हा
त्यामध्ये ती चटकन बसली व त्या दोघी घरी आल्या. त्या नेहमी-
पेक्षा 48 मिनिटे उशीरा घरी पोहचल्या.

तर रस्त्यावर मयूरी किती मिनीटे बसली होती ?
पान नं. - 49
36 . वसाहतीचे भाग पाडा

हा काटकोन चौकोन म्हणजे एका वसाहतीचा नकाशा आहे.
त्यामधील प्रत्येक चौरस म्हणजे एक घर आहे. आणि प्रत्येक चौरसातील
संख्या त्या त्या घरात रहाणाऱ्या एकूण लोकांची संख्या दर्शवते.
आता, गावातील वसाहत आहे. म्हणून ग्रामपंचायतीला या वसाहतीचे
आठच भाग पाडावयाचे आहेत. आणि प्रत्येक भागामध्ये बरोबर 14
लोकच रहावयास हवेत. अशा तऱ्हेने त्यांना करावयाचे आहे, मग
तुम्ही हे कसे कराल ? तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर ग्रामपंचायतीला
कसे भाग पाडावयाचे हे सांगून मदत करा.

वसाहतीचे किती भाग पडतील ? कसे ?
पान नं. - 50

37 . गराज आणि गाडया

फर्नांडिसचे 'रेक्स ऑटोमोबाईल गराज' फारच नावाजलेले होते.
तेथे मोटारी, लॉऱ्या, स्कूटर्स, थ्री-व्हिलर्स, मोटार-सायकली सर्व काही
दुरुस्तीसाठी येत. श्री. फर्नांडिस हा मनुष्यही सुस्वभावाचा आणि
लहरी व मजेदार. कधी कधी , कामाचा कंटाळा आला तर दुसऱ्या
हाताखालच्या माणसांबरोबर थट्टा-विनोद-गप्पा करीत बसे.

या क्षणाला, त्याच्याकडे एकूण 15 वाहने दुरुस्तीसाठी आली
होती. त्यामध्ये एक सहा-चाकी लॉरी, एक तीन चाकी टेम्पो, काही
मोटारसायकली व काही फियाट मोटारी होत्या. केवळ वेळ जावा म्हणून
श्री. फर्नांडिस गराजमध्ये असलेल्या सर्व वाहनांची चाके मोजू लागला.
(अर्थातच त्यात स्टेप्नी-व्हील्सचा समावेश नव्हता.) त्याच्या एकूण 15
वाहनांची 43 चाके होती.

किती मोटारी व किती मोटार-सायकली ?
पान नं. - 51

38 . खून

खेतवाडीच्या 7 व्या गल्लीत खून झाला होता. पोलीस इन्स्पेक्टर
रणजितराव चव्हाण हे जारीने तपास करीत होते. वरून सारखा दट्टया
आला होता. रात्रंदिवस झोप गेली रणजितरावांची ! काय करणार !
शेवटी त्यांच्या हाती चार संशयित खुनी आले. खुनींची नावे होती -
अब्दुल, बळीराम, कासिम, दामू.

रणजितरावांनी त्यांची उलटतपासणी सुरू केली. तेव्हा त्यांना
सी. आय. डी. ब्रँचतर्फे कळले की, प्रत्येकजण एक खरे विधान व एक
खोटे विधान करतो. लवकरच त्या पोलीस डिपार्टमेंटने खुनी शोधून
काढला. तुम्ही शोधून काढाल काय ?

अब्दूल म्हणाला, " मी खून केला नाही. बळीरामने केला."
बळीराम म्हणाला, " अब्दुलने खून केला नाही. कासिमने केला."
कासिम म्हणाला, " बळीरामने खून केला नाही. मी केला."
दामू म्हणाला, " कासिमने खून केला नाही. अब्दुलने केला."

खूनी शोधून काढाल काय ?
पान नं. - 52

39. रंगीबेरंगी मणी

पुढे मण्यांची आकर्षक गोलाकार रिंग दाखविली आहे. त्यामधील
काही मणी निघून गेले आहेत. ते हरवले आहेत पण बाजारात यातील
सुटे मणी विकत मिळतात व रिंगला ते लावण्यासाठी व्यवस्था
उत्तम आहे. मणी वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत, पण ते विशिष्ट
क्रमानेच बसविलेले आहेत.

अ,ब,क,ड,य,र,ल,व येथील मण्यांचे डिझाईन कोणते ?
पान नं. - 54

40 . ऑफिस कर्मचारी

एका फॅक्टरीचे ऑफिस होते फोर्टमध्ये ! एक दिवस पाच जणांनी
सूटबूट घालून फोटो काढला. कारण सर्व पाचही अधिकारी वरच्या
हुद्दयावरील होते आणि आज विशेष खुशीत होते. पुढील माहितीवरून
कोण , काय ते ओळखा.

फोटोमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर, इंजिनिअर, सुपरवायझर, हेडक्लार्क
कॅशियर असे पाचच जण होते. कॅशिअर हा फोटोमध्ये टोकाला आहे.

श्री. कामत हे इंजिनिअर नाहीत.
श्री. भोळे हे मॅनेजिंग डायरेक्टर आणि हेडक्लार्क यांच्यामध्ये आहेत.
श्री. चौबळ हा हेडक्लार्कचा पुतण्या आहे.
श्री. मेहतांच्या उजव्या बाजूला कोणीही नाही.
श्री. चौबळ हे श्री. मेहतांच्या डाव्या बाजूला उभे आहेत.
श्री. दवे यांच्या पत्नीला नुकतेच बाळ झाले.

तर प्रत्येकाचे नाव आणि काम सांगा ?
पान नं. - 56

41 . विवाह

कुमुद, सुनीता आणि वंदना ह्या पुढे दाखविलेल्या तीन व्यक्तीबरोबर
लग्न करणार आङेत.
कोण कोणाशी लग्न करील, जर -
अनिल हा कॉलेज-प्राध्यापक आहे.
सुनीता हिचा साहित्यिकाबरोबर साखरपुडा झालेला नाही.
राजकीय पुढाऱ्याची भावी पत्नी वंदना नाही.
राहुल याचा साखरपुडा कुमुदबरोबर झालेला आहे.
किशोर हा राजकीय पुढारी आहे.

तर कोणाते लग्न कोणाबरोबर ?
पान नं. - 57

42 . करा वाटणी, सांगा वय !

प्रदीप, मिलिंद आणि सुनील यांच्याकडे काचेच्या आकर्षक 770
गोटयांनी भरलेली एक पिशवी दिली आणि त्यांना निक्षून सांगितले
की, " भांडू नका आपापसात, या गोटया तुमच्या हल्लीच्या वयाच्या
प्रमाणात वाटून घ्या."

या तिघांच्या हल्लीच्या ( आजच्या) वयांची बेरीज आहे 17।। वर्षे
जेव्हा प्रदीपला 4 गोटया मिळतात, तेव्हा मिलिंदला 3 गोटया मिळतात,
आणि जेव्हा प्रदीप 6 गोटया घेतो, तेव्हा सुनीलला 7 गोटया मिळतात.
तर या सर्व गोष्टींवरून , सर्व वाटणी पूर्ण झाल्यावर......

प्रत्येकाला किती गोटया मिळतील
प्रत्येकाचे आजचे वय काय ?
पान नं. - 58

43 . दोन आगगाडया

दोन आगगाडया विरूद्ध दिशेने जात होत्या. त्या जवळ जवळ
असलेल्या रेल्वेमार्गावरून निघून गेल्या. मनमाडला जाणाऱ्या गाडीला
चार डबे होते तर मनमाडहून निघणाऱ्या गाडीला दुप्पट डबे होते.
म्हणजेच ती दुप्पट लांब होती. परंतु, कमी लांबीची गाडी दुसऱ्या
लांबीने जास्त असलेल्या गाडीच्या दुप्पट वेगाने प्रवास करीत होती.

जर दोन्ही गाडया एकमेकांना भेटून जाण्यास 30 सेकंद लागत
असतील तर -

(1) दोन्ही गाडयांनी वेगांची अदलाबदल केल्यास -म्हणजेच
लहान लांबीच्या गाडीने आपला वेग अर्धा केला आणि जास्त लांबीच्या
गाडीने आपला वेग दुप्पट केल्यास , दोन्ही गाडया एकमेकांना किती
वेळाने भेटतील ?

(2) जर दोन्ही गाडयांनी पूर्वीचाच मूळ वेग धरला, परंतु
मनमाडहून निघणाऱ्या गाडीची लांबी पूर्वीच्या लांबीपेक्षा अर्धी केली
तर दोन्ही गाडया एकमेकांना किती वेळाने भेटतील ?

दोन्ही गाडया किती वेळांत भेटतील ?
पान नं. - 59

44 . चुकीचे वर्तमानपत्र

'मॉडेल अपार्टमेन्टस््' मध्ये चारच मोठे ब्लॉक्स आहेत. तरीसुद्धा
हल्ली वर्तमानपत्र टाकणारा पोऱ्या नवीन आला. तो प्रत्येकाच्या
घरी चुकीचे वर्तमानपत्र टाकतो. मी 'महाराष्ट्र टाईम्स' घेतो पण तो
माझ्याकडे 'सकाळ' टाकतो. त्याचप्रमाणे तो बाकीच्या तिन्ही घरीही
करतो.

आम्हा चारी ब्लॉक्समध्ये वेगवेगळीच वर्तमानपत्रे घेण्यात येतात.
नेहमी ! तर अशा परिस्थितीत किती रीतीने वर्तमानपत्रे टाकण्यात
येतील ?

एकूण तऱ्हा किती ?
पान नं. - 61

45 . ज्ञानकोशाचे खंड

विनय आज अगदी खुशीत होता. तो ज्ञानकोशाचे खंड चाळत
बसला होता. विद्वान झाला वाटतं ! काल त्याचा वाढदिवस म्हणून मी
त्याला उत्तम असे ज्ञानकोशाचे सर्वच्या सर्व खंड बक्षिस दिले. म्हटलं,
पोरगा आज ना उद्या नाव काढील. दुसऱ्या खंडामध्ये पहिल्या खंडातील
पानांपेक्षा 2 पाने जास्त होती. तिसऱ्या खंडामध्ये दुसऱ्या खंडातील
पानांपेक्षा 3 पाने जास्त होती. इ. अशा तऱ्हेने पाने होती प्रत्येक
खंडात ! जेवढे खंड होते त्या संख्येच्या वर्गाच्या संख्येपेक्षा एकाने
अधिक इतकी पाने पहिल्या खंडात होती. शेवटच्या खंडांत 610 पाने
होती.

तर एकूण किती खंड होते ?
पान नं. - 62

46 . परीक्षा आणि नंबर !

आज मुलांची महत्वाची परीक्षा होती. त्यावर त्यांच भवितव्य
अवलंबून होतं. प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न करून प्रश्नपत्रिका सोडविली
होती. स्पर्धा-परीक्षा होती ती. त्या परीक्षेच्या वेळी अनिल, बाळू, चंदू
दिनू, विनय असे पाचहीजण बाहेर आले व पुढीलप्रमाणे संभाषण करू
लागले.

अनिल : बाळू हा चंदूपेक्षा दोन नंबराने ( क्रमांकाने) पुढे येईल.
बाळू : मी तिसरा येईन.
चंदू : दिनू पहिला येणार.
दिनू : बाळू दुसरा येणार .
विनय : चंदू हा अनिलपेक्षा तीन नंबराने खाली येणार.

यामध्ये गंमत अशी की, ही सर्व भवितव्ये यांची होती. आणि या
भवितव्यातील फक्त एकच भवितव्य ( विधान ) खरे होते, आणि ते
जो पहिला आला होता त्याने केले होते.

तर, परीक्षेतील त्यांचे गुणांच्या द्दष्टीने क्रमांक कोणते ?
पान नं. - 63

47 . बॅडमिंटन

विनयला बॅडमिंटनचे अतिशय वेड. नुकताच डिग्री घेऊन बाहेर
पडला होता आणि नोकरीही एका इंग्लिश कंपनीत मिळाली होती.
रविवारी सुट्टी , शिवाय, ऑफिसातून इतर दिवशी लवकर निघे. कामाचे
फारसे प्रेशर नव्हते स्वारीवर ! नशिबवान बेटा ! त्यामुळे जरा वेळ
मिळाला की बॅडमिंटन ! तो प्रत्येक विक््-एन्डच्या दिवशी सकाळी एक
मॅच आणि दुसरी दुपारी . रविवारी हे विक-एन्ड बॅडमिंटनसाठीच
राखून ठेवलेले होते.

1 मार्च पासून तो 26 दिवस ऑफिसात काम करावयास गेला,
परंतु कधीही पूर्ण दिवस भरला नाही. या 26 दिवसात विनय
सकाळी नाहीतर संध्याकाळी एकेक बॅडमिंटन मॅच खेळला.

काल संध्याकाळपर्यंत विनय 25 मॅचेस सकाळी आणि 21 मॅचेस
दुपारी खेळला.

तर , आजची तारीख काय ?
पान नं. - 64

48 . मनोरे आणि विहीर

श्री. सत्यवान खरे हे आपल्या घराच्या खिडकीतून दोन मनोऱ्यांकडे
बघत राहिले. त्यांचे तर्कशास्त्र व गणित चांगले होते. ते म्हणतात.
"माझ्या घरापासून प्रत्येक मनोरा 200 मीटर दूर आहे, आणि त्या
दोन्ही मनोऱ्यांमध्ये एक मोठी विहीर आहे आणि ती प्रत्येक मनोऱ्या
पासून 150 मीटर अंतरावर आहे."

तर श्री. सत्यवान खरे यांच्या खिडकीपासून

विहीर किती दूर आहे ?
पान नं. - 65

49 . सहा बळी

एका संस्थानाचा राजा फार क्रूर. एकदा मनातून एखादी व्यक्ती
उतरली की भरलीच त्याची 100 वर्षे ! एका दरोडेखोरीच्या गुन्ह्यात
36 गुन्हेगार पोलिसाने राजाच्या समोर उभे केले. राजाच न्याय
देणारा असे. त्या 36 गुन्हेगारांत 30 गुन्हेगार तर राजाचे आवडते
होते. आणि बाकी राहिलेल्या 6 गुन्हेगारांना राजा पाण्यात पहात असे.
"चांगला काटा काढू !" राजा स्वगत म्हणाला.

राजाला, कोठल्याही तऱ्हेची कोणावर मेहेरनजर केलेली दाखवावयाची
नव्हती. त्याने डोके खाजविले, विचार केला व आपल्या प्रधानाला
काही कानात सांगितले. प्रधानाने राजाच्या आज्ञेनूसार 36 गुन्हे-
गारांना आणले व आपण स्वतः त्यांना जागा देऊन त्याप्रमाणे
वर्तुळात 36 लोक उभे केले, आणि राजाच्या आज्ञेनुसार रांगेतील
प्रत्येक दहावा याप्रमाणे सहा जणांना फाशी दिले व बाकीच्या 30
जणांना सोडून दिले.

राजाने हे पाहिजे होते तेच लोक 10 वे कसे आणले ?

त्या सहा लोकांना रांगेत कोणत्या जागा दिल्या ?
पान नं. - 66

50 . गोटयांचा खेळ

विनय आणि अनिल दोघेही प्रत्येक दिवशी गोटया खेळतात. विनय
हा अनिलपेक्षा चांगला खेळतो, आणि म्हणून तो जेवढे डाव अनिल
जिंकेल तेवढया डावांस प्रत्येकी 8 गोटया देण्याचे कबूल करतो. आणि
जेव्हा विनय जिंकतो म्हणजेच अनिल हरतो त्या प्रत्येक डावास विनय
फक्त 5 च गोटया घेण्याचे कबूल करतो.

दोघेही दररोज खेळतात व जिंकलेल्या गोटयांचा हिशेब ठेवतात आणि
महिन्याच्या शेवटच्या तारखेला हिशोब पुरा करतात. 1 मार्च ते 31
मार्चपर्यंत, ते दोघे 26 डाव खेळले, आणि 31 मार्चला संध्याकाळी
हिशेब केला तेव्हा असे समजून आले की कोणाचेही कोण देणे नाही.
कारण फिटंफाटच झाली होती.

तर अनिल किती डाव जिंकला ?
पान नं. - 67

51 . कोठे चाललो ?

बंडोपंत चालण्यात मजबूत. त्यांचे वय होते जवळ जवळ 68 च्या
घरात. पण देहयष्टी मजबूत. रोज सकाळी फिरावयास जात.

एके दिवशी ते घरापासून निघाले. 3 मैल पूर्वेच्या दिशेने चालले.
नंतर लगेच 3 मैल उत्तरेच्या दिशेने चालले आणि नंतर 2 मैल
ईशान्येकडे चालले. तर ते घरापासून किती मैल दूर आहेत आता ?

घरापासून किती दूर ?
*
﻿
सखाराम पांडुरंग बरवे
03-07-25
Marathi
एकूण पाने :- 51
FROM 9 TO 100

पान नं. - 9

1 राग-मारवा

मारवा राग हा मारवा थाटातू तयार झाला असून पंचम स्वर वर्ज असल्याने
हा षाडव जातीचा समजतात. याचे रिषभ कोमल, मध्यम तीव्र आणि गंधार, निषाद,
हे स्वर शुद्ध आहेत. आरोहाला सुरुवात मंद्र निषादापासून करतात. यात वादी
संवादी रिषभ धैवत आहे. वादी संवादी एकमेकांचे मध्यम पंचम असतात, ह्या
नियमाला हा राग अपवाद आहे. याचा गाण्याचा समय अस्तमानकाली, याबद्दल
मात्र सर्वांचे एकमत आहे. याचे चलन म्हणजे रागविस्तार-तिन्ही सप्तकात होत
असले तरी याची प्रकृती फारशी गंभीर नाही. कुणी कुणी आरोहात निषाद वक्र
करतात. जलदीने ताना घेतेवेळी तो तसा येत नसला तरी सावकाश स्वरविस्तार
करताना मध्य सप्तकातील निषादावरून जोरकसपणे धैवत घेण्यातच या रागाचे
वैशिष्टय आहे. रि हा स्वर वादी असल्याने त्याला बरेच महत्व द्यावे. म्हणजे याच

पान नं. - 10

रागासारखा असलेल्या पूरिया रागाहून हा सहजच निराळा दिसेल, 'निरी गम
निधs मगरि s गमगरी s सा' एवढेच स्वर तुम्ही तडफेने वाजवाल तर तुमचा मारवा
राग चतुर श्रोते तेव्हाच कबूल करतील.

पान नं. - 12

2 राग-पूर्वी

कगवा बोले मोरि अटरिया । अटरिया सकुन्भइलवा । सखिमोरी
भुजवा फरकन लागी ।।धृ.।। अवन करो तुम मोरे पियरवा डांरू
गले फूलनके हरवा । सखिरी उनपर तनमन धारूं ।।1।।

पद पूर्वी-त्रिताल ( संशयकल्लोळ )

हा खचित दिसत मम भाग्यकाल ।। मोहूनी त्यांच्या कपट
भाषणा । नाहिं सोडिलें सदन काल ।। धृ.।। श्रीयुत संभविती
दे दाविती । परी आचारणीं उलट चाल ।।1।। भल्या हीन मग
गणिका आम्ही । उघड घालितो मोह जाल ।।2।।

हा राग पूर्वी थाटातून तयार झाला असून संपूर्ण जातीचा आहे. याला ग नी शुद्ध
रे ध कोमल आणि मध्यम दोन्ही लागतात. परंतु शुद्ध मध्यम ग म प किंवा प म ग असा सरळ
शुद्ध मध्यावर विराम विश्रांती मुळीच घ्यावयाचा नाही. तसा घेतला तर उत्तम रागापैकी
वसंतबहार या रागाचा भास होतो. तो भास टाळणे महत्वाचे आहे. याचे वादी संवादी ग नी
असून याची प्रकृती गंभीर असल्याने विलंबित लयीतील गीतेचे राग- स्वरूपाला पोषक
होतात. याच्या अंतऱ्याची सुरुवात म ग म धू अशा तऱ्हेने होते. तीव्र मध्यम व कोमल धैवत
यांची संगती करुणा, चिंता , भीती ह्या भावना निर्माण करणारी आहे. दिवसाच्या शेवटी
राग गातात. सारेगs मग s पमगमग s रे सा ही याची मुख्य पकड आहे.

पान नं. - 15

3 राग -केदार

कल्याण थाटजन्य द्विमध्यम रागांपैकी केदार हा वक्र -संपूर्ण जातीचा राग आहे.
प्रचारात याचे चार प्रकार प्रसिद्ध असल्याने शुद्ध केदार कोणता याविषयी तज्ञाचे मतभेद
आहेत. कल्याणथाटीय असल्याने दोन मध्यम घ्यावे हे बरोबर आहे, पण काही गायक याला
बिलावल थाटातील मानून तीव्र मध्यम टाळतात, तर काही विद्वान दोन मध्यम तर घेतातच
शिवाय धैवताच्या आश्रयाने कोमल निषादाचा कधीमधी उपयोग करतात. काही गायक
गंधार स्पष्ट न घेता तो असत््प्राय मानतात, तर कित्येक अवरोह करतेवेळी गमरेसा
असा स्पष्ट घेतात. परंतु सर्वसाधारण पद्धतीने याचे स्वरूप असे आहे, रेगधनी शुद्ध आणि
दोन मध्यम, शुद्ध मध्यमाशी फक्त अवरोहात गंधार आणि विवादी या नात्याने क्वचित
कोमल निषाद. याची प्रकृति गंभीर असून सा म ही स्वर संगती रौद्र रसाला पोषक आहे.

पान नं. - 16

याचे वादी संवादी शुद्ध मध्यम व षड््ज आहेत. आरोहात सा रे सा म अशी सुरुवात होते.
रात्रीच्या पहिल्या प्रहरी हा गाणे उचित आहे. दोन मध्यम घेणाऱ्या थाटजन्य रागात
आरोहात निषाद वक्र होतो, अर्थात हा नियम यालाही लागू आहेच, यात विशेष खुबी ही की
म म असे मध्यम बरोबर घेता येतात. तसे मध्यम प्रातर्गेय ललित रागात मात्र घेता
येतात. कामोद व हमीर या रागाहून हा निराळा ठेवण्यात गमरेसा हा प्रयोग टाळणे मला
अवश्य वाटल्याने व गंधार असत््प्राय ठेवण्याचीच पद्धती मी स्वीकारली आहे. याची मुख्य
पकड सा s ममs पपs धमपs रेसाs अशी आहे.

पान नं. - 18

4 राग-कामोद

कामोद राग कल्याण थाटातील असल्याने मध्यम दोन्ही व इतर सर्व शुद्ध लागतात.
या रागात मध्यमावर विश्रांती घ्यावयाची नाही. आरोहात ग म हे स्वर वर्ज असून
निषाद वक्र आहे. अवरोहात निषाद वर्ज करावा अशी ग्रंथोक्ति असली तरी प्रचारात तो तसा
न करता सांनि धप मप धप असा घेतात. परंतु या रागात निषाद व गंधार या स्वरांना महत्व
मुळीच नाही, हे विसरता कामा नये. हा वक्र संपूर्ण जातीचा असून याचे वादी संवादी
अनुक्रमे प रे आहेत. गाण्याच समय रात्रीचा पहिला प्रहर सर्वसंमत आहे. कल्याण थाटीय
द्विमध्यम रागात अवरोहात गंधार वक्र असतो हा नियम या रागात अवश्य पाळावा लागतो.
तीव्र मध्यम गमप किंवा पमग असा सरळ न घेता मपधप अथवा मपगमप असा घ्यावा.
लागतो. याची प्रकृती गंभीर असून रेsपs ही स्वरसंगती रागपोषक आहे. रेपs गमप
गमरेसा रेपs एवढा स्वरसमुदाय घेतल्यास तत्सम इतर रागाहून हा निराळा दिसेल. या
थाटातील रागांच्या अंतऱ्याची सुरुवात पप सांर्रैसां अशी होते, म्हणून कोमाद, केदार, हमीर,

पान नं. - 19

जैत, श्याम वगैरे रागांचे अंतर सारखेच ( स्थूल मानाने) दिसतात, अतएव आपल्याला
रागविस्तार करावयाचा तो अस्ताईतच चांगल्या तऱ्हेने करून श्रोत्यांच्या मनावर स्वीकृत
रागाचा परिणाम करावा.

पान नं. - 21

5. राग - हमीर

हमीर राग कल्याण थाटजन्य असून वक्रसंपूर्ण जातीचा आहे. याचे वादी संवादी ध
ग असून रात्रीच्या पहिल्या प्रहरी गाण्याचा प्रघात आहे. म्हणून ध हा उत्तरागीय असल्याने
कुणी कुणी पंचम वादी ठेवतात. पण हे मत सर्वानाच ग्राह्य वाटणार नाही. या रागात दोन
मध्यम व इतर सर्व स्वर शुद्ध आहेत आणि तीव्र मध्यमाचा उपयोग कामोदासारखाच
करावयाचा असतो. यात विशेष ठळक गोष्ट म्हणजे आरोहात पंचम वर्ज आहे आणि सा रे ग
म असे सरळ स्वर येतात. पुढे प ध नि सां असे न घेता ध s नि ध सां असे घ्यावे. याचे
चलन मध्य व तार सप्तकात विशेष होते. याची प्रकृती कामोद, केदारासारखी फार गंभीर
नाही, ग म ध s गे स्वरांचे त्रिकूट निश्चय, प्रतिज्ञा असले भाव दर्शविणारे आहे. अवरोह
सां नि ध म प ध ग म रे सा असा वक्र जातीने लागतो. ग म ध s नि ध s म प ग म
ध s ही याची मुख्य पकड आहे.

पान नं. - 24

6 राग - दुर्गा

दुर्गा राग खमाजथाटीय व बिलावल थाटातील असा दोन प्रकारचा आहे. खमाज
थाटातील दुर्गात असून क्वचित कोमल निषाद व ग म नी शुद्ध लागतात, पण
बिलावल दक्षिणेकडचा प्रकारच लोकविश्रुत असल्याने प्रस्तृत तोच दिला आहे.
काही विद्वान याला कर्नाटकी दुर्गा असे म्हणतात, यात ग नी हे दोन स्वर वर्ज व इतर सर्व
शुद्ध आहेत. याची जाती ओडव असून गाण्याचा समय रात्रीचा दुसरा प्रहर मानतात. याचे
वादी संवादी ध रे आहेत. तरी मध्यमाला महत्व फारच द्यावे लागते. ध प म रे प s एवढयाच
स्वरावरून तुमचा राग चतुर श्रोते ओळखतील, ध प म असा तुकडा घेतल्याने क्षणभर

पान नं. - 25

कैदारचा भास होईल. पण त्याला जोडून रे प s हे स्वर घेतले म्हणजे पुन्हा याचे स्वरूप
विकास पावेल. शिवाय केदारच्या मध्यमास गंधाराचा कण नेहमी लागत असतो आणि याला
तर निखालस वर्ज करावयाचा आहे. याच्या अंतऱ्याची सुरुवात ध म प ध सां किंवा म प
ध सां अशी होते. प ध सां s प ध सां असा तुकडा घेतला तर भूपालीचा भास होईल. प म रे
सा असा तुकडा घेतलात तर सारंगीची छाया दिसेल. म्हणून म प ध सां आणि म रे ध ला
असे स्वर घ्यावे.

पान नं. - 28

7 राग - देसकार

देसकार अथवा देशिकारराग बिलावल थाटापासून तयार झाला असून यात म नी हे
दोन स्वर वर्ज आहेत आणि रे म ध हे स्वर शुद्ध आहेत. हा पाच स्वरांचा असल्याने याची
जाची ओडव झाली. याची वादी संवादी अनुक्रमे धैवत आणि गांधार आहेत. गाण्याचा समय
प्रातःकाल आहे. याचे चलन मध्य व तार सप्तकात होत असले तरी प्रकृति फार गंभीर असून
प्रातर्गेय रागात बुद्धीचे जाडय घालवून कार्यप्रवण करण्यास फारच अनुकूल आहे. यातील
मध्यम व सप्तकीय धैवत पुनःपुन्हा दाखवण्यातच याचे कौशल्य आहे. ते कृत्य बरोबर साधले
नाही तर भूपाली रागाची छाया उत्पन्न होण्याचा संभव आहे. साधारण गायकाला भूपाली
आणि देसकार यातील फरक दाखविणे जरा अवघडच जाणार. जलद ताना घेतेवळी तर
पुष्कळ गायक याला भूपालीतच ढकलतात, म्हणून विचारी अभ्यासकाने यात विशेष
तानबाजी न करता स्वर रचनेनेत हा राग चांगला तयार करावा. ध प गपधप, गरेसा धप

पान नं. - 29

इतके स्वर सावकाश घेतले की याचे स्वरूप स्वच्छ दिसेल.

पान नं. - 31

8. राग - हिंदोल

हिंदोल किंवा हिंडोल हा राग कल्याणथाटजन्य असून मध्यम - तीव्र, गंधार
धैवत, निषाद शुद्ध आणि रे प हे स्वर वर्ज आहेत. याची जाती ओडव असून वादी संवादी
अनुक्रमे धैवत आणि गंधार आहेत. गाण्याचा समय प्रातःकाल सर्वसंमत आहे. तीव्र
मध्यमाचा प्रातर्गेय राग प्रचारात हा एकच असल्याने त्या वेळेच्या इतर रागाहून याचे स्वरूप
निराळेच दिसते. हिंदोलात निषादाला मुळीच महत्व द्यावयाचे नाही. इतकेच नव्हे तर
आरोहात तो वर्ज करून अवरोहातसुद्धा सां ध या दोन स्वरांमध्ये प्रच्छन्न करावा लागतो.
म ध नि सा असा घेतल्याने सोहनी आणि सां नि, धर्म असा घेतल्याने पुरिया या रागाची
छाया यात दिसेल, म्हणून मध सांध, धम गसा ध सां अशी पकड घेतल्याने याचे स्वरूप

पान नं. - 32

स्पष्ट होईल. या रागात जेव्हा सां ध असे स्वर येतील तेव्हा सां वरून ध या स्वरावर येताना
मधला निषाद धैवताला जोडून घ्यावा.

पान नं. - 34

9. राग - शंकरा

शंकरा राग बिलावल थाटातून तयार झाला असून याचे प्रचारात ओडव आणि षाडव
असे दोन प्रकार प्रसिद्ध आहेत. यात मध्यम वर्ज असून इतर स्वर शुद्ध लागतात. ओडव
शंकरा रे म वर्ज करून गातात आणि षाडव प्रकारात फक्त म वर्ज करतात. ग नी या स्वरांना
महत्व असून ते रे ध याना नाही. या रागात सा पासून प पर्यंत मालश्री रागाचा व प पासून सां
पर्यंत बिहागाचा भास होतो. तो तसा होण्याचे कारण म्हणजे शंकरा रागाच्या आरोहात रे ध
वर्ज करावा लागतो. परंतु यात निषाद वक्र आहे असे बिहागात नाही. अवरोहातसुद्धा नि ध
सां नि प असा तुकडा लागतो. बिहागात सांनि धप असा सरळ येतो. गपगरे, सां
या तुकडयाने मालश्री दूर होतो. याचे वादी संवादी कुणी सा प असे , तर कुणी ग नी
मानतात. रात्रीचा दुसरा प्रहर गाण्याची वेळ असल्याने ग नी वादी संवादीच अधिक
शोभतात, सागप, निध, सांनप, गपगरेसा, ही याची मुख्य पकड आहे. याचे चलन मध्य व

पान नं. -35

तार सप्तकात विशेष होत असल्याने प्रकृती गंभीर नाही. हा हास्यरसाला पोषक आहे.
याच रागात धैवत वर्ज करून आणि रिषभ जरा जास्त वाढवून दक्षिणेकडे एक प्रकार
(हंसध्वनि) फार प्रसिद्ध आहे, त्यालाच सामान्य गायक शंकराराग म्हणतात.

पान नं. - 38

10. राग - तिलक कामोद

तिलक कामोद हा षाडव -संपूर्ण खमाज थाटजन्य राग असून यात सर्व स्वर शुद्ध
आणि किंचित कोमल निषाद लागतो. परंतु बिलावल थाटजन्य माननारे काही विद्वान तो
टाळतात. देस आणि सोरट या खमाजथाटीय रागांशी याचे साम्य असल्याने कोमल निषाद
सोडल्याने बरेच काही काम सुलभ होते, पण तो निषाद अल्प प्रमाणात ठेवूनही याचे रूप सुन्दर
दिसते. याच्या आरोहात धैवत वर्ज केल्याने देस रागासारखा हा दिसतो खरा. म्हणून रमपध
मपनिसां असा धैवत वक्र घेतल्याने देस दूर होतो आणि अवरोह सां, धम, ग , सांनि, रेगतां
असा घेतल्याने दोन्ही निराळेच राहतात, पण जलद ताना घेताना सरळ अवरोह करूनसुद्धा
कुशल गायक याचे रूप बिघडू देत नाहीत. हा क्षुद्र प्रकृतीचा राग असून याचे चलन मात्र
तिन्ही सप्तकात होते. वादी संवादी सा प आहेत. गाण्याचा समय रात्रीचा दुसरा प्रहर

पान नं. - 39

सर्वसामान्य असला तरी सार्वकालिक रागांपैकी हा मानावयास हरकत नाही. पनिसारेगता
हा रागवाचक तुकडा आहे.

पान नं. - 42

11. राग-सारंग

ब्रिन्दावनिसारंग हा काफी थाटीय ओडव जातीचा राग असून गंधार धैवत हे दोन
स्वर यात वर्ज आहेत. रिषभ व मध्यम शुद्ध असून निषाद आरोहात शुद्ध आणि अवरोहात
कोमल याप्रमाणे दोन्ही लागतात. वादी संवादी रिषभ पंचम आहेत. गाण्याचा समय
मध्यान्हकाल सर्व संमत आहे. ब्रिन्दावनी किंवा बृन्दावनी सारंगाला प्रचारात फक्त सारंग या
नावानेच संबोधतात. यातील दोन-निषादांवरून हा खमाज थाटजन्य असावा असे वाटते,
परंतु ग्रंथकार याचा थाट काफीच सांगतात. इतकेच नव्हे तर सारंगातील सर्व प्रकार काफी
थाटजन्यच आहेत असे त्यांचे स्पष्ट सांगणे आहे. याच्या अवरोहात क्वचित्् शुद्ध धैवत

पान नं. - 43

वापरण्यास शास्त्राची संमती आहे, पण तसा तो फारसा कुणी वापरत नाहीत, याचे कारण
सूरदासी-मल्हार नावाच्या रागाचे साद्दश होय. यात मध्यम आणि कोमल निषाद हे जास्त
महत्वाचे घेऊ नये, ते तसे घेतले तर सारंगाचा तेव्हाच तिलंग होईल. नित्तारे , मरे, पमरे, ता
हा राग वाचक तुकडा आहे, याचे चलन मध्य व तार सप्तकात विशेष होते. अंतऱ्याची
सुरुवात मपनिप्् नितां अशी होते. आनंद व उपरोध हे भाव दर्शविण्यास हा राग योग्य आहे.

पान नं. - 45

12 राग - देस

देस हा खमाज थाटजन्य ओडव-संपूर्ण जातीचा राग असून यात निषाद दोन्ही व
इतर सर्व स्वर शुद्ध आहेत. आरोहात ग ध वर्ज आणि अवरोह संपूर्ण आहे. याचे वादी संवादी
रे प आहेत आणि गाण्याचा समय रात्रीचा दुसरा प्रहर आहे. याचा विस्तार मध्य व तार
सप्तकात होत असून हा क्षुद्र प्रकृतीचा राग आहे. काही गायक यात विवादी म्हणून किंचित
कोमल गंधाराचा उपयोग करतात. सोरट नावाच्या रागाशी याचे बरेच साम्य आहे. अवरोहात
ग रे ग सा असा रिषभ वक्र केल्याने पूर्वांगाचा भाग स्पष्ट निराळा होतो. उत्तरांगात निधsप
असा सोरटात धैवत वाढवावा लागत, तसा देसात वाढण्याची गरज नाही. सोरटात कोमल
गंधार रेsग््s, लारेनिसा असा स्पष्ट घ्यावा लागतो. यात तो मुळीच न घेतल्याने कार्य सुकर

पान नं. - 46

होते. ज्या रागात आरोहात धैवत वर्ज असतो. त्या रागात निषादाला महत्व फारच येते.
( अर्थात आरोहातच) याची उदाहरणे- शंकरा, बिहाग, मुलतानी, पटदीप वगैरे रागातील
आरोहीनिषाद आहेत. रेरे, मप, निधपs मगरे, गसा ही याची पकड आहे. तिरस्कार
तुच्छता या भावनाना हा राग अनुकूल आहे.

पान नं. - 48

13. राग-पटदीप ( धनाश्री)

धनाश्री हा राग काफी थाटातून तयार झाला असून याचे दोन प्रकार प्रसिद्ध आहेत.
पहिल्या प्रकारात ग कोमल रे म ध शुद्ध आणि निषाद दोन्ही घेतात आणि दुसऱ्या प्रकारात
एकच निषाद घेऊन त्याला पटदीप असे नाव देतात. पैकी पटदीप प्रकार फार लोकप्रिय
असल्याने त्याचाच समावेश या पुस्तकात करण्यात येत आहे.

पटदीप ओडव-संपूर्ण जातीचा असून, भीमपलासीप्रमाणे आरोहात रे ध वर्ज असून
त्याला मंद्रनिषादापासून सुरुवात होते. अवरोह संपूर्ण आहे. रे म ध नि हे स्वर शुद्ध असून
गंधार कोमल लागतो. म्हणून याच्या थाटाविषयी मतभेद आहे. वादी संवादी षडज्् पंचम
असून गाण्याचा समय अपरान्हकाल आहे '' रागकल्पद्रुमांकुरात'' ''स्वरास्तु
मृदवोsखिला'' असे याचे वर्णन आहे ते प्रसुत प्रकाराशी जुळत नाही . आपला
धनाश्री किंवा पटदीप हा वरील वर्णनाहून फारच निराळा आहे. यातील मध्य निषाद पुनःपुन्हा
दाखविल्याने

पान नं. - 49

रागाचे स्वरूप जास्त स्पष्ट होते. मध्य निषादावरून मंद्रनिषादावर येऊन मध्य षड््जाला
मिळण्याचे प्रयोग वारंवार केल्याने रागाचे वैचित्र्य वाढते. म प, नि नि ध प, म ग्् रे, नि सा
ही त्याची मुख्य पकड आहे.

पान नं. - 51

14 राग - वागीश्वरी ( यागेश्री)

वागीश्वरी किंवा बागेश्री हा काफी थाटजन्य रागापैकी फार लोकप्रिय असा ओडव
संपूर्ण जातीचा राग आहे. गंधार निषाद कोमल व इतर सर्व स्वर शुद्ध आहेत. आरोहात रे प
वर्ज असून अवरोहात फक्त पंचम वर्ज करावयाचा आहे, परंतु पचंम अजिबात वर्ज करावा
असे मात्र नव्हे. निधमपग किंवा मपध ग््रेसा असा वक्र पद्धतीने घ्यावा. सां नि ध प म ग्् रे
सा असा सरळ अवरोह केल्याने काफी रागाचे रूप दिसेल. याचे वादी संवादी षडज्् आणि
मध्यम आहेत. गाण्याचा समय रात्रीच्या प्रहराच्या शेवटी सर्वसमंत आहे, कुणी कुणी यात
विवादी या नात्याने किंचित तीव्र गंधाराचा उपयोग करतात. पण तसला प्रकार न केलेला
बरा. याचा धैवत, निषाद व तार षडज्् यापैकी कोणत्याही स्वरावरून घेऊन पुनःपुन्हा
गंधारावार येण्यात या रागाचे वैचित्र्य वाढते. करूण रसातील अनुकूल भाव हा राग निर्माण
करतो. याचे चलन तिन्ही सप्तकात होत असून प्रकृती फार गंभीर आहे.
रेसनिध, रेसा इतक्या स्वरावरून हा राग स्पष्ट ओळखता येतो.

पान नं. - 54

15. राग - जयजयवंती

खमाज थाटजन्य रागापैकी जयजयवंती हा वक्र- संपूर्ण जातीचा राग असून फार
लोकप्रिय आहे. यात गंधार व निषाद हे स्वर तीव्र असून आणि कोमल असे दोन्ही प्रकारचे
लागतात. याचे वादी संवादी अनुक्रमे रिषभ व पंचम आहेत. गाण्याचा समय रात्रीच्या
प्रहराचा शेवट योग्य आहे. आरोहात गंधार निषाद तीव्र घेऊन अवरोह करतेवेळी निषाद मात्र
कोमल करावा. गंधार तीव्रच घेऊन रेग््रेसा असा कोमल गंधार घ्यावा. जलद ताना घेतेवेळी
मगरेसा असा प्रयोग करण्यास हरकत नाही. पंरतु रागविस्तार करतेवेळी मग, रेग््रे, सा
असाच करावा. यातील कोमल निषादाइतके महत्व कोमल गंधारास नाही. फक्त रेंग््रेसा
एवढया तुकडयापुरताच त्याचा उपयोग करावा. याचे चलन मंद्र व मध्य सप्तकात विशेष
असून प्रकृती गंभीर असली तरी शृगार व हास्यरसाला हा उपयुक्त आहे. रेरे, रेंग््रसा
निधप रे ही स्वरपंक्ती रागवाचक आहे. यातील अंतरे देस, सोरट वगैरेप्रमाणे ममपनिसां
असे सुरु होऊन त्या रागाची छाया पसरतात, परंतू निधपरेंग रेसां असे स्वर घेतल्याने इतर
रागांचा भास लुप्त होतो.

पान नं. - 57

16. राग - रागेश्वरी

खमाज थाटातील ओडव-षाडव जातीचा रागेश्वरी हा राग फार लोकप्रिय आहे.
यात पंचम वर्ज असून इतर सर्व स्वर शुद्ध आहेत. खमाजथाटीय असल्याने यात
कोमलनिषादहि येत असला तरी तो आरोहावरोहात नियमाने घेऊ नये. सांनिधनिध््म असा
धैवताच्या वक्रत्वाने कधी कधी घ्यावा. याचे वादी संवादी कुणी षडज्् मध्यम तर कुणी गंधार
धैवत मानतात. खमाज मेलातील असल्याने गंधार धैवतालाच वादी संवादी मानणे योग्य
होय. याच्या आरोहात रे वर्ज करून अवरोहात तो स्पष्ट दाखवावा. म्हणजे यत्सम असलेला

पान नं. - 58

खंबावती राग याच्यापासून निराळा होईल, शिवाय खंबावतीत पंचम ग्राह्य असून ह्या रागाला
तो वर्ज असल्याने दोहोतील हा फारच मोठा फरक मानावयास हरकत नाही. ह्याचा
गाण्याचा समय रात्रीचा दुसरा प्रहर सर्वसंमत आहे, सागsमधमप हा स्वरलाप भयसूचकता
दाखवतो. रेसा निधनिसागम धमगरेsसा हा रागवाचक तुकडा आहे.

पान नं. - 60

17. राग - सिंधुरा (सिंदुरा)

काफी थाटजन्य रागात सिंधुरा हा षाडव - संपूर्ण जातीचा फार लोकविश्रूत राग
आहे. ग्रंथमते याचे गंधार निषाद कोमल असून इतर स्वर शुद्ध आहेत. तथापि तीव्र
निषादाचाही उपयोग प्राय सर्व गायक करतात. आरोहात निषाद वर्ज करावा असे असले
तरी बहुतेक चिजांचे अंतरे मपनिसां असे धैवत वर्ज करून निषाद घेतलेले असतात.
आरोहात गंधार वर्ज केल्याने काफी रागाहून हा निराळा होतो. अवरोहात सानि धप मप ग्् रे
सा असा मध्यम वक्र केल्याने रागवैचित्र्ये वाढते. पण ही निरनिराळी मते असल्याने याच्या
आरोहावरोहांचे एकच स्वरूप प्रचारात नाही आणि सामान्य प्रकृतीच्या रांगाचे असे विविध
प्रकार असतातच, पण याचे ठळक स्वरूप म्हणजे आरोहात गनी वर्ज, अवरोहात मध्यम वक्र
आरोहात निषाद घेणारे तीव्र किंवा कोमल कोणताही घेतात. परंतु तीव्र निषाद घेतला तर
धैवत वर्ज करावा लागतो. याची प्रकृती क्षुद्र असून चलन मध्य व तार सप्तकात होते. यात
ख्यालासारखी भारदस्त गाणी नसतात. , शृंगारीक होऱ्या, ठुंबऱ्या, टप्पे वगैरे गीते असतात.

पान नं. - 61

गाण्याची वेळ सार्वकालिक मानतात. याचे वादी संवादी पंचम षडज्् आहेत.

पान नं. - 63

18. राग - बहार

बहार गा काफीथाटजन्य रागापैकी षाडव - षाडव जातीचा राग असून रात्रीच्या
दुसऱ्या प्रहराच्या शेवटी गाण्याचा प्रघात आहे. ग्रंथोक्त एक कोमल निषादच असला तरी
बहुतेक गायक दोन्ही निषाद घेतात, मात्र तीव्र निषाद मध्य सप्तकीय घ्यावा लागतो आणि
तोही आरोही पद्धतीने. राहिलेल्या स्वरांपैकी गंधार कोमल व इतर शुद्ध स्वर लागतात, कुणी
कुणी मध्यमाच्या आश्रयाने विवादी म्हणून शुद्ध गंधारही किंचित घेतात, पण तो नियम नव्हे
याच्या आरोहात ऋषभ वर्ज करून अवरोहीत धैवत वर्ज करावा, परंतू निघनिप असा वक्र
पद्धतीने घेण्यास मुळीच प्रत्यवाय नाही. आरोहात ग््मपग््मधनिसां असा पंचम वक्र केल्याने

पान नं. - 64

रागरंजकता वाढते. याचे वादी संवादी षडज्् मध्यम आहेत. राग विस्तार मध्य व तार
सप्तकात होत असल्याने हा क्षुद्र प्रकृतीचा मानतात. मपग््म धनिसां ही याची मुख्य पकड
आहे. हा राग इतर पुष्कळ रागांशी मिश्र करतात. ज्या रागात हा मिश्र केला असेल त्या
रागाच्या संयुक्त नावाने ओळखला जातो. उदाहरण बागेश्री रागात मिश्र केल्याने
बागेश्री-बहार, त्याचप्रमाणे वसंत-बहार, भैरव-बहार इत्यादी, परंतु सर्वसाधारण एक
नियम लक्षात ठेवावा तो हा की ज्यात बहार मिश्र असेल , तर राग शुद्ध मध्यम किंवा पंचम
घेणारा असावा लागतो, कारण बहाराचे मिश्रण शुद्ध मध्यमापासून होते.

पान नं. - 67

19 राग - मियां मल्हार

मियां मल्हार हा काफी थाटातील षाडव-षाडव जातीचा राग आहे. याचे वादी
संवादी काही ग्रंथातून षड््ज पंचम सांगितले असले तरी प्रचारात ते मध्यम आणि षडज
मानून हा राग गातात. गाण्याचा समय मध्यरात्र आहे, परंतु वर्षा ऋतूत हा केव्हाही गायला
हरकत नाही. यात ऋषभ मध्यम आणि धैवत हे स्वर शुद्ध असून गंधार कोमल आहे. निषाद
दोन्ही घ्यावयाचे आहेत. ह्याच्या आरोहात गंधार व अवरोहात धैवत वर्ज करावा लागतो.
तीव्र आणि कोमल दोन्ही निषादांचा प्रयोग लागोपाठ करण्यास मोकळीक आहे, इतकेच नव्हे
तर ते योग्य तऱ्हेने घेतल्याने या रागाची ती एक ठळकशी खूणच होईल. याचे चलन तिन्ही
सप्तकात होत असून प्रकृति फार गंभीर आहे. अद्भूत व रौद्र रसाला हा राग पोषक आहे.
मेघ मल्हार, मीराबाईकी मल्हार, सूरदासी मल्हार इत्यादी थोड्या फार फरकाने याचे बरेच
प्रकार असून ते सर्वच मनोहर असल्याने फार लोकप्रिय आहेत. सारेसा, नि प ,म प
निधनिसा, मरे, प, निध निसां ही स्वरपंक्ती म्हणजे मियां मल्हार राजाची मुख्य पकड आहे.

आरोह :- सा, म, रे, प नि, ध नि सां
अवरोह : सां नि प म प, ग् म रे सा

पान नं. 70

20. राग जौनपूरी (जीवनपूरी)

आसावरी थाटातील जौनपूरी किंवा जीवनपूरी हा प्रसिद्ध् रागांपैकी षाडव-संपूर्ण
जातीचा राग आहे. ह्यात गंधार धैवत निषाद हे स्वर कोमल असून रिषभ व मध्यम हे शुद्ध
आहेत. याचा वादी स्वर गंधार असून संवादी धैवत अथवा निषाद मानतात. गाण्याचा समय
दिवसाचा दुसरा प्रहर सर्वसंमत आहे. आसावरी रागही याच रागासारखा असल्याने
दोहोतील थोडक्यात पण स्पष्ट फरक पुढे दिल्याप्रमाणे आहे. आसावरील आरोहात
मोकळीक आहे. इतकेच नव्हे तर फक्त कोमल ऋषभ घेणाऱ्या आसावरीचा एक स्वंतत्र
प्रकारच आहे. आसावरीचे वादी संवादी गंधार धैवत असून निषाद पंचम या स्वराना गौणत्व
आहे. आसावरीची प्रकृति फार गंभीर असून मंद्र, मध्य सप्तकीय स्वरांना विशेष महत्त्व

पान नं. 71
असते. जौनपुरीत आरोहवरोहात निषाद स्पष्ट घ्यावा, कोमल रिषभ या रागात वर्जच आहे.
संवादी निषाद मानल्याने परस्परांचे संवादीही निराळेच झाले. आसावरीतीला धैवताला प्रत्येक
वेळी आंदोलन द्यावे लागते, तसे जीवनपूरीतील धैवताला न दिल्यास चालेल. पंचमाला
महत्त्व द्यावे. हा राग आसावरी इतका गंभीर नसला तरी त्यांचे चलन तिन्ही सप्तकात होत
असून करूणा, अगतिकता इत्यादी भाव व्यक्त करण्यास हा अनुकूल आहे. रेमपन्
धपमप, ग्sरेसा, हा तुकडा रागवाचक आहे.

पान नं. 74

21. राग- दरबारी कानडा (कर्णाट)

कर्णाटक रागालाच प्रचारात दरबारी कानडा असे म्हणतात. हा राग आसावरी
थाटातील असून वक्र संपूर्ण जातीचा आहे. यात गंधार, धैवत व निषाद हे स्वर कोमल असून
रिषभ व मध्यम शुद्ध आहेत. वादी संवादी अनुक्रमे रिषभ व पंचम आहेत. गाण्याचा समय
रात्रीच्या दुसऱ्या प्रहराचा शेवट सर्व संमत आहे. याची प्रकृति गंभीर असून चलन मंद्र व मध्य
सप्तकात होते. यत्सम असलेला अडाणा राग उत्तरांग वादी असून या रागापेक्षा प्रकृतीने जरा
क्षुद्र आहे. याचा आरोह सरळ आहे व अवरोह वक्र आहे. दोन्ही रागात ग््रे, ध््प हे प्रयोग
टाळावयाचे असतात. धनि, सारे, ग््मरेसा, मपधनिसा ही स्वरपंक्ती याचे मुख्यांग असून
आसावरीप्रमाणे याच्या गंधाराला आंदोलन दिल्याने विशेष सुंदर दिसतो. भक्ति, विश्वास हे
भाव प्रगट करण्यास हा योग्य आहे.

पान नं. 76

22. राग-अडाणा

काफी थाटजन्य रागांपैकी अडाणा राग फार लोकप्रिय आहे. ह्यात गंधार, धैतव व
निषाद हे स्वर कोमल असून रिषभ मध्यम शुद्ध आहेत. धैवत तीव्र घेण्याबद्दल ग्रंथाधार
असला तरी एक कोमल धैवतच घेण्याचा प्रघात आहे. कुणी कुणी तारषड््जाच्या आश्रयाने
शुद्ध निषादही आरोही पद्धतीने घेतात, पण त्या निषादावर मुक्काम करीत नाहीत.
आरोहात गंधार वर्ज असून धैवताबद्दल तीन मते प्रचलीत आहेत, ती अशी- धैवत न घेता
पनिसां असा आरोह करणे, मपध््निसां असा सरळ आरोह करणे आणि मपधनिपसां असा
धैवत वक्र घेणे. यापैकी शेवटची - वक्र धैवताची पद्धत संयुक्त वाटल्याने स्वररचनेत व
तानपलट्यातून तीच स्वीकारली आहे. अर्थात हा वक्र- संपूर्ण जातीचा राग झाला.
अवरोहात सांनिध््निप मपगमरेसा असे धैवत, मध्यम आणि गंधार हे स्वर वक्र करावे.
लागतात. काही गायक अवरोहात धैवत वर्ज करतात, पण ते सुहा रागाचे रूप वाटत. ग्रंथोक्त
तीव्र धैवत असला तरी त्याचा उपयोग फार करून करीत नाहीत. अशा तऱ्हेने या रागाबद्दल
विविध मते असली तरी सांध््निप मपसां s निपमप ग््मरेसा हा रागवाचक तुकडा असून

पान नं. 78

प्रत्येकाच्या पद्धतीत हा प्रमुख असतो. त्यामुळे इतर सर्व भेद लुप्त होऊन याचे चलन मंद्र व
मध्य सप्तकात होते. अडाणा राग कानडा रागाइतका गंभीर नसून त्याचे चलन मध्य व तार
सप्तकात विशेष होते. वादी संवादी अनुक्रमे तारषड््ज व पंचम असून गाण्याचा समय
रात्रीच्या तिसऱ्या प्रहराच्या सुरूवातीस आहे. संताप, विराग वगैरे भाव हा व्यक्त करतो.

पान नं. 80

23. राग -पूरिया

पूरिया राग हा मारवा थाटातील प्रमुख रागांपैकी एक लोकप्रिय राग असून
मारवाप्रमाणेच यात पंचम वर्ज, मध्यम तीव्र आणि इतर स्वर शुद्ध आहेत. याची जाती षाडव
असून वादी संवादी गंधार व निषाद आहेत. याची प्रकृती फार गंभीर असून चलन( राग
विस्तार) मंद्र आणि मध्य सप्तकात होते. ज्या रागात मंद्र सप्तकीय स्वर अधिक येतात, तो
तत्सदृश रागमालिकेत गंभीर प्रकृतीचा असतो, असा साधारण नियमच आहे असे म्हटले
तरी चालेल. पूरिया राग गाण्याची वेळ संध्यासमय योग्य होय. सोहनी रागही पूरिया
सारखाच आहे, परंतु तो उत्तरांगवादी असल्याने त्याच्याहून हा सहजच निराळा दिसतो.
दुसरा यत्सदृश्य मारवा. या रागात रेध हे प्रमुख आहेत आणि तेच यात दुर्बल ठेवल्याने
मारवाहि निराळा होतो. पूरियात निषाद आणि मध्यम यांची संगती रागवैचित्य वाढविण्यास
उपयोगी पडते. ख्याल गायक या रागातील आपल्या चिजांची मुख्य जागा मंद्र निषादावर
ठेवतात आणि ते कृत्य फारच मनोहर दिसते. इतकेच नव्हे तर केवळ मंद्र निषादावर पुनः
पुनः मुक्काम केल्याने रागाचे वैशिष्ट्ये विशेष प्रत्ययायस येते. गरे, सानि, म धनि, गम धनि

पान नं. 81
म् धनि सा ही याची मुख्य पडक आहे. कुशल गायक मंद्र सप्तकाली गंधारापासून मध्य
सप्तकीय गंधारापर्यत एकेक स्वर विलंबतीने घेऊन याचे गंभीर स्वरूप श्रोत्यांपुढे उभे करतो,
तेव्हाच दोघांच्याही (गायक आणि राग) श्रेष्ठतेची प्रचिती येते. विरह, उदासीनता, मनाचे
नैराश्य वगैरे भाव हा राग दाखवतो.

पान नं. 83

24. राग सोहनी

मारवा थाटीय रागांपैकी सोहनी हा राग फार प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. ह्यात
पंचमस्वर वर्ज असल्याने जाती षाडव- षाडव झाली. राहिलेल्या स्वरांपैकी रिषभ कोमल
मध्यम तीव्र आणि गंधार धैवत निषाद हे स्वर शुद्ध आहेत. याचे वादी संवादी धैवत आणि
गंधार आहेत. उत्तरांगांतील स्वर वादी असल्याने हा उत्तर रात्रीत गावा हे योग्य आहे. ह्यात
किंचित शुद्ध मध्यम घेण्याविषयी ग्रंथाधार असला तरी तो प्रकार प्रचारात फारसा प्रसिद्ध
नाही. यत्सम असलेल्या मारवा आणि पूरिया रागाहून हा निराळा ठेवण्यास वादी उत्तरांगीय
असल्याने फारसे अवघड जात नाही. याची प्रकृति क्षुद्र असून राग विस्तार मध्य व तार

पान नं. 84

सप्तकात होतो. ह्यातील अंतऱ्याल सुरूवात मधमध सारे सां अशी होते, निषाद व रिषभ हे
स्वतत्र ठेवण्याची यात मोकळीक नाही, ते तसे जास्त ठेवल्याने पूरिया व मारवा यांची स्मृती
होईल. सांनिध, मध, गमधनिसां ही स्वर पंक्ती याची रूपदर्शिकाच आहे. तिरस्कार
उपहास, क्रोध वगैरे भावना दर्शविण्यास याचा उपयोग करतात.

पान नं. 86

25 राग - भैरव

भैरव रागाचा थाट भैरवच आहे. यात रिषभ व धैवत कोमल असून इतर सर्व स्वर
शुद्ध आहेत. याचा आरोहावरोह सरळ व संपूर्ण असल्यामुळे हा संपूर्ण - संपूर्ण जातीचा राग
झाला. याचे वादी संवादी अनुक्रमे धैवत व रिषभ आहेत आणि गाण्याचा समय प्रातःकाल
आहे. याची प्रकृती गंभीर असून मंद्र व मय्य सप्तकात राग विस्ताराचे महत्व आहे. याच्या

पान नं. - 87

वादी संवादी स्वरांना आंदोलन दिल्याने याची आकर्षकता जास्त वाढते. आरोहात रिषभाचे
महत्व जरा कमी प्रमाणात ठेवावे, पण आरोहात मध्यमावरून मिंडीने रिषभावर येण्याने
त्याचे संवादित्व प्रचित होते. याच्या अंतऱ्याची सुरुवात बहूतेकरून पंचमावरून होते.
आरोहात क्वचित कोमल निषाद घेणाऱ्या भैरवाचा एक प्रकार ग्रन्थसंमत आहे पण तो
प्रचारात ऐकायला मिळत नाही. रौद्र रसानुकूल म्हणून याकडे अंगुलिनिर्देश करण्यास
हरकत नाही.

पान नं. - 96

28 राग - तोडी

तोडी राग तोडी थाटातून तयार झाला असून त्यात रिषभ, गंधार व धैवत हे स्वर
कोमल आहेत. आणि मध्यम तीव्र असून निषाद शुद्ध आहे. हा संपूर्ण स्वर घेणारा असल्याने
जाती संपूर्ण - संपूर्ण आहे. याचे वादी संवादी अनुक्रमे धैवत आणि गंधार असून गाण्याचा
समय दिवसा दुसरा प्रहर सर्वसंमत आहे. हा राग फार गंभीर प्रकृतीचा असून चलन मंद्र व
मध्य सप्तकात विशेष होते. हा राग करूण रसाचा ठेवाच म्हटले तर अतिशयोक्ती होणार
नाही. ध््निसारेग््sमेग््रेग््sसा ही याची मुख्य पकड आहे.

तोडी रागात पंचमाला महत्व फारच कमी द्यावे लागते. नाहीतर यत्सम असलेल्या
मुलतानी रागाचे मिश्रण होण्याची भीती असते. यातील गंधार अतिकोमल घ्यावयाचा आहे,
म्हणून तंतुवाद्याशिवाय इतर वाद्यातून याचे स्वरूप स्पष्ट दिसत नाही. विकृत स्वरांच्या विषम

पान नं. - 97

मांडणीमुळे नवीन विद्यार्थ्यास हा गाण्यास फारच अवघड जातो. संगीतजिज्ञासूने चांगले
स्वरज्ञान ( श्रुतिभेदाने ) झाल्यानंतरच संगीताधिकारी व्यक्तीच्या सान्निध्याशिवाय हा राग
गाण्याच प्रयत्न करू नये. यातच थोडया फार स्वरांनी निराळी संगती वव काही स्वर वर्ज करून
बहादुरी , विलासखानी, मीयांकी, हुसेनी, गुर्जरी वगैरे बरेच भेद कुशल गायकांकडून
ऐकावयास मिळतात.

पान नं. - 99

29. राग - मुलतानी

मुलतानी हा तोडीथाटीय रागांपैकी प्रसिद्ध एकच राग प्रचारात असून तोडीप्रमाणेच
यात गंधार, धैवत , रिषभ हे कोमल असून मध्यम निषाद तीव्र आहेत. आरोहात रिषभ व
धैवत वर्ज आणि आरोहात संपूर्ण आहे. तेव्हा याची जाती ओडव - संपूर्ण झाली. यात वादी
संवादी पंचम षडज्् अशी जोडी आहे. गाण्याचा समय दिवसाच्या चौथ्या प्रहरी बहुसंमत
आहे. याची प्रकृतीही गंभीर असून रागविस्तार मध्य व तार सप्तकात होतो. रिषभधैवत या
जोडीला फार महत्व न देता मध्यम- निषाद याना द्यावे, म्हणजे तोडी रागापासून हा फार

पान नं. - 100

निरळा वाटेल. नैराश्य, करूणा यांची प्रतिमा म्हणून याच्याकडे बोट दाखविण्यास कोणतीच
हरकत नाही. निसा, मंगप्् ही यातील लाक्षणीक स्वरावली आहे.

*
﻿
अरविंद "ळद'र
03-07-25
Marathi
किंमत -63 Rs.
एकूण पाने -13
FROM 1 TO 13
+

पान नं. 1

1. विषय-प्रवेश

तीन-चार वर्षापूर्वीची गोष्ट. एका रविवारी माझे एक स्नेही वसंतराव
दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यांचा चेहरा थोडा त्रासलेला
दिसत होता. चेहऱ्यावरचा घाम पुसून स्थिर-स्थावर झाल्यावर म्हणाले,
"काय करावं समजत नाही, बुवा !"
माझा प्रश्नार्थक चेहरा.
वसंतरावांचा खुलासा, "अहो, काय सांगू ? आठ दिवस झाले पगाराचे
अँरीअर्स मिळाले, पण पैसे कुठं गुंतवावेत यावर माझा अन् हिचा वाद
चालू आहे. ही म्हणते, `सोनं घ्या,' मी म्हणतो, बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये
ठेवू."
"मग ?" माझी पृच्छा
"अहो, बायको ऐकायला तायर नाही." वसंतरावांचा हताशपणा त्यांच्या
चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांची आणि सौं. ची खटकेबाज संवादाची
जुगलबंदीच त्यांनी मला ऐकवली.
"सोनं घेतलं तर मिंटींच्या लग्नात उपयोगी पडेल." सौ. वसंतराव
"सोन्यात पैसे गुंतवायला आपण काय अडाणी लोक आहोत ?"
वसंतरावांनी सौ.ला ठणकावले. "आणि काय ग, सोन्यावर दर सहामाहीला
व्याज मिळतं वाटतं ?"
"पुरें झालं तुमचं बँकेत पैसे ठेवणं. बँकेत पैसे ठेवले तर परत
मिळताना कवडीमोल होतील. दोन वर्षापूर्वी पाचशेला मिळणारी वस्तू आता
हजाराला मिळते. आहात कुठं तुम्ही ?" सौ. चा रोकडा सवाल. "सोन्यात
व्जा नाही मिळालं तरी पैसे तरी बुडणार नाहीत."

पान नं. 2

"सोनं सांभाळणार कोण ? सध्याची परिस्थिती किती वाईट आहे ठाऊक
आहे ?" वसंतरावांच्या प्रश्न.
"ते काही सांगू नका मला. माझं म्हणणं आज नाही तरी उद्या
पटल्याशिवाय राहणार नाही." सौ. वसंतरावांचे ठाम विधान.
वसंतरावांनी हताशपणे मला विचारलं,
"या बायकांना सोन्याचा एवढं आकर्षण का कोण जाणे ?"
"पण वहिनी म्हणतात त्यात काही तथ्य नाही असंही नाही." माझाही
टोला.
"हो ना ! काय करावं कळत नाही म्हणून तर तुमच्याकडे आलो."
वसंतरावांनी कबुली दिली.
"शेअर्समध्ये गुंतवणूक करा की." माझ्या तोंडातून अनवधानाने शब्द
बाहेर पडले.
`अनवधानाने' म्हणण्याचे कारण ज्याला शेअर्समधली माहिती नाही,
आणि ज्याला अशी माहिती करून घेण्याची इच्छा नाही अशा व्यक्तीला
असा सल्ला देऊ नये या मताचा मी आहे.

"छान! म्हणजे आम्ही पैसे सांभाळावेत म्हणतो आणि तुम्ही तर
आम्हाला शेअरबाजारात नेऊन उभे केलंत की ! अहो, शेअर्स म्हणजे सट्टा !
चांगला सल्ला दिलात हं !"

वसंतरावाचा माझ्यावरील अविश्वास त्यांच्या चेहऱ्यावरच दिसत होता.
वरील संवाद पुरेसा बोलका आहे. केवळ वसंतरावच बचत करतात
असे नाही. मिळणाऱ्या उत्पन्नातून बचत करण्याची इच्छा समाजाच्या सर्व
थरांमध्येच बव्हंशी आढळून येते. सोन्या-चांदीतील गुंतवणुकीचे आकर्षण फार
प्राचीन कालापासून चालत आले आहे. कालगतीप्रमाणे नवीन आर्थिक कल्पना
आल्या. ब्रिटिश राजवटीत पोस्टाची सुरूवात झाली. नंतर बँकाही आल्या.
खाजगी क्षेत्रात आयुर्विमा कंपन्या सुरू झाल्या. बचतीची गुंतवणूक करण्यासाठी
नवीन दालने उपलब्ध होत गेली. शेअर-बाजाराची सुरूवात तर एकोणिसाव्या
शतकातच झाली होती.

केलेली गुंतवणूक जास्तीत जास्त लाभदायक ठरावी अशीच प्रत्येक
बचत करणाऱ्या व्यक्तींची इच्छा असते. पण त्याहीपेक्षा गुंतवणुकीच्या सुरक्षिततेकडे
अधिक लक्ष पुरविले जाते. सहसा सुरक्षित न राहणारी गुंतवणूक करण्याकडे
सामान्य माणसाचा कल नसतो. त्यामुळे पोस्टातील आणि बँकेतील ठेवी,
आयुर्विमा, कंपनी, ठेवी युनिट ट्रस्ट यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल आतापर्यत
वाढत्या प्रमाणावर मराठी मध्यमवर्गात दिसून आला. वसंतरावांचे प्रातिनिधिक
उदाहरण आपण वर पाहिलेच.

पान नं. 3

सोने-चांदी आणि जमिनीतील (शेतजमीन नव्हे) गुंतवणूक यावर नियमित
उत्पन्न मिळत नाही. मात्र त्याच्या किंमती वाढत जातात. इतर गुंतवणुकीपासून
नियमित उत्पन्न मिळते. मात्र गुंतवणूक केलेल्या रकमेत वाढ होत नाही.
समजा, एखाद्याने बँकेत 10 हजार रूपयांची मुदत ठेव ठेवली तर त्यावर
ठरावक दराने व्याज मिळेल. पण मुदतीनंतर गुंतवलेली रक्कमच फक्त परत
मिळेल. हीच गोष्ट पोस्टातील ठेवी, आणि कंपनी ठेवी, यांच्या बाबतीत
लागू होते. आयुर्विम्यामध्ये गुंतवणूक करताना एक वेगळ्या वैचारिक भूमिकेतून
गुंतवणूक केली जाते. त्यामध्ये गुंतवणुकीपासून होणाऱ्या तत्काल लाभापेक्षा
संकटातील तरतुदीचा विचार प्रामुख्याने असतो. त्याचबरोबर या गुंतवणुकीला
उपलब्ध असलेल्या कर-सवलतींचाही फायदा मिळतो. युनिट ट्रस्टमधीस फक्त
युनिट लिंक्ड इंश्युरन्स प्लॅन या गुंतवणुकीलाच कर-सवलतीचा फायदा आहे.
आजकाल घर भाड्याने देऊन नियमित उत्पन्न कमावण्याची सोय सामान्य
माणसाला राहिली नाही. त्यामुळे एकेकाळी लोकप्रिय असलेला गुंतवणुकीचा
हा मार्ग सामान्य माणसाला बंद झाला आहे असे म्हटल्यास वावगे होणार
नाही.

कंपनी शेअर्समधील गुंतवणुकीत मात्र गुंतवणुकीतील सर्व फायदे मिळू
शकतात. विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीची किंमतही वाढत जाते आणि
दरवर्षी व्याजाच्या (डिव्हिडंड) रूपाने नियमित उत्पन्नही मिळत राहते. उत्तम
गुंतवणुकीची आधारभूत तत्त्व यात सामावली आहेत असे म्हणता येईल.
सुरक्षितता, लाभदायकता, चटकन् पैसे हातत येण्याची सोय आणि गुंतवणुकीच्या
किंमतीत वाढ या सर्व गोष्टी शेअर्समधील गुंतवणुकीतून साधता येतात.

अगदी अलीकडेपर्यत मराठी माणूस शेअर म्हणजे सट्टा समजत होता.
महाराष्ट्रातील मध्यम वर्गाची गुंतवणुकीसाठी पोस्टाची आणि बँकेची निवड
जणू काही ठरून गेल्यासारखी होती. आवश्यकता आणि शक्यता असली
तर नियमित उत्पन्नासाठी आणि स्वतःला राहण्यासाठी घर बांधण्यासाठी
आपल्याजवळील बचतीचा पैसा वापरत होता. कंपनी ठेवींमध्येही गुंतवणुकीचे
प्रमाण हळूहळू वाढले. पण शेअरबाजारापासून मात्र मराठी मध्यमवर्ग मोठ्या
प्रमाणावर 1980 सालापर्यत अलिप्तच राहिला. 1980 नंतर शेअर्समधील
गुंतवणुकीविषयीची आस्था वाढली, आणि 1985 च्या अभूतपूर्व तेजीने फार
मोठ्या प्रमाणावर या गुंतवणुकीच्या या क्षेत्राविषयी मराठी मध्यमवर्गात कुतूहल
निर्माण झाले.

पान नं. 4

शेअरबाजारातील तेजी

31 ऑक्टोबर 1985 रोजीला झालेल्या इंदिराजींच्या निर्घुण हत्येनंतर
राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि लोकशाहीतील सुरळीत सत्तांतरामुळे डिंसेबरच्या
मध्यापासून शेअरबाजारात तेजी सुरू झाली. त्या वेळी होणाऱ्या मुदतपूर्व
निवडणुकांमध्ये कॉग्रेस (आय) पक्ष सत्तेवर येईल अशा अपेक्षेने बाजारातील
तेजीचा प्रारंभ झाला. अपेक्षेप्रमाणे तो पक्ष घसघशीत बहुमताने सत्तारूढ
झाला. राजी गांधीच्या सत्तारोहणाने भारतातील एका नवीन आर्थिक पर्वाला
सुरूवात झाली. नवीन सरकारचा आर्थिक धोरणात उदारमतवादाकडे कल
दिसून येऊ लागला. मार्च 1985 मध्ये मांडलेल्या अंदाजपत्रकात या धोरणाला
निश्चित आकार देण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली. परिणामस्वरूप शेअर-बाजारात
तेजीच्या लाटंवर लाटा येऊ लागल्या. भरीत भर म्हणून अंदाजपत्रकीय
आर्थिक धोरण जाहीर करून आर्थिक विकासाच्या दिशा निश्चित केल्या
आणि दरवर्षी निर्माण होणारी आर्थिक धोरणातील बदलांची अनिश्चितता संपुष्टात
आणली.

शेअरबाजारातील तेजीची दखल वृत्तपत्रसृष्टीत सर्वदूर घेतली गेली. ही
तेजी एक चर्चेचा विषयच झाला. आर्थिक आघाडीवर जाहीर झालेल्या
सवलतीमुळे काळ्या पैशाचाही शेअर बाजारात जोरात लोंढा आला, आणि
बघता बघता शेअर्सच्या किंमती जाणत्यांच्याही स्वप्नात येणार नाहीत इतक्या
वर गेल्या. जे शेअर्समध्ये पहिल्यापासून गुंतवणूक करीत आले त्यांचे तर
उखळच पांढरे झाले.

वर उल्लेख केल्याप्रमाणे मराठी माणूसही तेजीच्या या लाटेपासून अलिप्त
राहू शकला नाही. या तेजी अगोदर काही वर्षे बहुराष्ट्रीय (मल्टिनँशनल)
कंपन्यांना विदेश विनिमय नियंत्रण कायद्यातील (फेरा) तरतुदींमुळे मोठ्या
प्रमाणावर भाग भांडवलाचे भारतीयीकरण करणे भाग पडले. त्यामुळे अशा
कंपन्यांनी जनतेला खुल्या केलेल्या भांडवल विक्रीला मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांचा
जोराचा प्रतिसाद मिळाला. रिलायन्ससारख्या एतद्देशीय कंपन्याही आपले भाग
भांडवल घेऊन गुंतवणूकदारांसमोर आल्या. या अशा कंपन्यांमध्ये शेअर्ससाठी
अर्ज भरून ज्यांना शेअर्स मिळाले त्यांचा गेल्या 7-8 वर्षात भरमसाठ
फायदा झाला. त्यामुळे मराठी माणसाला शेअर-बाजाराची तोंडओळख करून
देण्यास अशा कंपन्यांच्या शेअर्सची विक्री कारणीभूत ठरली. या पार्श्भूमीवर
मराठी माणूस शेअर-बाजाराकडे न खेचला गेला तर नवल.

पान नं. 5

शेअर्समध्ये गुंतवणूक दोन प्रकारे होते. त्यातील पहिला म्हणजे नवीन
अथवा जुन्या कंपन्या आपले शेअर्स सार्वजनिक विक्रीस काढतात तेव्हा
त्यासाठी अर्ज करून शेअर्स मिळविणे हा होय. यातील पहिल्या प्रकारची
गुंतवणूक तुलनेन सोपी असते. दुसऱ्या प्रकारची गुंतवणूक मात्र तंत्र अवगत
असल्याखेरीज करणे धोक्याचे असते.
शेअर्सची खरेदी-विक्री कशी करावी, केव्हा करावी, तेजी-मंदी
काय, एखाद्या कंपनीच्या शेअर्सची निवड गुंतवणुकीसाठी कशी करावी,
शेअर-बाजारातील अपप्रवृत्तींना बळी पडून नये यासाठी कोणती पथ्ये पाळावीत
या गोष्टींचे ज्ञान यशस्वी गुंतवणूकदार होण्यास आवश्यक आहे.

उत्तम वेवहारे

अर्थ-व्यवहारातील अर्थाची (पैसा) महती पुराण कालापासून चालत
आली आहे. ती इतकी की महाभारतकारांनी भीष्ण-द्रोणांच्या तोंडी `अर्थस्य
हि पुरूषा दास:' हे शब्द घालून सार्थ करून दाखविली आहे. अर्थ( पैसा)
सर्वच गोष्टींचे नसले तरी बऱ्याच गोष्टींचे मूळ आहे. आयुष्यात अनेक
गोष्टी साध्य करण्यासाठी पैशांची गरज लागते. त्यासाठीच मनुष्य पैसे मिळविण्याच्या
मागे असतो. पैसा कमाविण्याला जितकी बुद्धी लागते. त्याहीपेक्षा अधिक
अधिक बुद्धी आणि कौशल्य पैसा उत्तम रीतीने सांभाळण्यास लागते असे
म्हटले जाते. बुद्धीच्या जोरावर `उत्तम वेवहारे' धन जोडण्यास संतश्रेष्ठ तुकाराम
महाराजांची देखील ना नाही. मध्यम वर्गीयांना-सधन शेतकऱ्यांसही -शेअर्समधील
गुंतवणूक ही धन जोडण्याची उत्तम संधी आहे असे वाटते. त्याचप्रमाणे
बचत केलेला पैसा विचारपूर्वक शेअर्समध्ये गुंतविण्याने कमावलेला पैसा उत्तम
रीतीने सांभाळताही येतो. पण शेअर्समध्ये पैसा गुंतवायचा तर शेअर-बाजाराची
आणि गुंतवणूकतंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी हा प्रपंच !

पान नं. 6

प्रकरण 2.

गुंतवणुकीचे मार्ग

मध्यमवर्गीय अथवा श्रीमंतांना गुंतवणुकीचे जे मार्ग उपलब्ध आहेत.
त्या विषयाची माहिती थोडक्यात खाली दिली आहे.

अल्प बचत
अल्पबचतीच्या योजना पोस्टातर्फे राबविल्या जातात. यामध्ये पाच रूपयांपासून
गुंतवणूक करता येते. याचे ठळक वैशिष्ट्य आणि फायदा म्हणजे याची
सुरक्षितता. कारण अल्पबचतीच्या योजना शासनाकडून राबविल्या जातात.
यामध्ये अलीकडे व्याजाचे दरही वाढवून 12 टक्क्यांपर्यत नेण्यात आले
आहेत. 6 वर्षे कालावधीच्या राष्ट्रीय बचत-पत्रात (National Saving Certificate)
केलेल्या गुंतवणुकीवर काही विशिष्ट प्रमाणात आयकर भरणाऱ्या करदात्याला
त्याच्या उत्पन्नातून वजावटही मिळते. त्यामुळे ही गुंतवणूक हल्ली इतकी
लोकप्रिय झाली आहे की, मार्चच्या महिन्यात पोस्टामद्ये बचत-पत्रे शिल्लक
देखील राहात नाहीत. अल्पबचतीमधील गुंतवणुकीवर कर्जही काढता येते
आणि बचतपत्रे मुदतीपूर्वी मोडावयाची असल्यास त्याचे पैसेही चटकन् मिळतात.
अल्पबचतीमध्ये जवळजवळ 10 वेगवेगळ्या घटकांच्या गुंतवणुकी उपलब्ध
असल्याने गुंतवणूकदाराला निवडीसाठी वाव खूप असतो.

बँकामधील ठेवी

बँक म्हटले की भारतीय माणसाला एकदम सुरक्षित वाटते. कदाचित
विश्वासाचे दुसरे नाव बँक असावे इतका विश्वास या संस्थेबद्दल लोकांना
वाटतो. राष्ट्रीयीकरण झालेल्या बँका आणि इतर व्यापारी बँका यांनी ठेवीदारांना
द्यावयाचे व्याजचे दर मात्र रिझर्व बँक ठरविते. सहकारी बँकांना रिझर्व

पान नं. 7

बँकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा 1 टक्का अधिक व्याज ठेवीवंर देण्याची
परवानगी आहे.

कोठल्याही बँकेची कोठलीही ठेव योजना रिझर्व बँकेने ठरवून दिलेल्या
व्याजाच्या दराला केंद्रबिंदू मानून त्याभोवती इतर वेगवेगळ्या प्रकारची नावे
लावून तयार केलेली असते. कोणी शुभमंगल ठेव काढतो, कोणी शिक्षण
ठेव काढतो. कोणी दैनंदिन ठेव योजना समाजातील सर्व थरांना
उपयोगी पडाव्यात म्हणून कल्पकपणे सुरू केल्या जातात आणि राबविल्याही
जातात. पण त्याचा कोठल्याही प्रकाराने हिशोब केला तर शेवटी ठराविक
दराच्या व्याजापलीकडे हाती काही लागत नाही.

सुरक्षितता, मुदतपूर्व ठेव मोडावयाची सोय, ठेवीच्या आधारे कर्ज
मिळण्याची सोय, व्याजावर आयकर-सवलत हे बँकेतील ठेवींचे फायदे आहेत
असे सांगता येईल.

आयुर्विमा

आयुर्विम्याला पर्याय नाही अशी जाहिरात सतत आपल्या कानावर
तरी येते किंवा डोळ्यांत तरी भरते. त्यात विमा एजटांच्या चिवटपणाच्या
चार दोन दंतकथाही प्रत्येकाच्या कानावर पडलेल्या असतात.

आयुर्विम्याचे आपल्या देशात राष्ट्रीयीकरण झाले आहे. आयुर्विम्याचा
फायदा विमेदारापेक्षा त्याच्या आकस्मिक मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना होतो.
विमेदारालाही फायदा व्हावा अशा काही योजना विमा महामंडळाने चालविल्या
आहेत.

विम्याचे प्रमुख फायदे म्हणजे आपत्कालात कुटुंबियांचे संरक्षण, नियमित
बचत, विमा महामंडळाकडून दरवर्षी जाहीर होणारा पण पॉलिसीच मुदत
पूर्ण झाल्यावर मिळणारा बोनस, विमा पॉलिसीवर मिळणारी कर्जे, घरासाठी
कर्जे मिळण्याची सोय, आयकरातून हप्त्याच्या रकमेची विशिष्ट मर्यादेपर्यत
सवलत आणि संपत्तिकरातून मोकळीक असे सांगता येतील.

समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या वेगवेगळ्या गरजा पुरविण्याच्या दृष्टीने
आयुर्विमा महामंडळाने अनेक प्रकारच्या पॉलिसीज काढल्या आहेत. त्यामध्ये
समुह-विमा (Group Insurance) आणि निवृत्तीनंतर मिळत राहणाऱ्या ठराविक
वार्षिक रकमा (Annutities) यांचाही समावेश आहे.

आयुर्विम्यात गुंतविलेली रक्कम आणि पॉलिसीची मुदत पूर्ण होऊन
मिळणारी रक्कम यांचा विचार केला तर आयुर्विम्यामधील गुंतवणूक विशेष

पान नं. 8

लाभदायक नाही असे दिसून येते. आयुर्विम्यातील गुंतवणूक एका वेगळ्या
वैचारिक भूमिकेतून केली तरच त्या गुंतवणुकीबद्दल मनात रूखरूख राहणार
नाही. केवळ गुंतविलेल्या पैशावर आकर्षक फायदा झाला पाहिजे या मनोभूमिकेतून
त्यामध्ये गुंतवणूक करता कामा नये.

सार्वजनिक भविष्य निधी (Public Provident Fund)

1968 पर्यत भविष्य -निधी हा फक्त पगारदार लोकांपुरताच मर्यादित
होता. पण 1968 साली सरकारने सार्वजनिक भविष्य निधी कायदा पास
करून त्याची द्वारे आम जनतेसाठी (विशेषतः पगारदार नसलेल्या आयकरदात्यांसाठी)
खुली केली. यामध्ये गुंतविलेल्या पैशांवर जे व्याज मिळते ते पूर्णपणे करमुक्त
असते, आणि गुंतवणुकीवरही आयकराची सवलत आहेच. तसेच या निधीची
मुदत 15 वर्षाची असून स्टेट बँक अथवा तिच्या सबसिडियरी बँकांच्या
शाखांतून अथवा पोस्टाच्या प्रमुख शाखेतून याचे खाते उघडता येते.

विशेषतः उच्च उत्पन्नाच्या गटातील लोकांना सार्वजनिक भविष्य निधीतीली
गुंतवणूक जास्त फायदेशीर होते असे आढळून आले आहे. अलीकडेच
आणखी काही सवलती जाहीर करून सरकारने सार्वजनिक भविष्य निधीमधील
गुंतवणूक अधिक आकर्षक बनविली आहे.

युनिट्स

जनतेजवळ असलेला बचतयोग्य पैसा एकत्र करून तो शेअर-बाजारात
निरनिराळ्या रोख्यात गुंतवावा या उद्देशाने युनिट ट्रस्ट युनिट्रसची विक्री करून
जो पैसा गोळा करते तो शेअर-बाजारात समभाग, अग्रहक्क भाग, ऋणपत्रे
इ. रोख्यांत गुंतविते. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांना कर्जेही दिली जातात.

युनिट्समध्ये गुंतवणुकीचे काही फायदे असे आहेत. युनिट्सवर जो
लांभाश मिळतो त्याच्यामधून आयकर कापला जात नाही. या लाभांशाला
आयकरामध्ये विशेष सवलत देखील आहे. युनि-संलग्न-विमा-य.ोजनेमध्ये पैसे
गुंतविल्यास गुंतविलेल्या रकमेची विशिष्ट मर्यादेपर्यत उत्पन्ातून वजावटही मिळते.
युनिटर्समधील गुंतवणुकीलाही संपत्तिकरामध्ये विशेष सूट आहे. दीर्घ मुदतीचा
भांडवली नफा मिळाल्यानंतर भांडवली युनिट्समध्ये आलेले विक्रीचे पैसे
गुंतविले तर त्यांवर आयकर भरावा लागणार नाही.

पान नं. 9

युनिट्सची खरेदी फार सुलभ असते. त्याचप्रमाणे युनिट ट्रस्ट त्यांची
जी फेर खरेदी करते तीही सोपी असते. युनिट्सच्या विक्रीचे आणि फेरखरेदीचेही
भाव रोज वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत असतात. युनिट ट्रस्टचे जमाखर्चाचे वर्ष
1 जुलै ते 30 जून असे आहे. या कालावधीत युनिट्स केव्हाही विकत
घेतली आणि नावावर चढवून घेतली तर पूर्ण वर्षाचा लाभांश मिळतो.
त्याचप्रमाणे युनिट्सचे हस्तांतरणही होऊ शकते. बँका युनिट्सच्या बाजारातील
किंमतीच्या 75 टक्क्यांपर्यत युनिट्स गहाण ठेवल्यास कर्जही देतात. युनिट्सच्याही
वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक गरजा भागविणाऱ्या योजना आहेत.

युनिट्समधील लाभ आकर्षक असले तरी बव्हंशी उच्च उत्पन्न गटातील
लोकांनाच ते अधिक प्रमाणात मिळतात असे दिसते.

1989 अखेर युनिट ट्रस्टने एकूण 35 योजना सुरू केल्या. त्यातील
16 योजना 1985 नंतर सुरू झाल्या आहेत. 1990 अखेर युनिट ट्रस्टकडे
17,495 कोटी रूपयांचा गुंतवणूकयोग्य निधी होता.

कंपनी मुदत ठेवी (Corporate Fixed Deposits)

एकेकाळी अतिशय लोकप्रिय असलेल्या या गुंतवणुकीच्या साधनाची लोकप्रियता
आता ओहोटीस लागली आहे असे दिसते. ज्या काळी बँका दीर्घ मुदतीच्या
(5 वर्षाच्या) ठेवींवर 10 टक्के व्याज देत असत, त्या काळी काही कंपन्या
3 वर्षाच्या ठेवीवर 13 पासून 15 टक्क्यांपर्यत व्याज देऊ करत होत्या
त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत असलेल्या कंपन्यांच्या मुदत ठेवीसाठी जाहिराती
वृत्तपत्रांतून आल्या की त्यासाठी ठेवीदारांच्या उड्या पडत असत. एक हजार
रूपयंपर्यतच्या व्याजातून आयकरही कापून घेतला जात नाही हेही एक आकर्षण
असे. तिमाही अथवा सहामाही व्याज मिळण्याची सोय असल्याने नियमित
उत्पन्नाच्या दृष्टीने या ठेवी आकर्षक ठरल्या होत्या.

पण या ठेवी पूर्णपणे सुरक्षित नसतात. त्यांना कोठलेही तारण दिले
जात नाही. केवळ कंपनीचा नावलौकिक आणि आर्थिक मजबुतीचा विचार
करून ठेवीदार ठेवी ठेवीत असत. कंपनी जितकी उत्तम तितकी ती व्याजाचा
दरही कमी ठेवीत असत. जास्त व्याजाच्या आशेने ज्यांच्याबद्दल काही
माहिती नाही अशा कंपन्यांमध्ये ठेवी ठेवल्याने काहींचे ठेवी बुडाल्यामुळे
नुकसानही झाले आहे.

तारणावरील डिबेंचर्स (Secured Debentures) कर्ज उभारण्याचे एक
साधन म्हणून उदयाला आली. यामध्ये सुरूवातीला डिबेंचर्सच्या दर्शनी मूल्यांपैकी

पान नं. 10

काही भागांचे शेअर्समधील `रूपांतर करण्याची आकर्षक योजना प्रथमतः रिलायन्सने
मोठ्या प्रमाणावर पुढे आणली आणि या डिबेंचर्सच्या उदयामुळे कंपनी
ठेवींवर फार मोठा आघात झाला. आताही कंपनी ठेवींच्या जाहिराती प्रसिद्ध
होत असतात. पण पूर्वीसारखी लोकप्रियता या ठेवींना नाही असे चित्र
दिसते.

कंपनी ठेवीवर कोठल्याही प्रकारची आयकराची अथवा संपत्तिकराची
सवलत नाही. त्यांचे व्याजही पूर्णपणे करपात्र आहे.

डिबेंचर्स बॉड्स( ऋणपत्रे)

सध्या स्थिर दराने व्याजाच्या उत्पन्नासाठी, आणि सुरक्षित ठेव म्हणून
कंपनी डिबेंचर्स फारच लोकप्रिय झाली आहेत. डिबेंचर्स लोकप्रिय करण्याचा
मान रिलायन्स या अग्रगण्य कंपनीकडे जातो.

रिलायन्सने मोठ्या प्रमाणावर अंशतः रूपांतरणीय डिबेंचर्स सार्वजनिक
विक्रीसाठी बाजारात प्रथम आणली. रूपांतरणीय डिबेंचर्सची कल्पना एकदम
नावीन्यपूर्ण आहे असे नाही. पूर्वीही काही कंपन्यांनी याचा वापर करून
पैसा उभारला होता पण रिलायन्सची लाट एवढी जबरदस्त होती की,
इतरांनाही त्याचे अनुकरण करावे लागले.

डिबेंचरच्या दर्शनी मूल्यापैकी काही मूल्याचे शेअरमध्ये रूपांतर करावयाचे
आणि अरूपांतरणीय मूल्याची परतफेड साधारणपणे 7 व्या वर्षापासून हप्त्यांमध्ये
करावयाची अशी सुरूवातीला पद्धत होती. डिबेंचरवर कर्ज उभारण्यास भांडवल
नियंत्रक (Controller of Capita; Issues) यांची परवानगी आवश्यक असते.
त्यामध्ये जर रूपांतरणाच्या शर्ती असतील तर असे रूपांतरण कोणत्या शर्तीवर
करावयाचे यासाठी देखील सरकारी अनुमती आवश्यक असते
डिबेंचर्सचे प्रकार आहेत :
1. पूर्णपणे रूपांतरणीय ( Fully Concertible)
2. अंशतः " (Partly")
3. अरूपांतरणीय (Non-Convertible) '

अ) डिबेंचरहोल्डर्सना राइट शेअर्स देऊ करणे. यामध्ये डिबेंचरची
रक्कम कधीच शेअर्समध्ये रूपांतरित होऊ शकत नाही.
आ) डिबेंचर होल्डर्सना सुरूवातीचे काही दिवस व्याज न देता त्याच्या
बदली शेअर्स देणे.

पान नं. 11

इ) सुरूवातीला अरूपांतरणीय म्हणून घोषित केलेल्या डिबेंचरच्या मूल्याचे
नंतर शेअर्समध्ये रूपांतर करणे.

रिलायन्सने आणि टाटा उद्योगसमूहाने अंशतः रूपातंरणीय डिबेंचर्स विकून
प्रचंड प्रमाणावर पैसा उभा केला. कंपनी जितकी उत्तम म्हणून प्रसिद्ध तितक्या
रूपांतरणाच्या शर्थी कडक ठेवल्या जाऊ लागल्या. फारशा प्रसिद्ध नसलेल्या
कंपन्यांनी पूर्णतः रूपांतरणीय डिबेंचर्स विक्रीसाठी खुली केली.

अरूपांतरणीय डिबेंचर्समध्ये पुढे दोन प्रकार निघाले. एका प्रकारात
दर सहा महिन्यांनी व्याज देण्याची सोय तर दुसऱ्या प्रकारात व्याज न
देता ते मुद्दलात मिळवून चक्रवाढव्याज देण्याची सोय हे दोन प्रकार non-cumulative
आणि cumulative म्हणून प्रसिद्ध आहेत.

सरकारनेही डिबेंचर्स लोकप्रिय होण्यास मदत केली. अरूपांतरणीय
डिबेंचर्सवरील व्याजाचा दर 15 टक्क्यांवर नेण्यात आला. त्याचप्रमाणे ज्याच्याजवळ
चाळीस हजार रूपयांपेक्षा कमी दर्शनी मूल्याची डिबेंचर्स असतील अशा
डिबेंचर्स होल्डर्सना 1 वर्षानंतर डिबेंचर्सची रक्कम पुनखरेदीच्या अटीवर परत
मिळण्याची सवलत सरकारमुळे मिळू लागली.

पुन्हा एकदा आणखी पुढचे पाऊल रिलायन्सने टाकून अंशतः अरूपांतरणीय
अथवा पूर्णपणे अरूपांतरणीय डिबेंचर्सच्या मूल्यांचे पूर्णपणे शेअर्समध्ये रूपांतर
करण्याचा नवीन पायंडा पाडला. त्याचा परिणाम असा झाला की, विशेषतः
रिलायन्सच्या अरूपांतरणीय डिबेंचर्सना बाजारभाव देखील उत्तम मिळू लागला.

संचित व्याजाच्या (Cumulative Interest) डिबेंचर्सवर विशेषतः
आयकरदात्यांच्या उड्या पडू लागल्या आहेत. संचित व्याजाचे डिबेंचर बाजारात
विकल्यास जो फायदा होईल तो भांडवली नफा म्हणून धरला जाईल.
त्यामुळे भांडवली नफ्याच्या कर आकारणीच्या सर्व सवलती अशा डिबेंचर्सच्या
विक्रीतून येणाऱ्या भांडवली नफ्यावर मिळणार असल्याने उच्च उत्पन्न गटातील
करदात्यांना अशा डिबेंचर्सच्या व्याजावर फारच मोठी आयकराची सवलत
मिळाली आहे.

तारण असलेल्या डिबेंचर्सची सुरक्षितता, त्यावर मिळणारे आणि मिळू
शकणारे आकर्षक लाभ यामुळे डिबेंचर्स अतिशय लोकप्रिय झाली आहेत.
येती काही वर्षे तरी त्यांची लोकप्रियता घटण्याची चिन्हे दिसत नाहीत.
अर्थात त्यांची जागा घेणारे गुंतवणुकीचे अधिक आकर्षक साधन कोणाच्या
सुपीक मेंदूतून निघत नाही तोपर्यतच.

पान नं. 12

घर,जमीन इ. (Real Estate)

राहण्यासाठी घर बांधणे आणि जमीन घेणे (शेती अथवा बिगरशेती
याला मानवाच्या जीवनात आगळे स्थान आहे. यात गुंतवणुकीच्या दृष्टीने
पैशांचा जरा विचार असतो तसा बऱ्याच वेळेला भावनिक विचारही असतो.
मानवाच्या प्राथमिक गरजांपैकी, म्हणजे अन्न,वस्त्र, आणि निवारा, ही एक
प्राथमिक गरज आहे. `असावे घरकुल आपुले छान' अशी भावना जाति-पाती,
आणि देशांच्या सीमा ओलांडून जाणारी वैश्विक भावना असावी. आपल्या
मालकीची जमीन असावी हीही अशीच एक भावना आहे. असे म्हणतात.
की प्रत्येक ज्यू पित आपल्या मुलाला एकच अतिशय महत्त्वाचा सल्ला
नेहमी देतो. "Every thing grows under the sun, but not the
land. buy, more land, son"( जगात सारे काही निर्माण होते. पण
नवीन जमीन निर्माण होत नाही, मुला, जमीन खरेदी कर, खूप जमीन
खरेदी कर.) विज्ञान इतके पुढे गेले आहे की मानवाने समुद्र हटवून देखील
आता नवीन जमीन निर्माण करण्यास सुरूवात केली. ही गोष्ट वेगळी. पण
अशा निर्माणाला मर्यादा असतात.

स्वतःला राहण्यासाठी घर बांधणे अथवा मालकी तत्त्वावर गाळा (Ownership
Flat) घेणे या गोष्टीला माणसाच्या आयुष्यातील नियोजनात फार महत्त्वाचे स्थान
आहे. त्यामध्ये गुंतवणूक करताना त्यातून मिळणाऱ्या लाभाचा विचार माणूस
करीत असावा असे वाटत नाही. घर बांधताना जरी माणूस मेटाकुटीला
येत असला तरी त्यातील गुंतवणुकीतून माणसाची भावनेची भूक भागते.
1970 सालपर्यत घरभाड्यापासून मिळणाऱ्या स्थिर उत्पन्नासाठीही भाड्याने
देण्याच्या दृष्टीने घरे बांधली जात होती. परंतु घर-मालकांना जाचक भासणाऱ्या
भाडेनियंत्रण कायद्यामुळे आणि वाढत्या महागाईमुळे आणि चलनवाढीमुळे
घर-भाड्यापासून मिळणारे उत्पन्न रूपयाच्या घसरणाऱ्या किंमतीच्या तुलनेत
वाढू शकले नाही. कोर्ट-कचेऱ्या, भांडेकरूंशी भांडणे आणि `मूर्ख माणसे
घरे बांधतात, शहाणे त्यात राहतात' या अर्थाच्या आंग्ल वाक्प्रचाराची दिवसेंदिवस
सिद्ध होणारी सत्यता यामुळे घरभाड्याच्या उत्पन्नासाठी घरे बांधण्याचे प्रमाण
हळूहळू कमी होऊन आता ते तर अगदीच कमी झाले आहे असे म्हटल्यास
अतिशयोक्ती होणार नाही.

पान नं. 13

मोकळ्या भूखंडातील (Open plot) गुंतवणुकीपासून लोकांना अमाप
फायदा झालेला आहे. शेतीप्रधान असणाऱ्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा
केंद्रबिंदू खेडे राहिला नाही. पाश्चात्त्य देशांतून येणारी उद्योगीकरणाची लाट
आपण थोपवू शकलो नाही. ज्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध आहेत
अशा ठिकाणी उद्योदगधंद्यांची बेसुमार वाढ झाली. अर्थातच अशी ठिकाणे
म्हणजे मोठमोठी शहरे आणि महानगरे हीच होत. लोकसंख्यावाढीचा वेगही
आपल्याला म्हणावा तितका आटोक्यात ठेवता आला नाही. खेड्यांमधून
शेतीला पुरक असे उद्योंगधेदे निर्माण न झाल्याने तेथील लोकांना बाराही
महिने पुरेल एवढे काम आणि रोजगार निर्माण होऊ शकला नाही. आणि
त्यामुळे पोटाच्या पाठीमागे जो तो शहराकडे रोजगारासाठी धाव घेऊ लागला.

झपाट्याने होणाऱ्या उद्योगीकरणामुळे आणि खेड्यामधून येणाऱ्या लोंढ्यामुळे
शहरातील जमिनींचे भाव हळूहळू वाढू लागले. नागरी जमीन नियंत्रण कायद्यामुळे
या भाववाढीला चांगलाच वेग प्राप्त झाला. 1980 नंतर तर जमिनीचे
भाव सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले. सामान्य माणसाच्या दृष्टीतून
विचार केला तर जमिनीतील गुंतवणुकीच्या मर्यादा स्पष्ट होतील. त्यातील
सर्वात अडचणीची गोष्ट म्हणजे जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार सुलभपणे
होत नाहीत. अनेक कायदेकानूंची बंधने पाळून हे व्यवहार करावे लागतात.
दुसरी अडचण म्हणजे हे व्यवहार चटकन् होत नाहीतच. सर्व गोष्टी ठीक
आहेत, मालकी हक्क (Title) निर्वेध आहे. इ. गोष्टींची खातरजमा होण्यास
वेळ लागतो. जमिनीच्या भावासंबंधीची बोलणी कित्येक वेळा बऱ्याच काळपर्यत
चालू राहण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टीतून पार पडल्यानंतर साठे-खत
होते आणि त्यानंतर शेवटी खरेदी-खत होते. त्यामुळे सामान्य माणूस आपल्या
आयुष्यात एखादा दुसराच असा व्यवहार करू शकतो. बरे एवढे करून
भागेल म्हणावे तर तसेही होत नाही. अचानक सरकारी नियंत्रणे जाहीर
होतात. मोकळ्या जागेत एका रात्रीत झोपडपट्टी उठते. जमीन बळकाव
(Land grab) नावाचा नवीन प्रकार सध्या निघाला आहे. शहराच्या विकास
आराखड्यात (Master Plan) आपली जमीन एखाद्या लोकोपयोगी कामासाठी
राखून (Reservation) ठेवण्याचा प्रस्तावही स्थानिक स्वराज्य संस्था अगर
सरकार करू शकते. या सर्व अडचणीतून आपली जागा मोकळी करून
घेण्यास अगर ठेवण्यास जी यातायात करावी लागते तिचे वर्णन शब्दांनी
करणे अशक्य आहे.

सोने (Gold)

सोन्याची महती काय वर्णावी ? वैदिक काळापासून ज्ञात असलेले
याचे महत्त्व भारतीय माणसाच्या मनी इतके रूजले आहे की, सांगता सोय

*

﻿
प्र.कृ. सहस्त्रबुद्धे
03-07-25
Marathi
एकूण पाने :-17
FROM 10 to 26

+

पान नं. 10

तयार करा आणि वापरा
(नित्यावश्यक वस्तूंचे स्वावलंबी उत्पादन)

साबण आणि निर्मलके

कुठल्याही वस्तूवरील घाण--मळकट काळपट- तेलकट ओशाटपणा-धूळ इ.
नाहिशी करण्याचे सहज सुलभ साधन म्हणजे साबण किंवा साबणाची
भुकटीद्रावण इ. होय. Cleanliness is Next to Godiness अशी फार जुनी
म्हण प्रचारात आहे. म्हणूनच साबण वा साबणासारखे मळ-घाण नाहिसे करणारे
पदार्थ उदाहरणार्थ -राख0-सज्जीमिट्टी, रिठे-चिंच इ. वस्तूंना मळ-घाण नाशक
पदार्थ असे म्हणतात.

धातुची भांडी किंवा अलंकार स्वच्छ करणेसाठी रिठे किंवा चिंचेचा बलक

पान नं. 11

वापरण्याची फार पूर्वीपासून पद्धत आहे.

प्रचंड वेगाने वाढलेली लोकसंख्या व सुधारलेले आधूनिक रहाणीमान याचे
जोडीला नैसर्गिक साधनसामुग्रीचा( वाढत्या लोकसंख्येच्या संदर्भात) तुटवडा
यामुळे तेले व चरबी इ. पासून साबण तयार करण्याचा शोध लागला.)

साबण तयार करण्यासाठी वनस्पतिक तेल( खाद्य किंवा अखाद्य वर्गातील) व
कॉस्टिकसोडा किंवा कॉस्टीक पोटर्शनचे द्रावण ह्यांचे विशिष्ट प्रमाणात व ठराविक
तपमानांवर एकजीव मिक्षण करावे लागते. शेंगदाणा तेल, खोबरेल तेल, पाम
ऑइल (पामोलिन) किंवा निबोंणी-करंजा इ. तेलामध्ये चरबीयुक्त आम्लपदार्थ
असतात. (Fatty -Acids) या चरबीयुक्त आम्लपदार्थाशी कॉस्टिक सोडा
द्रवणातील क्षारा (Alkali) च संयोगीकरण होऊन म्हणजेच Saponification
(साबुनीकरण) प्रक्रिया होऊन साबण तयार होते. ह्या साबणाची उपयुकत्तता
वाढविण्यासाठी साबण तयार करण्याच्या प्रक्रियेत मीठ, सोडियम सिलिकेट.
चायनाक्के इ विविध पदार्थ योग्य त्या प्रमाणात मिसळले जातात व नंतरच
तयार होणाऱ्या साबणाच्या लगद्यापासून बार-वड्या-चिप्स किंवा साबणाची
भुकटी आवश्यकतेनुसार केली जाते.

वस्तू किंवा वस्त्र यावरील धूळ-घाण इ. नष्ट करण्यासठी निव्वळ पाण्याने
वस्त्र किंवा वस्तू स्वच्छ होत नाही परंतु साबणाचे द्रावण (पाण्यात साबण
विरघळून केलेल द्रावण) वस्तू किंवा वस्त्र स्वच्छ करण्यासाठी उपयोगात
आणल्यास कपड्यातील मळ किंवा वस्तूचे पृष्ठभागावरली घाण- धूळ इं. चा
संयोग होऊन जो पदार्थ बनतो तो त्वरित, निद्राव्य (न विरघळणारा) असल्याने
कपड्यापासून सहजरित्या अलग होतो व कपडा स्वच्छ होतो.

विविध प्रकारच्या तेलापासून साबण तयार करण्याच्या ज्या विविध पद्धती
आहेत त्यात 1) तेलाला पूर्ण उकळून साबण तयार करण्याची पद्धत.
2) तेलाला समशितोषण् गरम करून नंतर कॉस्टिक सोड्याचे द्रावण मिसळून
साबण तयार करण्याची पद्धत. व 3) थंड तेलातच कॉस्टिक सोड्याचे द्रावण
मिसळून शीत पद्धतीने साबण तयार करण्याची पद्धती अशा पद्धती प्रचारात
आहेत या पैकी समशितोष्ण पद्धत व शीतपद्धत ह्या पद्धती कुटिरोद्योग किंवा
घरगुती प्रमाणात साबण तयार करण्यासाठी फार उपयुक्त आहेत.

साबण तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाचा साबुनीकरण अंश

पान नं. 12

किंवा Saponification-Value माहित असली पाहिजे म्हणजे त्यावरूनच विशिष्ट
जातीच्या 1 किलो तेलापासून साबण तयार होण्यास क्षारररपदार्थ (कॉस्टीक सोडा
इ.) किती प्रमाणात लागेल ते समजते.

1) सोयाबिन पामोलिन तेलापासून साबणवड्या तयार
करण्याची अनुभवसिद्ध पद्धती.

सोयाबिन पामोलिन तेल सहज सुलभ किफायतशीर भावात विकत मिळू
शकल्यास दररोजच्या वापरातील सर्व प्रकारचे कपडे धुण्यासाठी (स्वच्छ
करण्यासाठी) घरच्याघरी सुलभपद्धतीने साबणवड्या किंवा चिप्स तयार करता
येतात.

1) पामोलिन किंवा सोयाबिन तेल 1 किलो
2) कॉस्टीक सोडा 1/4 किलो
3) थंडपाणी 1/2 लीटर
4) चनाडाळीचे पीठ 1/4 किलो
5) गार पाणी 1/2 लीटर
6) गरम पाणी 1. 1/2 लीटर
एकूण 4 किलो

प्रथम कॉस्टीकसोडा गार पाण्यात विरघळवावातसेच चना डाळीचे (बेसन
पीठ 1/2 लीटर थंड पाण्यात मिसळून एकजीव करावे. पामोलिन तेल वजन
करून एका जस्ताच्या कढईत किंवा स्टीलच्या उथळ भांड्यात कढईत ओतून
शेगडीवर किटिंत गरम करूनघ्यावे. तले गरम झाल्यावर त्यात कॉस्टीक
सोड्याचे थंड द्रावण सावकाश मिसळावे व मिक्षण (तेल+कॉस्टीक सोडा द्रावण)
साकडी दांड्याने ढवळावे नंतर चना डाळीचे (बेसन)पाण्यात कालवलेले मिक्षण
तेल + कॉस्टिकसोडा मिक्षणात ओतावे व सावकाश ढवळून सर्व मिश्रण
एकजीव झाल्यावर साधारण अर्ध्यातासाने ह्या मिक्षणात गरमपाणी ओतून सर्व
मिक्षण पुन्हा चांगले ढवळावे व शेवटी एखाद्या परसट ट्रे मध्ये किंवा टिनपत्र्याचे
परातती ओतावे म्हणजे बारा-पंधरा तासात घट्टसर साबण तयार होईल. त्याच्या
सोईचे आकारत वड्या पाडाव्यात किंवा तुकडे किसून चिप्स तयार कराव्यात.

साबण वड्या अधिक फेसयुक्त होण्यासाठी फेसवर्धक किंवा

पान नं. 13

Foam-Boosters या नावाने ओळखली जाणारी रसायने केमिकल मार्कट मध्ये
विकत मिळतात. ही रसायने तयार होणाऱ्या साबणाच्या 5 टक्के पर्यत
वापरल्यास साबणाला मुबलक फेस येतो. वर दिलेल्या पाठात 1 किलो पामोलिन
तेलापासून अदमासे 4 किलो साबण तयार होईल व तो साबण अधिक फेसवर्धक
व्हावा म्हणून त्यात 200 ग्रॅम्स पर्यत Foam-Boosters हे रसायन मिसळावे.
फोमिंग एजंट या नावाने पावडर स्वरूपात फेसवर्धक रसायन विकले जाते.

साबण तयार करण्याच्या प्रक्रियेत कॉस्टीक सोडा ही तीव्र त्रार गुणधर्मीय
रसायन वापरावे लागते. ह्या कॉस्टीक सोड्याचे द्रावण तयार करताना थंड
पाण्याचाच उपयोग करावा. व कॉस्टीक सोड्यात पाणी न मिसळता थंड पाण्यात
कॉस्टीक मिसळावा व मिक्षण ढवळावे.

कॉस्टीक सोडा कमी प्रमाण उपयोगात आणल्यास साबुनिकरण क्रिया
होणार नाही म्हणजे साबणाचे द्रावण झाल्यावर तेल द्रावणाचे पृष्ठभागावर तरंगेल
परंतु कॉस्टीक सोडा जास्त वापरल्यास साबण हाताळताना (कपेड धुण्याचेवेळी)
हाताच्या बोटांची आग होते. कॉस्टीक सोड्याचा तीव्र क्षारगुणधर्ण वापरले जाते.

कपडे धुण्यासाठी साबणाचे द्रावण करावे लागते किंवा गारपाण्यात
भिजविलेल्या (ओल्या) कपड्यांवर साबण वडी घासावी लागते. अशावेळी
वापरले जाणारे पाणी जर कठीण (Hard-Water) गुणधर्माचे असेल तर साबण
पाण्यात पूर्णपणे विरघळला जात नाही व कठीण पाण्यातील क्षारीय घटकांशी
साबणाचे संयोगीकरण होऊन, चिकट-मेचट व पाण्यात न विरघळणारे पदार्थ
साबणांची मळनाशक शक्ती सुद्धा कमी करतात. साबणातील हे दोष ध्यानात
आल्यावर साबणाला पर्यायी पदार्थ शोधून काढण्यात शास्त्रज्ञ मग्न झाले शिवाय
प्रचंड वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मुबलक प्रमाणात साबणारे उत्पादन
करावयाचे म्हणजे वनस्पतिक तेले सुद्धा विपूल प्रमाणात हवीत. खाद्य-अखआद्य
वर्गातील तेलबिया व तेलाचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे साबण सदृश्य
मळनाशक वस्तू उत्पादनासाठी तेला ऐवजी पेट्रोकेमिकल्सचा उपयोग करून
नवीन प्रकारातील निर्मलके किंवा घाण मळ नाशक पदार्थ तयार करण्यात
शास्त्रज्ञाना 1938-40 या वर्षात यश प्राप्त झाले. त्यामुळे नैसर्गिक वनस्पतिक

पान नं. 14

तेले खाद्य व अखाद्य वर्गातील यांची साबण उत्पादनासाठी जी चणचण
(कमतरता) जाणवत होती. तिच्यावरही शास्त्रांज्ञाना मात करता आली. ही
निर्मलके पारंपारिक साबण (वड्या-बार-चुरा) उत्पादन क्रियेपेक्षा अधिक सुलभ
पद्धतीने कमी क्षमात, अल्पवेळात व जास्त क्षेष्ठ गुणधर्माची असल्यामुळे
उत्तरोत्तर आधिकाधिक लोकप्रिय होऊ लागली. पारंपारिक साबण उत्पादन
प्रक्रियेपेक्षा ही निर्मलके (वड्या-पॉव़र्स व द्रावण) तयार करण्यासाठी
पेट्रोलियन व अन्य केमिकल्सचा उपयोग करावा लागत असल्याने ह्या
निर्मलकांना सिथेंटिक (कृत्रिम) डिटरजंटस् अशी संज्ञा दिली गेली. Dirt
Removing Agents किंवा संक्षिप्त भाषेत DETERGENTS( निर्मलके)
ह्या नावाने ही नव्या प्रकारातील निर्मलके (मळघाण नाहिसे करणारे
पदार्थ-वस्तू) ओळखली जाऊ लागली. खनिज (Mineral) संपत्तीद्वारे
मिळणाऱ्या पेट्रोलियन केमिकल्स मधील डोडिसिलबेंझिन ( Dodect-Benzene
व अल्किल अरिल बेंझिन ह्या हायक्रो कार्बन वर्गातील रसायनांचे गुणधर्माचा
शोध लागल्यामुळे साबणाला पर्याय किंवा निर्मलके Detergents उत्पादन
करणे व प्रचारात आणणे शक्य झाले

डोडिसल बेंझिन हे रसायन घट्टसर-चिकट व फिकट काळपट तपकिरी वर्ण
सदृश्य असते व काकवी (गुळ उत्पादन प्रक्रियेतील पातळसर पदार्थ ) सदृश्य
किंवा लापशी स्वरूपात विरून मिळते. डोडिसिल बेंझिन रसायन केमिकल मार्केट
मध्ये अँसिडस्लरी ह्या व्यावहारिक भाषेत ओळखले व किवले जाते.

Akyl Aryl Benezene हे रसायन मार्केटमध्ये अँसिडस्लरी म्हणूनच विकले
जाते व ह्या दोन रसायनांमधील फरक रासायनिक परिक्षणानंतर समजतो.

डोडिसिल बेंझिन युक्त अँसिडस्लरी-Hard Slurry म्हणून ओळखली जाते
व ह्या स्वलीचा उपयोग डिरजंट पॉवडरर्स-वड्या बार इ. तयार करताना
होतो. अल्किल बेंझिन युक्त अंसिडस्लरी Soft Slurry म्हणून ओळखली
जाते व ह्या स्लरीचा उपयोग लिक्वीड डिटरजंट किंवा द्रवरूपी डिटरडंट
उत्पादन करताना प्रामुख्याने केला जातो. हार्डस्वरीपेक्षा सॉफ्ट स्लरी किंमतीत
स्वस्त असते. हार्डस्लरी डोडिसिल बेंझिन चा उपयोग करून डिटरजंट पावडर्सस
तयार करताना 1) वॉशिंग सोडा किंवा सोडा अँश 2) सोडियम बाय
कारबोनेट- NaHCo3 (खाण्याचा सोडा) 3) सोडियम मेटा सिलिकेट

पान नं. 15

4) सिलिकेट ऑफ सोडा 5) ट्राय सोडियम फॉस्टेट किंवा ट्रिपोली फॉस्फेट 6)
डिओलाइट 7) काळीकटी मिथेल सेफ्युटोड अथवा सी.एस. सी. पावडर 8)
परबोरेट ऑफ सोडा 9) बोरेक्स 10) ऑप्टिकल व्हाइटनर अथवा टिनोपॉल
सदृश्य केमिक्लस 11) पिगमेंट कलर लेमनयलो किंवा रॉयल ब्लू रंग छटेतील व
12) सुगंध सुवास इ. केमिकल्स मिसळावी लागतात. ही सर्वच रसायने डिटरजंट
पावडर तयार करताना वापरलीच जातात असे नाही परंतु सोडा अँश
ट्रिपोटीफॉस्फेट व ग्लाबर्स सॉल्ट (एक प्रकारचे मीठाची भुकटी) इ. केमिकल्स
पॉवडर्स मात्र मिसळणे अत्यावश्यक असते जेणे करून कपड्यातून सगळी
घाण-मळ इ. सुलभतेने निघून जातो व कपडे उजळ स्वच्छ होतात. सोडियम
बाय कारबोनेट हे रसायन वापरल्याने वॉशिग सोड्याचा तीव्र क्षार धर्मीय
गुणकारी होतो व डिटरजंट पावडर हाताळताना क्षारिय गुणधर्मामूळे
कापडीला (हाताचे बोटांना) होणारा दाह (बोटांची आग होणे) थांबतो. 3)
सोडियम मेटासिलिकेट Sodium Meta Silicate हे रसायन सिलिकेट ऑफ
सोड्याचे पावडर स्वरूपातील रसायन आहे. या रसानामुळे डिटरजंट पावडरची
कपड्यातील मळ काढण्याची क्षमता वाढते व शिवाय हे रसायन Rust Proof
गंज विरोधक म्हणून कार्य करते.

5) ट्राय सोडियन फॉस्फेट हे रसायन कठिण पाण्यातील चुना व लोह धातूंच्या
लवण पदार्थाचा कपडे धुण्यातीलल अडथळा दूर करते व डिटरजंट पावडर्सची
गुणवत्ता वाढवते. ट्रिपोट फॉस्फेट इ. विविध नावानेही ही केमिकल्स बाजारात
विकत मिळतात. अशाच प्रकाराचा गुणधर्म असलेले झिओलाइट Zeolite हे
रसायन सुद्धा ट्रायसोजियम फॉस्फेटचे ऐवजी हल्ली वापरतात.

6) कार्बाकसी मिथेल सेक्लूलर अथवा C.M.C या संक्षिप्त नावाने
ओळखली जाणारी ही रासायनिक पावडर Anti-Redeposting Agent म्हणून
डिटरजंट पॉवडर्स मध्ये वापरली जाते. कपड्यातून निघालेला मळ पुन्हा
कपड्यात शिरू न देण्याचे कार्य ह्या रसायनाद्वारे होते. ह्या रसायनाचे 5 ते 8
टक्के क्षमतेचे द्रावण केल्यास ते चिटकसर (Gum Paste) होते व या चिकट
पारदर्शक द्रावणाचा वापर द्रवरूप लिक्विड डिटरजंट तयार करताना लिक्विड
दाटसर (Viscouse) होण्यासाठी केला जातो.

7) परबोरेट ऑफसोडा-पांढऱ्या रंगाचे भुकटी स्वरूपातील हे रसायन

पान नं. 16

डिटरजंट पावडर्समध्ये मिसळल्याने धुवावयास घेतलेले पांढरे कपडे जास्त उजळ
शुभ्र होतात कारण ब्लीचिंगचा गुणधर्म परबोरेट ऑफ सोडा ह्या रसायनात आहे.
परबोरेट ऑफ सोडा किंवा Sodium Perborate ह्या रसानाचे ऐवजी बोरेक्स
orex ह्या रसायनाची भुकीट सुद्धा वापरता येते. कारण बोरेक्स रसायनाचा
गुणधर्म कपड्यांना उजळ-शुभ्र करण्याचाच असतो. 10) ऑप्टिकल व्हाइटनर
किंवा दृष्टिगोचर रसाने-टिनोपॉल सदृश्य गुणधर्माची ही रसाने फिकट
पिवळसर रंगाचे भुकटी स्वरूपात विकत मिळतात व ही केमिकल्स डिटरजंट
पावडरीमध्ये मिसळल्याने कपड्यांवर चमच चकाकी ( Brigthness) येते व
धुतलेले कपडे अधिक आकर्षक दिसतात. दररोजच्या वापरातील कपडे
धुण्यासाठी तयार करावयाच्या निर्मलकामध्ये वापरली जाणारी विविध
गुणधर्माची रसायने (केमिकल पावडर्स) पांढरट रंगाची असतात. ही रसायने
एकत्रित मिसळून व सर्वमिश्रण एकजीव व्हावे म्हणून नायलॉन चाळणीतून
(Mesh) गाळली जातात व नंतर त्यात अँसिडस्लरी मिसळली जाते. ह्या
अँसिडस्लरीचे तपकिरी काळपट रंगामुळे तयार होणारी डिटरजंट पावडरीला
मळकट रंग येतो. हा मळकट काळपट रंग नाहीसा व्हावा व डिटरजंट पावडर
आकर्षक दिसावी म्हणून पिगमेंट कलरर इमलशन पाण्यात मिसळून व त्या
पाण्यात अंसिडल्सरी मिसळून तयार झालेले फिकट पिवळट रंगाचे किंवा निळसर
झाक असलेले अँसिडस्वरीचे द्रावण डिटरजंट पावडरमध्ये वापरावयाच्या वाशिंग
सोडा, ट्रिपोटी, फॉस्टे, मेटासिलिकेट इ. विविध केमिकल पावडर्सचे मिश्रणावर
ओतले जाते व मिश्रण एकजीव करून फिकट निळसर किंवा लेमनयसो
रंगाची जिटरजंट पावडर तयार केली जाते.

2) कपडे (व्सत्र) धुण्यासाठी डिटरजंट पावडर

ही पावडर तयार करताना उपयोगात आणआवयाची सर्व रसायने (केमिकल
पावर्डस) पाण्यात सुलभरित्या व पूर्मपणे विरघळारी अशीच हवीत.
कपडे धुण्यासाठी उपयुक्त अशी फिकट पिवळट रंगाची व सुवासिर डिटरजंट
पावडर तयार करण्याचा पाठ ( Receipe) खालली प्रमाणे.य

1) वॉशिंग सोडा किंवा सोडा 750 ग्रॅम्स
2) सोडियम ट्रिपोली फॉस्फेट 750 ग्रॅम्स

पान नं. 17

3) सोडियम मेटा सिलीकेट 500 ग्रॅम्स
4) बोरॉक्स पावडर 250 ग्रॅम्स
5) सी.यएम्. सी. पावडर 100 ग्रॅम्स
6) ग्लाबर्स सॉल्ट (सोडियमसल्फेट) 2,100 ग्रॅम्स
7) सुगंध 10-15 ग्रॅम्स
8) मिगमेंट लेमनयलो इमलशन 10 ग्रॅम्स
9) डोडिसिल बेंझिन (अंसिडस्लरी हार्ड) 500 ग्रॅम्स

कृती- सर्व केमिल पाववर्डस वजन करून घ्याव्यात,

सोडियन ट्रिपोली फास्फेट किंवा मेटासिलिकेट इ. रसायनांमध्ये गुठळ्या
(Lumps) असल्यास अशी रसायने खलबत्त्यात कुटून व नाययलॉन चाळणीने
चाळून त्यांची भुकटी करावी. नंतर पाठातील क्र. 1 ते 6 मधील सर्व रसायने
पावडर स्वरूपात एकत्र मिसळा. मिक्षण एकजीव होण्यासाठी नायलॉन
चाळणीचा वापर करावा.

लाकडी फ्रेमला नायलॉनची जाळी घट्ट ताणून बसवली की मजबूत चाळणी
तयार होते.

सर्व मिश्रण जाडसर पॉलिथिन शीटवर (प्लास्टिक कागदावर) पसरवून
लाकडी उलथन्याने मिश्रण एकजीव करावे.

नंतर प्लास्टिक चे उथळसर ट्रेमध्ये अदमासे पाव लीटर (250 सीसीज) थंड
पाणी घेवून त्यात अंसिडस्लरी (हार्ड) मिसळावी मिश्रण एकजीव पातळसर
झाल्यावर त्यात पिगमेंट्यलो कलर इमलशन ओतावे. आता अंसिडस्लरी मिश्रित
फिकट पिवळट रंगाचे द्रावण केमिल पावडर्समध्ये थोडे थोडे मिसळावे म्हणजे
पावडर्सला फिकट पिवळ्या रंगाची झलक येईल व अंसिडस्लरी सर्व रसायनांचे
पावडर्समध्ये मिसळली गेली आहे ते समजेल.

प्लास्टिक शीटवर लाकडी उलथन्याने सर्व मिश्रण खालीवर एक जीव करावे
पावडर्सला किंचित ओलावा आला तरी ही पावडर (मिश्रण) प्लाटस्टिक कागदावर
पसरवून ठेवली की डिटरजंट पावजर मधील ओलावा निघून जातो व पावडरकोरडी होते.
प्लास्टिक शीटवर केमिकल पावडर्सचे मिश्रण करणअयाऐवजी

पान नं. 18

प्लास्टिक टब मध्ये सर्व पावडर्सचे मिश्रण ओतून त्यावर अँसिडस्लरीचे पाण्यात
कालवलेले रंगीत द्रावण ओतले व सर्व पावडर्स एकजीव केल्या तरीही मिश्रण
जास्त चांगले एकजीव होते- मिश्रण एक जीव होत असतानाच सुंगधी अर्काचे
द्रावण ह्या मिश्रणात थोडे थोडे टाकावे म्हणजे पावडरमध्ये सुगंध दरवळते.

3) पाठ नं. 2 टिनोपॉल सदृश्य रसायन मिक्षित निळसर झाक
असलेली डिटरजंट पावडर.

पावडर कि.ग्रॅम्स
1) वॉशिंग सोडा 1-000
2) सोडियम ट्रिपोटी फॉस्फेट 1-000
3) सोडियन बायकार्बोनेट -500
4) सोडियन परबोरेट -100
5) ग्लाबर्स सॉल्ट 1-000
6)कॉमन सॉल्ट(खाण्याचे मीठ) -800
7) टिनोपॉल -014
8) पिगमेंट ब्ल्यू इमलशन -010
9) अँसिड स्लरी हार्ड -450
एकूण 5 किलो

कृती- वर दिलेल्या (क्र.1) पद्धतीनुसार

4) किफायतशीर (स्वस्त किंमतीची) व उपयुक्त गुणधर्माची
डिटरजंट पावडर

पावडर कि.ग्रॅम्स
1) वॉशिंग सोडा 2-250
2) सोडियन बायकार्बोनेट 1-120
3) कॉमन सॉल्ट(पांढरेशुभ्र) 1-200
4)अँसिडस्लरी(हार्ड) -400
5) पिगमेंट लेमनयलो इमलशन -010

पान नं. 19

5) भांडी घासणेसाठी (स्वच्छ करण्यासाठी) डिटरजंट पावडर
किंवा वड्या तयार करण्याची रीत.

शहरी भागात व ग्रामीण भागातसुद्धा दररोजच्या वापरात तांबा, पितळ
भांड्याऐवजी स्टे. स्टीलस हिंडालियम अँल्युमिनियम इ. धातूची भांडी जास्त
प्रमाणात हल्ली पावरली जातात तसेच कपबशा इ. क्रेकरी व काचचे पेले
प्लास्टिक मग्ज - टब्ज् इ. विविध वस्तूंचा वापर मुबलक प्रमाणात केला जातो.

या वस्तू स्वच्छ -निर्मळ करण्यासाठी राख-माती साबणाची पावडर इ. चा
उपयोग करण्यऐवजी क्लीनिंग पावडर्स (शाइन इट, क्लीनॉल इ.) वापरणे जास्त
सोयीचे व कमी श्रमाचे होते.

कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिटरजंट पावडर्स व भांडी घासण्यासाठी
वापरात येणाऱ्या क्लीनिंग पावडर्स (Cleaning Powders) ह्या दोन्ही पावडरी
जिटरजंट वर्गातीलच असल्या व ह्या दोन्ही पावडर्समध्ये जेडिसिट बेंझिन किंवा
अँसिडस्लरी हे रसायन वापरले जात असले तरी वरील दोन्ही प्रकारच्या
(डिटरजंट पावडर व क्लीनिंग पावडर्स) पावडर्समध्ये मूलभूत फरक म्हणजे
कपडे धुण्याची पावडर 100 टक्के पाण्यात विरघळणारी असते परंतु भांडी व
तत्सम वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरात येणारी क्लीनिंग पावडर फक्त 4-50
टक्केच पाण्यात विरघलते म्हणजेच भांडी घासण्याच्या क्लीनिंग (डिटरजंट)
पावडर्समध्ये 55 ते 60 टक्के प्रमाणात पाण्यात न विरघळणारे डोलोमाईट
प्युमिस पावडर टाल्क पावडर बारिकरेती इत्यादीची भुकटी मिश्रण केलेली
असते. पाण्यात न विरघळणाऱ्या, डोलोमाईट प्युमिस पावडर इ. पदार्थामुळे
चिकट-तेलकट-ओशटपणा पूर्णपणे निघून जातो. ह्या क्लीनिंग पावडर्स भुकटी
(पावडर) स्वरूपात 2 ते 5 किलो वजनाचे पुड्यातून विकल्या जातात.
डोलोमाईट (दगडाची पांढरी भुकटी) मुळे या क्लीनिंग पावडर्स वजनात जड
असतात परंतु किंमतीत खूप स्वस्त होतात. डोलोमाईट पावडर दर्जानुसार 25
ते 30 पैसे प्रति किलो मुबलक प्रमाणात विकत मिळते.

6) भांडी घासण्यासाठी क्लीनिंग पावडर (डिटरजंट ) तयार
करण्याचा मार्गदर्शनक पाठ.

1) सोडाअँश (वॉशिग सोडा ) 175 ग्रॅम्स

पान नं. 20

2) सोडियम बायकार्बोनेट (खाण्याचा सोडा) 75 ग्रॅम्स
3) डोलोमाईट पावडर (वस्त्रगाळ भुकटी) 650 "
4) डिटरजंट स्लरी Acid Slurry( Hard) 50"
5) फोम बुस्टर (Foaming Agent) Slsp पेस्ट 30 "
6) सुगंधी अर्क जस्मि इ. 20 "
1000 (1 किलो)

कृती . क्र. 1 ते 3 पावडर्स वजन करून एकत्रित मिसळाव्यात नंतर अँसिडस्लरा 100
सीरीज थंड पाण्यात मिसळून त्या मिश्रणात वरील पावर्डस मिसळाव्यात सर्व मिश्रण एकजीव
करावे व शेवटी फोम बुस्टर व सुगंधी अर्क एका पाठोपाठ मिसळून सर्व मिश्रण नायलॉन मेश
मधून चाळून घ्यावे.

भांडी व अन्य गृहपयोगी वस्तू घासण्यासाठी (स्वच्छ करताना) वरील प्रकारच्या क्लीनिंग
पावडर्स वापरण्यऐवजी तशाच गुणधर्माच्या वड्या क्लीनिंग केक्स वापरल्यास कमी खर्च होते
व पावडर वाया जात नाही. मोरीत किंवा मोरीच्या जाळीवर डोलोमाईट पावडर हे पाण्यात न
विरघळणारे रसायन साचून रहात नाही. मोरीचा पाईप तुंबणे (पाण्यात न विरघळणाऱ्या
डोमाईट पावडरचा थर जाळीवर किंवा मोरीचे पाईपचे बाजूला चिकटून बसतो.) इ. समस्या
येत नाहीत. भांडी घासताना मोलकरणी क्लीनिंग पावडर्सची उधळण राखे प्रमाणे करतात
म्हणूनच क्लीनिंग पावडर्स ऐवजी भांडी घासताना क्लीनिंग केक्स (वड्या) चा वापर केल्याच
भांडी घासण्याचे काम सुलभ व स्वच्छ होते.

7) क्लीनिंग कक्स (वड्या) गृहोद्योग म्हणून तयार करण्यासाठी
खालील मार्गदर्शन पाठ उपयुक्त होईल.
किलो ग्रॅम्स
1) वॉशिंग सोडा( सोडाअँश) 1-000
2) सोडियम बायकारबोनेट -600
3) सोडियम मेटा सिलिकेट -150
4) डोलोमाईट पावडर 3-000
5) डोडिसिल बेंझिन (अँसिडस्लरी हार्ड) - 225
6) कॉस्टिक सोडा द्रावण (50 टक्के क्षमतेचे) -045

पान नं. 21

7)फेसवर्धक Slsp पेस्ट -045
8) सी.एम.सी.किंवा डी.पी स्टार्च
पेस्ट (10 टक्के क्षमतेची) -750
9) थंड पाणी -190
एकूण 6 किलो

वड्या करण्यासाठी प्रथम अदमासे 1।। ते 2 लीटर्स गार पाण्यात कॉस्टीक
सोड्याचे द्रावण (क्र. 6) णिसळावे कॉस्टीक सोड्यामुळे तयार होणाऱ्या
क्षारीय (Alkaline) द्रावणात डोडिसिल बंझिन (क्र. 5) म्हणजेच अँसिडस्लरी
मिसळावी. व मिश्रण ढवळून बाजूला ठेवावे.

नंतर पाठातील क्र. 1 ते 4 केमिकल्सचा पावडरी Receipe नुसार वजन
करून एकत्रित मिसळाव्यात सर्व केमिकल्स शुभ्रवर्णाच्या पावडर्स स्वरूपात
विकत मिळत असल्याने त्यांचे एकजीव मिश्रण करणे सुलभ असते. सर्व
केमिकल पावडर्स एकजीव मिसळल्यानंतर त्या मिक्षणात कॉस्टीकसोड्याचे
पाण्यात मिसळलेली अँसिडस्लरीचे मिश्रण हळूहळू एकत्रित करावे. व हे मिश्रण
लाकडी पळ्याने एकजीव कालवावे.

सर्व मिश्रण चांगले एकक्षित झाल्यावर त्या ओलसर मिश्रणात सी.एमसीसची
पेस्ट (क्र 8) मिसळावी जेणेकरून टचिकट व घट्ट असा मिश्रणाचा गोळा तयार
होईल यातच Slsp पेस्ट (क्र.7) मिसळावी. आवश्यकतेनुसार सुगंधी अर्क 50
सीसीज पर्यत मिसळावा. व ह्या मिश्रणाचा गोळा पुन्हा एकजीव करावा. हातात
रबरी मोजे घालून सर्व मिश्रण एकजीव घट्ट चिकटसर गोळ्याप्रमाणे होईल असे
बघावे.नंतर वड्या पाडण्यासाठी प्लास्टिकच्या छोट्या पसरट तोंडाच्या खोलगट
वाटीचा उपयोग करून त्यात हा गोळा (मिश्रणाचा गोळा भरलेली) उलटी करून
डिटरजंटच्या वड्या( केक्स) पाडाव्यात. ब्या वड्या 8 ते 10 तासाचे कालावधीत
चांगल्या सुकतात. सी.एम. सी स्टार्च पेस्ट मुळे सर्व केमिकल्स एकत्र साधली
जातात व वड्यांचा (कप्स) आकार मोडत नाही. ह्या पाठ्यात दिलेल्या सोडियम
मेटासिलिकेट (क्र. 3) ह्या रसायनाचे ऐवजी सिलिकेट ऑफसोडा ह्या चिकट
पातळसर स्वरूपात मिळणाऱ्या रसायनाचा देखील उपयोग करता येतो. सिलिकेट

पान नं. 22

ऑफ सोडा हे रसायन क्षारीय गुणधर्माचे असून मळ नाशक गुणधर्माचे आहे. सी.
एम.सी.. (c.m.c) ह्या रसायनाच्या प्सेटमध्ये चिकटपणाबरोबरच Anti
Redepositing of Dirt चा गुणधर्म असल्याने भांडी घासण्याची वडी तयार
होण्यास मदत होते शिवाय भांड्यावरी घाण- मळ निघून जाण्यास C.M.C
रसायनाचा उपयोगही होता. वापर करताना ह्या वड्यांवर (Cleaning Cakes)
पाण्याने ओली केलेली नायलॉन घासणी (स्क्रबर) टेकविताच वडीतील केमिकल्स
घासणीला चिकटतात व भांडी घासताना मळ-चिकट ओशटपणा निघून
जाण्याचे कार्य सुकर होते. कुठलीही यंत्रसामुग्री (मशिनरी इ.) न वापरता
घरातल्या घरात फावल्या वेळात दैनिक गरजेच्या ह्या क्लीनिंग केक्स कुणालाही
तयार करता येतील.

8) हस्त प्रक्षासनासाठी (काळे मेणचट तेलकट हात)
सुवासिक क्लिनिंग (डिटरजंट) पावडर

कागद छापखाने, मोटार स्कूटर्स रिपेरिंग वर्क्स गॅरेजेंस, सायकल स्टोव्ह
दुरूस्ती केद्नद्र इ. ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीना काम ओटापल्यावर तसेच
भोजनाचे सुट्टीत आपले काळे मेणचट तेलकट टिकट हात स्वच्छ धुणे(हस्त
प्रक्षालन) जरूरीचे असते बऱ्याच ठिकाणी (वर्कशॉप्स-छापखाने इ.) कपड्यांचे
साबण वडीचा तुकडा किंवा वॉशिगसोडा पावडरचा वापर कामगारांच्या हस्त
प्रक्षालनासाठी केला जातो. बारीक रेती, विटाची भुकटी, राख-माती इ.
पदार्थाचा सुद्धा काही ठिकाणी हात धुण्यासाठी वापर करतात.

वर वर्णिलेल्या वस्तूंमुळे हाताचे बोटाचे नाजूक कातडीला इजा होण्याची व
कातडी हळूवार बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. कपडे धुण्याचे साबण
वड्यात कॉस्टीक सोड्यासारखे तीव्र क्षार गुणधर्मीय रसायन वापरले जात
असल्याने हाताचे (बोटाचे) कातडीला निश्चितच इजा होण्याची शक्यता असते
व हाताची बोटं हुहूळी बनतात. साबणवडीला मुबलक फेस येतो परंतु नुसता
मुबलक फेस निर्माण झाल्याने हाताचे बोटांवरील तेलकट चिकट काळपटडाग
पूर्णपणे निघून जात नाहीत. कारखाना व प्रिंटीग प्रेस मधील कामगारांचे हाताचा
(बोटावरली) तेलकट मेणचट काळपटपणा निघून जाण्यासाठी हात धुताना अल्प
प्रमाणात घर्षण (Scrubing) क्रिया करू शकणारी परंतु बोटाचे कातडीला

पान नं. 23

अपायकारक नसणारे पदार्थ (केमिकल पावडर) हस्त प्रक्षालनासाठी वापरल्या
जाणाऱ्या पावडर्समध्ये असले पाहिजेत हात धुण्याची क्रिया होत असताना
प्रसन्न व सुंगधित आल्हाददायक वाटले पाहिजे. म्हणूनच हस्त प्रक्षालनासाठी
वापरावयाचाय् पावडर्समध्ये, सुंगधी अर्क वापरावयास हवा. तसेच टाल्क
पावडर-संगजिरा( मार्बल स्टोन व Tiles( पावडर) भुकटी इ. घटक काळपट
चिकट डाग काढून टाकणारी काही रसायने ह्या पावडरमध्ये मिसळ्यास
हाताचा तेलकटपणा काळपट डाग व ग्रीक इ. मुळे येणारा चिकट मेणकटपणा

त्वरित निघून जाण्यास मदत होते. वॉशिंग सोड्यासारख्या क्षारपदार्थाचा गुणधर्म
सौम्य होण्यासाठी सोडा बार कार्ब( बाय कार्बोनेट ऑफसोडाः ची पावडर भुकटी
ह्या क्लिनिंग पावडरमध्ये मिसळ्यास हाताचे बोटांना काहीही इजा (नुकसान)
होत नाही.

मार्गदर्शक पाठ व तयार करण्याची कृती :

1) टाल्क पावडर । संगजिरा भुकटी 600 ग्रॅम्स
(अतितलम नायलॉन चाळणीतून गाळलेली)
2) वॉशिंग सोडा-सोडा अँश 220 "
3) सोडियम बाय कार्बोनेट 120 "
4) डोडिसिल बेंझिन (अँसिडस्लरी हार्ड) 50 ग्रॅम्स
5) फोमिंग एजंट( SLSP) पेस्ट
Sodium Lauryl Sulphate Paste
6) सुगंधी अर्क द्रावण 3 ग्रॅम्स
एकूण (1 किलो) 1000 ग्रॅम्स

पाठात दिलेली सर्व रसायने मोजून (वजन करून) घेणे क्र्. 1 ते 3 पावर्डसचे
एकजीव मिश्रण झाल्यावर क्र. 4 ऑसिडस्लरी थोडी थोडी त्यात मिसळावी व
मिश्रण चांगले एकजीव होणेसाठी अतितलम नायनॉन चाळणीतून गाळून घ्यावे
सर्वात शेवटी Slsp ची पेस्ट किंवा पावडर मिसळावी व नंतर सुगंधी अर्क
मिसळावा. पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करावे. तेलकट कालपट चिकटसर हात
धुण्यापूर्वी हातावर थोडे गारपाणी घ्यावे व अदमासे अर्धा चमचा क्लिनिंग पावडर

पान नं. 24

तळ हातावर घेऊन चांगले खसखसून चोळावे हात धुण्याची क्रिया होत असताना
संगजिरा भुकटीमुळे घर्षण होऊन व डिरजंट स्लरीमुळे डाग निघून जाण्यास
मदत होते शिवाय मुबलक फेरा व सुंगध दरवळत राहिल्याने हस्त प्रक्षालनाची
क्रिया सुखावह होते.

9) द्रवरूपी-निर्मलके

पावडर जिटरजंटस् प्रमाणेच, द्रवरूपी निर्मलकेसुद्धा स्टे, स्टील-कपबशा प्लेटस्
इ. क्रोकरी वस्तू व काच प्लास्टिक इ. विविध प्रकारातील गृहोपयोगी वस्तूंच्या
पृष्ठभागावरली (Surface) घाण-मळ, चिकटपणा नाहीस करण्यासाठी
उपयोग होतो. द्रवरूपी-निर्मलकांना (Liquid-Detergents) Surface
Cleaning Agents असेही म्हटले जाते (म्हणणअयाचा प्रघात आहे.) ही द्रवरूपी
निर्मलके पारदर्शक-मधाळ(फिकट पिवळसर रंगाची) रंगाची व चिकट घट्ट
स्वरूपात उत्पादन केली जातात किंला पाण्यासारखी सुलभ प्रवाही व सुवासिक
सुद्धा तयार करताना जेणे करून हात धुण्यासाठी (स्वच्छ करण्यासाठी) द्रवरूपी
सुवासिक निर्मलकांचा वापर करणे सोयीचे होते.

द्रवरूपी निर्मलके तयार करताना अल्किल अरिल बेझिंन किंवा अँसिडस्लरी
सॉफ्ट या पेट्रोकेमिकल्सचा उपयोग करतात. व कॉस्टीक सोडा किंवा कॉस्टीक
पोटेश (Potassium Hydroxide) ह्या रसायनाचा वापर केला जातो. डिटरजंट
पावडर्स तयार करताना सात ते आठ प्रकारच्या केमिकल पावडर्स, अँसिडस्लरी
(हार्ड) समवेत वापराव्या लागतात व ह्या सर्व पावडर्स सुयोग्य मिश्रण
झाल्यावरच गुणधर्मात श्रेष्ठ अशी निर्मलकाची पावडर तयार होते. द्रवरूपी
निर्मलक (Liquid-Detergent) तयार करताना फक्त दोन तीन प्रकाराचीच
रसायने अँसिडस्लरी (सॉफ्ट) समवेत वापरावी लागतात व ही रसायने पाण्यात
विरघळ्यावर त्यांचे एकजीव मिश्रण करून द्रवरू निर्मलक तयार होते
म्हणजेच पावडर डिटरजंटस मध्ये सुगंध- सुवास
मिश्रीत केल्यास. हात स्वच्छ करण्यासाठी सुलभतेने उपयोग करता येतो

पान नं. 25

उत्पादन क्रिया सोपी-कमी श्रमाची व तुलनात्मक दृष्ट्या (पावडर्सपेक्षा) स्वस्त
किंमतीची द्रवरूपी निर्मलके तयार करण्यास साधन सामुग्री सुद्धा थोडीच लागले.

द्रवरूपी निर्मलके तयार करण्याची रीत व मार्गदर्शक पाठ

(Recipe)
1) कॉस्टीक सोडा 0.190 ते 0.200
गारपाणी 0.500
2) अँसिडस्लरी (सॉफ्ट) 1.200 ते 1.250
गारपाणी 6.250
3) युरिया 0.300
लीटर्स 9.00

कृती- प्लास्टिकच्या छोट्या टब््मध्ये गारपाणी अदमासे अर्धालिटर मोजून
घ्यावे व त्यात कॉस्टीक सोडा विरघळवावा. कॉस्टीक सोड््याचे द्रावण थंड होऊ
द्यावे. मग प्लास्टितकच्या बकेट मध्ये गार पाणी 6 1/4 लीटर्स मोडून घ्यावे व त्या
पाण्यात अँसिडस्लरी मिसळावी. सर्व मिश्रण लाकडी दांड्याने एकजीव करावे.
पातळ घट्टसर फिकट काळपट परंतु पारदर्शक द्रावण तयार होईल हे द्रावण थंड
झाल्यावर त्यात कॉस्टीक सोड्याचे (क्र.1) थंड द्रावण सावकाश मिसळावे. असे
मिश्रण करीत असताना अँसिडस्लरी व कॉस्टीक सोड्याचे द्रावण यांची
रासायनिक क्रिया होऊन पांढूरक्या रंगाचे (Milky) द्रावण तयार होईल. ह्या
द्रावणाचे PH टेस्ट पेपरच्या उपयोग करून परिश्रण करावे लागते. पी.एच.टेस्ट
पेपरलाच युनिव्हर्सल इंडिकेटर (Universal Indicator) असेही नाव आहे.
औषधी रसायन उद्योगात PH टेस्ट पेपर्सची आवश्यकता असते हे कागद तांबूस
पिवळट रंगाचे व छोट्या तुकड्यांचे स्वरूपात (Paperstrips) विकत मिळतात.
ह्या कागदाचे तुकड्यावर आम्ल द्रावणाचे थेंब टाकल्यास कागदाचा रंग तांबूस
होतो व क्षारीय (Alkaline) द्रावणाचे थेंब टाकल्यास कागदाला निळसर रंग येतो.
जर उदास (Neutral) द्रावणाचे थेंब टाकले तर पी.एच. पेपर्सचा रंग बदलत
नाही तसाच रहातो.

अँसिडस्लरीचे द्रावणात कॉस्टीक सोडा द्रावण मिसळण्यानंतर ह्या मिश्रणांचे
एक-दोन थेंब पी.एच पेपर स्ट्रीपवर टाकावे व PH पेपरवर तांबूस रंग आला तर
ह्या मिश्रणात कॉस्टीक सोड्याचे थंड द्रावण आणखी टाकावे परंतु PH काग

पान नं. 26

पट्टीवर काळपट निळा रंग आला तर कॉस्टीक सोडा द्रावण जास्त झाले
असे समजावे व ह्या मिश्रमात अँसिडस्लरी (सॉफ्ट) थोडी थोडी मिसळावी जेणे
करून पी.एच. कागदपट्टीवर फिकट निळसर रंग छटा येईल. अशा प्रकारे कॉस्टीक
सोडा व अँसिडस्लरी यांचे संतुलित मिश्रण तयार झाले म्हणजे या मिश्रणात
युरिया (Urea) हे पांढऱ्या दाणेदार स्वरूपातील रसायन मिसळावे. युरिया
अदमासे अर्धा ते पाऊण लीटर गार पाण्यात मिसळून वापरल्यास लिक्विड
डिटरजंटला पारदर्शकव्त व थोडा घट्टसरपणा येईल व मधाळ रंगाचे चिकटसर घट्ट
पारदर्शक द्रवरूपी निर्मलक तयार होईल.

10) सुवासिक-सुगंधी द्रवरूप निर्मलक

Scented Liquid Detergent

जस्मिन, गुलाब, मोगरा इ. सुगंधी अर्क वापरून सुवासिक द्रवरूप डिटरजंट
तयार करण्यासाठी वरील पाठानुसार लिक्विड डिटरजंट तयार करावे व ह्या
द्रावणात 1:1ह्या प्रमाणात गारपाणी मिसळून व मिश्रण एकजीव करून प्रवाही
निर्मलक तयार करावे. आपणाला हव्या असलेल्या सुगंधी द्रावणाचा अर्क 1/2 ते
1 चमचाभर 1/4 लिटर गार पाण्यात मिसळून हे पाणी द्रवरूप निर्मलकाता
मिसळावे म्हणजे सुगंधी निर्मलकाचे प्रवाही द्रावण तयार होईल.

ह्या सुगंधी द्रावणात फिकट हिरवा किंवा गुलाबी रंग ग्रावण मिसळल्यास फिकट
रंगाचे सुगंधी द्रावण (निर्मलक) तयार होईल. वॉशबेसिन जवळील साब-
पात्रात सुगंधी निर्मलकाचे द्रावण भरतात व भांडे उपड़े करून निर्मलकाचे 2-4
थेंब हातावर घेतल्यास हात स्वच्छ होऊन सुगंध दरबळतो.

हॉटेल्स-कॅटीन्स इ. मधून हस्तप्रक्षालनासाठी साबणवडीचे ऐवजी सुगंधी
निर्मलकाचे द्रावण वापरणे जास्त किफायतशीर व सोईचेही होते.

11) सुवासिक अगरबत्ती- उदबत्ती

भरपूर भांडवल, अवजड यंत्रसामुग्री, कारखान्यासाठी मोठे आवार, उच्च
दर्जाचे तांत्रिकज्ञान इ. गोष्टी (बाबी) असतील तरच उद्योगधंदा सुरू करता
येईल अशी परिस्थिती ज्या व्यवसायात (उद्योगात) मुळीच नाही पण तरीही
उत्पादन केलेल्या मालाला सर्व ठिकाणांहून सतत बाराही महिने मागणी असतेच
असा उद्योग म्हणजे सुवासिक अगरबत्ती उत्पादन व्यवसाय होत हे फारच

*
﻿
धो. वि. देशपांडे
03-07-25
Marathi
एकूण पाने :- 8
FROM 60 TO 67

+

एंक अन्वयार्थ

पान नं 60

यात्रिक

ग्रेस आणि जी. एं. कुलकर्णी ही मराठी साहित्यातली दोन महागूढे. एंक कवि. दुसरा
कथाकार. पण दोघांचा साहित्याचा फर्मा एंक आहे. ग्रेसच्या कवितेचा मोह पडतो. मन तीत
चिंब डुंबून उल्हासते. पण बुद्धीला ती कळत नाही. न कळता भावणे हा त्या कवितेचा गुण.
जी गत ग्रेसच्या कवितेची, तीच जी.एं. कुलकर्ण्याच्या कथेची. त्यांची कथा आवडते.
ह्दयाला दावे लावून आपल्याबरोबर फरपटत नेते. क्षणभर त्याला सुन्न करते. वाचून संपली
की रसिक, साक्षेपी वाचकाला गावल्यासारखी वाटते. पण तसे वाटत असतानाच त्याच्या
हातून निसटते. मागे ठेवून जाते ती फक्त एंक अंतर्मुख विषण्णता, अनेक अनुत्तरित प्रश्न,
असंख्य गूढ उपप्रश्र, अस्वस्थ विचारमाला, आणि अज्ञेय भावानुभावाचां एंक गुंता. त्यांच्या
कथेची ही शक्ती अजब आहे. अलिकडच्या कथा सोडा. त्या तर काहींच्या मते शेवाळलेल्या
आहेत. पण त्यांच्या जुन्या कथांचा पोतही हाच आहे. असाच आहे.

पु.भा.भावे, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर ही मराठी
कथाप्रांतातील मातबर श्रेयनामे. पण त्यांचा बाज आणि जी. एं. कुलकर्णी यांची कथा यांचे
घराणे कधीही एंक नव्हते आणि आजही एंक नाही. कथाकार मातबर असो किंवा मामुली
असो, प्रत्येकाला समूहात बुडूत गेलेला माणूस कळून घ्यायची इच्छा असते. प्रत्येक व्यक्ती
त्याच्या मते एंक विश्व असते. म्हणून ते त्या व्यक्तीच्या मनाचे पदर उलगडून त्यांचे वेगवेगळे
पोत दाखवतात. त्याचे पापुद्रे दूर करून त्याचा नाभा नागवा करतात. जी. एंं. चे तसे नाही.
त्यांच्या लेखनीकळेची प्रक्रिया थेट उलट आहे. त्यांना व्यक्तीत समष्टी दिसते. `दिसते' हा
शब्दप्रयोग चुकला. ते `व्यक्तीत समष्टी ' पाहतात. त्यामुळे त्यांच्या पात्रांची व्यक्तीगत दुःखे
अखिल मानव समाजाची दुःखे होऊन बसतात. व्यक्तीच्या प्रश्नांचा मानवाच्या प्रश्नांची
गूढगंभीर उदात्तता प्राप्त होते. तिचे जयपराजय मानवाचे जयपराजय ठरतात.

सर्वसाधारणपणे सिंधूतून बिंदू वेगळा करून दाखवणे ही कथाकाराची कमाल मानली
जाते. जी. एं. विंदुत सिंधूचे दर्शन घडवतात. त्यामुळे जी.एं. ची कथा म्हणजे प्रतीक-कथा
असा अनेकांचा गैरसमज आहे. वास्तवात ती प्रतीकाच्या पलीकडे जाते. बिंदुत सिंधूचे दर्शन
होणे म्हणजे काय ? बिंदू म्हणजे एंचटूओ. सिंधु म्हणजे एंचटूओचा भला मोठा साठा.म्हणून

पान नं 61

जे नियम बिंदुला, तेच सिंधूला - याला प्रतीक म्हणतात. जी. एं. चा बिंदु-सिंधु-संबंध असा
नाही. बिंदुंचा साठा म्हणजे सिंधु नाही. याचे भान जी.एं. ना आहे. म्हणून बिंदुचे गुणधर्म
वेगळे, सिंधुचे वेगळे, हे ते कधीही विसरत नाहीत. सिंधुला खळाळी असते. बिंदुला असतेच
असे नाही. बिंदु विध्वंसगर्भ असू शकतो, पण त्याची विध्वंसशक्ती परिमित असते. सिंधु
अफाट विद्धंसशक्ती बाळगूनदेखील अनेकांचे पोषण करू शकतो. नव्हे, करतो. इतकेच नव्हे,
तर जी.एं.चा बिंदू सिंधू सोडू शकतो, पण त्याची विध्वंसशक्ती परिमित असते. सिंधू
अखंड धडपड चालू असते. म्हणूनच तो प्रश्न विचारतो. त्याला शंका येतात. त्याच्यापुढे
उपप्रश्न उभे राहतात. तो त्यांची उत्तरे कधी शोधतो, कधी शोधत नाही. काही झाले तरी
त्यांची उत्तरे मिळत नाहीत. मिळाली तरी उपप्रश्नांपुढे ती टिकत नाहीत. हे प्रश्न एंका बिंदूचे
नसतात. एंक बिंदू मुखर असतो हे खरे. पण त्याच्या वाणीतून प्रश्न येतात ते सर्व बिंदूंना
ग्रासून उरणारे प्रश्न असतात. सर्वानाच या प्रश्नांची जाणीव असते, असे नाही. नेणिवेच्या
आनंदात त्याचे आयुष्यमान अखंड अवरित चालू असते पण ते त्या प्रश्नांपासून मुक्त
नसतात. त्यांच्या उत्तरांपासून मुक्त नसतात. आणि सर्वात अखेरचे म्हणजे त्यात अंतर्निहित
असलेल्या परिणामापासून तर कधीच मुक्त नसतात. या अर्थाने जी.एं. च्या एंका बिंदूचे प्रश्न
सर्व बिंदूचे प्रश्न असतात, आणि कधी कधी खुद्द सिंधूचेही असतात. या प्रश्नांचा पोत मात्र
वेगळा असतो.

जी.एं आपल्याला तत्त्वज्ञानाच्या प्रांतात नेतात. मानवाचा अतीत काय ? अनागत कसा
असेल ? दोघांच्या मर्यादा कोणत्या ? असले प्रश्न त्यांना भंडावतात. यांची उत्तरे शोधायची,
तर त्या शोधात साहाय्य बुद्धीचे. ही बुद्धी तरी खरी आहे का ? तिला कळणारे सत्य अंतिम
सत्य असते का ? मग अतिंम सत्य म्हणजे काय ? असत्य कशाला म्हणायचे ? या
सत्यासत्यविचारातून सद्सद््विवेक स्फुरतो. आणि मग समोर उभी ठाकते ती पापणुण्यद्वयी.
पुन्हा प्रश्न: पाप काय ? पुण्य कोणते? या साऱ्या तत्त्वज्ञानाचे गाठोडे लटकावण्याचा खुंट्या
म्हणजे जी. एं. च्या कथा. प्रत्येक कथेत अशा प्रश्नावली आहेत. काही तर जी.एं.नी
स्पष्टपणेच मांडल्या आहेत. अनेक क्यांत अध्याह्दयत आहेत. त्यांची साधी गोष्ट : `राधी'
`साधी' म्हणजे सर्वाना कळेल अशी. पण तीही राधीबद्दल बोलता बोलता स्वतः वाचकाबद्दलही
बरेचसे सांगून जाते. आणि जेवढे सांगते त्यापेक्षा अधिक सुचवते. राधीचे भोक्तव्य हे तिचे
एकटीचे भोक्तव्य नाही- ते आपणां सर्वाचे भोक्तव्य आहे. जी. एं. वाचा न वाचा, त्यातून
आपली सुटका नाही याचा प्रत्य आपल्याला येतो. आणि मग आपल्यापुढे प्रश्नावलीच्या
प्रश्नावली उभ्या राहतात. म्हणूनच जी. एं.च्या कथांना प्रश्नोपनिषदांची दीप्ती चढते.
इतरांचे कथासंग्रह एंका बैठकित वाचून पुरे करता येतात. जी. एं. च्या कथासंग्रहांचे तसे होत
नाही. ते यामुळेच हा. जी. एं. चा गुणही आहे, दोषही आहे. प्रतेयक कथा एंक नवी डोकेदुखी
घेऊन येते. ज्याला ती पेलते, तो एंकेक करीत त्यांच्या कथा वाचतो. ज्याला पेलत नाही, तो
जी.एं.च्या वाटेला जात नाही. `गुणः दोषायन्ते' हेच जी.एं.चे भागधेय होय. म्हणूनच
जी. एं. तारीफ अनेक करतात. पण समजून जी. ए. वाचणारा क्वचित कधी
आढळलाच तर आढळतो.

वर तत्त्वज्ञानावर उल्लेख आला. जी. ए. कुलकर्णी यांच्या तत्त्वज्ञानाचे अनेक
पैलू आहेत. खुद्द जी. ए. वैष्णव संप्रदायात वाढले असावेत. वैष्वण म्हणजे वीर-वैष्णव,

पान नं. 62
तप्तमुद्रा, इंग्रीजमुळे ख्रिस्ती तत्त्वज्ञानाशी त्यांचा परिचय असावा. ग्रीक डायलेक्टिक्स त्यांना
अज्ञात नाही. अस्सित्ववादाचे त्यांना वावडे नसावे. म्हणूनच त्यांच्या गोष्टींतील तत्त्वचर्चा
काही वेळा अनेकविध संवादी-विसंवादी वळणे घेते. आणि त्यामुळेच अनेकांना ती एक
`स्यूडो-फिलॉसॉफी' असावी असे वाटते. कथेच्या संदर्भात ही फिलसॉफी खरी आहे का स्यूडो
(आभास निर्माण करणारी) हा प्रश्न नाही. प्रश्न आहे, तिच्याबरहुकून त्यांनी उभारलेले प्रश्न
कसे आहेत. ते खरे आहेत का खोटे आहेत ? हा विचार येताच त्यांच्या प्रशअनांचे महत्तव
आपल्या ध्यानात येते. आणि आपण त्या ओझ्याखाली गुदमरून वाकतो. असो.

जी. ए. कुलकर्णी यांची ही प्रश्नोपनिषदे रूक्ष नाहीत. कुठे कथासरित्सागराची घडण,
कोठे अरेबियन नाईट्रसचा बाज, कुठे अँपोक्रिकल स्टोरीचा साचा, असा त्याचां वेगवेगळा
घाट आहे. कधी कधी असंभवाला संभाव्याचे रूप देऊन ते आपल्याला अद्भुताच्या प्रदेशात
घेऊन जातात. शब्दकळा त्यांच्या लेखणीला बोथीवर कसलेल्या नटारांगी नर्तकीसारखी
नाचते. प्रतिमा आणि प्रतीके त्यांच्यासमोर हात जोडून उभी आहेत. म्हणून जी. एं. ची कथा
कधी कंटाळवाणी होत नाही. वाचक कथासूत्राचा मागोवा घेत तिच्याबरोबर स्वचेछेने वाटचाल
करीत जातो. या वाटचालीत त्याची दमछाक होते. पण ती थआंबली रे थांबली की तो पुन्हा आपला
जिथून निघाला होता तिथेच. चक्राकार घुमवणाऱ्या गाडीतून प्रवास करणाऱ्या माणसाची गत.
गाडी धावते आहे तोपर्यंत जग आहे, त्याचे सौदर्य आहे, भीषणता आहे, भव्यता आहे, आणि
त्याबरोबरच त्या जगाची उदात्त विषण्णताही आहे. पण ती थांबली रे थांबली की पुन्हा तो
जिथून निगाला होता तिथेच. पुन्हा तेच त्याच्या घरकुलाचे सपाट, अरंद अंगण आणि
त्याच्यावर अखंड सळसळणारी उदात्त सावली करून उभा राहिलेला भव्योदात्त अश्वत्थ.
एकूण काय ? तर गतिहीन वेग. म्हणजेच व्ही--0. गतिहीन वेग हेच जी.ए.कुलकर्णी यांच्या
कथेचे रूप आहे. त्या वेगाचा झपराटा मात्र अफाट दिसतो. त्यामुळे विश्वरूदर्शन होते. जे
प्रश्न कधई आपल्याला सुचले नसते, ते आपल्यापुढे येतात. त्यामुळे कल्पनातीत उत्तरे स्फुरतात.
ती स्फुरतानात स्वतःचा फोलपणा सूचित करतात. आणि शेवटी विषण्ण जाणीव उरते ती
एक : आपली उतत्रे फोल आहेत हे खरे; पण आपले प्रश्न तरी ठोस होते का ? मग जी.एं.च्या
कथाविश्वातील या वाटचीलीचे प्राप्तव्य काय ? बुद्धी घासून तिला आकार देणाऱ्या
विचारमालिका, मनाला उभारी देणारा श्रम, त्या श्रमांची ह्दयाला आलेली एक अलौकिक तकाकी
आणि आत्बलाला उभारी देणारा एक शांत तकवा. हेच तिचे प्राप्तव्य. हे प्राप्तव्यदेखील
येरागबाळ्याच्या नशिबी नसते. ते भागधेय एखाद्याच जाणत्या साक्षेपी मनाचे. ज्याला हा
तकवा लाधला तो भाग्यवान.

अशाच दुर्मिळ अवघड कसाची कथा म्हणजे `यात्रिक'. तिची जात
अँपोक्रिफल स्टोरीची. सर्वान्टिजच्या डॉन क्विक्झोट (खरा उच्चार `किओट') चे हे उत्तरकांड
चुकले, उत्तरकांडाचे एक नवे संस्करण. वर `अँपोक्रिफल' शब्द आला आहे, म्हणून आता
अँपोक्रिफल स्टोरी म्हणजे काय हा प्रपंच.

अँपोक्रिफल स्टोरी लिहिण्याची पद्धत कोणी सुरू केली ? केव्हा सुरू झाली ? हा विषय
संशोधनाचा. त्या आडरानात शिरण्याचे येथे कारण नाही. पण या कथाप्रकाराचा दादा म्हणजे
कारेल कापेक. त्याचा `अँपोक्रिफल स्टोरीज' म्हणून एक कथासंग्रहच प्रसिद्ध आहे.
`अँपोक्रिफल' या शब्दाचा अर्थ `खोटा, कल्पित,शाबीत न झालेला.' मूळ शब्द `अँपोक्रिफा.'

पान नं. 63

ज्यांचा धर्मग्रथांत मागून घुसडलेला आणि खुद्द ज्यूंना अमान्य असलेला भाग. या अर्थाने
`यात्रिक' हा `डॉन क्विक्झोट' चा अँपोक्रिफा आहे. अशा कथेची कल्पना स्पष्ट व्हावी म्हणूनच
कापेकचा खालील अँपोक्रिफिक विष्कंभक.

कापेकच्या कथेत एक इंग्रज प्रवासी शेक्सपिअयनंतर तीस-पत्सीसेक वर्षानी व्हेरोना या
गावी गेला. त्याचा उद्देश काय ? तर रोमिओ आणि जूलिएट यांच्या समाधींचे दर्शन घेणे.
गावात गेल्यावर त्याने चौकशी केली. `शेक्सपिअरने अमर केलेल्या त्या दोन प्रेमी जिवांच्या
समाधी कोठे आहेत ' प्रशअन ऐकणारा स्तिमितच झाला. त्याने विचारले, `जिवंत माणसांची
समाधी केव्हापासून बांधायला लागले ? अहो, ज्यूलिएट आजही ठणठणीत दिसते. ती तीन
नातवांच्या आजीचे सुखी जीवन जगत आहे.' प्रवासी अवाक होऊन विचारता झाला, `मग
तिचे आणि रोमिओचे लग्न झाले काय ?' उत्तर मिळाले, `नाही हो. दोघांचा पोरवयातील
मूर्खपणा तो. दोघे थोडी मोठी झाली आणि तो संपला. तिला एका सरदाराने मागणी घातली.
आज ती सुखात आहे.' प्रवाशाने विचारले, `आणि रोमिओ? ' व्हेरोनाच्या लोकांनी त्याला
सांगितले, `त्यानेही एक चांगली मुलगी पाहून लग्न केले. त्याचीही मुलेबाळे आहेत. दोन
वर्षापूर्वी तो आजारी होता.' हे ऐकून त्या बिचाऱ्याने मान खाली घातली. दुसऱ्याच दिवशी
त्याने व्हेरोनाला रामराम ठोकला. - कपेकची गोष्ट इथेच संपते. गोष्ट भाष्य अपेक्षीत नाही.
ज्यांनी रोमिओ-जूलिएट वाचले आहे, त्यांना कापेकची कथा अधिक कळेल. शेक्सपिअरच्या
नाटकांकले स्वप्निल पौंगड प्रेम आणि कापेकच्या अँपोक्रिफातील वास्वव या दोहोंतील विदारक
विरोधस जाणवेल. ज्यांना रोमिओ-जुलिएट माहीत नाही. कतापेकची कथा त्यांच्याकरता नाही.
अँपोक्रिफातील ही तेजाबी दाहकता साहतसाहतच जी. एं. ची `यात्रिक' वाचायला हवी. तशी
ती कुणी वाचली तरच डॉन क्विक्झोट व सँको पांझा यांची नवी परिमाणे त्याला मापता येतील.

`यात्रिक' हा `डॉन क्विक्झोट'चा अँपोक्रिफा. म्हणून आता डॉन क्विक्झोटचा प्रपंच.
सर्वसाधारण सुशिक्षिताला हे नाव माहीत असते. पण त्याचे महत्तव कळत नाही. डॉन हे
सर्वाटीझच्या प्रतिभेचे अपत्य. त्याच्या काळात लोकांना `नाइंट एरंट्स' च्या कथा व त्यांच्या
शौर्यगाथा यांचे वेड होते. त्यांची टवाळी उडवण्यासाठी म्हणून सर्वाटीझने हा ग्रंथ लिहिला.
उद्देश साधाच. टवाळीची आणि मनोरंजनाचा. पण सर्वाटीझच्या लेखणीतून बाहेर पडला तो
एक एलौकिक ग्रंथ. वर वर दिसायला तो संपूर्णपणे निरूपद्रवी दिसतो. ब्रिटिशांच्या
कारकिर्दीत जेलमध्ये देशभक्तांना, विशेषतः क्रांतिकारकांना, वाचनासाठी देण्यात येणाऱ्या
ग्रंथांत `डॉन क्विक्झोट 'ला अग्रमान असे. आजही लोक त्याच्याकडे एक काळाकाढू मनोरंजन
म्हणूनच पाहतात. पण ते खरे नाही. विचार केला तर ग्रंथात मनोरंजनाच्या पलिकडचे
बरचसे दिसेल. म्हणूनच तर डॉन क्विक्झोट व सँको पांझा ही जोडी अमर होईन बसली आहे.
किंहबहुना तिने देशोदेशीच्या अनेक भाषांत अवतार घेतलेले दिसतात. इंग्रजीतला सॅम्युएल
पिक््विक आणि त्याचा व्हॅले सॅम वेलर हे इंग्रजीतले पहिले डॉन आणि सँको वुडहाउसचा
बर्टी वूस्टर आणि जीव्ह््ज ही तशीच दुसरी जोडीगोळी. मराठीतले चिमणराव आणि
गुंड्याभाऊ हेही पगडी-उपरण्यातले डॉन आणि सँकोच.

प्रत्येक माणूस म्हणजे अनेक व्यक्तित्वांचे एक संयुग (केमिकल कंपाउंड) असतचे. या
संयुगातील सगळ्यांनाच जाणवणारे आणि म्हणून महत्तावचे घटक दोन. एक मूर्ख, दुसरा धूर्त.
पहिला भाबडा, दुसरी कपी. एक स्वप्नाळू, दुसरा व्यवहारी. स्वतःला नकळत सर्वाटीझने

पान नं. 64

माणसाचे हे घटक वेगवेगळे केले आमि पहिल्याला नाव दिले `डॉन' आणि दुसऱ्याला `सँको'
प्रत्येक माणसात सँको तर असतोच असतो. तो नसेल तर या जगात त्याचा पाडच लागायचा
नाही. पण त्याचबरोबर त्याच्यात डॉनही असतो. माणसाचे रक्षण-पोषण होते ते त्याच्यातील
सँकोमुळे, पण माणूस सुमद्ध होतो त्याचे श्रेय मात्र त्याच्यातील डॉनलाच असते. एक माकड
अंजनीच्या पोटी जन्माला आहे. एका सकाळी पाळण्यातल्या त्या बाळाला आकाशात एक
तांबडे पिकलेले फळ आहे असा भास झाला. झाले, त्याच्यातील डॉनने आभाळात उसळी
घेतली. डॉनच तो. शेवटी वज्राचा मार खाऊन धरणीवर आपटला. आणि आपटला म्हणूनच
रामायणात हनुमान म्हणून गाजला. समजा, त्या माकडातला डॉन जागा न होता तर !
लंका न जळती. जे या माकडाचे, तेच आपल्यातील अनेक महापुरूषांचे आणि आपणा
सर्वांचेही. प्रत्येकाने आपल्या मनात डोकावून पाहावे. त्याला स्वतःच्या अंतरीच्या गूढ गर्भात
दडून बसलेला डॉन दिसेल. सँको हा शोधत बसण्याची गरज नसते. तो नियमाने सकाळी
आठ-सदतीसच्या लोकल गाठतो. दीड वाजता आपल्या मित्राच्या खिशातला चहा पितो.
खोटया सिक-नोट्स पाठवून परस्त्रीबरोबर चोरून सिनेमाला जातो. आणि शेवटी एके दिवशी
खराच सिक् पडतो आणि सरणावर चढून आपल्या बायकोचे कुंकू पुसतो.

रामायणातल्या मारूतीला सूर्य म्हणजे एक पिकलेले फळ हा भास झाला होता. सर्वाटीझच्या
डॉनच्या खाक्या उस्से जादा. त्याला पवनचक्क्या म्हणजे राक्षस वाटले. पखालीत शिपायांचा
आभास झाला. खानावळीतल्या मोलकरणीत त्याच्या डोळ्यांनी राजकन्या पाहिली. शेवटी जे
मारूतीचे झाले तेच डॉनचे झाले ! मारूती फुटक्या हनुवटीनिशी जमिनीवर दाणकन् आदळला
होता. डॉन क्विक्झोट प्रत्येक ठिकाणी मार खात खात विपन्नावस्थेत आपल्या खेडयातील
घरकुलाकडे परतला. मारूतीने एकटयानेच उड्डाण केले होते. डॉनच्या बरोबर होता त्याचा
सँको. त्याच्या मांडीखाली होते त्याचे घोडे- रोजीनांते. आणखी एक पात्र त्याच्याबरोबर
होते. ते म्हणजे सँकोचा भार वाहणारे डॅपल नावाचे गाढव. डॉन आणि सँको या दोघांची
वाहने त्यांना साजेशीच आहेत. डॉनचे घोडे- रोजीनांते -शरीराने मरतुकडे. आपणा
प्रत्येकातील डॉनचे वाहन मरतुकडेच असायचे. ते तसे नसते तर आपणा प्रत्येकातील
अंतःसुप्त डॉनने लांबलांब पल्ले गाठले असते. हे घोडे मरतुकडे असते, म्हणूनच आपल्यातील
डॉन पराधीन जिणे जगत जगत शेवटी केविलवाणे मरण मरतो. उरला आपल्यातला सँको.
त्याला गाढवापेक्षा योग्य वाहन कोणते असू शकते ? संक्रांतीच्या वाहनावरून वर्षाची भविष्य
ओळकतात. सँकोच्या वाहनावरून सँकोचे भवितव्य कळते. गाढव गाजराला राजी असते.
सँको डॉनच्या बरोबर जन्मभर राहूनही त्याची स्वप्ने पाहू शकला नाही. मुलुखगिरीवरून परत
येताना तो आपल्याबरोबर थोडीबहुत माया घेऊन परतला. त्या मायेच्या गाजरावर तोही खूष
होता, त्यीची बोयकोही खूष होती आणि त्याच्या पोरीच्या हर्षाला तर पारावार उरला नव्हता.

सर्वाटीझचा डॉन घरी परतला, अकंड भ्रमंतीमुळे तो खंगला होता. घरी आला तो तो
आजारी पडला. आणि त्या आजारात त्याला पहिल्यांदा महाज्ञान स्फुरले. महाज्ञान काय ? तर
आजपर्यंत आपण वेडे होतो. नाइट एरंट्री खोटी. राजकन्या खोटया. दबा धरून बसलेले
शिपाई खोटे. त्याबरोबर आपल्याला भेटलेले राक्षसही खोटे. इतकेच नव्हे, तर आपण घेतलेले
`डॉन क्विक्झोट डी ला मांचा' हे नावही खोटे. आपले खरे नाव `अलोन्सो क्विट्झानो' आहे
आपण वाचलेले अमादिस व त्याच्या सहकाऱ्यांचे इतिहास या सैतानाच्या कल्पित कथा

पान नं. 65

होत्या - हे ते महाज्ञान. या (महा) ज्ञानवायूत त्याला आपल्या येऊ घातलेल्या मरणाची चाहूल
लागली. म्हणून त्याने पाद््याला अंतिम क्षमापनविधीसाठी (लास्ट कन्फेशन आणि एक्स्ट्रीम
अंक्शन ) बोलावले. आणि त्याच्यासमोर आपल्या सर्व चुकांचा आणि पापांचा पाढा वाचला.
त्या पाद््याला ते कन्फेश खरेच वाटेना. तो आ वासून म्हणाला, `अरे देवा ! हे काय आणखी
नवे खूळ ?' मोठ्या कष्टाने शेवटी त्याची समजूत पटली. त्याने डॉनला `अँब्सोल्यूशन इन
आर्टिक्युलो मॉर्तिस' दिले. आणि डॉनने आपला देह ठेवला. त्याच्या थडग्यावर कोणीतरी एक
ओळ कोरून ठेवली होती. `ही हॅड द लक टु लिव्ह ए फुल अँड यट डाय
वाईज'- सर्वाटीझटा डॉन इथेच संपला.

जी.ए. कुलकर्णी यांची `यात्रिक' डॉनच्या परतीचा प्रवासात तो आपल्या खेड्याच्या
शिवेवर आला तेव्हा सुरू होते. इथे जी. ए. डॉन आणि सर्वाटीझचा डॉन या दोघांचे
परस्परनाते तपासून पाहिलेले बरे. या दोघांचे नाते पित्रापुत्रांचे आहे. सर्वाटीझचा डॉन आहे
म्हणून जी. एं. चा डॉन असू शकतो. पहिला जरल लोपला तर दुसऱ्याचा जन्मच होणार नाही.
या अर्थाने जी. ए. या कथेत सर्वाटीझच्या डॉनचे बंदी आहेत. ती बेडी तुटला तर ही कथा
टिकतच नाही. डॉन आणि सँको यांच्या जागी `बंकाजी बोधले' आणि `मऱ्या भोईर' ही नावे
टाकून पाहा. कथेची सारी खुमारी अळणी पडले. मग या दोहांत काही फरक नाही का ? तसे
नाही. सर्वाटीझंचा डॉन स्वप्ने दिसली पे दिसली की एकदम कृती करायला उद्युक्त होतो. या
अर्थाने तो कृतिवीर आहे. जी. एं. नी त्याला जिज्ञासू बनवले आहे. त्याची ही जिज्ञासा जागृत
का झाली, कशी झाली हे सांगत नाहीत. शिवेशी आल्याबरोबर तो एकदम
हस्तामलकासारखे प्रश्न विचारू लागतो. त्याच्या या पिरवर्तनाची कारणसंगती लावून लागत
नाही. हा या कथेतील एक दोष म्हटला तरी चालेल. जिज्ञासा जागृत झाल्यानंतर त्याने उभे
केलेले प्रश्न मूलभूत आहेत. डॉनला असे प्रश्न सुचू शकतात का ? ही दुसरी शंका. ती मात्र
निराधार आहे. जगात कोणताही मूर्ख कधीकधी महापंडिकांना गप बसवणारे प्रश्न विचारू
शकतो. या अर्थाने डॉनचे प्रश्न अस्थानी वाटत नाहीत. त्याला मिळालेली उत्तरे ! त्यांचा प्रपंच
यथास्थान होईलच.

अशा हा जी. एं. चा डॉन तो थकलेला आहे. त्याचा चेहरा `बराच वेळ मातीत पुरून
ठेवल्यासारखा' दिसतो. त्याचे घोडे म्हणजे घोडयाचा सांगाडा. अशा परिस्थितीत डॉन
गावाच्या शिवेवर आला. त्याची साथई सँको. त्याच्या चेहऱ्यावर मात्र हसरी लाल हाव
रानफळासारखी लकाकत होती. त्याचे गाढव डॅपल ! तेही सँकोसारखे संतुष्ट दिसत होते.
अशा या दग्धाद पार्श्वभूमीवर जी. एं.च्या डॉन-सँको-उपनिषदाची सुरूवात होते. डॉन
त्याला विचारतो, `माझे कुठे चुकले ?मी स्वप्नांच्या पाठीमागे धावलो, ते माझ्या मनाच्या
आधारावर. पण आज माझ्या मनानेच फितूर केला. ते खचले आहे. मला एक राजकन्या
शोधायची होती. तिचे बिरूद मिरवायचे होते. तिचे नाव चिरंतन करायचे होते. पण सगळे
सगळे फसले. आज सगळीकडे माझी कुचेष्टा होते. दिवसाअजेडी गावात शिरण्याची माझी
छाती नाही. म्हणून मी अंधाराची वाट पाहत इथे बसलो आहे. हा अपमान माझ्या नशिबी
का ?माझे काय चुकले ? माझे कुठे चुकले ?'

सँकोच तो. त्याची अक्कल त्याच्या स्वतःच्या वाहनाइतकीच. डॅपलचे खूर जमिनीवर, तर
सँकोचे बूड त्याच्या पाठीवर, बरे, गाढवाची उंची गाढवाच्या इतकीच. म्हणून सँकोच्या

पान नं. 66

पावलाखाली जमीन क्वचितच सुटली होती. त्याने अगदी शुद्ध खरवाहन तत्र्वज्ञान्यासारखे
उत्तर दिले, `तुम्ही खऱ्या तोंडाने काल्पनिक भाकरी खायची धडपड केली. दे कधी नव्हतेच
त्याच्या पाठीमागे तुम्ही धावलात. आणि नुसते धावलातच नाहीत, तर त्याला खरे मानून
त्याच्याशी तसा व्यवहार करायला गेलात. यामुळे तुम्ही तर आपले हसे करून घेतलेतच. पण
तुमच्या खुळचट शब्दांवर भाळून मी माझे हसे करून घेतले. तुम्हांला ढगात भाला घेतलेला
सैनिक दिसतो. थोड्या वेळाने आणखी काही दिसेल. डोके एकदा चुलासारखे पेटले, की
हिरवा सूर्यास्त दिसतो. जांभळी गाढवे दिसतात. पण एखाद्या पोरालाही माहीत आहे की झाड
म्हणजे झाड. नुसती शीळ वाजवली तरी शेकडो माणसे पुढे येऊन "झाड म्हणजे झाड, नुसते
झाडा "' ही साक्ष देतील.

डॉनला प्रश्न पडतो. निव्वळ संस्खेवर सत्य ठरू शकते का ? मताधिक्याने सत्य सिद्ध होऊ
शकते का ? तसे असेल तर रूपकांचा अर्थ काय ? अर्थात जग रूपकावर जगत नाही. त्याला
जगायला गाजरे लागतात. सँकोने गाजरे शोधली. ती त्याला मिळाली. त्यांवर सँको जगला.
मीही जगलो. पण त्याबरोबरच त्याच गाजरांवर सँकोचे गाढव पण जगले. आमि माझ्या
रूपंकावर मात्र मलाही जगता आले नाही. मग माझी रूपके निरर्थक होती का ? तसे असले
तर जगात कशालाच अस्तित्व नाही. कारण `जिच्यामुळे एकही रूपक सुचत नाही ती वस्तू
नव्हे. आणि ज्याला एकही रूपक सुचत नाही तो माणूस नसतो !' पण जगाच्या मते मात्र सँको
यशस्वी आहे. तो गाजरामागे धावला आणि त्याने गाजर मिळवले. म्हणून गाजर सत्य आहे.
मी रूपकांमागे मारखाऊ धावपळ केली. तीत मी अपेशी ठरलो. अपेशी ठरलो, म्हणजे माझी
रूपके असत्य ठरली. मग यश म्हणजे सत्य, अपेश म्हणजे असत्य. ही जगाची समीकरणे. ही
दोन्ही समीकरणे तरी बोरबर आहेत का ? आणि यश म्हणजे जर सत्य असेल, तर यश म्हणजे
तरी काय ? सिकंदर चार माणसे घेऊन घराबाहेर पडला. त्याला यश मिळाले. आज तो
इतिहासावर पाय फाकून उभा आहे. आम्हीही चौघेच बाहेर पडलो होतो. मी अपेशी ठरलो.
म्हणून आजा हास्यास्पद आहे. पण मूलतः मी आणि सिकंदर या दोघांत फरक काय ? त्याला
जगाच्या साम्राज्याची स्वप्ने पडत होती. मला राज्यकन्येची पडली. सिकंदर मरू द्या. येशूचे
काय ?तो बारा शिष्य घेऊन बाहेर पडला. आपल्या स्वप्नाकरता अवजड क्रूस खांद्यावर घेऊन
कॅल्व्हरीची टेकडी चढला. त्याच्यावरही लोकांनी दगड भिरकावले होते. त्याला आपल्या
मुखरसाने न्हाऊ घातले होते. मीही आपल्या स्वप्नांसाठी मार खाल्ला. विटंबना सहन केली.
मग त्याच्या स्वप्नात आणि माझ्या स्वप्नांत फरक काय ?

सँकोचे उत्तर परखड होते : `येशूचे स्वप्न खरे होते म्हणून त्याचा धर्म सगळीकडे पसरला.
आणि त्याची शिकवण सत्य होती म्हणून त्याला इतके अनुयायी मिळाले.'एकूण अर्थ काय ?
धर्म सत्य होता म्हणून अनुयायी मिळाले. आणि अनुयायी मिळाले म्हणून धर्म सत्य होता.
सँकोचा हा तर्कदुष्ट कार्यकारणसंबंध डॉनला पटला नाही. येशूचा प्रेमशांतीचा संदेश
तरवारीच्या जोरावर पसरला होता. त्याचा भर होता निरिच्छितेवर. आज मात्र संपत्ती त्यांच्या
धर्मकाठांचटा म्हणजेच धर्माचा आधार आहे. उरले त्याचे जगभर पसरलेले अनुयायी ! त्यांतले
खरे अनुयायी मूठभर असतील-नसतील. तसे पाहायला गेले तर आजपर्यंत जगात एकच
ख्रिस्ती होता. पॉटियस पायलेटने त्याला क्रुसावर बळी दिले होते. मग येशू खरा कसा ?
कशाच्या जोरावर ? आणि त्याची स्वप्ने जर खरी असतील तर मग माझी का नाहीत ?

पान नं. 67

- डॉनच्या या पाखंडाने सँको वैतागला असावा. त्याने ठणकावून उत्तर दिले: `आता
तुम्ही पवित्र येशूचीच स्वतःची तुलना करीत आहात म्हणून सांगतो. जगात एकच महासत्य
असते. आणि ते म्हणजे पोट आणि पोट भरायला लागणारी भाकरी' डॉनला वाटले सँकोचे
गाढवदेखील सँकोचेचे तत्त्वज्ञान माते. मग सँकोत आणि त्याच्यात काय फरक आहे ? जर
फरक नसेल तर प्रश्नच मिटला. पण जर असेल तर सँको शहाणा की मूर्ख ?

इथे डॉनला ग्लानी आली असावी. त्या ग्लीनीत त्याला तपकिरी वस्त्रातला एक यती
दिसला. त्या यतीने त्याला आपले तत्त्वज्ञान सांगितले. `एके काळी मी तुझ्यासारखा होतो.
मी मोठे वैभव पाहिले आहे. विलास केले आहेत. सुख हसत हसत भोगले आहे. दुःख रडून
मागे टाकले आहे. व्यसनांत डुंबलो होतो.गुन्हे केले होते. त्यानंतर सगळे गेले. घरदार,
कनक-कांत, परिवार-पुत्र सारे निमाले. त्यामुळे एक उपरतीचा क्षण आला. त्यानंतर मात्र
थोडा परोपकार केला. थोडी तपश्चर्या केली. थोडे दान-पुण्य केले. आणि मग मला जाणवले
की, देवाने मला अत्यंत सौम्य शिक्षा केली. आणि त्याच वेळी तो क्षण आला. आणि
माझ्यातला सारा अंधार स्वच्छ धुवून निघाला. तिथे अस्तहीन सूर्याचा प्रकाश पसरला. मी मुक्त
झालो. मला अंतिम ज्ञान झाले.

डॉनला प्रश्न पडला : अंतिम म्हणजे काय ? अंत कुणाचा ? व्यक्तीचा ? का जगाचा ?
व्यक्तीचा असेल तर त्या व्यक्तीचा अंत होईपर्यंत कोणतेच ज्ञान अंतिम ठरू शकत नाही. कारण
जगणे म्हणजेच नवे नवे अनुभव घेणे. आणि प्रत्येक नवा अनुभव म्हणजे नवे ज्ञान. एकदा
माणसाला महाज्ञान झाले म्हणजे त्यात पुन्हा भर पडणार नाही असे थोडेच आहे ? असे असेल
तर आजचे अंतिम ज्ञान उद्याचे उपान्त्य ज्ञान ठरले. आमि अंतिम ज्ञान म्हणजे जर अंतिम
सत्य, तर उपान्त्य ज्ञान म्हणजे उपान्त्य सत्य. याही पलीकडचा एक प्रश्न उरतो. भवभूतीच्या
मालतीमाधवात माधवाने मालतीला पाहिले. ती दिसताच त्याच्या काळजावर मोरपीस फिरले.
पण त्या दर्शनाने त्याला काय झाले हे त्याला सांगता येईना. त्या वेळी तो म्हणतो. :
श्र

*
﻿
वसंत कानेटकर
03-07-25
Marathi
अंक पहिला

प्रवेश पहिला

[ वाल्मीक नगरातील हमरस्त्यावर एक इमारत. या इमारतीतील तिसऱ्या
मजल्यावरील एक दिवाणखाना. सजावट श्रीमंती थाटाची, पण मठ्ठ अडाणी अडत
दुकानदाराला साजेलशा रसिकतेची. एक दिवाण ठेवला आहे. काही खुर्च्या आणि दूर
कोपऱ्यात लांबलचक तारेचा टेलिफोन ठेवला आहे. साईबाबा, लक्ष्मी, म. गांधी आणि
काही चित्रचंद्रिका यांच्या तसबिरी लावल्या आहेत. वेळ सायंकाळची. या इमारतीत
काही प्रचंड धामधूम उडाली आहे. उघडच पोलिसांची धाड पडली आहे आणि झडती
चालली आहे, हे पडदा वर जाताच काही क्षणांतच लक्षात येते. काही युनिफॉर्ममधले
आणि काही साध्या वेशातले पोलिस एकमेकांना सूचना देत आतबाहेर लगबगीने जात
येत आहेत. खाली दूरवर कोठेतरी बायकांचा कांगावा, रडारड अस्पष्टपणे ऐकू येते
आहे. त्यातच मालकीणबाई तारस्वरात तणतणतात - "वाट्टंळ हुईल मुडद्यांचं. . .
जरीमरीआई बघूल घील. . . आमी सरळ मान्सं. . .आमच्या वाटंला का लागता
यसा ? समदं घरदार इस्कटून टाकलं मेल्यांनी. . . अरं तुला कुनी आय-भइनी, पोरं ~
बाळं हाईत का न्हाईत ?. . .. .धाड पडली, पटकी लागली रांडेच्यांना. . . . अरं ए
मुडद्या s s ते पोतं कशापायी उचकतुयास ? अरं, त्यात भांडीकुंडी हैत. दुसरं काय बी
न्हाई. . . " - आणि हा आरडाओरड चालला असतानाच, दिवाणवर लोडाला रेलून
निर्विकार थंड मुद्रेनं पान तयार करत बसले आहेत राघूशेट. स्वच्छ धोतर, अंगरखा,
जाकीट, डोक्यावर फरची उंच काश्मिरी टोपी, पायात आणि हातात तलम मोजे
असा वेश. शेजारी ठेवलेला, कुठलीशी गीतमाला ऐकवणारा किंमती ट्रान्झिस्टर .
सभोवार दंगल, किसन आणि फकिरा अदबीनं पण बावरलेल्या मुद्रेनं राघूशेटच्या
चेहऱ्याकडं पाहत उभे आहेत. राघूशेठ पन्नाशीच्या घरातले. खाली कोठेतरी
चाललेला मालकीणबाईंचा कांगावा असह्य होतो तशी ट्रान्झिस्टरचा व्हॉल्यूम
कमी करत -]

राघूशेट : ( जरबेनं ) काय चाललाय हा तमाशा ? दंगल, तू खाली जा आणि बाइ ~
जीला सांग, उगाच बोंबाबोंब करू नका . काही आकाश कोसळलं नाही की जमीन
फाटली नाही. पोलिस लोक हुकमाचे ताबेदार ; काय त्यांना शोधाशोध करायची

पान नं. - 4

असेल ती निमूटपणे करू द्या.

दंगल : होय शेट. (जाऊ लागतो तशी - -)

राघूशेट : कोणाची तक्रार आली तर हा राघूशेट पार बिघडून जाईल. एकेकीला रट्ट
हाणील येऊनं हां. नीट जरब देऊन सांग.

दंगल : होय शेट, सांगतो (दंगल लगबगीनं जातो.)

राघूशेट : किसन-

किसन : जी शेट ?

राघूशेट : सगळ्या पोलिसांच्या चहापाण्याचा बंदोबस्त झाला

किसन : तीनतीनवेळा चहा फिरवला पण -

राघूशेट : यडपट आहेस. अरे तुम्ही महारोगी लोक. तुमच्या हताचा चहा ते कसा
घेतील समोरच्या इराण्याला ऑर्डर दे. सगळ्या हवालदारसाहेबांना सांग, पाळी
पाळीनं तिथं जाऊन चहाफराळ करून या म्हणावं.

किसन : तेही सांगून पाहिलं, पण- -

राघूशेट : त्यांच्या साहेबाचा तसा हुकूम नाही हेच ना ? ठीक, ठीक. कुठायत
इन्स्पेक्टर साहेब ?

फकिरा : आपल्या बेडरूममध्ये शेट.

राघूशेट : बाकी सगळ्या खोल्यांची झडती झाली ?

फकिरा : जी हा शेट.

राघूशेट : काय लागलं हाती ?

फकिरा : काही नाही साहेब. फक्त कोठीच्या खोलीतून -

राघूशेट : नासक्या गुळाची गोणी सापडली.

फकिरा : होय शेट.

राघूशेट: सापडू दे. त्यासाठीच ठेवली होती ती. कानात वारं भरलेलं हे तट्टू
किती खोल पाण्यात शिरतयं ते बघायंच मला. आपल्या सगळ्या लोकांना
इशारे गेले ?

फकिरा : होय शेट.

राघूशेट : तयार झालेला माल जिकडच्या तिकडं- -

फकिरा : बिल्कुल शेटसाहेब. आपण काळजीच करायची नाही.
[ तेवढयात एक पोलिस लगबगीनं येतो तशी ]

राघूशेट : बोला हवालदारसाहेब , कोणती सेवा करायची आता ?

पोलिस : साहेबांना आपल्या खोलीतली कपाटं उघडून हवी आहेत.

राघूशेट : बस्स् इतकंच (कमरेचा किल्ल्याचा जुडगा काढून समोर टाकत ) या
चाव्या घेऊन चला.

पान नं. - 5

पोलिस : जोखमीचं काम आहे शेटसाहेब. आपण स्वत:याल तर -

राघूशेट : अरे काय बोलताय काय हवालदारसाहेब, तुम्ही कोणी परके आहात का
आम्हाला ? साहेब नवे असले तरी तुम्ही -

पोलिस : हळूहळू शेट. जमाना बदललाय.

राघूशेट : काही बदललं नाही शिरसाटसाहेब. सगळं ठीक होऊन जाईल.
इन्स्पेक्टर साहेबांना हया चाव्या नेऊन द्या आणि सांगा, तुम्ही नेकीचे अधिकारी
आहात. राघूशेट तुमच्या इमानदारीची कदर करतात. खुशाल सगळी कपाटं
उघडून पहा. जा. आमचा विश्वास आहे म्हणावं तुमच्यावर (पोलिस अनमान
करतो तशी ) किसन, तू जा त्यांच्या बरोबर. (किसन किल्लांचा जुडगा उचलून
जाऊ लागतो तशी -) हवालदार साहेब, (गादीखालून सिगरेटचं पाकीट काढत )
अरे चहाफराळाचं राहिलं पण बिडीकाडी तरी घ्याल घ्या घ्या . . . खिशात
ठेवा. कामगिरी संपल्यावर घरी जाऊन पहा आणि मग निचींतीनं स्वाद घ्या.
(पोलिस इकडे तिकडे पाहत हात पुढे करतो. तेवढयात आतून इन्स्पेक्टर
साहेबांची 'शिरसाsट' अशी गर्जना ऐकू येते. तशी झटकन हात मागे घेत
'साsब' अशी ओ देत शिरसाट लगबगीने आत पळतो. किसनही पाठोपाठ
जातो. राघूशेट मंदपणे हसतो ) काय दरारा ठेवलाय या बच्चानं ! फकिरा, हाता ~
खालच्या माणसांवर अशी जरब पाहिजे. नाहीतर लेको तुम्ही !

फकिरा : शेट, ही नव्याची नवलाई चार दिवस. पुढं पाहाल.

राघूशेट : फार दिवस वाट पाहण्यात अर्थ नाही फकिरा. रोज तक्रारी यायला
लागल्या आहेत. हवा तंग करून टाकलीय त्यानं.

फकिरा : (चाहूल घेत ) हुकूम कराल तर -

राघूशेट : इतकं टोकाला जायची काही गरज नाही. मी पाहून घेतो त्याला. तुझी
माणसं तू नीट संभाळ. दोन घास सुखाचे पोटात जायला लागल्याबरोबर माज
यायला लागलाय त्यांना. बोटं झडली तरी बरं वाटायला लागल्याबरोबर
तरण्याताठया पोरींच्या बरोबर हीरोगिरी सुचायला लागलीय हरामजाद्यांना.

फकिरा : नाही शेटसाब. एक धनाच तेवढा उल्लू निघाला. त्या पोरीसंगे पकडला
तेव्हा जीव घेऊन पळाला, फरारी झाला. पण फरार होऊन होऊन जाईल कुठं
मागावर माणसं ठेवलीय मी त्याच्या.

राघूशेट : (खिशातून चांदीचं कोनकोरणं काढून कान कोरीत ) तो दामलेमास्तर
फरारी झालाय म्हणून सांगत होता हणमंत्या.

फकिरा : फरारी होईल नाहीतर काय करील किती दिलस अंधारात बसून राहील ?
वाडयातल्या बिऱ्हाडकरूंनी गिल्ला केला तशी बायकोनं जीव दिला. घरमालकांनी
तगादा लावला तशी पोरीला टाकून हा पसार. पुलाखालच्या कमानीत रहातो म्हणे !

पान नं. - 6

राघूशेट : ही पांढरपेशी झुरळं अशीच मरायची. पुलाखालची कमानीत सडत
मरेल साला. पण माझ्या तळावर यायचा हवा. लाज वाटते ना ! मला त्याच्या
पोरीची काळजी पडलीय.

फकिरा : जानकी ?

राघूशेट : होय जानकी.

फकिरा : तिलाही इस्पितळाच्या आवारातून हुसकायची खटपट चालू आहे म्हणतात.

राघूशेट : कशावरून ?

फकिरा : हणमंतराव सांगत होते. ती भरारा फिरतये आसरा शोधत नात्यागोत्याच्या
माणसांकडे.

राघूशेट : कुणी दाराशी उभं करतो का तिला ?

फकिरा : छा छा ! त्याचं नाव काढू नका ! एक दिवस नक्कीच आपल्या वाल्मीक ~
नगरात येणार ती- म्हणजे हणमंतराव म्हणत होता.

राघूशेट : (उसळून ) मला तिला अंगाखाली घालायची नाही आहे फकिरा, जबान
संभाळून बोलत जा. सडलेला माणूस तू. . . . तुला तरण्या पोरींची खूबसुरती
खुपायल लागली काय ? डोळे फोडून टाकीन. काय समजला आहेस तू ?

फकिरा : (घाम फूटत ) गलती हुई. . .एकवार माफ करा शेट मला तस म्हणा ~
यचं नव्हतं. जानकीबाई अजून तरी धडधाकट आहेत असं-
राघूशेट तुला काय म्हणायचं होतं ते बरोब्बर कळलंय मला. तुम्हाला धंद्याला
लावून घेतलं ही माझीच गलती झाली. साले रस्त्यावर सडत पडला असतात म्हणजे
दुनियादारी कळली असती तुम्हाला.

फकिरा : (राघूशेट पाय धरीत रडत ) माफी एकवार माफी करा शेट. पुन्हा
नाही अशी गलती करणार अन्नदाता, क्षमा केली असं म्हटल्याबिगर - -

राघूशेट : (जरबेनं ) तमाशा पुरे झाला. तुझा-माझा बाप बसलाय तिथं. डोकं
ठिकाणावर ठेव. [फकिरा बाहीनं डोळे पुसत उठून उभा राहतो.] पोर चांगल्या
घरची आहे. नर्सच्या धंद्यात शिकलीसवरली आहे. आपल्या नगरात दवापाणी
करायला कामाला येईल. तिचंही भलं होईल. बाप महारोगी म्हणून फरार झाला
तरी पोटाची खळगी भरायला हिला कोणाची रांड व्हावं लागणार नाही - एवढाच
माझा हिसाब होता फकिरा.

फकिरा : पण शेटसाब, पढे-लिखे बाबू लोकांना हे शहाणपण कलत नाही. त्यांची
जातच वेगळी.

राघूशेट : साल्या तुझी-माझी जात काय एक आहे फकिरा ?

पान नं. - 7

फकिरा : छा छ: --भलतंच काय शेट ?

राघूशेट : अरे होय म्हण ! डरपोक साला. अरे तुझीमाझी जात एकच . जन्माने
दिलेली नव्हे. सडलेल्या रक्तानं दिलेली. सारे महारोगी एकाच जातीचे; एकाच
रक्ताचे , आज ती धडधाकट, बडी खूबसूरत दिसत असेल पण रक्त कधी दगा
देणार नाही. तिलाही आज ना उद्या आपली जात सापडेलच.
[तेवढयात आतून तरुण इन्स्पेक्टरसाहेब घाम पुसत येतात. पाठोपाठ किसन आणि
दोन पोलिस येतात.]

इन्स्पेक्टर : (येतायेताच ) हॅटस ऑफ टु यू राघूशेट.

राघूशेट : (जराही आसन न बदलता लाघवी स्वरात ) आधी बसा तर खरे साहेब,
तुम्ही फाकृर थकलात. काही थंड घेणार ? लिम्का ? मँगोला ? थम्सप ? फकिरा अरे
फ्रीजमध्ये कोकाकोला आहे का पहा - पूर्वी घेऊन ठेवल्या होत्या बाटल्या. नाहीतर
असं कर. साहेब, टिन्ड बिअर घेणार का ? अस्सल जर्मन माल आहे. म्हणजे
परमिटवर खरेदी केलेला.

इन्स्पेक्टर : (खूर्चीवर बसत ) रागूशेट. मला इथं काहीही घ्यायचं नाही.

राघूशेट : तुमचंही बरोबर आहे साहेब. तुमची नेकी मी जाणतो. तुमच्यासारख्या
इमानदार अधिकाऱ्यांच्या बळावर आपला देश ताठ उभा आहे साहेब. मी आप ~
ल्याला संपूर्ण सहकार्य दिलंय हे आपण जाणताच. आपल्याला कुणीतरी खोडसाळ
पणानं चुकीची खबर दिली म्हणून आपण -

इन्स्पेक्टर : खबर चुकीची नव्हती राघूशेट, पण माझ्यापेक्षा तुम्ही फार हुशार
ठरलात.

राघूशेट : (हसत) आम्ही व्यापारी माणसं. तुमच्यापुढं हो कसली हुशारी दाखविणार ?
त्यातून पुन्हा (दोन्ही हातांचे वाकडया बोटांचे पंजे दाखवीत ) हे असे. म्हणजे तसा
आता मी बरा आहे. बरा आहे म्हणूनच महारोग्यांना अन्नाला लावण्यासाठी
थोडीफार धडपड करीत असतो. पण कोणाकोणाला ते पाहवत नाही. म्हणून मग
हे खोटेनाटे आरोप -

इन्स्पेक्टर : तरीदेखील रागूशेट, तुमच्या घराच्या कोठीच्या खोलीत -

राघूशेट : नासक्या गुळाच्या दोन गोण्या सापडल्या, मान्य आहे साहेब.

इन्स्पेक्टर : त्याबद्दल तुमचा काय खुलासा आहे ?

राघूशेट : खुलासा (हसतो ) सिगरेट तरी घेणार का साहेब ? बाकी मीच चुकलो.
या हातांचा स्पर्श झालेली सिगरेट तरी तुम्हाला कशी चालेल ?(खिशातून सोन्याची
सिगरेटकेस काढीत ) पण साहेब , माझ्या बोटांचा स्पर्श फक्त सिगरेटकेसला घडलाय,
तोही हातमोज्यातून. आतल्या सिगरेटीला नाही. या सिगरेटकेसमध्ये सिगरेटी भरून
ठेवण्यासाठी तुमच्यासारखा अगदी पाक रक्ताचा माणूसच नेमून घेतलाय मी.

पान नं. - 8

(सिगरेट शिलगावीत ) तरीपण माझा आग्रह नाही. पोलिस अधिकारी म्हणजे
समाजाचे रखवालदार. त्यांना आमच्यासारख्या नासक्या रक्ताचा दुरूनदेखील स्पर्श
नकोच. तर खुलासा. असं पहा साहेब, नासक्या गुळाच्या गोण्या तुम्हाला कोठीच्या
खोलीत सापडल्या. त्यावेळीच हाक मारून तुम्ही मला विचारलं असतंत बरोबरच
आहे. तुम्ही पंचनामा केलात. तर आता आमचं म्हणणं असं आहे-म्हणजे रागावू
नका साहेब, जे काय व्हायचं ते सगळं रीतसरच होऊ द्या. काय ? खुलासा मी
वकिलामार्फत कोर्टातच देऊ शकतो.

इन्स्पेक्टर (उठत तीव्र शब्दांत) राघूशेट मी तुम्हाला अटक करू शकतो.

राघूशेट (हसून) बसा हो इन्स्पेक्टरसाहेब, तुम्ही आम्हाला अटक करू शकता.
आम्ही जामीन देऊ शकतो. पण तुम्ही बुवा फारच गरम रक्ताचे आहात. नाही,
एकप्रकारे तेही योग्यच आहे. पण थोड तारतम्य. . .म्हणजे मागलापुढला थोडा
पोच ठेवायला हवा. तुम्ही असं करा, तो फोन आहे. . . फकिरा, साहेबांना फोन
लावून दे . . .तांदळेसाहेबांना एकदा विचारून घ्या. ते म्हणाले तर मला हातकडया
घालून चला. काsय ? पण तुम्ही मला सारे झ्याकीत अटक करून जायचे
आणि साहेबांनी तुमचीच शोभा करून मला सोडून द्यायचं असं व्हायला नको.
साहेब, तुम्ही नवीन आहात म्हणून सुचवतोय हो. एरव्ही--

इन्स्पेक्टर : राघूशेट, तुमच्या बोलण्याचा अर्थ न कळण्याइतका मी दुधखुळा नाहीयै.
ठीक आहे, येतो मी. शिरसाट, आपल्या लोकांना गाडीत बसायचा हुकूम दे. एक
माणूसदेखील मागं रेंगाळता कामा नये.

शिरसाट : (पाय आपटून सलाम करीत ) होय साहेब, (जातो)

इन्स्पेक्टर : राघूशेट, तुम्ही इथलेच आहात. मीही आणखी काही वर्षे इथंच राहणार
आहे. तुमची पाळंमुळं खणून काढली नाही तर --

राघूशेट : (हसून) अरे. . .अरे. . तुम्ही फार रागावलात. बराय, नमस्ते, या
आता. पण पुढल्यावेळी याल ते अधिक खबरदारीनं या बुवा. आणिक राघूशेटवर
धाड घालण्यासाठी तरी या जागेवर आणि या गावात रहा. काय समजलात ?
(खळखळून हसतो )
[इन्स्पेक्टरसाहेब पाय अपटीत तरातरा जातात. हणमंतराव कधीचे येऊन उभे
आहेत. ते पुढे होत -]

हणमंतराव : शेट -

राघूशेट : (हात वर करीत त्याला थांबवून) फकिरा , सगळे बिळातले नागोबा टोप ~
लीत घालून त्या गारूडयानं नेले का पहा आणि तशी वर्दी द्यायला ये. (फकिरा
जातो ) बोला हणमंतरावजी -

पान नं. - 9

हणमंतराव : शेटसाहेब, धना आलाय.

राघूशेट : (प्रथमच रागाने ताठ हसत ) धना ? आलाय ? आपणहून आलाय की
आपल्या माणसांनी त्याला पकडून आणलाय ?

हणमंतराव : नाही शेट. . .तो आपणहून कधीचा येऊन बसलाय.

राघूशेट : बसूदे. मला तुमच्या कामगिरीची खबर हवीय. दामले मास्चर तुम्हाला भेटला ?

हणमंतराव : होय शेट.

राघूशेट : कुठं भेटलात ? पुलाखालच्या कमानीत ?

हणमंतराव : होय शेट.

राघूशेट : माझा अंदाज बरोबर ठरला. आणि जानकी ?

हणमंतराव : तीही तिथंच भेटली. बापाबरोबर खलबतं करायला आली होती.
दवापाणीही देत होती.

राघूशेट : माझा निरोप दामले मास्तरांना सांगितलात ?

हणमंतराव : होय शेट. सांगितला, पण तो म्हातारा मान खाली घालून स्वत:शीच
काही पुटपुटत राहिला. म्हणून मग दुसरा निरोप जानकीला सांगितला. पण तिला
आपला आसरा नकोय साहेब.

राघूशेट : तिला आपल्या धंद्याची आणि तिला कराव्या लागणाऱ्या कामाची कल्पना
दिलीत ?

हणमंतराव : होय शेट. नाक उडवून ती म्हणाली, 'तुझ्या राघूशेटापेक्षा प्रसंग पड ~
लाच तर मी विहिरीचा आसरा घेईन.'

राघूशेट : (रागाने) नाकाचा शेंडा अजून फुटला नाही म्हणून ही नाक उडवण्याची
मस्ती आहे. ते काही नाही हणमंत्या, जानकी इथं आलीच पाहीजे.
हणमंतराव शेटसाहेब ती अखेर इथंच येणार आहे. आपण थोडी वाट पहावी.
राघूशेट नाही नाही. . . हणमंत्या ती आज या घटकेला आहे तशी धडधाकट,
ताठ मानेची मला आहे.
हणमंतराव ते अशक्यच आहे शेटसाहेब, ते अशक्यच आहे...

राघूशेट (भडकून) हणमंत्या, तू कुणापुढं बोलतो आहेस ? काय बोलतो आहेस ?
अशक्य आहे म्हणून सांगायला तुला शरम नाही वाटत ? बाकी तुझंही ठीकच आहे.
सडक्या रक्ताचा तू शेजाऱ्याचा हात धरून तुझी बायको पळून गेली. ही तुझ्या
रक्तातली जिद्द-

हणमंतराव : (क्रोधाने कडाडत ) शेटसाहेब, तोंड सांभाळून बोला.

राघूशेट : (क्षणमात्र त्याला न्याहाळत ) आहेस, थोडातरी माणूस उरला आहेस
अजून....नुसताच रक्तामांसाचा गोळा झालेला नाहीस.
हणमंतराव : (व्याकूळ होत ) शेट मला क्षमा करा....फक्त तेवढा एकच उल्लेख

पान नं. - 10

पुन्हा कधी करू नका. कधीही करू नका. (डोळे टिपतो )

राघूशेट : (विषण्णतेनं) हणमंता, अरे आपण कमनशिबी म्हणून सडकं रक्त घेऊन
निपजलो. तरीही कधीकधी मला एक उबळ येते. या झुरळांनी फेकलेलं सडक
अन्न खाऊन आपण लाचार तर झालो नाही ना, अशी मला अनेकदा शंका येते.
म्हणून मग मी जवळच्या माणसांच्या जखमेवरची खपली कधीकधी अशी काढून
बघतो, खरं म्हणजे मीच माफी मागायला हवी तुझी.

हणमंतराव : (गहिवरून ) छे छे: तसं नाही शेट.

राघूशेट : छोड दो. दामले मास्तर आणि त्याची छोकरी यांना कसं वळणावर
आणायचं ते मीच पाहीन आता. [फकिरा येतो] बोल फकिरा ?

फकिरा : शेटसाहेब, सगळे लोक गेले. खाकीतले आणि बिनखाकीतले.

राघूशेट : (चांदीच्या कानकोरण्यानं कान कोरीत ) तर मग फकिरा, धनाला आणून
उभा कर पुढे....हणमंतराव, तुम्ही जिन्याखाली उभे रहा. किसन , तांदळे साहेबांना
फोन लाव.
[हणमंतराव आणि फकिरा जातात. किसन फोनवरील लांबलचक वायरचा
रिसीव्हर राघुशेटच्या हाती आणून देतो आणि मग डायल फिरवतो.]

राघूशेट : (रिसीव्हरमध्ये) नमस्ते जी...कोण?...कॉन्स्टेबल हरिप्रसाद का रे ?
तांदळेसाहेब काय करतायत ? त्यांना फोन जोडून दे.....आवाजावरून नाही
ओळखलंस ? मी राघूशेट....हा ....थांबतो.....
[एवढयात फकिरा येतो. पाठोपाट भेदरलेला धना.]

फकिरा : शेट, धना आलाय.

राघूशेट : (कान कोरत) दोन पायावर उभा आहे अजून ? अन्न खाऊन अंगाला
फार खाज सुटली आहे का रे तुझ्या ?

धना : (भेदरून) पाया पडतो शेट. चूक झाली. दया करा.

राघूशेट : किसन, फकिरा अरे बघत काय उभे राहिलास ? दया करा म्हणतोय ना
तो ? कंबर फार वळवळायला लागलीय त्याची. [फकिरा आणि किसन मोहरा
करून त्याच्याकडे जाऊ लागतात. तो भेदरून मागे मागे सरत "नाही....नाही....
नाही.......मला मारू नका शेट......मला मारू नका...." म्हणून लटपटून गयावया
करीत असतानाच-] मी तांदळे साहेबांना फोन लावलाय. किंचाळशील तर गळा
घोचला जाईल. किसन, फकिरा तुम्हाला अकला आहेत की नाहीत ? घनाला
तिकडच्या बंद खोलीत न्या आणि दार लावून घेऊन मग त्याच्यावर दया करा.
[फकिरा आणि किसन धनाला फरपटत ओढून घेऊन जातात. क्षणार्धात त्याला
तुडवल्याचा, बदडल्याचा आवाज आणि "ओsय ओsयss मेलोss मेलोss"
अशा धनाच्या अस्फुट किंकाळ्या ऐकू येतात. तशी--]

पान नं. - 11

मी फोन लावलाय फकिरा. त्याच्या तोंडात बोळा कोंबा अगोदर. [मग धोपटल्याचा
आणि तोंड दाबलेल्या हुंकाराचा आवाज येत असतानाच ] नमस्ते तांदळेसाहेब,
गरिबावर फारच खप्यामर्जी झालीय तुमची...नाही नाही ते सगळं ठाऊक आहे
हो...झडतीचा रिपोर्ट द्यायला तुमचे नवे साहेब येतीलच की.... छे छे.....
मी काळजी करीत नाही.....राघूशेट कुणाला भीत नाही साहेब.....हा हांss
कसं बोललात ! तर साहेब, या तुमच्या इन्स्पेक्टरसाहेबांना उचला..... हो हो...
ताबडतोब !.....नाही नाही, हे काम ताबडतोब व्यायला हवं.... मुंबईला तुम्ही
फोन लावला का मी लावू ?.....नाही, तसं नाही साहेब....तुमच्याकडून हे काम
होण्यासारखं नसलं तर मी वरून मी हुकूम आणू शकतो. पण तुमच्या इभ्रतीच्या
द्दष्टीनं तुमच्यांतर्फेच हे काम झालेलं जासत् बरं. काsय ? ....(हसतो)....छे
छे... माझ्या अपमानाचं काही नाव नाही साहेब. लाजलज्जा, मानअपमान सगळं कोळून
प्यायलोय मी... नाही, माझी माफी वगैरे मागायला त्याला लावू नका. फक्त उचला
त्यात सगलं आलं... ठीक ठीक ! आणि काय ?.....पाहुणे ?.....मग स्कॉच पाठवू
का ? .... हे हे असं नाही तांदळेसाहेब, तुम्ही संकोच नाही करायचा. हक्कानं मागून
घ्यायचं. उद्या संध्याकाळपर्यंत सगळा बंदोबस्त होईल, अगदी पक्का....(हसून)
अस करता साहेब राघूशेटचा शब्द आहे तो. अच्छाss नमस्तेss [रिसी ~
व्हर बाजूला ठेवीत] फकिराs धनाला घेऊन या. [फकिरा आणि किसन रक्तबंबाळ
धनाला फरफटत घेऊन येतात. त्याला पाहत -] यॅss ह! आता कसा शोभतोय
गब्रू. हीरोगिरी थंडगार झाली का रे तुझी सगळी ! त्या कोवळ्या पोरीला धरणारे
तुझे हात जरा पुढे कर बाळा--[धना भेदरून तुडवलेले हात पुढे करतो.]
आयssश्शी ! फकिरा , उचल त्याला. तळावर नेऊन सगळ्या पोरीला माणसांना त्याला
दाखवा. आणि मग गावाबाहेर सडकेवर कचऱ्याच्या पेटीजवळ द्या त्याला भिरकावून.
[फकिरा आणि किसन त्याचा लळालोंबा करून त्याला घेऊन जातात. हणमंतराव
येतात. राघूशेट रिसीव्हर त्याच्या हाती देतो. ते तो जागेवर नेऊन ठेवतात.] हण~
मंत्या, दोन दिवसांनी, ऊन माती भरपूर खाल्ल्यावर . किती झालं तरी तो आपल्या
राज्यातला कामगार आहे.

हणमंतराव : होय शेट.

राघूशेट : दामले मास्तर आणि त्या जानकीला चार-आठ दिवसांत मी स्वत:च
जाऊन भेटायचं ठरवलंय.

पान नं. - 12

हणमंतराव : आपण स्वत: ? छे छे शेट -

राघूशेट : त्यावाचून मला दुसरा मार्ग दिसत नाही.

हणमंतराव : पण मला आश्चर्य वाटतं शेट, आजवर आपण मागितल्याशिवाय
कोणाला कधी आसरा दिला नाही आणि कुठची कोण ही पोर जानकी-

राघूशेट : (भडकून) हणमंत्या तू बुद््धू आहेस. अरे, ही जानकी त्या दामले
मास्तरची पोर आहे आणिक-

हणमंतराव : कबूल आहे, पण दामले मास्तर तरी असे कोण लागून गेले की-

राघूशेट : (कडाडत) कोण लागून गेले ? सगळ्या गोष्टी उकलून सांगायला हव्यात
तुम्हा लोकांना, हणमंत्या. चाळीस वर्षांपूर्वी, याच शहरात एका कामगारानं आपल्या
बायकोला आणि आठ वर्षांच्या पोराला एक दिवस रस्त्यावर आणून फेकलं . कारण
काय म्हणून विचारू नकोस. तेय. पांगळ्या, झडलेल्या आईला हातगाडयावर
घालून ते शेंबडं पोर भीक मागत रस्तोरस्ती फिरत असे. या. याच गावातले सगळे
बगळे तिरस्कारनं माना वळवायचे. तुच्छतेनं थुकांयचे आणि गाडा जवळ आला
की- 'दूर दूssर....शिंच्या जवळ येऊ नकोस' म्हणून गुरकावयाचे. एक
माणूस फक्त एकच माणूस भाजीच्या पिशव्या खाली ठेवून आईच्या थाळीत
नेमानं तरी पै-पैसा टाकायचा. तो हा दामले मास्तर. आणि तो हा-हा मी त्यावेळचा
शेंबडा पोरगा राघू. समजलं ?

हणमंतराव : माफ करा शेट.

राघूशेट : हे कुठं बोललास तर मुंडी मुरगळीन. (ओरडून) सात वाजले, माल
तयार झाला की नाही अजून ? दंगलs ? (दंगल लगबगीनं येतो.)

दंगल : शेट, ड्रम घेऊन माणसं कधीची खोळंबली आहे.

राघूशेट : मग वाट कुणाची पाहता आहात हरामजाद्यांनो ? धंद्याची वेळ टळून
गेली तर खाणार काय ? मातीs ? घेऊन ये. ( भराभर दोन तीन माणसे छोटे छोटे
ड्रम्स घेऊन येतात. एक काकडा घेऊन राघूशेट एकेका ड्रममध्ये तो बुचकळून
बाहेर काढतो. दुसरा माणूस काकडा पेटवतो. ज्वाला पाहून राघूशेट -"दोन
नंबर....तीन नंबर.....चार नंबर.....कंडम....." असा पुकारा करीत प्रत्येकवेळी
पुढं केलेल्या पाण्याच्या भांडयात काकडा बुडवून जाळ विझवून टाकतो. अखेर
काकडा आपटत तो ओरडतो-) हणमंत्या, एक नंबरची दारू स्कॉचपेक्षाही दुर्मिळ
व्हायला लागलीय ! आपली माणसं पुरती सडली आहेत की भडभुंजे -झोपडीत
नुसताच ऐशआराम करतायत ? मोरीत ओतून द्या हा सगळा माल. अरे राघू ~
शेटच्या इज्जतीला साजेलसा माल कुणी आणून देणार आहे का नाही ?
[आणि त्याचवेळी अंधार ]
प्रवेश पहिला संपला

अंक पहिला
प्रवेश दुसरा

पान नं. - 13

+

[त्याच वेळी सांयकाळी गाववस्तीपासून थोडे दूर बाप्पाजींच्या मळ्यावर पर्ण ~
कुटीमध्ये. पूर्वी हा भाग ओसाड आणि खडकाळ माळ होता. त्याचे मळ्यात रूपांतर
करण्याची किमया बाप्पाजींची. एक चक्रम आणि विक्षिप्त माणूस म्हणूनच या
माळरानावर अहोरात्र राबणाऱ्या बाप्पाजींची त्या काळी गावकऱ्यांनी संभावना केली
होती. बाप्पाजी वर्षोनुवर्षे राबले तेव्हा धरती माता त्यांना प्रसन्न झाली. थोडया
थोडक्या नव्हे तर चार विहीरींना भरपूर पाणी लागले आणि बाप्पाजींच्या भगीरथ
प्रयत्नामुळे माळरानावर भाजीपाल्यांची भरमाप पिके डोलू लागली. एव्हापावेतो
बाप्पाजी चाळिशीला आले. त्यानंतर लग्न करून त्यांनी या पर्णकुटीतच प्रपंच थाटला.
गोवर्धदास हॉस्पिटलमधे बालविधवा म्हणून शांताक्का परिचारिकेचे काम करीत होत्या.
त्या बाप्पाजींच्या पत्नी म्हणून पर्णकुटीवर आल्या. संसारी झाल्या तरी शांताक्कांनी
नोकरी सोडली नाही. वर्षभरातच भाई जन्माला आला. तरीही शांताक्का हॉस्पिटलमध्ये
काम करीतच राहिल्या. भाई पुष्कळसा बाप्पाजींच्याच अंगाखांद्यावर वाढला आणि
त्या मळ्यातच लहानाचा मोठा झाला.

कायद्याची पदवी मिळून तो वकिलीच्या धंद्याला सुरुवात करतो तोच बाप्पाजी
निवर्तले. मग वकिली सोडून मळ्याचा सगळा कारभार भाईलाच पहावा लागला.
एव्होपावेतो शांताक्का हॉस्पिटलमधे मेट्रन झाल्या होत्या आणि त्यांच्या प्रेमळ सेवा
भावी वृत्तीचा खूपच बोलबाला झाला होता. भाई आजमितीला तिशींच्या जवळपास
आला आहे. तरी देखील त्याचे लग्न केले नाही. करायचा विचारही दिसत नाही.
बापाप्रमाणेच भाईही विक्षिप्तच आहे. म्हणून मग शांताक्कांनीही फार हट्ट धरला
नाही. भाई असा कल्पक आहे, कष्टाळू आहे, पण बुद्धी स्थिर नाही आणि मन कुठे
तरी बिनसले आणि शिकारीची बंदूक त्याने टाकून दिली. भाई चित्रकारही आहे.
हुक्की आली तर दिवसचे दिवस चित्र-फलकासमोरून तो हालत नाही. गाण्याचा
षोकही बऱ्यापैकी आहे. अलीकडेच नगराध्यक्ष आणि त्याचे एक जिगर दोस्त
शिवरामदादा मोरे यांनी त्याला निवडून आणल्यापासून भाई नगरपालिकेच्या काम

पान नं. - 14

काजात मनापासून रमल्यासारखा दिसतो. वाचनाचे वेडही त्याला भरपूर आहे. आणि
खूप काही गोष्टी त्याच्याजवळ आहेत पण आथून तो प्रचंड अस्वस्थ आहे. कुठे तरी
तो हरवला आहे. अलीकडे भाजीपाला मंडईत नेऊन स्वत: विकायला बसण्याचाही
एक प्रयोग त्याने चालवला आहे. हाती घेईल ती गोष्ट अगदी टोकाला जाऊन करायची
ही त्याची सवय . पण पाठ फिरवली की पुन्हा तिचे नाव नाही.

तर असा हा अवलिया बाप्पाजींच्या पर्णकुटीवर आज आपल्या आईबरोबर राहातो
आहे. संगत-सोबत शेतावर राबणाऱ्या शेतगडयांची , कारभारी मुरलीधर कापडी आणि
जनावरे यांची. या पर्णकुटीतले दर्शनी दालन. पर्णकुटीच्या सगळ्या भिंती बांबू जोडून
केलेल्या. दारे-खिडक्याही बांबूची बनवलेली. रंग गर्द विटकरी. आत एक चौपाई
आणि बसायची आसने. ही आसनेही ओबडधोबड झाडांचे बुंधे छाटून तयार केलेली.
एक ओबडधोबड जंगली लाकडांचे पुस्तकांचे शेल्फ. झाडांच्या फांद्या उचलून आणून
थोडी काटछाट करून तयार केलेला चित्रफलकाचा स्टँड. एक चौपाई. त्यावर घोंगडी.
त्यावर पसरलेली पुस्तके. एक टेलिफोन आणि एक प्लेयर. भिंतीवर शिकार चिन्हे,
काही लँडस्केपच्या तसबिरी कोपऱ्यात एक गाडगेमहाराजांचा तयार होत आलेला
मेणाचा पुतळा. ही अर्थातच सगळी भाईची किमया. भिंतीवर फक्त तीन माणसांच्या
तसबिरी लावल्या आहेत बाप्पाजी, गांधीजी आणि दोघांच्या मधे चित्रचंद्रिका
मीना कुमारी.

रंगमंच उजळतो तेव्गा उघडया खिडक्यांतून मळ्याचे दर्शन घडते. पुढले
दार उघडे आहे. पण या दालनात कोणीही नाही. फक्त टेलिफोन खणखणतो
आहे. क्षणभराने आतून लगबगीने धावत येतो मुरलीधर कापडी. मुरलीधर
पस्तिशीचा. कारभारी छाप वेश आणि मुद्रा. फोनपाशी जाऊन तो रिसीव्हर उचलतो
आणि - ]

मुरलीधर : (फोनमध्ये) हॅलाव हॅलाव......मी मुरलीधर कापडी. बाप्पाजींच्या
मळ्यावरून बोलतोय...आ ? .....कोण शांताक्का तुम्ही होय ? आवाज मला जरा
वेगळा वाटला म्हणून......भाई ? भाई अजून परतले नाहीत. मगाशी भेटले होते
मला भांडेश्वर गल्लीत. म्हणाले आता फक्त मुजाबांचा बोळ आणि ढमढेऱ्यांची
बखळ तेवढी राहिली. तेवढयांची संडास सफाई उरकून मळ्याकडं येतोच मी....
एकटे ? एकटे का म्हणून ? बाकीचे भंगी होते की बरोबर.....[हे ऐकतच बाहेरून
शिवरामदादा मोरे येतात. वेश पुढारी छाप. शिवरामदादा "तुझं चालू दे. मी
बसतोय" असं खुणेनं मुरलीधरला सांगतात व चौपाईवर प्रशस्तपणे बसून पान
तयार करू लागतात. दरम्यान फोनमध्ये--]नाही नाही, भाजी घेऊन
नेहमीसारखे भाईच गेले होते मंडईला पण.....हां , तिथली मजा कळली ना तुम्हाला

पान नं. - 15

......भाई काय म्हणणार ? थोडे चिडले , चरफडले बागवानावर. एक लेक्चर झोडलं
त्यांना आणि वेतागानं परत आले. हं....हं....हो.....आता गुरं आली आहेत
इतक्यात रानाकून. शिदूला आणि श्रीपतीला धारा काढायला बसवतोय. मी...हं...
हा....ठी आहे. तुम्ही येईपर्यंत सगळं तयार ठेवतो. (रिसिव्हर खाली ठेवतो )
नमस्ते शिवरामदादा, भाई आणि शांताक्का .येतीलच एवढयात.

शिवरामदादा : येऊ देत सावकाश. मला काही खास गडबड नाहीये आज. पण
काय रे मुरली, नंडईत काय मजा झाली आज ? सांग सांग......भाईची मजा मला
सांगितलीस म्हणून तो काही उखडायचा नाही तुझ्यावर.

मुरली : मजा म्हणजे--रोज भाजीच्या पाटया घेऊन भाई स्वत: मंडईत जाऊन
विकायला बसतात हे ठाऊकच आहे तुम्हाला 
शिवराम : मलाच का, उभ्या गावाला ठाऊक आहे. हा मागल्या जन्मीचा हरिश्चंद्रा ~
चाच अवतार रे. म्हणून सत्ययुगातल्या प्रमाणे माल घ्या आणि योग्य तो दाम
पेटीत टाका म्हणून पाटी लावून बसतोय हा राजा. गिऱ्हाइकं याच्या बापाचं
बारसं जेवून बसलीत. पेटीत दिडकी टाकतात आणि पाटीभर माल उचलतात--
हीच तुझी मजा ना ?

मुरली : नाही हो दादा यात कसली आलीय मजा ? आज सगळ्या बागवानांनी
भाईंना मंडईत आल्या आल्या घेराव घातला . त्यांना बाजूला बसवलं आणि
भाजीच्यापाटया ताब्यात घेऊन रास्त पैका हातावर ठेवला म्हणाले रोज तुमचा
सत्याग्राह तर आज आमचा सत्याग्रह--

शिवराम : यंव रे यंव ! या भाईला असात कोणीतरी धडा शिकवायला पाहिजे, त्या
शिवाय नाही याचं डोकं ताळ्यावर येणार. अरे हा नगरपालिकेचा उपाध्यक्ष, आरोग्य
खात्याचा प्रमुख झाल्याबरोबर, भंग्यानी तंटा काढला म्हणून यानं त्यांच्याबरोबर
आठ न् आठ दिवस काय संडास सफाई करीत बसायचं ? अरे लोकांनी माझ्या
या नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या तोडांत शेण घालायचं बाकी ठेवलंय. तुम्ही घरातले
लोक करताहात तरी काय ? नुसती गंमत बघताहात काय ? हे--हे फार म्हणज
फारच झालं.

मुरली : शिवरामदादा, भाई कसे आहेत ते तुम्ही जाणता. तुम्ही त्यांचे बालमित्र.
तुम्हाला ते जुमानत नाहीत तर आमचं कुणाचं हो ते ऐकणार ?

शिवराम : नाही नाही, ते चालणार नाही. आज मी शांताक्कांच्या समोर त्याला
खडसावणार आहे की 
[तोच बाहेर गलबल्यातले बोलणे ऐकू येते तशी --]

मुरली : भाई आले बरं का शिवरामदादा.
[असे म्हणत मुरलीधर बाहेर पळतो. शिवरामदादा पान तोंडात घालून तोबरा

पान नं. - 16
चघळू लागतात. तेवढयात चार पाच भंग्याशी बोलत भाई पाठमोरा दारात येऊन
उभा राहतो . खाकी हाफ पँट, अंगात जर्सी , डोक्याला रुमाल बांधलेला. येता येता
भाई म्हणतो--]

भाई : .....हे असं नाही....असं नाही चालणार.....या गप्पा आता नाही मी ऐकून
घेणार . आज संडास सफाईचा माझा आठवा दिवस. तुमच्या बरोबर मी कामाला
बाहेर पडतोय. तुम्ही झाडूपाटी खाली ठेवल्या क्षणीच मीही खाली ठेवतोय. माझं
रोजचं काम संभाळून सकाळी मंडई, दुपारी कोर्ट, नगरपालिकेचं कचेरीकाम,
सायंकाळी मळ्यातली देखरेख-हे सगळं संभाळून रोज किती संडासांची सफाई
करतो मी ? तीस. जास्तच पण कमी नाही. काय रे रझाक ? खरं आहे ना बालाजी ?

बालाजी : साब आपण पढेलिखे बाबू आहात. आपली आमची कशी बरोबरी
व्हायची ?

भाई : अरे वा रे वा ! बाबू लोक संडास सफाईत तरबेज असतातं वाटतं ? मी
तीस संडास साफ करू शकतो तर तुम्हाला वीससुद्धा डोईजड होतात काय ? जरा
रीतीनं बोला राव.....

रझाक : लेकिन साब, बात ऐसी है--

भाई : आपकी बात मुझे सब मालूम है (आत येत) हे पाहा नगराध्यक्षच इथं
बसले आहेत. त्यांच्यासमोर सांगतो तुम्हा लोकांची कामाची तऱ्हा कशी आहे ती.
तुम्ही आधी उन्हं डोक्यावर आल्यावर हळू हळू कामावर उगवणार. 'हा आला
का रे. .. तो आला का रे ? ममद्या कुठं उकिरड्यावर पडला ?....दगडया कुठं गायब
झाला- ही चौकशी. त्यात मग बिडी-काडी नाहीतर तमाखू मल्हारीची भागू
कोणाचा हात धरून कशी पळून गेली ? जन्याला मटका कसा लागला ? यावर मग
खमंग चर्चा. मग संडास सफाईला तुम्ही उठायचे. चार संडास साफ होईपोत्तर
भोलाशंकरचा टी स्टॉल आलाच की वाटेवर. पुन्हा ठेल्यावर निचिंतींच चा-पानी....
मग दिवसभरात काम कशाला पुरं होतयं ?

बालाजी : असं नेहमी नाही होत साब....हां, कधी कधी एकेक टायमाला-

भाई : काही बोलू नका गुलामांना. या आठ दिवसांत मी तुम्हाला पुरता ओळखून
चुकलोय. रोज वीस संडासांची सफाई करायला तुम्हाला काहीही जड नाही. काम कमी
होणार नाही. वाढवीत नाही हे नशीब समजा. चला, जा आता, घराला चालू लागा.
तुमची महागाई मात्र वाढवून घेणार आहे. मी नगरपालिकेच्या पुढल्या बैठकीत.

बालाजी : तेवढं तरी करा साहेब. गरिबावर फार उपकार होतील बघा.

भाई : (उसळून) हे हे-हे मला आवडत नाही. तुमचा महागाईभत्ता मी वाढवून
देणार यात उपकार कसले ? हा लाचारी मला आवडत नाही. अरे काम करताना
अंग चोरू नये. आणि दाम घेताना दिडकी सोडू नये. बालाजी, हे चित्रातले माझे

पान नं. - 17

वडील, बाप्पाजी पाहा. कामाच्या वेळी कुचराई केली तर मळ्यातला ऊस काढून
बदडून काढीत असत. कोणाला ?शेतमजुरांना नव्हे. मला , पोटच्या पोराला.
त्यांच्या कडक शिस्तीत वाढलोय मी. तेव्हा माझ्याशी गमज्या करू नका. समजलात
ना, चला....निघा...[सगळे भंगी जातात, मग ] मुरली, स्नानासाठी हंडाभर
गरम पाणी काढायला सांग दादूला. आई अजून परतली नाही ना हॉस्पिटलमधून ?
दादा, आधी आंघोळ करून शुद्ध, पवित्र होतो आणि मग [मुरलीधर आत जातो]
शिवराम : तेवढयासाठी हंडाभर गरम पाणी ?

भाई : अरे हे भंग्याचं घाणेरडं काम युद्धजन्य पातळीवरूनच करायला लागतं. नाक
मुठीत धरून नव्हे राजा, नाक ठार मारून. दिवसभर असं काम केलं म्हणजे
आंघोळीची खरी किंमत कळते यार. बाकी तुला सांगण्यात काय अर्थ आहे म्हणाs
आंघोळीच्या बाबतीत तू जुम्मे के जुम्मेवाला...

शिवराम : कळलं ss , समजलं ! आता आमच्यावर एक उपकार करा. आपल्या
पादुका आणि झाडू आमच्या ताब्यात द्या.

भाई : कशाला ?

शिवराम : नगरपालिकेत एक स्पेशल देव्हारा करून त्यात ठेवाव्यात म्हणतो मी या
वस्तू . तेवढंच लोकांना पूजा करायला....

भाई : उगाच बकबक करू नकोस दोस्ता, एक दिवस खरीच वेळ येईल तशी . मी
येईतोवर. ही एक ठुमरी ऐक. जरा स्वरांच्या बरसातीत तरी न्हाऊन नीघ. स्वीच
ऑन करतो. मधुर स्वरलापांनी वातावरण भरून जाते. "वा जी वाs" अशी दाद
देत भाई आत पळतो. क्षणाक्षणाला शिवरामदादा कासावीस होतात. मोठया मुष्कि ~
लीनं ते थोडावेळ छळ सोसल्यासारखी ही संगीतबरसात सहन करतात, मग असह्य
होऊन, उठून खिडकीतून पानाचा तोबरा थुंकून टाकीत माघारी फिरत-]

शिवराम : एss, कोण तो हाs......अरे मुरलीधर......[मुरलीधर येते तशी--] अरे
हा 'आ ऊ' चा धबधबा थांबव बाबा......डोक फिरायची वेळ आली दोन मिनिटांत.
काही लावणी बिवणी असली सिनेमातली तर ती लाव की गडया. हे काय खडक
फोडायचं चाललंय ?

मुरलीधर : [प्लेयर बंद करीत] तेवढं बरीक सांग नका दादा. भाईच्या कपाटात
फक्त असल्याचं कॅसेटस आहेत. रेडिओवर कोणी बिनाका गीतमाला लावली तरी भाई
उखडतात एकदम.

शिवराम : असा कसा रे हा ओसाड बैरागी माणूस ? उद्या लग्न झाल्यावर बायकोचे
किती हाल करील हा ?

मुरलीधर : म्हणूनच लग्न करीत नाहीत भाई.......

शिवराम : मोठा अजब प्रकार आहे हा. तो दीडशहाणा नाही म्हणत असेल.

पान नं. - 18

म्हणून शांताक्कांनी गप्प बसायचं ?

मुरलीधर : या शांताक्काच येताहेत (बाहेर पाहात) विचारा त्यांनाच. [बाहेरून
परिचारिकेच्या शुभ्र वेशात शांताक्का आणि पाठोपाठ जानकी येतात. शांताक्का
पन्नाशीच्या स प्रेमळ, सात्त्विक. जानकी काळीसावळीच तरुणी पण तरतरीत मुद्रेची
तडफदार आणि अमळ फटकळ देखील. आल्या आल्या--]

शांताक्का : भाई कुठाय ? तुम्ही केव्हा आलात शिवरामदादा ?

मुरली : भाई आंघोळीला बसलेत.

शिवराम : आलोय मघा शांताक्का. तुम्हाला आणि भाईला एकदा निचिंतीनं भेटाव
आणि सोक्षमोक्ष करून टाकावा म्हणून-

शांताक्का : कशाचा सोक्षमोक्ष ? मुरली, बाईंना चहा सांग आणि कामावरच्या गडयांना
इतक्यात सुटी करू नकोस. थोडं काम करून घ्यायचय. (मुरली जातो) बैस ग
जानकी, अशी सासुरवाशिणीसारखी उभी नको राहूस बाई. ही कोण परकी माणसं
नव्हत. हे शिवरामदादा मोरे, नगराध्यक्ष. पण इथं मात्र भाईचे लहाणपणापासूनचे
मित्र. आणि दादा, ही जानकी दामले. आमच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या हाताखाली
सिस्टर म्हणून काम करते. [दोघे औपचारिकपणे नमस्कार करतात. जानकी
अवघडून बसते.] हूं दादा, कशाचा सोक्षमोक्ष करायचाय तुम्हाला ?

शिवराम : शांताक्का, भाईनं हे-हे-हे काय आरंभलंय ?

शांताक्का : तुम्ही दोघे बालमित्र. तुम्हालाच ते ठाऊक असायला हवं. तुमच्याशी काही
सल्लामसलत 
शिवराम : सल्लामसलत ? भाई कधी कुणाशी सल्लामसलत करतो का ? धडाधड बाँब
टाकीत सुटतो. त्याच्याशी कसं वागायचं हेच कळत नाही.

शांताक्का : काही वाईट काम केलंय का त्यानं ?

शिवराम : आता वाईट म्हणजे काय सांगायचं ?

शांताक्का : वाईट म्हणजे पूर्वी तो दारू प्यायचा. पेल्यानं नव्हे अगदी पिपानं. तुमच्या
संगतीत. ते त्यानं सोडलं. तुमचं मला ठाऊक नाही.

शिवराम : न.....नाही नाही....मी सुद्धा सोडलीय...म्हणजे बेतानं घेतो कधीमधी.

शांताक्का : पण ते वाईट. पूर्वी तो शिकार करायचा. मला ते आवडायचं नाही. देवानं
माणसाबरोबर या सृष्टीत जे पशुपक्षी निर्माण केले ते काही माणसाच्या करमणुकी ~
खातर त्याची शिकार बनण्यासाठी नाही. पण हे त्याचं त्यालाच कळून चुकलं.
आताही तो जंगलात जातो. पण बंदूक घेऊन नव्हे, बंधुभाव घेऊन. पूर्वीची
शिकारीची वृत्ती वाईट होती, असं तोच म्हणतो आता. तसंsss--
शिवराम : तुम्हीच सांगा शांताक्का, हे-हे मंडईत जाऊन भाजी विकायला बसणं आणि
भंग्यांच्या ताफ्यात मिसळून आठ न् आठ दिवस संडास सफाई करीत राहाणं, हे

पान नं. - 19

शोभतं का याला ? अहो नगरपालिकेचा उपाध्यक्ष-

शांताक्का : समजलं, पण भाईनं यात वाईट काय केलं ते सांगा की ? (तेवढयात
मुरलीधर चहाचे कप ट्रे मध्ये ठेवून येतो तशी - एक कप उचलून पुढं
करीत ) घ्या , दादा आधी चहा घ्या आणि मग विचार करून सांगा.

शिवराम : आणि हे काय ? भाईचा चहा ?

शांताक्का : (चहा घेत ) देवानं तुमच्या पोटी हा नगच एक्स्ट्रॉ स्ट्राँग पाठवून
दिलाय.

शांताक्का : ते आई म्हणून ओळखलंय. पण मित्र तुम्हाला कधी ओळखता
आलं नाही. ( चहा घेऊन, क्षणभराच्या स्तब्धतेनंतर) शिवरामदादा, तुम्हाला एक
गोष्ट कधी कळली नाही.. भाई म्हणजे एक भन्नाट वादळ आहे. एक दिशाहीन
वादळ. म्हणून मी त्याच्या बाबतीत कधी मध्ये पडत नाही. भाई या बाबतीत अगदी
त्याच्या वडिलांची दुसरी मूर्ती .

शिवराम : असला वादळी माणूस नगरपालिकेच्या राजकारणात टिकायचा नाही
आणि आम्हाला परवडायचाही नाही, शांताक्का.

शांताक्का : त्याला त्या तसल्या राजकारणातत तुम्ही ओढलात इथंच मोठ्ठी चूक झाली.
तर आता चूक लवकर दुरुस्त करून टाका. जन्मवैरी होऊन दुरावण्यापूर्वीच तुम्ही
त्याला निरोप द्या....मोकळा करा गोडीनं.

शिवराम : तसं नव्हे शांताक्का, पण वादळी माणूस थोडा तरी माणसाळायला नको
का ? आपण काही तरी करायला हवं.

शांताक्का : नेमकं काय करायला हवं ?

शिवराम : सांगू ? शांताक्का , तुम्ही भाईचं लग्न करून द्या आणि -

शांताक्का : (हसून) छाsन ! भाईसारख्या माणसाचं लग्न काय बळजबरीनं करता
येतं ?

शिवराम : शांताक्का, मला ठाऊक आहे भाई तुम्हाला किती मानतो ते. तुमचा शब्द
मोडायची त्याची हिम्मत नाही.

शांताक्का : शक्य आहे. माझा शब्द मानून तो लग्नाला उभा राहील. पण असल्या
भन्नाट वादळापुढं बायको टिकायला नको ? तिसऱ्या दिवशी ती पळून जाईल.

शिवराम : आं ? असं म्हणता ?

शांताक्का : म्हणून म्हणते दादा, तुमचा मित्र जेवढा कळला नाही, तेवढा
मला, माझा मुलगा समजलाय. तुम्ही एकच लक्षात ठेवा. भाईच्या वडिलांच्या
बरोबर वीस वर्षं मी संसार केलाय, तरवारीच्या धारेवर. घरी काही कमी नव्हतं.

पान नं. - 20

सगळी समृद्धी होती. माणसंही तशी वाईट नव्हती. पण तरीही माझी नोकरी मी
कधी सोडली नाही. तोच माझा आधार खराखुरा. तेव्हाही आणि आजही.

शिवराम : शांताक्का, तुम्ही काय बोलताहात ते मला समजत नाहीये.

शांताक्का : (हसून) तशी अपेक्षाही नाहीये माझी. मुद्दा एवढाच की तुम्ही भाईचे
मित्र असलात, तर फक्त मित्रच राहा. पण दुरून. फार जवळ जाऊ नका. हे वादळ
तुम्हाला खरोखरीच परवडणारं नाहीये.
[तेवढयात भाईच्या गाण्याची लकेर ऐकू येते. पाठोपाठ भाई येतो. अंगात झब्बा
पायजमा, टर्किश टॉवेलने डोकं संपूर्ण झाकलेलं. डोक खसाखसा पुसत भाई येतो.
येता येताना म्हणत असतो--'दादा तुला सांगण्यासारखा आज एक विलक्षण
प्रकार घडला.' आणि--]

भाई : (सहज डोक्यावरून टॉवेल काढीत विस्मयानं) अरेs ! आई, तू केव्हा आलीस ?

शांताक्का : तू अभ्यंग स्नानाला बसला होतास तेव्हाच आलो आम्ही दोघी. हिची तुला
ओळख करून देते. हा आमचा भाई. आणि ही-

भाई : सिस्टर जानकी दामले, बरोबर आहे ना ?

शांताक्का : म्हणजे काsय ? तुमची दोघांची ओळख झालीय ?

जानकी : (बावचळून) छे छे . मी यांना आजच पाहतेय.

भाई : बरोबर आहे आई. आमची समोरासमोर ओळख अशी आजच होतेय. पण
मी यांना आधीपासून ओळखतोय, यांचं एकदा एक स्केच देखील काढून ठेवलंय.
(शेल्फात शोधू लागतो)

शांताक्का : ते कधी काढलंस आणखी ?

भाई : (स्केचबुक उलगडून दाखवीत) हे बघ. [शांताक्का जवळ जाऊन जान ~
कीही उत्सुकतेने बघते ] मी तुला भेटायला आलो होतो एकदा हॉस्पिटलमध्ये . त्या वेळी
या हिरवळीवर नारळाच्या झाडाखाली एकटयाच विचारमग्न बसल्या होत्या. ती पोज
मला आवडली म्हणून-

शांताक्का : (स्केच बुक परत करीत) बराच आहेस की रे !

भाई : (स्केचबुक टाकीत) किती बरा आहे ते मी माझ्या मनातलं मीराबाईंचं चित्र
काढीन त्यावेळी कळेल तुला.

जानकी : (किंचित लाजून) इश्यs.....काहीतरीच काय ?

भाई : स्केच काढलं आणि एका वॉर्डबॉयजवळ चौकशी केली तेव्हा यांचं नाव कळलं

शांताक्का : बरं असू दे. ती काही शिळोप्याच्या गप्पा मारायला इथं आली नाहीये.
तिचं काम आहे एक.

भाई : कोणतं काम ? [तेवढयात मुरलीधर त्याचा चहा आणून देतो. तो घेत ]
तुमच्या सगळ्यांचा झाला वाटतं ?

पान नं. - 21

शिवराम : हो आम्हाला साधा चहा चालतो. तुमचं म्हणजेच सगळंच एकदम एक्सट्रॉ
स्ट्राँग-

भाई : ही आईनं भलावण केली वाटतं माझी ?

शांताक्का : मी काय विचारतेय ते सांग आधी. आपल्या मळ्याच्या टोकाला तिसऱ्या
विहिरीच्या मागं दोन खोल्या बांधल्या होत्या बघ यांनी......ध्यानधारणेसाठी बसायचे
हे त्यावेळी 
भाई : बाप्पाजींच्या ध्यानाची कशाला आठवण देते आहेस तू ? सहा वर्षांपूर्वी तिथं
धान्याची पोती लुटायला आलेल्या चोरटयांशी मुकाबला घडला होता माझा. अजून
जखमांचे वण आहेत माझ्या अंगावर.

शिवराम : खरं म्हणजे तू मरायचासच त्यावेळी.

भाई : अरे जा जा.....भुरटया चोरटयांच्या हातून इतिश्री व्हायला जन्म घेतला नाहीये
मी. मी होतो म्हणून त्यावेळी 
शांताक्का : पुरे. तो इतिहास झाला. या खोल्या कशा अवस्थेत आहेत सध्या ?
कोणाला राहायला उपयोगी पडतील का त्या ?

भाई : पडतील तर काय झालं ? जरा साफसफाई करायला लागेल.

शांताक्का : मुरलीधर, आपली गडीमाणसं कामावरून सोडण्यापूर्वी खोल्या स्वच्छ
करून घे आज.

मुरली : पण शांताक्का तिथं दिवाबत्ती देखील नाहीये.....

शांताक्का : ती उद्या करून घेता येईल. पण 
भाई : कोणाला राहायला हव्या आहेत त्या खोल्या आई ?

शांताक्का : जानकीला. आपल्या वडिलांना घेऊन ती राहायला येणार आहे तिथं.....

भाई : (विस्मयानं) तिथंss ? राहायला ? या ?

शांताक्का : तिचे काही प्रॉब्लेम्स आहेत. त्याबद्दल आपण नंतर बोलू. तुझी काही
हरकत नाही ना ?

भाई : माझी काही हरकत असायचं काय कारण ? खोल्या मोकळ्याच आहेत. साफसफाई,
दिवाबत्ती होऊन जाईल. पण आई, यांच्यासारख्या एकटया दुकटया बाईनं, वडि ~
लांना घेऊनसुद्धा तिथं राहाणं, एवढी ती जागा सुरक्षित नाहीये.

जानकी : तशी मला कोणाचीच भीती वाटत नाही. आणिक काही धोका असलाच
तर तो मला पत्करला पाहिजे.

भाई : तुम्ही एकदा ती जागा प्रत्यक्ष पाहून येता का ?

जानकी : पाहण्याची काही गरज नाही. चार भिंती आणि वर छत असलं म्हणजे पुरे.

भाई : पण त्यापेक्षा आई, मला वाटतं, आपल्या पर्णकुटीच्या मागं जे आऊट हाऊस
आहे--

*
.

"
"
"

﻿
साने गुरुजी
03-07-25
Marathi
एकूण पाने :-15
FROM 1 TO 22

पान नं. - 1

1

चार गोष्टी

महात्माजींना श्राद्धदिन भारतातच नव्हे तर सर्व जगात साजरा
होतो. ते भारताच्या द्वारा जगाचीच सेवा करत होते. कारण येथे सर्व
धर्म, सर्व संस्कृती. भारत म्हणजे मानवजातीचे प्रतीक, गांधीजी जगाचे
ह्दय झाले होते, त्यांच्यावरच्या आघाताने सारे जग क्षणभर निर्जीव
झाले होते. साऱ्या जगाने त्यांना श्रद्धाजली वाहावी हे समुचितच होय.

श्राद्ध अति पवित्र व मंगल वस्तू आहे. कृतज्ञतेची ती मधुर खूण
आहे. ज्यांचे आपण श्राद्ध करतो त्याला आपण श्रद्धापर्नक स्मरतो
श्रद्धा चमत्कारजननी आहे. यजुर्वेदात म्हटले आहे की, अदेवाला श्रद्धा
देवत्व देते. जो अ-देव आहे. ज्याच्या जीवनात दिव्यता नाही, अशा
माणसाला जर अमर श्रद्धा मिळाली तर त्याचे जीवन ज्वलंत होते. ते
दैवी होते. श्रद्धा ध्येयाकडे घेऊन जाते. ध्येयाचा ध्यास लावते. सारे
जीवन धगधगीत , रसरशित होते. मग अन्य काही सूचत नाही, रुचत
नाही.

तुका म्हणे व्हावी, प्राणासवे ताटी
नाहीतरी गोष्टी , बोलू नये.

महात्माजींना श्रद्धांजली म्हणजे त्यांनी दिलेल्या ध्येयाला श्रद्धांजली
आज सर्योदय, समन्वय अनेक शब्द उच्चारले जात आहेत. सर्वांचा उदय
व्हावा, सारे सुखी व्हावेत म्हणून प्राचीन ऋषींपासून, ऋषीश्वरांपासून
सारे सांगत आले, परंतु केवळ शब्दोच्चाराने सारे सुखी कसे व्हायचे, हा
प्रश्न आहे. सर्वाचा उदय व्हावा म्हणूनच स्वराज्य हवे होते. परंतु

पान नं. - 2

सर्वाच्या उदयाची तीव्रता आपल्याला लागून राहिली आहे का ?
भांडवलदारांना शतसवलती देऊन, आणखी काही वर्षे तुमचे कारखाने
राष्ट्राचे होणार नाहीत असे आश्वासन देऊन त्यांचा उदय सुरक्षित केला
जात आहे. गरिबांचे काय. हा प्रश्न आहे.

महात्माजींनी स्वराज्यात चार गोष्टी हव्यात म्हणून लिहिले होते.
(1) आर्थिक समता (2) सामाजिक समता (3) धार्मिक समता
(4) लोकशाही. सरकारचे धोरण पसंत नसले तर शांततेने विरोध
दाखवायला परवानगी. या चार गोष्टी अजून किती दूर आहेत, हे पाहिले
म्हणजे दुःख होते. वेदना होतात.

दिल्लीला महात्माजी म्हणाले, ' एक दिवसही स्वतंत्र हिंदुस्थान
आर्थिक विषमता सहन करणार नाही.' परंतु आज काय दिसते ृृ?
शेतकऱ्याला दिलीत जमीन ? काटकसर करून विकत घे. असे सांगणे
म्हणजे सर्वोदयी श्रद्धा नव्हे. शेतमजुराजवळ मालकीची जमीन नाही.
त्याच्याजवळ दोनचार बिघे जमीन विकत घेण्याइतके पैसे कधीही साठ-
णार नाहीत ,चलनवाढीची सबब न सांगता , जमीन मालकाला दीर्घ
मुदतीची सेव्हिंग्ज सर्टिफिकेट द्या आणि शेतमजुराला जमीन द्या. कानां
वर आले की कोणी क्राँग्रेसचे बडे अधिकारी म्हणाले , ' पुढच्या
निवडणुकीनंतर हे करावयाचेच आहे. ' तुमच्या पुढच्या निवडणुकीसाठी
आज या लोकांना तसेच सडतपिचत ठेवणार होय ? गरिबांच्या चिंतेची
होळी पेटत ठेवून त्यावर भावी निवडणुकांची भाकर भाजणार ?
दुसऱ्यांना सत्तोलोलुप म्हणणाऱ्या या लोकांची ही सत्ता टिकवण्याची
कारस्थाने पाहिली की किळस येते.

जो प्रकार शेतकऱ्यांच्या बाबतीत तोच कामगारांच्या बाबतीत
'उत्पादन वाढवा, उत्पादन वाढवा' म्हणून त्यांना येताजाता सारे
डोस पाजत आहेत.कोटयावधींचा नफा उकळणाऱ्या मालकांसाठी का
अधिक उत्पादन करायचे ? ज्या कारखान्यात आपण श्रमतो, तेथील
माल जनतेच्या कल्याणार्थ आहे, जनता पिळली जाणार नाही, काळे-
बाजार होणार नाही, तेथील नफा धनवंतांच्या विलासात, दगडी

पान नं. - 3

राजवाडयात उधळला जाणार नाही, ही खात्री वाटली तर कामगार
आनंदाने नाचत वाटेल तितका श्रमेल. परंतु जोवर गरिवांची होते
होळी, बडयांची पिकते पोळी, हे त्याला दिसत आहे तोवर त्याचा जीव
अधिक उत्पादनात संपूर्णतया कसा रंगेल ? एवंच आर्थिक समता
दूर आहे.

आणि सामाजिक समता ? जोवर शिक्षणाने, राहणीने, संस्कृतीने
सारे थर समान पातळीवर येत नाहीत तोवर सामाजिक विषमता तरी
कशी दूर होणार ? साऱ्या जातीपाती समान माना म्हणून म्हटले तरी
जिच्या केसाला तेल नाही, जिचे नेसू चिंधी अशी कातकरीण स्वच्छ
इरकली पातळ नेसलेल्या, वेणीफणी केलेल्या भगिनीजवळ कशी बसणार ?
तिलो बसू कोण देणार ? बिहारमध्ये चंपारण्यात गांधीजी गेले.
कस्तुरबांना म्हणाले, 'भगिनींना स्वच्छता शिकव.', एक भगिनी
कस्तुरबांना म्हणाली, ' आंग धुतले तर नेसू काय ?' सामाजिक
विषमता नष्ट करायलाही आर्थिक विषमता दूर करावी लागते. धार्मिक
विषमता दूर करण्यासाठी सर्व धर्मातील चांगल्या गोष्टींचा प्रचार करणे,
कोणत्याही धर्माचा असो तो लायक असेल तर त्याला कामावर घेणे.
भेदभाव न करणे या गोष्टी हव्यात.

स्वराज्यातील चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे अहिंसक रीतीने
सरकराला विरोध दाखवण्याची मोकळीक असणे. गांधीजी म्हणत ,
' आय ऑम द् ग्रेटेस्ट डेमोक्रॅट - मी सर्वात मोठा लोकशाहीचा पुरस्कर्ता
आहे.' परंतु आज काय आहे ? सरकार लोकशाहीचे पुरस्कर्ते असते तर
येताजाता कार्यकर्त्यांना अटक ना करते, त्यांच्या मार्गात अडचणी ना
आणते. परंतु सेवादलाचे 'बिजली नाचेल गगनात ' हे सुंदर नृत्यगीत
पाहून एका मंत्र्याने म्हणे कपाळाला आठया घातल्या ! ' सेवादलात
गाणे कशाला ?' असे म्हणाले ! पू. विनोबाजींनी धुळ्याला सेवादलाच्या
कलापथकाचा कार्यक्रम पाहून संतोष दर्शवला व ' खेडयापाडयांतून जा
असे कार्यक्राम करत ' असे सांगितले.

केवळ कायद्याने जनतेची ह्दये का मिळत असतात ? दुसऱ्या

पान नं. - 4

पक्षाला विधायक सेवाही करू द्यायची नाही ! त्यांच्या नावावर सेवेचे
भांडवल उगाच जमा व्हायला नको. ' आमच्या प्रोढ साक्षरता वर्गांना
मंजुरी मिळत नाही मग मदत कोठून मिळणार ? असे एक कार्यकर्ता
म्हणाला,

बर्नार्ड शॉने एके ठिकाणी सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हटले आहे -
'इफ यू वॉन्ट ब्लड यू वुइल हॅव यूवर ओन चॉइस - तुम्हाला
रक्ताचेच डोहाळे हवे असतील तर तीही तुमची इच्छा पूर्ण होईल !'
रक्तपात नको असेल तर त्वरेने जनतेचा संसार नीट उभा करा
यला हवा.

दरिद्रनारायणा, तुला सुखावणारे स्वराज्य दूर आहे. ते जवळ यावे
म्हणून निर्मळपणाने जे संघटना करू पाहतात. जे लोकशाही मार्गाने
जाऊ इच्छितात त्यांच्या वाटेत निखारे पेरले जात आहेत. परंतु गांधीजींनी
दिलेली श्रद्धा घेऊन आपण जाऊ. जय की पराजय, हा सवाल नसून
सारे सहन करत न दमता थकता उत्कटपणे काम करणे एवढेच
आपल्या हाती.

पान नं. - 8

3

जीवनाची आशा

देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारत आता लोकशाही मार्गानसमाजवाद
ध्येय प्राप्त करून घेईल अशी कोटयवधी भारतीयांस आशा वाटत
आहे. हे ध्येय जास्तीत जास्त लौकर प्राप्त होण्यातच देशाचे कल्याण
आहे, आंतरराष्ट्रीय शांती राहण्यासही भारताने त्वरेने समाजवादी ध्येय
गाठणे आत्यतिक जरुरीचे आहे. स्वतंत्र राष्ट्रात अहिसेचे व्यापक बंधन
पत्करून आपापल्या मतांची नि योजनांची सर्वत्र प्रसिद्धी करायला
सर्वांना वाव हवा. मोकळीक हवी. तरच लोकशाहीचा आत्मा जिवंत
राहील.

देशात लोकशाहीचे तत्त्वज्ञान तेव्हाच दृढमूल होईल, जेव्हा आपण
आपापल्या मतांचा अति अभिनिवेश वाळगणार नाही. याचा अर्थ आपल्या
मताविषयी आपणासच श्रद्धा नको असा नाही, परंतु सत्य समजणे
कठीण आहे. मी माझ्या श्रद्धेप्रमाणे जावे, परंतु तोच एक सत्याचा मार्ग
असे मी कसे म्हणू ? कदाचित उद्या माझीही चूक मला कळेल आणि
मी निराळा मार्ग घेईन. म्हणून कदाचित मी माझे मन मोकळे करायला हवे.
जीवन-प्रकाश घ्यायला सदैव, ते तयार असायला पाहिजे. ' बुद्धे
फलमनाग्रहः' असे वचन आहे. तुमच्याजवळही बुद्धी आहे, विचार
करायची शक्ती आहे हे कशावरून ठरवायचे ? तुम्ही आग्रही नसाल
हट्टी नसाल तर सत्याचा संपूर्ण ठेवा जणू आपणासच सापडला अशी
भावना विचारी मनुष्य कधी करू शकणार नाही. तो आपल्या श्रद्धे
प्रमाणे जाईल, परंतु त्या श्रद्धेप्रमाणे न जाणाऱ्याचा तो खून करणार

पान नं. - 9

नाही, त्यांचा आत्यन्तिक द्वेष तो करणार नाही. त्याचे कारण तरी
मला चुकीचे वाटते असे फार तर तो म्हणेल.

गांधीजीसारख्यांची या देशात हत्या झाली, याचे कारण काय ?
आपण सर्वानी या घटनेचा गंभीर विचार केला पाहिजे. मताचा अभि-
निवेश हाच या गोष्टीच्या मुळाशी नाही का ? मला वाटते तेच सत्य
बाकीचे सारे चूक, एवढेच नव्हे तर राष्ट्राला ते खड्डयात लोटत आहेत,
म्हणून त्यांना दूर केले पाहिजे, ही स्वतःच्या मताची आत्यान्तिक आग्रही
वृत्तीच या खुनाला प्रवृत्त करती झाली.

कम्युनिस्टांचे आजकालचे तत्त्वज्ञान ' आम्हीच अचूक' या समजुतीवर
उभारलेले आङे. रशियातील स्टॅलिनची कारकीर्द रक्ताने माखलेली
आहे. जो जो विरोधी तो तो दूर केला गेला. अपार छळ त्यांचे
झाले. नाझी लोकच क्रूर होते असे नाही. रशियातील तुरुंगातूनही जे लाखो
जीव संशायवरून ठेवले जातात ते ज्यांना शक्य झाले त्यांनी स्वानुभवाने
लिहिले आहे. पूर्वी ख्रिस्ती लोकही धर्माचा असाच प्रचार करत. प्रत्यक्ष
ख्रिस्ती धर्मातही कॅथलिक किंवा प्रॉटेस्टंट यांनी एकमेकांचा का कमी
छळ केला ?? मुसलमानी धर्माचा काही प्रचार ' कुराणातच सारे सत्य
आहे, ते माना, नाहीतर मान उडवतो,' या अभिनिवेशानेच झालेला आहे.

हे जुलूम का केले जातात ? मनुष्य इतका निर्दय, कठोर कसा होतो ?
माझ्याजवळ जे आहे तेच सत्य असल्यामुळे त्याच्या आड जो जो येईल
तो उडवलाच पाहिजे, ही आसुरी वृत्ती त्यातून जन्मते. माझ्या सत्याला
विरोध करायला कोणी उभा राहता कामा नये, यासाठी सर्वांना दहशत
बसवावी असे त्यांना वाटते. नाझी लोकांना वाटे , ' जर्मन वंशच श्रेष्ठ
बाकीचे मानव म्हणजे केरकचरा, त्यांना जाळले काय, छळले काय,
काय बिघडले ? कम्युनिस्टांना वाटते, ' आम्ही जगाचे उद्धारकर्ते
दुसऱ्यांजवळ सत्य नाही. आमचा मार्ग म्हणजे मानवी सुखाचा , विकासाच्या
त्या मार्गात जे जे आड येतील ते वाटेल त्या रीतीने नष्ट करणे हेच
योग्य. अशा वृत्तीमुळे कम्युनिस्टी छळबुद्धी आणि खुनी वृत्ती जन्मली.
संघाच्या लोकांना असेच वाटे. आणि अखेर महात्माजींचा वधही अशाच

पान नं. - 10

प्रवृत्तीतून झाला. एकदा 'मीच खऱा' अहंकार जडला की त्याच्या
मागून अंधता , निर्दयता , सारे काही येते.

जैन हे अहिंसाधर्माचे उपासक. स्याद्वादाचा त्यांचा सिद्धान्त
'इदम््पिस्यात््' हेही असू शकेल - असे ते म्हणत. स्वतःचे मत मांडतान
त्याची सत्यता स्थापताना दुसरीही बाजू असू शकेल, अशी अनाग्राही
वृत्ती या स्याद्वाद्वात आहे. स्वाद्वाद म्हणजे संशयात्मा नव्हे. मला या क्षणी
जे सत्य वाटते ते मी घेऊन जावे. परंतु त्याला विरोध करणाऱ्यांची
मी चटणी नाही उडवता कामा, कारण कदाचित उद्या मला सत्य
वाटणारी गोष्ट चुकीची ठरू शकेल. अशी वृत्ती समाजात राहील तर
समाजात अहिंसा राहील. हिंदुस्थानात नाना दर्शने, नाना तत्त्वज्ञाने
जन्मली, परंतु कोणी कोणाला छळले नाही. जाळले नाही. पोळले नाही
नाही. चार्वाकवादी आपले मत मांडत आहे. अद्वैती आपले तत्त्वज्ञान
मांडत आहेत. आपापली मते मांडा. जनतेला जे पटेल ते जनता घेईल
अशानेच सत्याची पूजा होईल, सत्य का तलवारीने शिकवायचे असते ?
जेथे संकुचितपणा असेल तेथून सत्य निघून जाते. अहंकाराजवळ कोठले
सत्य ? महात्माजी नेहमी म्हणत, ' मला पटवा, माझी चूक दिसली तर
मी निराळा मार्ग घेईन. ' ते स्वतःच्या श्रद्धेने जात होते. ती श्रद्धा अचल
होती, परंतु सदैव नवीन घ्यायला ते सिद्ध असत.

श्रीकृष्णमूर्ती एकदा म्हणाले, ' ट््रूथ कॅन नेव्हर बी ऑर्गनाईजड
- सत्याची संघटना नाही करता येत.' विनोबाजी हेच म्हणाले होते.
तुरुंगातुन सुटून आल्यावर ते महात्माजींना म्हणाले, ' मला कोठे अध्यक्ष
चिटणीस नका नेमू. हे घ्या राजीनामे.'

महात्माजींनी विचारले , ' परंतु काम करणार आहेस ना ?'
ते म्हणाले ' हो'
महात्माजी म्हणाले, ' मग दे तुझे राजीनामे.'

संघटना बांधली की थोडा तरी अभिनिवेश येतोच. माझाच पक्ष
खरा, माझीच संघटना सत्यावर उभी असे मग मला वाटते. सत्य तर

पान नं. - 11

सूर्यप्रकाशाप्रमाणेच मोकळे हवे, वाऱ्याप्रमाणे सर्वगामी हवे. तरच ते
सतेज, निर्मळ, प्राणमय राहील, संकुचितपणा सत्यास मानवणार नाही.
अहंकार मानवणार नाही. राजकीय नेत्यांच्या ठिकाणी असा दैवी गुण
भाग्यानेच आढळतो. गांधीजींनी या राष्ट्राला, जगाला दिलेली ती शिक-
वण आहे. आपल्या निर्णयाची सत्यता स्वतःला पटत असून ही दुसऱ्या
विषयी सद््भाव ठेवणे ही अहिंसा. यातच लोकशाहीचा आत्मा. महात्मा
जींनी आमरण ही गोष्ट कृतीने शिकवली. भारतीय संस्कृतीतच ही
गोष्ट आहे.

संघटनेमुळे, पक्षामुळे अंधता येते. जडता म्हणजे मीच खरा आहे ही
वृत्ती येते. अभिनिवेश येतो. सत्य गुदमरते, हे सारे खरे, परंतु जगात कार्य
करायचे तर काही संघटना लागते. विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात,
' जगात कार्य करायचे तर थोडा अहंकारही लागतो.' परंतु थोडा
अहंकार म्हणजे अहंकाराचा पुंज नव्हे. लोकमान्य एकदा म्हणाले,
की, ' स्वराज्य खोटे बोलून येणार असेल तर मी खोटेही बोलेन.'
यांतील 'ही' शब्द महत्वाचा आहे. आता अगदी माझ्या खोटे
न बोलण्यामुळेच अडत असेल तर बोलतो. बाबा म्हणजे तो 'ही' दुःखच
दर्शवतो.

खोटे बोलणे वाईटच, परंतु आलीच वेळ तर तेही करीन. परंतु
लोक 'ही' विसरून गेले आणि लोकमान्यही म्हणत की स्वराज्यासाठी
खोटे बोलले म्हणजे काय झाले. राजकारणात हे चालायचेच, असा अर्थ
करू लागले ! विवेकानंदाच्या वरील म्हणण्याचाही असा अर्थ कोणी
करतील. परंतु विवेकानंद 'थोडा अहंकार ' म्हणतात. आपापले पक्ष
करी, संघटना करा. आपण बरोबर आहोत ही श्रद्धा ठेवून , हा थोडा
अहंकार ठेवून काम करा. पण अहंकार फाजील झाला की दुसऱ्या पक्षाचे
निःसंतान करायला निघाल. म्हणून जपा. गांधीजींनीही संघटनेचा आश्रय
करूनच प्रयोग केले. क्राँग्रेस संघटनेद्वारा त्यांनी काम केले. इतरही अनेक
संस्था त्यांनी काढल्या, परंतु त्यांची स्वतःची विशिष्ट श्रद्धा असूनही
ते मोकळे असत. 'मला पटवा' असे ते म्हणत. सर्वास ते असेच सांगत.

पान नं. - 12

आपण मानव अपूर्ण आहोत. संपूर्ण सत्य आपणास मिळणे कठीण
त्याचप्रमाणे मिळालेल्या श्रद्धेनुसार अहंकाररहित होऊन जाणेही कठिण
परंतु प्रयत्न करावा. त्या दिशेने जावे, आपापल्या विचारांचा , कल्प-
नांचा प्रचार करा. त्या पटवा, त्यासाठी हाणामारीची, तुमच्या शस्त्रा-
स्त्राची जरूर नाही. सत्य प्राणमय असेल तर जगात विजयी होईल
सत्य जर सत्तेवर अवलंबून असेल, आत्मा ऑटमबाँबवर अवलंबून
असेल, तर सत्ता, ऑटमबाँब म्हणजेच विश्वाचे आदितत्त्व वा अंतिमतत्त्व
असे म्हणावे लागेल आणि तसे असले तर जीवनाला आशा तरी कोणती ?

पान नं. - 17

4

संयम नि सहानुभूती

प्रचंड इमारत उभारण्यात येत असते, तेव्हा आपल्याला काय
दिसते ? गवंडी दगडांना इकडेतिकडे कापीत, छाटीत असतो, मगच
त्यांना त्या भव्य इमारतीत जागा मिळते. ज्याप्रमाणे दगड-विटा सारख्या
करून , त्यांची पुढे आलेली टोके काढून छाटून घ्यावी लागतात. त्याच
प्रमाणे दगडादगडांच्यामध्ये, विटाविटामध्ये सिमेंटही भरावे लागते.
चुना लागतो. प्राचीन इमारती अजून भक्कम आढळतात. म्हणतात
की, चुन्यात गूळही घालीत असत.

आज स्वतंत्र भारताची टोलेजंग इमारत उभारायची आहे.
भाषावर प्रांतरचना पूर्वीच मंजूर झालेली आहे, परंतु अशी रचना
केली जात असता द्वेषमत्सर न फैलावोत. परस्पर प्रेम राहो, सहकार्य
राहो, भारताचे एक ह्दय आहे ही जाणीव सर्वाना असो, परमेश्वराला
सहस्त्रशीर्ष, सहस्त्राक्ष अशी विशेषणे आपण देतो, परंतु सहस्त्र-ह्दय असे
विशेषण कधीच नाही आढळत. परमेश्वराला ह्दय एकच, त्याचप्रमाणे
भारताचे प्रांत अनेक झाले तरी अंतःकरण एक असो.

भारताची एक संस्कृती आहे. प्रत्येक प्रांताची विशिष्ट अशी
संस्कृती कोठे आहे ? थोडेफार फरक असतील, परंतु तेवढयाने ती
भिन्न नाही होत. भारतातील प्रत्येक प्रांताची का भिन्न संस्कृती आहे ?
भारतीय संस्कृतीची ध्येये आपल्या संस्कृत ग्रंथांतून आहेत. वेद, उप-
निषदे, रामायण, महाभारत, स्मृति पुराणे, दर्शने, यातूनच आपणा
ध्येये मिळाली. संस्कृतातील हे ध्येयघोष प्रांतीय भाषांतून जनतेचे

पान नं. - 18

कैवारी जे संतकवी त्यांनी दुमदुमवले. कृत्तिदासांचे रामायण बंगालीत
श्रीधरांचा रामविजय मराठीत, कंबनचे रामायण तामिळमध्ये, परंतु
त्या त्या प्रांतातील जनतेला त्यांच्या भाषेतून रामसीता, भरत-
लक्ष्मण, हनुमान यांचे जे आदर्श मिळाले ते का निरनिराळे आहेत.
भगवान शंकराचार्य जन्मले केरळात, परंतु तो ज्ञानसूर्य हिंदुस्थानभर
गेला. द्वारका, जगन्नाथपुरी , बदरीकेदार, शृंगेरी चारी दिशांना चार
पीठे स्थापून संस्कृतीचे ऐक्य निर्माण करता झाला.

शंकराचार्यच्या अद्वैताचा सुगंधच सर्व भारतीय भाषा साहित्याला
येत आहे. तुकारामाच्या अभंगात, नरसी मेहताच्या भजनात, रवीद्र
नाथांच्या गीतांजलीत, श्री बसवांच्या वचनात, एकाच संस्कृतीची ध्येये
दिसून येतील. भारतीय संतांनी आणि आचार्यानी भारतीय संस्कृती
एकरूप केली. नामदेवांनी अभंग शीखांच्या ग्रंथसाहेबात जातात. कबीराची
गाणी नि दोहे, मीराबाईची उचंबळवणारी गीते. गोपीचंदाची गाणी
सर्व हिंदूस्थानभर गेली आहेत. दक्षिणेकडील यात्रेला उत्तरेकडील लोक
येत. उत्तरेकडील यात्रेला दक्षिणेकडील. संस्कृतातून चर्चा चाले. तीच
प्रातीय भाषांतून मग जाई. अशाप्रकारे अखिल भारतीय संस्कृती
जोपासली गेली. कमलाच्या अनेक पाकळ्या म्हणजे या प्रातीय संस्कृती
त्या अलग नाहीत.

कलकत्त्याला डॉ. कटजू गेले तेव्हा त्यांचे स्वागत करताना बंगाली
पुढारी म्हणाले, ' बंगाली संस्कृती निराळी आहे. तिच्या विकासात
अडथळे नका आणू.' बंगाली संस्कृती , निराळी म्हणजे काय ? तुमचे
विवेकानंद, रामकृष्ण, विद्यासागर, बंकीम, रवींद्र, शरदबाबू यांनी का
असे काही दिले जे इतर प्रांतात नाही ? जे इतर प्रांताच्या परंपराहून
फार निराळे आहे. आज प्रत्येक प्रांताला असे वाटू लागले आहे की ,
आपण इतरांहून वेगळे निराळे, बाबांनो, भाषा जरी निराळी
बोलत असाल. परंतु आईच्या दुधाबरोबर एकच संस्कृती भारतीय
मुलांना पाजली जात आहे हे विसरू नका.

1930 मध्ये आम्ही मुंबई प्रांतातले राजबंदी त्रिचनापल्लीला

पान नं. - 19

पाठवले गेलो. सायंकाळी प्रार्थना झाल्यावर कोणी काही लिहून वाची
व्यंकटाचल््म म्हणून दक्षिणेतला एक राजबंदी माझा मित्र झाला होता.
तो इंग्रजीत काही लिही. मी मराठीत अनुवादून वाची. त्याची भाषा
मल्याळी, ' त्याने मलबारकडचा एक दिवस ' म्हणून एक लेख लिहिला
मी त्याचे भाषांतर करून वाचले. 'सकाळी बायका उठतात. चूल
सारवतात. सडा-समार्जन करतात. मग कॉफी होते. आजीबाई भाजी
चिरते. आजोबा पूजेला बसतात. सुना तळ्यावर धुणी घेऊन जातात.'
असे ते वर्णन होते. ते ऐकल्यावर महाराष्ट्रीय मित्र म्हणाले, ' आपल्या
कडच्यासारखेच आहे.' मी म्हटले, ' भारताचे ह्दय एकच आहे. तेच
प्रश्न , त्याच सामाजिक समस्या, हुंडे, स्पृशा-स्पृश्ये- तेच प्रकार. म्हणून
मी म्हणतो की भारतीय संस्कृती एक आहे. प्रांताप्रांताच्या संस्कृती
विशेष अलग अशा नाहीत.

परंतु एकदा कोठे शुद्धीच्या नावावर हकालपट्टी सुरू झाली
म्हणजे ती कोठे थांबेल ते सांगता येणार नाही. मराठीतून उर्दू शब्द
हाकला चळवळ सुरू झाली. नाना शब्दांच्या नाना छटा असतात.
आकाश शब्द नि अस्मान शब्द आपण एकत्र नाही घालवणार, परंतु
विवक्षित छटा दाखवायला अस्मान शब्द सुंदर वाटतो. साऱ्या जगांतून
घ्यावे, पचवावे नि बलवान व्हावे, इंग्रजी कोशात राजा, सरदार , जंगल
इत्यादि शब्द आढळतील. शेकडो ठिकाणचे त्यांनी शब्द घेतले. भाषा
शुद्धीची चळवळ आणि प्रांतशुद्धीची चळवळ ! हिंदूंनी मुसलमानांना
हाकलावे, मुसलमानांनी हिंदू-शिखांना हाकलावे . एकमेकांची घाण जणू
दूर काढावी, असे प्रकार सुरू झाले ! परंतु मुसलमानांनी हिंदूशिखांना
आणि हिंदूशीखांनी मुसलमानांना हाकल्यावर पुढे काय ? हाकलायची
तर गोडी वाटू लागली.

मग बंगाल्याने बिहारीला 'चले जाव' म्हणावे, बिहारीने बंगाल्याला
तामीळ बंधूने तेलगू बंधूस, तेलगू बंधूने तामीळबंधूस, कानडी
बंधूनी महाराष्ट्रीयास, महाराष्ट्रीयांनी गुजरात्यास, असे का एकमेकांना
खो देत रहायचे ? आज हे प्रकार होत आहेत. श्री, जयप्रकाश

पान नं. - 20

मद्रासच्या बाजूला दौऱ्यावर असता, आम्हाला स्वतंत्र द्रविडीस्थान
द्या. आर्यांनी आमचा नाश केला, आर्य भाषेतील शब्द काढून टाकले
अशा चाललेल्या चळवळी त्यांनी पाहिल्या. त्यांना दुःख झाले. कोठे
आहे भारत ? प्रत्येक प्रांत का सर्वतंत्र स्वतंत्र होणार ? हे असहिष्णू
प्रकार कोण थांबवणार ? आपणच याला आळा घालू या. आळा कशाने
घालता येईल ? परस्परांची भाषा अभ्यासून. एखादी तरी द्रविडी
भाषा आपल्याला आली पाहिजे. मातृभाषा नि हिंदुस्थानी याशिवाय
जयप्रकाश मद्रासकडे हिंडताना आधी चार वाक्ये तामीळमध्ये बोलत
लोकांना आनंद होई. भाषा अहंकारासाठी नसून ह्दयाला पोचण्यासाठी
आहे.

सेनापती नि मी अस्पृशता निवारणार्थ हिंडत असता गडहिंग्ल-
जला गेलो. मला चिठ्ठी आली, ' गुरूजी , कानडीत बोला.' मी म्हटले,
' तुरुंगात वाचायला शिकलो, परंतु बोलायला नाही.' सेनापतीना
वाईट वाटले. आमची मोटार लॉरीसारखी जात होती. बरोबर सेवादल
पथकात कुतुब होता. त्याला कानडी येई, सेनापती म्हणाले , ' बंधू
भगिनीनो वगैरे मला कानडीत शिकव.' सेनापतींनी चार वाक्ये पाठ
केली. पुढच्या सभेत, ' बांधब रे मत्तु भगिनी रे ' त्यांनी म्हटले
टाळ्यांचा कडकडाट झाला ! ह्दयला ते शब्द भेटले. विवेकानंद
शिकागोला सर्वधर्म परिषदेसाठी गेले. सारे प्रतिनिधी ' सभ्य नरनारींनो
असा आरंभ करीत विवेकानंद ' बंधू-भगिनींनो' म्हणाले
आणि टाळ्या थांबत ना ! त्या दोन शब्दांनी त्यांनी सारी ह्दये जिंकली
अशी ही मौज आहे. कानडी भाषा बोलत असले म्हणजे काय ' उंडु गुंडु'
चालवले आङे म्हणू नये. गुजरातीला ' अमळो' असे हिणवू नये. ती ती
भाषा कानावर पडली तर भावाची भाषा भेटली म्हणून नाचावे
थोडेथोडे शब्द येत असावेत. गाणी येत असावीत. आनंद वाटावा.

मी मुबंईस मांटुग्याला उडपी श्रीकृष्ण भुवन खानावळीत जातो.
तेथे कानडी, तमीळ, तेलगू, मल्याळी सारे येतात. मला अपार आनंद
होतो. भारतीय बंधूंचे दर्शन होते. मी देशभर कधी हिंडू फिरू ? मला

पान नं. - 21

मित्र म्हणतात. ' इतक्या लांब कशाला जाता ?' तेथे मला माझा
सारा प्यारा भारत भेटतो. हा आनंद त्यांना काय कळे ? विनोबाजी एकदा
म्हणाले, ' आकाशातील सप्तर्षी पाहून मला नकाशातील काश्मिर नि
युक्तप्रांत आठवतात । ' जेथे जातो तेथे भारताचे भव्य दर्शन, असे
भारतमय आपण होऊ या. हिमालय माझे डोके , विध्याद्रि माझा कंबर
पट्टा, पूर्व पश्चिम तीरे माझे पाय. सर्व भारताच्या रुपाने मला नटू दे
साऱ्या भाषा माझ्या, सारे भाऊ माझे. माझे मोठे कुटुंब आहे. लाखांचे
हे तुटपुंजे राष्ट्र नाही. या कोटयावधींचे ते आहे. मग मोठया कुटुंबावर
जबाबदारी अधिक. शिका दोनचार भाषा. प्रांताच्या सीमेवरचे भाग
तर संगमाप्रमाणे तीर्थक्षेत्रे माना. ते इकडे का तिकडे भांडू नका.

प्रांतांनी भारती व्हावे आणि भारताने अति भारती व्हावे.
महात्माजी उर्दू लिपी शिका म्हणत. अरे त्या महापुरुषांची दूरदृष्ठी आहे.
तुमच्याजवळ ? एकीकडे आशियाचा संघ करा म्हणता. ईजिप्तपासून
तमाम मुस्लीम राष्ट्रींची जी अरबी लिपी. फक्त तुर्कांनी रोमन लिपी
घेतली. या सर्व देशांचे विचार कळायला त्यांची लिपी नको यायला ?
त्या भाषा नको कळायला. ? या सर्व मुस्लिम देशांचे राजकारण वा
अर्थकारण अमेरिकेच्या वृत्तपत्रांवरून का आपण वाचणार. समजून
घेणार ? हिंदी मुस्लीम कोटयावधी आहेतच. त्यांच्यासाठी शेजारधर्म
म्हणून आणि आशियांतील मुस्लिम राष्ट्रांचे ह्दयगत कळावे म्हणून अरबी
लिपी शिकणे आवश्यक आहे. युरोपातील लोक अनेक भाषा शिकतात.
झेक राष्ट्रात हिंदीचे वर्ग चालतात. काय त्यांना जरूर ?

म्हणून आपण क्षुद्र कुंपणे घालून बसता कामा नये. व्याप वाढवाल
तर वैभव वाढेल. संकुचितता सोडा. सारे प्रांत प्रेमस्नेहाने एकमेकांजवळ
वागोत. भारताचे एक ह्दय असो. प्रांत एकजीवी असोत. आंतरभारती
आणि विश्वभारती अशी आमची दोन ध्येये आहेत. ते थोर पूर्वज
म्हणाले , ' कृण्वन्तो विश्वमार्यम्' आपण सर्व विश्वाला आर्य म्हणजे
उदार सुसंस्कृत करू. म्हणून चिनी भाषा शिकून त्या भाषेत आपल्या
प्राचीन पंडितांनी ग्रंथ लिहिले. विनोबाजी अरबी शिकून मुसलमानांना

पान नं. - 22

कुराणाचा महिमा आज सांगत आहे. प्रांतांचा परस्परांशी आणि भारताशी
प्राणमय संबंध, याला आपण आन्तरभारती ध्येय म्हणू. दुसरे रवींद्र
नाथांनी उद््घोषिलेले विश्वभारतीचे. भारताचा सर्व जगाशी संबंध
ठेवणे. असे हे संबंध संयम नि सहानूभुती, विशाल व थोर दृष्टी ही
असतील तरच निर्माण होतील.

*
﻿
दिलीप प्रभावळकर
03-07-25
Marathi
एकूण पाने : - 16
from 1 to 16

पान नं . - : 1
+
क्रिकेट रजनीचा बहुरंगी कार्यक्रम

विद्युत प्रकाशातले क्रिकेट आपल्याकडे लोकप्रिय होणार याबद्दल मुळीच शंका नाही .
अधिककाधिक उद्योगपतींचे लक्ष आता अशा सामन्यांकडे जात आहे हे मला परव
समजले . अडगुले अँड मडगुले प्रायव्हेट लिमिटेड ( सुप्रसिद्ध ' कोम्बी ' हेअर ब्रशचे
उत्पादक ) या कंपनीचे एक पार्टनर भय्यासाहेब मडगुले यांच्याकडे जाण्याचा योग
आला , इतर अनेक मोठया व्यक्तीप्रमाणेच भय्यासाहेबांचे क्रिकेटप्रेम हा लोकांच्या
कौतुकाचा विषय आहे . त्याच्या ऑफिसच्या केबीनमध्ये मला त्यांच्याशी बोलायला
मिळाले हे मी माझे भाग्य समजतो .

" मडगुलेसाहेब , मी असं ऐकतोय की तुमच्या कंपनीतर्फे विद्युत प्रकाशात
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जाणार आहे . कोंबी हेअर ब्रश ट्रॉफीसाठी खरं आहे
का ? " " त्याला आम्ही वन् नाइट इटरनॅशनल म्हणतो . हा बघा स्टेडियमचा ' प्लॅन ' त्यांनी
उत्साहाने मला प्लॅन दाखवला . ' या अत्यंत आधुनिक तंत्राने बांधलेल्या स्टेडियममध्ये
एका वेळी दीड लाख लोक बसतील आणि ह्या खुणा केलेल्या जागा दिव्यांसाठी नाईट
क्रिकेट आता सगळीकडे पॉप्युलर होत आहे हे त्या विल्स ट्रॉफी क्रिकेटवरून तुमच्या
लक्षात आलं असेलच . '

' अर्थातच रात्री बारा बारा वाजेपर्यंत लोक सर्कसच्या लास्ट शोला बसावे तस बसून
होते ' .

' मला विल्सपेक्षाही अधिक आकर्षक क्रिकेट सामने भरवायचे आहेत . '
' विल्स नाईट क्रिकेटपेक्षा अधिक आकर्षक ? कस शक्य आहे ? त्यांच्या मॅचमध्ये
पॅडस््सुद्धा फिकट निळ्या रंगाचे होते . '

' आमच्या स्पर्धेत ते काळे असतील आणि क्रिकेट बॉल सप्तरंगी असेल '

पान नं . - 2

' सप्तरंगी ? क्रिकेटचा बॉल नेहमी लालच असतो . '
कोण म्हणतं ? परवा विल्स करंडक सामन्यात पांढरा होता . आणि साइट स्क्रीन
काळा , मला प्रथम वाटलं , आमच्या रंगीत टी . व्ही . सेटमध्ये काही बिघाड झालाय
आमची मिसेस दहा मिनिटे सगळी बटन गोल गोल फिरवत होती . शेवटी संधूचे केस
केशरी आणि कपिलचे पुढचे दात जांभळे दिसायला लागल्यावर प्रयत्न थांबवला . पण
चेंडू काही लाल होईना . '

' खरं आहे . पुष्कळ रंगीत टी . व्ही . सेटवाले बॉल आणि पॅडस््चे ते नवे रंग पाहून
गोंधळले होते आणि कलर ऑडजल्ट करण्यासाठी धडपडत होते . अहो , अंपायर्सचा
गणवेषही गडद रंगाचा होता . '

' आमच्या हेअर ब्रश ट्रॉफी मॅचेसमध्ये अंपायर्सना हिरवा कोट आणि लाल पँट
असेल . क्रिकेटर्सना कपडे पिवळे असतील आणि बूट सोनेरी . दोन्ही कर्णधारांच्या हॅटला
तांबडे पीस असेल . '

' हे सगळं जरा भडक नाही का वाटत ? ' मी भीत भीत विचारले .
' भडक ? ' भय्यासाहेब उसळून म्हणाले , ' हे भडकपणाचं आणि जाहिरातीचं युग
आहे . ' शो ' महत्वाचा ; क्रिकेट थोडं कमी पडलं किंवा अजिबात पडलं तरी चालेल . '
' अगदी बरोबर . बरं मडगुलेसाहेब , लाखो लोक आपली कामं सोडून कॉमेंटरी
ऐकणार . त्याचा काही वेगळा विचार केला आपण ? '

' हो . कॉमेंटेटर्स बायका असतील . तेच तेच पुरुष आवाज ऐकून कंटाळलेल्या
श्रोत्यांना हे नाजूक आवाज नक्की आवडतील . शिवाय ' गेंदबाजी ' , ' बल्लेका
किनारा ' , ' मनोवैग्यानिक दबाव ' अशा सारखे शब्द बायकांच्या तोंडी अधिक शोभून
दिसतील ?

' शंकाच नको . पण क्रिकेटचे सखोल ज्ञान असलेल्या बायका उपलब्ध आहेत ? '
' इतकी वर्ष ऐकलं ते सखोल ज्ञान पुष्कळ झालं . एक्स्पर्ट कॉमेटेटर्सनी तर सखोल
ज्ञान देऊन हैराण केलं . आता जास्त भर करमणुकीवर आहे . हे झगझगीत दिवे ,
रंगीत कपडे काय सांगतात ? '
' काय ? '
' जास्त सीरियसली काही घ्यायचं नाही . तेव्हा कॉमेंटरीच्या मध्ये एखादी पाककृती
किंवा नाजूक प्रश्नांवर कॉमेंटेटर ताईचा सल्ला सांगितल्यास गैर वाटणार नाही . '
' फारच सुंदर ! आणि टीटाईम - लंचटाईममध्ये लोकांच्या समोर मैदानातच खातील
का क्रिकेटर्स ? ते जास्त आकर्षक दिसेल . '

' नको . प्रेक्षकांना मैदानात घुसण्याची सवय आहे . तसं झालं तर क्रिकेटर्सच्या

पान नं . - 3

वाटयाला काही उरणार नाही . पण लंचटाईमसाठी माझी वेगळी योजना आहे . '
' ती कोणती बरं ? मनात म्हटले , जेवढया नव्या कल्पना , तेवढी मडगुल्यांच्या
हेअर - ब्रशची जास्त जाहिरात !

' क्रिकेटच्या माजी कर्णधारांना लोक विसरून जातात . मग त्यांना
क्रिकेटसमीक्षकांच्यामदतीने मदतीने पुस्तक तरी लिहावी लागतात . किंवा तज्ज्ञाचा मुखवटा
घालून चालू कसोटी मालिकेवर मतप्रदर्शन करावं लागतं . म्हणून माजी कर्णधारही
लोकांच्या नजरेसमोर राहावेत ह्यासाठी त्यांना उघडया मोटारीत मैदानाभोवती
लंचटाईममध्ये फिरवण्यात येईल . ते त्यांची इतक्या वर्षातली कमाई ( फक्त ट्रॉफीज
आणि मानचिन्ह , पैसे नव्हेत ) पब्लिकला दाखवतील . कशी काय वाटते कल्पना ? '

' उत्तम ! पण मडगुलेसाहेब , एख शंका येते मनात . अचानक पॉवर ब्रेक डाऊनमुळे
सगळे दिवे गेल तर ? असं कधीही होऊ शकतं . काळोखात कसं खेळणार क्रिकेट ? '

' आम्ही मेणबत्या तयार ठेवणार आहोत . साडेसोळा लाख मेणबत्यांची ऑर्डर दिली
आहे . '

' साडेसोळा लाख ? '
' हो . पंधरा लाख मेणबत्या मैदानात जागोजागी लावण्यात येतील . '
' आणि उरलेल्या दीड लाख ? '
' प्रत्येक प्रेक्षकाला एक एक पेटवून देण्यात येईल . तसंच प्रत्येक फिल्डरकडे एक

पान नं . - 4

एक पेट्रोमॅक्सचा दिवा दिला जाईल . त्यानं तो फिल्डिंग करताना शेजारी ठेवायचा
तो घेऊनच बॉलमागे धावायचं . फक्त बोलिंग करताना अंपायरच्या हातात द्यायचा . दर
वीस ओव्हर्सनंतर अंपायरने खूण केल्याबरोबर सगळे प्लेअर्स खाली बसून आपापल्या
पेट्रोमॅक्सला पंप मारतील . ही ऑक्शन वीस सेकंद टिकेल आणि याला ' मँडेटरी
सेकंडर ' म्हणण्यात येईल .

' अप्रतिम ! ' मी आदराने म्हणालो , ' आता शेवटचा प्रश्न . दीड लाख लोक बसू
शकतील अशा या अद्ययावत स्टेडिअमचा - '

' त्याचं नाव मडगुले स्डेडिअम ठेवणार आहोत . मडगुले नाव अजरामर व्हायला हवं .
' ओव्हल टेस्ट ' , ' लॉर्डस टेस्ट ' , म्हणतात तसं ' मडगुले टेस्ट ' म्हणतील - '

' हां मडगुले स्टेडिअम . तर या प्रचंड स्टेडिअमचा क्रिकेट सीझन नसेल तेव्हा काय
उपयोग होईल ? '

' आपल्याकडे क्रिकेटपुढे सगळं काही फिकं आहे . ' भय्यासाहेब तुच्छतेने म्हणाले .

' अगदी खरं आहे , या देशात स्टेडिअम बांधायचं ते क्रिकेटसाठीच मी भारावून
बोललो .

' - पण ऑफ सीझनमध्ये पडून राहाणार असेल तर त्यातल्या त्यात आगामी
ऑलिपिक्ससाठी स्टडिअम द्यायला हरकत नाही . तेवढंच ऑलिंपिकला उत्तेजन मिळेल . '

पान नं . - 5

एक तप

स्टेडिअम तुडुंब भरले आहे . खेळायला नुकतीच सुरुवात झाली आहे . तिसरी टेस्ट
मॅच . सामन्याचा तिसरा दिवस . लांब तिथे . घरापासून शेकडो मैल दूर . वेस्ट
इंडिजमधले जॉर्जटाऊन , प्रचंड उकाडा . पण प्रेक्षकांना अमाप उत्साह . सामूहिक गाणी ,
टाळ्या . आरडाओरड , जल्लोष ! वेस्ट इंडिजचा पहिला डाव 363 धावात संपला आहे .
भारताने काल सुरुवात चांगली केली आहे . फक्त मंकड आऊट झाला . आणि आज
कॅप्टन वाडेकर आणि तो मुंबईचा नवा पोरगा खेळायला येतात . गेल्याच टेस्टमध्ये त्या
पोराने कसोटी पदार्पण केले . त्याचे बॅटिंगचे तंत्र , रिफ्लेक्सेस आणि एकाग्रता
पाहून तिथले क्रिकटेचे बुजूर्ग एकमेकात कुजबूजु लागले आहेत . त्यांना त्याच्यात
असामान्यत्वाचा खुणा आढळल्या आहेत म्हणे . तो उभा राहिलाय तिथे मध्यावर .
अगदीच पोरगेला दिसतोय . वेस्ट इंडियन फिल्डर्सच्या आडदांड गर्दीत तर तो शिकारी
कुत्र्यांच्या घोळक्यात ससाच वाटतो .

आज पिचकडे जाताना कॅप्टन वाडेकर नेहमीच्या इंग्लिश स्टाईलमध्ये मराठी वाक्य
पुटपुटला आहे . " आपण टिकून राहू आणि स्कोअर करू . " पण तो दिला शब्द पाळत
नाही . सोबर्सच्या एका अवघड बॉलला त्याचे दोन स्टंप्स फाकतात . आणि तो परततो .
नवीन आलेला विश्वनाथ फिल्डिंग करणाऱ्या लॉईडजवळून जाताना प्रचंड हशा होतो .
दोघांच्या उंचीतला फरक पाहून प्रेक्षकांना भलतीच गंमत वाटते . आणि मग ते दोघे
छोटे वीर वेस्ट इंडिजच्या बोलर्सना तुटून पडतात . बघता बघता तो मुंबईचा नवा पोरगा
नव्वदी ओलांडतो . त्याच्या चाहत्यांची ' धडकन ' वाढते आणि मग शुभशकुनाचा म्हणून
मी काय भुरुभुरू पाऊस पडू लागतो . फार जोरात नाही . पण हवेत गारवा येईल इतपत .
त्याची एकाग्रता पावसामुळे भंगत नाही . लान्स गिब्जच्या वळणाऱ्या बॉल्सना खेळतानाचे
त्याचे पदचापल्या पाहून सोबर्सला त्याचे कौतुक केल्याशिवाय राहावत नाही . आता तो

पान नं . - 6

चौऱ्याण्णववर आहे . नॉलिगाचे काही बॉल्स भलतेच फसवे वाटतात . असा एक बॉल
खेळताना शॉर्टलेगला सोबर्सकडे कॅच उडतो आणि बेसावध सोबर्सच्या हातून बॉल
चक्क सांडतो ! जमिनीवर ओघळतो . सोबर्स आज नॉर्मल वाटत नाही . ( काल लॉईड
आणि सोबर्स बॅटिंग करत होते . तेव्हा फटकावलेल्या बॉलकडे बघत घाईने रन काढताना
प्रचंड जोरात दोघांची टक्कर झाली . दोघांच्या रानदांडग्या ताकदीचा दणका एकमेकाला
बसला . आणि दोघेही पार कोलमडले . नेहमीच्या त्याच्या घणाघाती खेळातले . किलर
इन्स्टिंक्ट टकरीतही आले असावे . लॉईड तर काल पिचवर निपचित पडला होता . त्याला
उचलून न्यावे लागले . अजूनही तो चष्मा सावरत हरवल्यासारखा वोवरतोय . आणि
सोबर्सने तर सोपा कॅच सोडला . पण होते ते बऱ्यासाठीच ) चौऱ्याण्णववर कॅच
सुटल्याचे बघताच त्याने टाकलेला सुस्कारा . बोलर नॉरिगाच्या चडफडीत आणि
प्रेक्षकांच्या कोलाहलात विरून जातो . मग प्रतिक्षा . काही काळ . त्याचा स्कोअर
अठ्यठ्ठाण्णव असताना पाऊस जोरात सुरु होतो . अगदी प्लेअर्सना खेळ सोडून आत
यावे लागते . पाऊस पडत राहतो . लवकरच पुऱ्या होणार असलेल्या पहिल्या
शतकासाठी मैदान शुचिर्भूत करावे या हेतूने !

त्याला मात्र त्याच्या पहिल्याच सेंचुरीचे टेन्शन म्हणावे तस जाणवत नाही . आणि मग
पाऊस थांबल्यावर ते खेळायला प्रेक्षकातून बाहेर पडतात . प्रेक्षकातली शाळकरी पोरेपोरी
आणि म्हातारे - म्हाताऱ्या जवळ येऊन ओरडून त्याला भरभरून बेस्ट विशेस देतात .
इतक्या की त्याला त्या पुढल्या तीस सेंचुरीसाठी पुऱ्या पडाव्यात !

आणि मग प्रतिक्षा संपते . तो सेंचुरी पुरी करतो . पहिली वहिली . कानठळ्या
बसवणारी आरडाओरड टाळ्या , फटाके , वाद्यांचे संमिश्र आवाज . काही क्षण त्याल
निश्चित काय झाले हे लक्षात आले असे होऊन बधिर झाल्यासारखे वाटते . मग एकदम
घरची आठवण येते . काँमेंटरी ऐकताना आई - बाबांचे चेहरे डोळ्यासमोर येतात . त्यांना
होणाऱ्या आनंदाच्या जाणीवेने छाती भरून येते . लोक उभे राहून टाळ्या पिटतच आहेत .
सुहास्य मुद्रेने . त्याच्या बालिश चेहऱ्यावरही हसू फुटते . सगळे भारतीय खेळाडू बाहेर
येऊन बाउंडरी लाईनवरून कौतुक करत आहेत आताशा ते या मुलाला अधिक
सिरियसली घेऊ लागली आहेत . हे प्रकरण काही वेगळेच असल्याची त्यांना हळूहळू
प्रचिती येत आहे .

इथून सुरुवात होतेय . आज इथे पुढल्या सनसनाटी क्रिकेट नाटकांची नांदी झाली
आहे . पुढे घडणाऱ्या क्रिकेट इतिहासाचा पहिला धडा आज लिहिला गेला .

आणि मग त्याने मागे पाहिलेच नाही . पुढच्याच टेस्टमध्ये आणखी एक सेंचुरी
ठोकली आणि लगेच शेवटच्या टेस्टमध्ये तर दाढदुखीच्या असह्य वेदना होत असताना

पान नं . - 7

पहिल्या इंनिगला सेंचुरी आणि दुसऱ्या अंनिगला डबल सेंचुरी हाणली !

तिथून तो भारतात आला . पार बदलून . जातानाचा तो आणि दौऱ्यावरून
आल्यावरचा तो यात खूपच फरक पडला होता . आयुष्य सारे बदलून गेले . तो एकदम
आम पब्लिकचा , जनसमुदायाचा झाला . त्याच्या चाहत्यांची संख्या एकसारखी वाढतच
राहिली . तो या आकस्मिक प्रसिद्धीच्या झातामुळे चक्रावला नाही . काही काळ सुखावला .
पण मग त्यातही स्थिरावला . या उंचावरल्या स्थानाचीही सवय झाली . प्रचंड
लोकप्रियतेपुढे खाजगी आयुष्यावर होणाऱ्या आक्रमणाचाही मग सराव झाला . या
क्रिकेटच्या लोकप्रियतेचे साईड इफेक्टस् ही अंगाला चिकटले . त्यात जाहिरातपटात
काम , मॉडेलिंग , सिनेमातली हिरोगिरी , ग्रंथलेखन , क्रिकेट समालोचन आणि चीफ
गेस्ट ही पदवी हे सगळे आले . त्यांच्या अंगातले नेतेपदाचे गुण , त्याचा मिस्किल स्वभाव 0
त्याचा अभिनय , लेखनातील यश , सभाधीटपणा हे सगळे , त्याच्यातल्या क्रिकेटर मुळे
मान्याता पावले .

करिअरमध्ये चढउतार झाले . वाद , काँट्रोव्हर्सिज , मतभेद उत्पन्न झाले . खेळाडूंच्या
हक्कांसाठी झगडे केले . आणि वेळप्रसंगी बंडखोरीही झाली . पब्लिकच्या प्रेमाची आणि
टीकेची भरती - ओहोटी त्याने अनुभवली . काही हितशत्रू आणि कायमचे टीकाकार सतत
सुतार पक्ष्यासारखे टोचतच राहिले .

पान नं . - 8

एक तप होऊन गेले . आता या साऱ्याकडे पाहाताना विस्मयवाटतो . या तपातल्या
विविध अनुभवांबद्दल , विलक्षण स्थित्यंतराबद्दल . या साऱ्या अनुभवांनी बरेच काही
शिकवले . शहाण केले . लोकांचे सामुदायिक प्रेम आणि नाराजी याकडे आता तो
अलिप्तपणे पाहू शकतो . त्याच्या एकेका विक्रमामुळे लोकांच्या आनदांला उधाण येते तरी
तो हुरळून जात नाही आणि त्याचे टीकाकार अगदी कर्तव्य असल्यासारखे दोषदिग्दर्शन
करतात . कंडया पिकवतात . पण तो बिथरत नाही .

आजही स्टेडिअम गच्च भरलेले आहे . तो बॅटिंगसाठी उभा आहे . मध्यभागी . बोलरने
स्टार्ट घेतला आहे . फील्डर्स वाकून तयार आहेत . लाखो लोक टी . व्ही . वर त्याला
बघताहेत . कॉमेंट्री कानाला लावून उत्सुकतेने ऐकताहेत . कॉमेंटेटरर्स त्याच्या रेकॉर्डस््ची
उजळणी करतायत . रिपोर्टर्स आणि समिक्षक पेने आणि टाईपरायटर्स घेऊन बसलेत . तो
तिथे मध्यावर उभा आहे . एकटा . सर्वाच्या त्याच्या विषयीची अपेक्षांचे ओझे स्वत : ला
जाणवू न देता , स्वत : च्याच कर्तबगारीचा दबदबा स्वत : ला वाटू न देता तो मन एकाग्र
करण्याच्या प्रयत्नात उभा आहे . पहिल्या सेंचुरीच्या वेळची तिक्ष्ण नजर आता तशीच
आहे का ? त्यावेळचेच रिफ्लेक्सेस आता किंचित मंदावले असावेत . पण लोकांना तो
तसाच हवा आहे . बारा वर्षांपूर्वीचा . महापराक्रमी सुपरस्टार .

लोकांचा गोंगाट वाढतो . त्या कोलाहलात मन शांत ठेवून ते उभा आहे . एकटा .
एकाकी . फास्ट बोलर पळत येऊ लागला आहे .

एका तपाची पुण्याई पाठीशी घेऊन तो निमूटपणे हल्ल्याला सामोरा जातो . . . . .
पहिल्या शकुनाच्या शतकाला साक्षी ठेवून खेळाच्या स्वाधीन होतो .

पान नं . - : 15 शब्द - 832

+

आपल्या टेस्ट क्रिकेटर्सपैकी एकजण एवढया लोकप्रियतेच्या , शो बिझनेसच्या आणि
अर्थात क्रिकेटच्या व्यापातून वेळ काढून नियमितपणे रोजनिशी लिहितो हे एरवी
खरे वाटले नसते . पण तो लिहितो . कुणाकडूनही पैसे न घेता स्वत : साठीच तो लिहितो .

पण क्रिकेटच्या आयुष्यात सध्या काही खाजगी राहात नाही . त्यामुळे तो डायरी
लिहितो हे कळल्याबरोबर साहजिक एका उत्साही प्रकाशकाने त्याला गळाला लावले
आणि मग मूळ इंग्रजीतल्या त्या रोजनिशीची भारतातील सर्व भाषांत भाषांतरे झाली .
प्रत्येक भाषेतील दर वेगळे आहेत मराठी भाषांतराच्या पुस्तकाचा दर शब्दामागे
क्रिकेटरला आठ रुपये . तामिळचा शब्दाला सहा रुपये , बंगाली आवृत्तीचे शब्दामागे तीन
रुपये तर पंजाबीत ( वितरणव्यवस्था जालंदरला असल्यामुळे ) शब्दामागे फक्त बारा पैसे
असा भाव पडला .

मराठी भाषांतर मला वाचायला मिळाले . त्यातले एक पान खाली देत आहे . टेस्ट
क्रिकेटरच्या आयुष्यातला ( टेस्ट मॅच नसताना ) दिवस कसा असतो याची यावरून
साधारण कल्पना येईल . पुढे कधीतरी आणखी काही पाने देण्याचा बेत आहे .

: 3 ऑक्टोबर : 983

सकाळी ब्रिजमोहनजींचा फोन आला . कानपूर टेस्टला सोळाजणांची नावे जाहीर
केली आहेत . त्यात तू आहेस . चला सुटलो ! सोळा तर सोळा . आणखी सहाजणांची
नावे संध्याकाळी अनाउन्स होणार आहेत म्हण . म्हणजे एकूण बावीसजणांतून मॅचच्या
दिवशी अकरा लोक निवडणार . हे हल्ली काय चालले आहे ? प्रुडेन्शिअल कप
जिंकल्यापासून इंग्लंडला गेलेले चवदाही पुण्यवान खेळाडू प्रत्येक टेस्ट साठी आपोआप
निवडले जातात . सुनील वाल्सन तर तिथे एकही मॅच न खेळता प्रुडेन्शियल कपला हात
लावून फोटो काढून घेतल्यामुळे प्रत्येक टेस्टला सामान घेऊन हजर रहातो . उरलेल्या

पान नं . - : 16

खेळाडूंमध्ये वेंकट किंवा आठ महिने टेस्ट न खेळलेला दोशी यांच्यासारखे जुने ,
नाहीतल रघूराम भट्टसारखे अगदी नवे घेतात . निश्चित पॉलिसी काही कळत नाही . बेदी
त्याच्या बोलिंगसारखे वैचित्र्य सिलेक्शनमध्येही दाखवतो . यावेळी बावीसजणांत लाला
अमरनाथना घेण्याची शक्यता आहे . कारण हजोरो लोकांनी लालाजींना हवे तर टेस्ट
टीममध्ये घ्या . पण एक्स्पर्ट कॉमेंटेटर नको . असे कळवले आहे . वीसएक वर्षांपूर्वीची
विझी ची कॉमेंटेरी बरी म्हणण्याची पाळी आली आहे असे बोलले जाते . ( गेल्या वर्षी
पाकिस्तानात आपण सणकून मार खाल्ला तेव्हा लालाजी कॉमेंटेटर बॉक्समध्ये घुसले
होते . त्यांना खास आमंत्रण होते . काहींच्या मते पाकिस्तान्यांचा हा डावपेच होता . क्रिकेट
फील्डवर नव्हे तर कॉमेंटरीमध्येही काही सरस आहोत हे लालाजींना पुन : पुन्हा
बोलायला लावून त्यांना सिद्ध करायचे होते . )

ब्रिजमोहनजींचा फोन ठेवला आणि लगेच ' फॅन्स ' चे फोन सुरू झाले . बहुसंख्ये
मुलीच . फोनवर सिनेमातले डायलॉग मारतात . मी फोन घेतला की ' एक दूजे के लिये ' ची
गाणी म्हणतात . हैराण झालो . कॉलेजमध्ये ऑडमिशन घेतली तेव्हा इतक्या पोरीवर
इंप्रेशन मारायला प्रयत्न केला पण कोणी ढुंकून पाहत नव्हते . आता टेस्ट क्रिकेटर
झाल्यावर आबादी आबाद आहे .

आंघोळ केल्यावर प्रोटो हेअर क्रीम लावले . पण केस अजिबात बसत नाहीत . पूर्वीची
क्वालिटी राहिली नाही . यांच्यात जाहिरातीसाठी मला वापरले . ( आय लाइक प्रोटो - द
नॅचरल हेअर ऑफ अ क्रिकेटर ) वीस हजार आणि क्रीमच्या सहा डझन
बाटल्या मिळाल्या . त्या अजून संपत नाहीत म्हणून वापरतो . केस लगेच सुकतात आणि
पिंजारतात . कोणी पटकन् फोटो काढला तर किती वाईट दिसेल . शिवाय वेस्ट इंडिज
फास्ट बोलर्स समोर आले की एकदम उभे राहतील . त्यापेक्षा कायम कॅप घालावी किंवा
किरमाणीप्रमाणे तासून / घ्यावे किरी म्हणतो उन्हाळ्यात त्रास होत नाही . शिवाय मी चमन
केला तर कदाचित ती फॅशन होईल . मुलींना गोटा आवडू लागेल . हल्ली क्रिकेटर म्हणेल
ती पूर्व आणि करील ती स्टाईल असे झाले आहे . !

अकरा वाजता क्लब ग्राउंडवर हिंदळेकर करंडक मर्यादित षटकांच्या सामन्यात
खेळलो . सामना तसा महत्वाचा नव्हता . पण आमच्या पाच सिलेक्टर्स पैकी दोघेजण
साईट सीइंगसाठी इथे आल्याचे कळले म्हणून अटॅकिंग स्ट्रोक्स मारायला गेलो तल स्टंप
झालो . जरा वेळ मुद्दाम उभा राहिलो . पेपरवाल्यांना तेवढाच ' डाऊटफुल डिसीजन '
वाटेल . टेस्टमध्येसुद्धा लवकर कॅच उडाला तर असे करावे . लोक अंपायरच्या निर्णयाची
चर्चा करतात . आपल्या लवकर आऊट होण्यावर तेवढीच मलमपट्टी ! पुष्कांची ही
ट्रिक आहे . पण निर्णयाबद्दल नापसंती दाखवायची पद्धत वेगवेगळी असते . काहीजण

पान नं . : 17

अंपायरकडे खुनशी नजरेनं बघत राहतात . काहीजण बॅट आपटतात . मी मात्र हँडग्लोव्हज
झटक्यात काढून तडातड कपाळावर हात मारून घेतो . थोडा तरी परिणाम होतो .

संध्याकाळी लायन्स क्लबमध्ये साठ वर्षांवरील बायकांची केशभूषा स्पर्धा होती तिथे
चीफ गेस्ट म्हणून गेलो . गव्हर्नरही आले होते . पण फोटो वेगवेगळ्या अँगल्सनी माझेच
जास्त काढले . गव्हर्नरीणबाई क्रिकेट फॅन आहेत . त्यांना राऊंड द विकेट आणि ओव्हर द
विकेट मधला फरक दीड तास समजावून दिला .

सात वाजता सीताराम पापड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या नवीन युनिटचे उद््घाटन केले .
' सीताराम पापड ला जवाब है ' असे एक स्लोगन मी म्हटले . टाळ्यांचा कडकडाट
झाला . मॅनेजिंग डायरेक्टरने लगेच चेक फाडला . रात्री घरी पाचशे पापडांचे पार्सल आले .

आज मम्मीचा डायमंड लेडिज क्लबमध्ये सत्कार झाला . मग भाषण झाले .
विषय - माझा मुलगा आणि मी .
पिंटूने ' जंटलमेन ' मॅगझिनसाठी लेख लिहिला आहे . नाव - ' माझा दादा . ' राजू
म्हणतो त्यालाही इथल्या संडे एडिशनसाठी विचारले आहे . विषय - ' माझा क्रिकेटर
मामा . '

रात्री आडेआठला ' स्पोर्टस गॉसिप्स ' मॅगझिनसाठी मुलाखत झाली . त्यांना माझा एक
उघडा फोटो ' ब्लो अप् ' द्यायचा होता . मी शर्ट काढून बसलो सुद्धा . पण आरसात पाहिले

पान नं . - : 18

तर पोट सुटलेले दिसले . हल्ली व्यायाम करायला वेळ मिळत नाही . सत्कार समारंभ
आणि मेजवान्या चालूच आहेत . वजन वाढत आहे . बॉलमागे धावताना नाही
म्हटले तरी त्रास होतो . टी शर्ट घालून फोटो काढून घेतला . मुलाखत घेणारा स्मार्ट होता
एवढया कमाईमुळे मला इन्कमटॅक्सचा काही प्राब्लेम नाही का , विचारत होता . याला
काय करायचे आहे ? दिवस आहेत . कमावून घ्यायचे . उद्याचे कोणी सांगावे ? एकदा 0 बॅड पॅच सुरू झाला 0 झोप लागणार नाही ( ल्याच्या ल्याला ्या े ' म्हणत
) स
कमिटीतल्या कोणाची मर्जी फिरली की आटपलेच . मग ' बेनिफिट मॅच ' ची तयारी , सुरू
करावी लागेल .

परवा इथल्या हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष विचारीत होते - एका क्रिकेटरसाठी तुम्ही
बिनिफिट मॅच ठेवता तशी भारतातल्या सगळ्या हॉकी प्लेअर्ससाठी एखादी ठेवता येईल
का ?

पान नं . - : 19

उद्या कानपूरला निघायचे आहे . रात्री बॅग भरली आणि झोपलो . गार्नरची बोलिंग
खेळायला मी उभा आहे असे दिसले . गार्नर बारा फूट उंच दिसला . मला फिल्डर्सनी
घेरले होते . ग्रिनीजचा श्वास मानेला आणि रिचर्डचा उजव्या गालाला लागत होता .
गारफिल्ड सोबर्स समोर गुडघ्यावर बसून माझ्या कापणाऱ्या पायांकडे पहात होता . सगळे
प्रेक्षक खदाखदा हसत होते . लालाजी कॉमेंटरी करीत होते . ' दॅट बॉय इज शुअर टू लुज
हिज विकेट . व्हॉट अ स्टुपिड स्टान्स ! ' मग डिव्हिट्रीने फर्माइश केली म्हणून लालाजी
' मुझको यारों माफ करना , मै नशेमे हूँ ' म्हणू लागले . सगळ्या प्रेक्षकांनी ताल धरला .
तेवढयात गार्नरने बॉल टाकला . मला अजिबात दिसला नाही . जबडयावर जोरात
आदळला आणि तीन दात बाहेर उडाले . ते अनुक्रमे विकेट कीपर फर्स्ट स्लिप आणि
सेकंड स्लिपने झेलले आणि जोराने अपील केले . अंपायर स्वरूप किशनचे लठ्ठ बोट
आभाळाकडे गेले . मी दचकून जागा झालो . दरदरून घाम सुटला होता . उठलो . उद्या
न्यायची लकी बॅट , बॅगेतील लकी मोजे , लकी बनियन ( भोके पडलेला ) तसेच
गळ्यातील लकी चेन आणि बोटात लकी अंगठी - सगळे जागच्या जागी असल्याची
खात्री केली आणि पाणी पिऊन पुन्हा झोपलो .
शोमीर भट्टाचार्याची मुलाखत

पान नं . - 25 शब्द - 986
+
परवाच अचानक कपिलदेववर संत्रं मारणारा भेटला केवळ योगायोगानं . फिल्मोत्सव
84 च्या पहिल्या दिवशी दाखविल्या गेलेल्या ' खंडहर ' या मृणालसेनच्या
चित्रपटाला आला होता . कोणाशी तरी मोठमोठयाने बंगालीत बोलून बंगाली
वातावरणनिर्मिती करत होता . बिटु कूबलने आमची ओळख करून दिली . बिट्टू कूबल
आपला दोस्त आहे . मुंबईत होणाऱ्या प्रत्येक टेस्टला काहीतरी निमीत्त काढून तो आठ
आणेवाला हार घेऊन धावत सुटतो आणि पन्नास हजार प्रेक्षकांसमोर पोलिसांशी
पकडापकडी खेळतो . पोलिसांनी मारल्यामुळे झालेल्या जखमा किंवा आलेली सूज तो
संध्याकाळी सर्वांना अभिमानाने दाखवत फिरतो . ' मॅन ऑप द मॅच ' ऑवॉर्ड दाखवावे
तसे . दरवेळी मैदानात उडी मारायला काही तरी कारण मिळतेच . कारण प्रत्येक टेस्टला
कसले ना कसले रेकॉर्डस् होतच असतात . कोणाची सेंचुरी झाली तर प्रश्नच नाही . बिट्टू
एका हातात पेटत्या फटाक्याची माळ आणि दुसऱ्या हातात फुलांचा हार घेऊन धावतो .
पण एकदा मॅचमध्ये काहीच झाले नाही . सेंचुरी नाही की कसला रेकॉर्ड नाही . संथ ,
कंटाळवाणा खेळ . आता हार कुणाला घालायचा ? तर बेदी पोट बिघडल्यामुळे
पॅव्हिलियनमध्ये गेला होता तो तासाभरात पुन्हा फिल्डिंगसाठी आल्याबरोबर बिट्टूने
धावत जाऊन त्याला हार घातला होता . असे त्याचे वेड . टी . व्ही वर मॅच बघून चर्चा काय
सगळेच करतात , पण बिट्टू प्रत्यक्ष कृती करणाऱ्या पंथाचा आहे . तर त्या पंथाचीच
माहिती मला त्या दिवशी मिळाली .

बिट्टूने मोठया अभिमानाने ओळख करून दिली . ' मीट मिस्टर शोभीर भट्टाचार्य .
कपिलवर संत्रं मारून त्याला हादरवणारे ते हेच . एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत .
( तवढयात दोन बंगाली मुलींनी त्याला ओळखले आणि ' आमाके तोमार ऑटोग्राफ
दिते पारबेन ' असे काहीसे म्हणत डायऱ्या घेऊन आल्या ) त्याच्या मुलाखती बंगाली

पान नं . - 26

पेपरात प्रसिद्ध होत आहेत .

' फार छान ! ' एवढया प्रसिद्ध व्यक्तीशी ओळख झाल्याचा आनंद झाला मला .
' संत्रं ' फेकून त्या दिवशी शोमीर भट्टाचार्य रेल्वेने घरी गेला तेव्हा भगिरगंज स्टेशनवर
तो उतरताच त्याचे प्रचंड स्वागत करण्यात आले . भारतीय क्रिकेटच्या सध्याच्या
घसरगुंडीवर प्रतिनिधिक प्रतिक्रिया संत्रं फेकून जाहीरपणे व्यक्त करणारा म्हणून त्याचा
कलकत्त्यात सत्कार होत आहे . एका ऑरेंज सिरप कंपनीने तर त्याला
जाहिरातपटासाठीही ऑफर दिले आहे म्हणे ! ' आय लाइक फ्रेश ऑरेंजेस ' म्हणणारा
रागीट चेहऱ्याचा भट्टाचार्य . त्याच्या एका हातात रससशीत संत्रे आणि दुसऱ्या हातात
संत्र्याच्या रसाची बाटली . नाव ' कपिल ऑरेंज सिरप ' )

' चांगली जाहिरात होईल . सध्या क्रिकेटर्स लोकांच्या मनातून उतरल्यामूळे ( एक
सुनील सोडून . तिसावी सेंचुरी नुकतीच केल्यामुळे त्याला सध्या दिवस बरे आहेत - पुन्हा
लवकर आऊट होईपर्यंत ) तातडीने दुसरा कोणीतरी हिरो लोकांना हवा होता . डोक्यावर
संत्रं मारणारा शोमिर भट्टाचार्य आयता हातात सापडला . चला बरं झालं .

' खरं आहे . खेळाडूंना सतावण्याचा त्याचा कित्येक वर्षांचा सराव आहे . बिट्टू
म्हणाला , ' असणारच . सरावाशिवाय अशी अचूक संत्रफेक होणारच नाही . मृणाल
सेनला चित्रपट पाहायला हा मुद्दाम कलकत्त्याहून आला ? ' मी आश्चर्याने विचारले .

' छे छे ! त्यासाठी मी नाही आलो . ' शोमीर भट्टाचार्य तोंडून अस्खलित मराठी
ऐकून मी चकीत झालो . मग कळाले . काही वर्षांपूर्वी बंगाल - महाराष्ट्र या राज्यांतील
सांस्कृतिक देवाण - घेवाण कार्यक्रमानुसार पु . लं . ना बंगाली शिकवले गेले आणि त्याबदल्यात 0 बंगाल सरकारने एकसष्ट कॉलेज 0 मराठी शिकायला पाठवून
पु . ल . ची शिकवणी वसूल केली होती . त्यात हा शोमिर होता .

' खास काही काम होते , मुंबईत ? '
' आमच्या संघटनेची मीटिंग आहे . ' शोमिर गंभीरपणे म्हणाला
' संघटना ? कसली संघटना ? ' मी संशयाने विचारले .
' के . एस् . के . एस . '
' के . एस् . के . एस् . म्हणजे काय ? '
' क्रिकेट शौकीन कृती संघ . प्रत्येक राज्यात आमचे सभासद आहेत . '
' क्रिकेटर्सवर काय फेकायचे ते तुम्ही ठरवता ? '
' अर्थातच . क्रिकेटर्सचा निषेध आणि क्रिकेटर्सचे लाड करण्यात आमचा पुढाकार
असतो . वाडेकरची टीम इंग्लंडमध्ये जिंकून आली तेव्हा आमच्या सभासदांनी त्यांच्या
खिशात नोटा कोंबल्या होत्या आणि परवा प्रुडेन्शियल कप जिकून आल्यावर

पान नं . - 27

टीममेंबर्सना पार्ट्या देऊन खा - खा खाऊ घालणारे सगळे यजमान आमचेच सन्माननीय
सभासद होत . त्या क्रिकेटर्सना वर्षभर फुकट बियर देण्याची सनसनाटी घोषणा करणाऱ्या
कंपनीचे मालक आमच्या ऑडव्हायसरी बोर्डावर आहेत . '

' आणि वर्षभर फुकट हेअरकट आणि दाढी करून देऊ म्हणणारे दिल्लीतल्या
एअरकंडिशंड सलूनचे चालक ? '

' वा ! ते तर दिल्ली युनिटस््चे सरचिटणीस . आणि विमानतळावर कपिलदेवला
खांद्यावर बसवून नाचल्यामुळे डावा खांदा फ्रॅक्चर झालेले ब्रिजमोहन हे आमच्या हरयाणा
के . एस् . के . एस् . चे खजिनदार आहेत ! '

' तुम्ही क्रिकेटर्सवर संत्री का मारता ? '
' हा संत्र्याचा सीझन आहे . सीताफळांच्या सीझनमध्ये सीताफळंही मारतो . पण
सीताफळ खूप पिकलेले असले आणि ते वेस्टइंडिजच्या गोम्ससारख्या खेळाडूवर फेकले
तर सीताफळ फुटून त्याच्या केशसंभारात बिया अडकतील आणि शेवटची बी निघेपर्यंत
दौरा संपत येईल . म्हणून फळ निवडताना काळजी घ्यावी लागते . '
' बरोबर . पण खेळाडूंच्या भावना दुखावतील याबद्दल तुम्ही - '
' आणि आम्हाला भावना नाहीत ? प्रेक्षकांवर अन्याय होत नाही ? आमरा सज्ज
कोरबेना ! ' संतापाच्या भरात शोमिर भट्टाचार्य मुठी आवळून बंगाली बोलला . बिट्टूने
त्याला शांत केले .

कसला अन्याय ? '
' इतका खर्च करून आम्ही सीझन तिकीट काढतो . साडेतीन दिवसात मॅच संपणे
म्हणजे आमची फसवणूक नाही काय ? भरमसाठ तिकिटांचे दर लावून आम्हाला खेळ
बघायला बोलावता . मग आमच्या अपेक्षा असणार नाहीत काय ? ( मला
मराठी पेपरातला अग्रलेख मोठयाने वाचतोय असे वाटले ) कूर्मगतीने खेळून दिवसाला
जेव्हा जेमतेम दोनशे रन्स करता किंवा अत्यंत निष्काळजीपणाने खेळल्यामुळे लवकर
आऊट होऊन मन रमवायला शहरात फिरता तेव्हा पन्नास हजार प्रेक्षकांचेही काही देणं
लागतो . हा विचार डोक्यात येतच नाही काय ? ' ( पुन्हा काय ? ) शेवटच्या वाक्याने
शोमिरला दम लागला . तो काही वेळ खोकत राहिला .

' अगदी योग्य आहे . तुमचं म्हणणं . प्रत्येक क्रिकेटरने प्रेक्षकांकडे लक्ष देऊनच
खेळलं पाहिजे . वुई वाँट सिक्सर , म्हटल्यावर लगेच सिक्सर मारली पाहिजे .
एल . बी . डब्लू . चं अपील प्रेक्षकांतून केलं तरी अंपायरनं आऊट दिलं पाहिजे . बरं
आपल्या कृती संघटनेचं प्रशिक्षण शिबिर वगैरे असतं का ?

' हो तर , परवा मद्रास टेस्टला डेव्हीसच्या अंगावर वस्तू फेकणारा आमच्या

*
﻿
कांचन घाणेकर
03-07-25
Marathi
Page nos. : 17
From : 1 To : 17
+
पान नं. - 1

1

उबदार डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता. साल 1962. मी त्या वेळी
एस्.एस्. सी ला होते. शाळेला मुकतीच नाताळाची सुट्टी सुरू झाली होती.
25 डिसेंबरचा दिवस होता. सकाळीच चारूकाका (श्री. चारूदत्त सरपोतदार -
पुना गेस्ट हाऊसचे चालक) पुण्याहून आले होते. एखाद्याला एकदा आपले
मानले की, सख्ख्
या नात्यानेही लाजावे असे प्रेम करणारा हा माणूस. आत्ताशी
(अभिनेत्री सुलोचना-माझी आई ) त्यांचे भावाचे नाते इतके द्दढ झाले की,
तितके ते त्यांच्या सख्ख्या बहिणीशीही नसेल.

चारूकाकांच्या जवळ 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकाचे निमंत्रण
होते. सौ. सुधा करमरकर यांनी त्यांना निमंत्रित केले होते. चारुकाकांनी मला
नाटकाला येणार का असे विचारले. खरं तर गेले दोन महिने मी या नाटकाची
जाहिरात वर्तमानपत्रातून पाहात होते. या नाटकाचे नाव वाचून मला त्याबद्दल
खूपच कुतूहल वाटायचे. त्या नावाचे गर्भितार्थ लक्षातच यायचा नाही. कारण
नाटकाला जाण्याचे फारचे वळण नव्हते. त्याचे मुख्य कारण म्हणजे माझी
आजी. आम्ही घरातील सर्व सर्व मुले नाटक-सिनेमाला जायची तर माझ्या आजी-
बरोबर नेहमी जायची. पण तिला तर संगीत नाटकांचे वेड होते, आणि त्यातूनही
नाटक पाहायचे तर ते बालगंधर्वांचे असे ती म्हणायची. गद्य नाटकांचा तिला
कमालीचा तिटकारा होता.

त्यातूनही त्या वेळी माझे लाडके नाटक होते 'लग्नाची बेडी.' दादा (राजा

पान नं. - 2

परांजपे) त्या नाटकात गोकर्णाची भूमिका करायचे. त्यामुळे ते एकच नाटक
मी खूप वेळा पाहिले होते. त्याशिवाय लहान मुलांनी पाहावे असे आदर्श नाटक
म्हणून 'दुरितांचे तिमिर जावो 'हे नाटक आम्हाला दाखविले होते. एस्. एस्.
ली. चे वर्ष असल्यामुळे नाटक-सिनेमाचा त्या वर्षी विचारच करता येत नव्हता.
पण नुकत्याच झालेल्या फॉर्म परीक्षेमुळे अभ्यासाची खूपशी तयारी झालेली होती.
मुख्य म्हणजे मीही तोच तोच अभ्यास करून कंटाळलेली होते. काहीतरी
वेगळा विषय म्हणून मी चारुकाकांच्या बरोबर भारतीय विद्याभवन येथे दुपारी
तीन वाजता 'रायगड' बघायला गेले. माझी आई बरोबर आलेली होती.

भारतीय विद्याभवन येथील ते चार तास अलीबाबाच्या गुहेत शिरल्यासारखे
वाटले. नाटक असंही असू शकते याची प्रथम जाणीव झाली. माझा जन्म
कोल्हापूरला झाला. येथील सरंजामशाहीच्या अवशेषामध्ये माझी सुरुवातीची दहा
वर्षे गेल्यामुळे ऐतिहासिक वातावरणाची मला आवड होतीच. लेखन, अभिनय,
नेपथ्थ, पार्श्वगीत, प्रकाशयोजना आणि दिगदर्दशन या सर्वच बाजूंनी श्रीमंती
जाणवत होती. तीनही अंक बांधून ठेवल्यासारखे झाले होत्. मध्यंतरामध्येही त्या
नाटकाचा कैफ उतरत नव्हता. अर्थात सगळ्याच आकर्षित केलं होते त्या
नाटकातील संभाजीच्या भूमिकेतील महान नटाने. त्या कलाकाराचे नावही मला माहिती
नव्हते. पण त्या कलावंताला प्रत्यक्ष पाहावे असे मात्र नाटत होते.

नाटत संपल्यावर सुधाताईंना भेटण्यासाठी आम्ही तिथे संगपटात गेलो.
त्या वेळी मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत सुलोचना या नावाचा प्रचंड दबदबा
होता. त्यामुळे ती रंगपटात जाताच सारे तिच्याभोवती जमले. सुधाताईंचा व
माझ्या आईचा तसा थोडा फार परिचय होता. सुधाताईंनी एकेकाशी माझ्या
आईचा परिचय करून द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये अर्थातच पहिली व्यक्ती
होती. मा. दत्तारामबापू. माझी आई त्यांच्या समोर आपसूकच झुकली.
माझी नजर मात्र संभाजीला शोधण्यासाठी भिरभिरत होती.

उंचापुरा, भेदक डोळ्यांचा, देखणा, भरदार संभाजी कुठेच दिसत नव्हता.
आणि एवढयात सुधाताईंचा आवाज आला, "संभाजीचे काम केलेले डॉ.
काशिनाथ घाणेकर." मी दचकलेच. कारण तंग सुरवार, त्याच्यावर बाह्या
असलेला गंजीफ्रॉक घातलेला, प्रकृतीने किरकोळ वाटणारा एक तरुण जिरेटोप
छातीशी कवटाळून केव्हाचा माझ्या समोर उभा होता. सुलोचनाबाईंशी कधी

पान नं. - 3

ओळख होते याची वाट पाहात तो तरुण अधीरपणे उभा होता, आणि सुधाताई
त्या तरुणाची ओळख संभाजीची भूमिका करणारा म्हणून देत होत्या.
डॉ. काशिनाथ घाणेकर भारावल्यासारखे माझ्या आईसमोर नमस्कारासाठी वाकले.
"छान झालं हं तुमचं काम " असं कौतुकाने म्हणत माझ्या आईने घाणेकरांना
दोन्ही खांद्याला धरून उठवलं.

त्या रंगपटातील संभाजीला बघून माझी थोडीशी निराशाच झाली. मेकअप
पॅडिंगच्या साहाय्याने किरकोळ वाटणाऱ्या घाणेकरांना नखशिखान्त बदलून टाकले
होते. पण त्यांचा अस्सल अभिनय, गाभाऱ्यात घुमावा तला घुमारदार आवाज
आणि भेदक पाणीदार डोळे मात्र त्याचे स्वत:चे होते. त्या सर्वांनी घाणेकरांच्या
इतर उणिवांवर मात केली होती.

कौतुक समारंभ आटपून आम्ही घरी परत आलो. पण 'रायगडाच्या'
धुंदीतून बाहेर यायला पुढे काही दिवस जावे लागले. आत्तीला (माझी आई)
तर 'रायगड' नाटकाची तारीफ करायला शब्द पुरत नव्हते. भेटेल त्याला ती
'रायगडाला जेव्हा जाग येते' हे नाटक पाहण्याचा आग्रह करीत होती. मी
मात्र 'डॉ. काशिनाथ घाणेकर' या नऊ मंत्राक्षरांनी मंतरले गेले होते. या
आकर्षणाचे मला स्वरूप सापडत नव्हते. भाऊ, काका, मामा, या नात्याचे
लेबल मात्र त्याला नक्कीच नव्हते. मात्र खोलवर कुठेतरी बीज रुजले होते.
माझ्या नकळत ते वाढत होते.

2

नव्या वर्षात शाळा उघडल्या आणि मी पुन्हा अभ्यासात गुरफटून गेले.
16 ते 18 तास मी अभ्यास करायची. मी खूप हुशार नव्हते. पण मेहनती
मात्र होते. मुख्य म्हणजे घेतलेले काम शेवटाला नेण्याची जिद्द, ध्यास असायचा.
शिवाय मी मला न आवडणारा आणि न पेलणारा उच्च गणित हा विषय घेतला
होता. त्यामुळे तर अभ्यास एवढेच ध्येय समोर होते. इतर सर्व
विषयांना फाटा दिला होता.

त्याच सुमारास देशातही एक नवी खळबळ माजली होती. चीन देशाने

पान नं. - 4

केलेला विश्वासघात, पराभवाचे दु:ख आणि पुन्हा प्रतिकाराला सिद्ध होण्यासाठी
चाललेली धडपड असे एक मंथन सर्व देशभर सुरू होते. सगळा देश त्यामध्ये
ढवळून निघत होता. हिमालयाने सह्याद्रीला घातलेली साद म्हणून यशवंतराव
चव्हाण संरक्षणमंत्री या पदावर दिल्लीला रवाना झाले. सरंक्षणनिधीसाठी साऱ्या
देशातून मदतीचा ओघ वाहायला लागला.

यशवंतराव चव्हाण संरक्षणमत्री झालेले पाहून मराठी माणसाचा ऊर अभि ~
मानाने भरून आला. त्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीही मागे नव्हती. कधी नव्हे
ती हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत मराठी मंडळी एकत्र आली आणि
मनोरंजनाचे कार्यक्रम करून संरक्षणनिधीला मदत करण्याचे ठरले. नृत्य,
नाटयप्रवेश, नकला यासाठी त्या वेळच्या लोकप्रिय चित्रपट-नाटय कलावंतांनी
हजेरी लावली . तर सी रामचंद्र, वसंत देसाई, सुधीर फडके, वसंत पवार,
राम कदम, ही मातब्बर मंडळी आपल्या अजोड कलाकृती घेऊन उभी ठाकली.
पहिला कार्यक्रम ठरला खामगाव येथे. या कार्यक्रमाचा खरा हिरो ठरला चार ~
साडेचार वर्षांचा सचिन. लावणी नृत्यावर व्हावी तशी त्याच्या नृत्यावर दौलत
जादा झाली म्हणे. खुल्या जागेत अफाट जनसमुदायासमोर न घाबरता ताला~
सुरात बेफाम नाचणारा सचिन मॅन ऑफ दि मॅच ठरला. हा कार्यक्रम खूपच
यशस्वी ठरल्यामुळे सर्व मंडळींचा उत्साह दुणावला आणि मग पुढचे कार्यक्रम
नाशिक, औरंगाबाद येथे ठरले.

एस्. एस््. सी. च्या परीक्षेमुळे मी खामगावला जाऊ शकले नाही. पण
खामगावच्या कार्यक्रमाचे वर्णन ऐकल्यामुळे नाशिकच्या कार्यक्रमाला आत्तीबरोबर
जाण्याचे नक्की केले होते. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी गणिताचा पेपर टाकला
आणि घरी येऊन पहिले काम कोणते केले असेल तर रणजित देसाई यांची
'स्वामी' कादंबरी वाचायसा घेतली. त्यामध्ये इतकी रंगले की 25 मार्च रोजी
नाशिकच्या कलावंत रजनीचाही विसर पडला होता.

त्या दिवशी आम्ही कार्यक्रमाच्या आधी तासभरच नाशिकला पोहोचू शकलो.
कार्यक्रमाच्या ठिकाणी तयार होण्यासाठी कलाकारांची झुंबड उडाली होती.
त्यातच दिवेही गेले होते. गोंधळामध्ये अधिकच भर पडली होती. अर्थात
आत्ती कुठल्या कार्यक्रमात भाग घेणार नव्हती. त्यामुळे आम्ही दोघी तयार
होऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. कुठल्याशा पटागंणावर तो कार्यक्रम

पान नं. - 5

होता. माणसांनी आवार नुसते फुलून गेले होते. भारतीय बैठकीची बसण्याची
व्यवस्था होती. नंतर खूप गर्दी होईल. म्हणून आत्तीने बाहेर जाऊन बसायला
सांगितले. ती कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी आतच थांबली
होती. कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होता. बसल्या ठिकाणाहूनच मी इकडे
तिकडे बघत वेळ काढीत होते.

आणि एक क्षणी माझी नजर एके ठिकाणी जाऊन अडकली. ती तिथून पुढे
सरकेचना. रंगमंचाच्या दुसऱ्या बाजूला , त्याला टेकून एक व्यक्ती उभी होती.
पांढरा सूट मला वाटतं शार्कस्क्रीनचा असावा व पांढरा शर्ट अशा वषात ती
व्यकती होती. कोट एक खांद्यावर टाकलेला होता. डाव्या पायावर उजवा पाय
आडवा टाकून कलंडल्यासारखी ती व्यक्ती स्टेजला टेकून उभी होती. स्वत:च्या
तळहाताच्या आधारावर डोके टेकले होते. स्वत:च्या विचारत हरवल्यासारखी ती
व्यक्ती उभी होती.

माझ्या ह्दयाचा ठोका क्षणभर चुकल्यासारखा झाला. कारण ती व्यक्ती दुसरी
तिसरी कुणी नसून डॉ. काशिनाथ घाणेकर होते. रायगडाच्या प्रयोगानंतर म्हणज
तब्बल तीन महिन्यांनी मी त्यांना पाहात होते. कशाने तरी त्रस्त झाल्यासारखे
कंटाळून ते उभे होते. त्यांच्याशी जाऊन बोलावं असं सारखं वाटत होतं. पण
माझी त्यांची ओळख कुठे झालेली होती ? सुधाताईंनी तर फक्त आत्तीशीच त्या
दिवशी घाणेकरांची ओळख करून दिली होती. ओळख नसतानाही जाऊन
बोलण्याचे आगाऊ धैर्य माझ्यामध्ये नव्हते. बरीचशी रिझर्व्हड असलेली मी
इच्छा होऊनही पुढे जाऊन त्यांच्याशी बोलू शकले नाही. त्यांच्याकडे एकटक
बघच राहणेही शक्य नव्हते. पण माझी नजर परत परत त्यांच्याकडेच वळत
होती. तिथेच खिळून राहात होती.

कार्यक्रम सुरू झाला आणि त्या गडबडीत माझ्या नजरेचा पहारा असूनही
डॉ. घाणेकर तिथून कुठे नाहीसे झाले ते कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी मुंबईला
जायला निघालो, तर चारूकाका (चारूदत्त सरपोतदार ) म्हणाले, "काशिनाथचा
डोळा कसा आहे कुणास ठाऊक ? काल माझी अंगठी त्याच्या डोळ्याला फार
जोरात लागली."

आत्तीने विचारले, "घाणेकर आता कुठे आहेत ? रात्री दिसले नाहीत ते ?"
"तो गजानन जहागिरदारांच्या बरोबर आला होता, पण त्याला आज

पान नं. - 6

मुंबईत रायगडचा प्रयोग होता, आणि धुमाळलाही आज शूटिंग होते. त्यामुळे
रात्रीच तो त्याच्याबरोबर मुंबईला परत गेला." चारूकाकांनी सांगितले.

मला वाटतं मुंबईला परत आलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच श्री. वसंत
जोगळेकर यांच्या ' शेवटचा मालुसरा' या मराठी चित्रपटाचा परळ येथील
कारदार स्टुडिओत मुहूर्त होता. त्यांनी मध्यंतरीच्या काळात प्रामुख्याने हिंदी
चित्रपटांचीच निर्मिती केली होती. त्यामुळे मराठी चित्रपटाचा मुहूर्त असूनही
सर्व थाट हिंदी चित्रपटाच्या मुहूर्ताचा होता. हिंदी चित्रपटसृष्ठीतील बडी मंडळी ~
ही आली होती. थोडयाच वेळात मुहूर्ताचा शॉट रमेश देव यांच्यावर पार
पडला, आणि आत्तीचे शूटिंग असल्यामुळे आम्ही घाईघाईने स्टुडिओच्या बाहेर
जायला निघालो.

समोर पाहते तर स्टुडिओच्या दारात चक्क माझे दैवत उभे होते डॉ. काशिनाथ
घाणेकर. त्या घाई गडबडीतही आत्तीचे काळडीपूर्वक घाणेकरांच्या डोळ्याची
चौकशी केली. डोळ्याच्या डॉक्टरांना दाखविले की नाही तेही विचारले. त्यांचा
डोळा चांगलाच लाल झाला होता. मात्र गंभीर इजा झालेली नव्हती. आत्तीने
त्यांच्याकडे आणखी एका गोष्टीची चौकशी केली ती म्हणजे, "लेन्सेसचे काय
झाले ?" त्यावर डॉ. घाणेकरांनी उत्तर दिले की, "ते होऊ शकत नाही."
त्यावर आत्तीने विचारले की , "बाबांना सांगितले का ?" त्यावर डॉ. घाणेकरांनी
उत्तर दिले की--"नाही जी. मी आता कोल्हापूरला जाणार आहे. त्या वेळेस
बाबांना (श्री. भालजी पेंढारकरा) हे सर्व सांगतो."

हे सर्व बोलणे कुठल्या कुठे संदर्भामध्ये याचा मला काहीच अर्थबोध
होत नव्हता. मात्र राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की हा
कोकणस्थ ब्राम्हण असणारा माणूस प्रत्येत वाक्याला उत्तर देताना 'हो जी'
'नाही जी' म्हणत होता. या खेपेसही डॉ. घाणेकरांची व माझी ओळख
झाली नाही.

गाडीतून जाताना वाटेत समजले की बाबा(भालजी पेंढारकर) आपल्या
शिवाजीवरील आगामी ऐतिहासिक चित्रपटामध्ये शिवाजीच्या भूमिकेसाठी
काशिनाथ घाणेकर यांना घेण्याचा विचार करीत होते. पण डॉ. घाणेकरांचे
निळसर डोळे शिवाजीच्या भूमिकेच्या आड येत होते. त्यावर उपाय म्हणून

पान नं. - 7

डोळ्यावर काळ्या रंगाच्या लन्सेस बसवून मिळू शकतात का ते बाबांना हवे
होते.

शिवाजीच्या जिवनावरील नाटक म्हणून बाबांनी 'रायगडाला जेव्हा जाग
येते' हे नाटक पाहिले होते. 'शककर्ता शिवाजी' हे शिवाजीचे रूप बाबांनी
ध्यानीमनी जपलेले होते. त्यामुळे रायगडामधील घरगुती वाटणारा शिवाजी
बाबांना रुचणे कितपत शक्य होते ?

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबांना संभाजी अप्रिय होता. संभाजी
व्यसनी, रंगेल होता म्हणून नव्हे तर, शिवाजी महाराजांच्या मुलाने मोगलाना
जाऊन मिळणे हा बाबांच्या द्दष्टीने संभाजीचा अक्षम अपराध होता.

हे सर्व जरी असले तरी संभाजीच्या भूमिका करणाऱ्या काशिनाथ घाणेकर
यांच्या प्रेमात मात्र बाबा पडले होते. डॉ. घाणेकर प्रयोगाच्या निमित्ताने कोल्हा ~
परूला जात होते. पण त्याचबरोबर त्यांचा पहिल चित्रपटही जयप्रभा स्टुडिओमध्ये
सुरू झाला होता. नाव होते 'पाहू रे वाट किती वाट' पुण्याच्या काही मंडळीनी
सहकारी संस्था सुरू करून त्या संस्थेतर्फे हा चित्रपट सुरू केला होता. त्याचे
दिग्दर्शक होते राजा ठाकूर. नायक-नायिका होते अरुण सरनाईक व सिमा , तर
नायिकेच्या धाकटाय भावाच्या भुमिकते होते डॉ. काशिनाथ घाणेकर आणि त्यांची
नायिका होती उमा. या चित्रपटाचा मुहूर्त बाबांच्या पत्नी सौ. लीलाबाई पेंढारकर
यांच्या हस्ते झाला होता. वरील संस्थेचे जे अनेक भागीदार होते, त्यांपैकी एक
चारूदत्त सरपोतदार होते.

त्या चित्रपटामध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांची वर्णी चारुकाकांच्यामुळे
लागली होती. त्या दोघांती आता मैत्री जुळायला सुरुवात झाली होती. पुण्या ~
मध्ये प्रयोगाच्या निमित्ताने दोघांच्या गाठीभेटीही वाढल्या होत्या. बालगंधर्व
नाटयगृह होईपर्यंत मुंबईहून पुण्याला नाटकासाठी जाणाऱ्या नाटयसंस्था चारु ~
काकांच्या पूना गेस्ट हाऊसमध्ये उतरत. नाटय-चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणूनही
पूना गेस्ट हाऊस प्रसिद्ध होते. ह्या माहेरघरी सर्वांचे आपलेपणा, प्रेमाने
मातोश्री श्रीमती सरस्वतीबाई सरपोतदार. चारूकाका आता काशिनाथ घाणेकर
यांना 'काश्या' ह्या लाडक्या नावाने संबोधायला लागले होते. घाणेकर मात्र
चारूकाकांना 'अरे चारू' च म्हणत.

पान नं. - 8

3

एप्रिमध्ये दादांनी (राजा परांजपे) दिग्दर्शित केलेल्या 'बायको माहेरी
जाते' ह्या मराठी चित्रपटाचे रिलीज होते. या चित्रपटाचे निर्माते चारूकाकांचे
धाकटे बंधू. श्री. विश्वास सरपोतदार. ह्या चित्रपटाचे प्रिमियर सेंट्रल सिनेमा
मध्ये होते.

चित्रपट सुरुवातीपासून पकड घेत होता. प्रेक्षागृह अक्षरश: उसळत होते.
थिएटर तुडूंब भरले होते. बाहेर पडणे मुश्कील झाले. इतकी गर्दी झाली होती.
बॉक्सला लागून असलेल्या जिन्यावरच आम्ही खोळंबून उभे होतो. अंधारातून
बऱ्याच वेळाने उजेडामध्ये आल्यामुळे डोळे किलकिले करून मी गर्दी न्याहळत
होते. बाल्कनीच्या दरवाजामधून बाहेर पडणाऱ्या गर्दीत क्रीम कलरच्या पँट-शर्ट
मध्ये एक व्यक्ती दिसली. तिथे प्रकाश बराच अंधूक होता. पण त्या
व्यक्तीच्या तोंडामध्ये सिगरेट होती. तिचा झुरका मारताना त्या व्यक्तीच्या तोंडावर क्षण
भरच पसरे. प्रथम मी पाहिले तेव्हा ह्दयाचा ठोकाच क्षणभर चुकल्यासारखे
वाटले. ती व्यक्ती कोण आहे याची खात्री होताच मी माझ्या मोठया मामे ~
बहिणीच्या कानाशी लागले आणि कुजबुजले-

"बेबी, काशिनाथ घाणेकर."

कुठल्याही प्रिमियरला जायचे म्हणजे आम्ही दहा-बारा जण तरी सहजच
असायचे. त्या दिवशीही होतो. माझी आजी आणि आम्ही बहिणी एका गाडीतून
प्रथम थिएटरमधून बाहेर पडलो. आडव्या रस्त्याला सोडून मुख्य रस्त्याला
लागताच लक्षात आले पुढे असलेल्या फियाटमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर आहेत.
त्यांच्या शेजारी एक स्त्री होती. त्या त्याच्या पत्नी होत्या. बॉम्बे सेंट्रलपर्यत
आमची व त्याची गाडी पुढे-मागे अशी होती. बाँम्बे सेंट्रल आले आणि डॉ.
घाणेकरांची गाडी डाव्या हाताला वळाली, आणि आम्ही सरळ रस्त्याने सायनला
निघालो. मग मात्र एखाद्याची अचनाक संगत सुटून एकाकी वाटावे तसे सुने
सुने वाटायला लागले.

आता मी काशिनाथ घाणेकर यांच्याबद्दल माहिती मिळावायला सुरुवात केली

पान नं. - 9

होती. डॉ. घाणेकर स्वत: दातांचे डॉक्टर , तर त्याची पत्नी डॉ. इरावती ह्या स्त्री
रोगतज्ज्ञ असून त्यांचा दवाखाना लालबाग येथे गणेश टॉकीजच्या लागून आहे.
घरातील सर्व कामे स्वत: करून त्या बाई प्रॅक्टिस करतात. डॉ. घाणेकरांचाही
स्वत:चा दवाखाना त्याच्या राहत्या घरी असून तेही प्रॅक्टिस करतात, आणि
आवड म्हणून नाटकातही कामं करतात. त्यांचा वरळीचा ब्लॉक प्रशस्त होता.
स्वत:ची गाडी होती. दोघांचीही प्रॅक्टिस चांगली चालली होती 'रायगडा' च्या
यशाने डॉ. घाणेकर यांचे रंगभूमिवरील यश निश्चित झाले होते. पण हे सर्व
असूनही एक फार मोठी उणील त्यांच्या ,संसारामध्ये जाणवत होती. ती म्हणजे
डॉ. घाणेकर व इरावती यांच्या लग्नाला पाच वर्षे होऊन गेली होती, पण घरात
अजून बाळराजाचे आगमन झाले नव्हते.

4

एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा असेल. एके दिवशी सकाळी एक
फोन आमच्या घरी घणघणला. मी रिसिव्हर कानाला लावून 'हॅलो' म्हटले
आणि गाभाऱ्यात घुमतो तसा आवाज कानात घुमला.

"मी काशिनाथ घाणेकर बोलतोय. दिदी आहेत का ?"

[माझ्या आईची खासगीतील दोन-तीन नावे प्रचलित आहेत. व्यावसायिक
स्नेहमंडळी बाई,दिदी या नावाने संबोधितात, तर मी जरी माझ्या आईची
एकुलती एक मुलगी असले तरी इतर मामेभावंडाप्रमाणे मीही माझ्या
आईला आत्तीच (आत्या) म्हणते.]

डॉ. काशिनाथ घाणेकरांचा आवाज इतक्या जवळून ऐकल्यावर माझं तर ह्दय
आनंदतिशयाने बंदच पडायची वेळ आली होती. धडधडत्या ह्दयावर एक हात
दाबून धरीत जवळ जवळ किंचाळूनच मी आत्तीला हाक मारली. माझी अशी
हात ऐकून बिचारी आत्ती धावतच फोनजवळ आली.

"काय ग ! कुणाचा फोन ? इतकं ओरडायला काय झालं ?" घाबरेलेल्या
आत्तीचा प्रश्नांचा मारा सुरू झाला. काहीही न बोलता मी फोन आत्तीच्या हातात
दिला. माझे पाय जमिनीला टेकतच नव्हते. काशिनाथ घाणेकरांनी कशासाठी

पान नं. - 10

फोन केला आहे हे ऐकायला सगळ्या शरीराचे कान झाले होते.
आत्ती हसून त्यांना सांगत होती-

"हो . येईन ना. तो दिवस मी रिकामाच ठेवला आहे. महाराष्ट्र राज्याचा
चित्रपट पारितोषिक समारंभ त्याच दिवशी सकाळी आहे. दुपारी आम्ही तुमच्या
नाटकाला नक्की येऊ. हो हो. कांचनही येईल. ती केव्हापासून इथे उडया मारत
उभी आहे. थांबा हं तिलाच फोन देते."

आत्तीने माझ्यापुढे रिसीव्हर धरताच मी भानावर आले. माझे पाय जमिनीवर
स्थिरावले.

"छे ! माझी त्यांची ओळख नाही. मी नाही त्यांच्याशी बोलणार." आणि
मी झटकन तिथून निघाले. जाता जाता आत्तीचे हसत हसत बोललेले शब्द
कानावर पडले.

"अहो, तिची तुमच्याशी ओळख नाही असं ती म्हणतेय. त्यामुळे ती फोन
घ्यायला तयार नाही."

आता वेध लागले होते पंचवीस एप्रिलचे . एक तर त्या वर्षी प्रथमच
सुरू झालेल्या राज्य चित्रपट पारितोषिकापैकी उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारि ~
तोषिक 'प्रपंच' या चित्रपटाकरिता जयश्री गडकर, सीमा यांचेही उत्कृष्ट भूमिकांचे
चित्रपट या वेळच्या स्पर्धेमध्ये होते. पण बाजी मात्र आत्तीने मारली होती. दादांना
(राजा परांजपे) 'सुवासिनी' चित्रपटाच्या दिग्दर्शनाकरिता दुसऱ्या क्रमांकाचे
बक्षीस मिळाले होते. आणि आता त्यातच 'रागगडाला जेव्हा जाग येते' या
नाटकाचा अवघ्या सहा महिन्यांत सुवर्ण महोत्सवी प्रयोग त्या दिवशी होता. त्या
समारंभाचे आमंत्रण देण्यासाठी डॉ. घाणेकरांचा फोन आला होता. माझ्या द्दष्टीने
मणिकांचन , दुग्धशर्करा सगळे योगं एकाच दिवशी जुळून आले होते.

आता पन्नासावा प्रयोगाचे काही वाटत नाही. पण पंटवीस वर्षांपूर्वी नाटकाचे
पंचवीस प्रयोग झाले तरी कोण अपूर्वाई वाटायची. आत्तीलाही लोकमान्याता
खूप मिळाली होती. त्याबरोबर आता राजमान्यताही मिळाली होती. आम्हा
बहिणींची तर एखाद्या लग्नाला जाण्यासारखी तयारी सुरू होती. नव्या स्कर्टवर
नवा ब्लाऊज हवा म्हणून फोर्टमधून नुसता ब्लाऊजच दीडशे रुपयांचा
(25 वर्षांपूर्वीचे दीडशे रुपये) आणला होता.

पान नं. - 11

महाराष्ट्र सरकारचा पारितोषिक वितरण समारंभ लिबर्टी चित्रपटगृहामध्ये
होता. समारंभाचे प्रमुख पाहुणे युनियन मिनिस्टर बी. गोपाल रेडडी होते, तर
व्ही. शांताराम , दुर्गा खोटे, शांता आपटे, स्नेहप्रभा प्रधान अशी ह्या व्यव ~
यातील बुजुर्ग मंडळीही आवर्जून उपस्थित होती. स्नेहप्रभाबाई प्रधान (ह्या
ज्युरी होत्या) यांनी आत्तीचे काम त्यांना खूप आवडल्यामुळे मीनाकाम केलेली
राजस्थानी फुलदाणी आत्तीला बक्षीस म्हणून दिली. आत्तीला तर महाराष्ट्र सर ~
कारच्या बक्षिसाहूनही अधिक मोलाचे ते बक्षिस वाटले. कारण एक जेष्ठ
कलावंताने एका दुसऱ्या कलावंताचा केलेला तो सन्मान होता.

तृप्त मनानेच आम्ही सर्व घरी परत आलो आणि 'रायगडाच्या' समारंभासाठी
पुन्हा दुपारी भारतीय विद्याभवनवर पोहोचलो. चारुकाका पुण्याहून ह्या दोन्ही
कार्यक्रमांसाठी आले होते. गद्य नाटकं न आवडणारी माझी आजीही 'रायगड'
नाटक बघायला आली होती. डॉ. घाणेकर यांनी आमची सर्वांची तिकीटं स्वत:
काढली होती. सर्वांना नाटक बघायला बोलवायचे तर स्वत:च्या पैश्याने तिकीटं
काढून बोलवायचे. ही डॉ. घाणेकर यांची तेव्हापासूनची पद्धत होती. आधुनिक
वाल्मीकी ग. दि . माडगूळकर अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या वक्त्तृवपूर्ण शैलीचा
पुन्हा एकदा आस्वाद चाखायला मिळाला.

एक अंक झाल्यावर आत्तीने मला व माझ्या बहिणींना चारुकाकांच्याबरोबर
रंगपटात जाऊन काशिनाथ घाणेकरा यांना पुष्पगुच्छ द्यायला पाठवून दिले. आणि
मुख्य म्हणजे आत्तीने सर्वांची (विशेषत: माझी ) डॉ. घाणेकरांशी
आधी ओळख करून द्यायला चारुकाकांना बजावले. आत पोहोचलो तर खुद्द
शंभुराजे आलेल्या निमंत्रितांना चहाचे कप देत होते. चारुकाकांनी पुढे होऊन
आम्ही आल्याची डॉ. घाणेकर यांना वर्दी दिली, आणि परिचयही करून दिला.
माझ्या गातून पुष्पगुच्छ घेत डॉ. घाणेकर आपले नाक फुगवीत मिश्कीलपणे
खर्जात बोलले 
"आता तरी झाली का ओळख ?"

मला काय बोलावे सुचेना. एवढयात त्याच स्वरात पुढचा प्रश्न डॉ. घाणे ~
करांच्याकडून आला "चहा घेणार का ?"

मी मानेनच नकार दिला. आम्ही सर्वजणी त्यांचा निरोप घेऊन प्रेक्षागारात
आलो. पुढचे नाटक मी कसे पाहिले ते काहीच आठवत नाही.

पान नं. - 12

5

त्यानंतर मात्र मी काशिनाथ घाणेकरांच्यासंबधी येणारे वर्तमानपत्रातील,
मासिकातील मजकूर खूपच उत्सुकतेने वाचायला लागले. 'रायगडाला जेव्हा
जाग येते ' या नाटकावर चर्चा तर सारख्या झडत होत्याच. मनोविश्लेषणात्मक
पहिले मराठी ऐतिहासिक नाटक म्हणून 'रायगड' वर सारख्या उलट सुलट चर्चा
झडत होत्या आणि संभाजी अतिशय लोकप्रिय झाल्यामुळे काशिनाथ घाणेकर
सतत प्रसिद्धीच्या झोतात होते.

आय. एन्. टी. च्या 'माते तुला काय हवंय' ह्या नाटकात नानासाहेब
फाटकांसमोर डॉ. घाणेकर मोठया ताकदीने उभे राहत. त्यांची ही भूमिका धी
गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेच्या कलाविभागाचे भिकू पै आंग्ले आणि त्यांच्या
सहकाऱ्यांनी पाहूनच डॉ. घाणेकर यांची संभाजीच्या भूमिकेसाठी निवड केली
होती. प्रा. वसंत कानेटकर हे तर त्यांनी नव्याने निर्माण केलेल्या संभाजीच्या
बाबतीत फारच काटेकोर होते. मागे एकदा ग. दि माडगूळकर यांनी डॉ.
घाणेकरांची 'वेडयाचे घर उन्हात' ह्या वसंत कानेटकर यांच्याच नाटकातील
दादाची भूमिका पाहून डॉ. घाणेकरांची तारीफ वसंत कानेटकर यांच्याजवळ
केली होती. पण नवीन नट इतक्या अवघड भूमिकेसाठी उभा केलेला पाहून
वसंत कानेटकर हे धास्तावलेले असणारच, आणि त्यामध्ये काही गैरही असे
नव्हते. पण मा. दत्ताराम यांच्या निवडीवर मात्र वसंत कानेटकर यांचा पूर्ण
विश्वास होता.

खरी कसोटी होती ती मा. दत्ताराम व डॉ. काशिनाथ घाणेकर यांची. पण
नाटक पाहिल्यावर श्री दीपलक्ष्मी मासिकाने त्याबद्दल लिहिताना म्हटले-

डॉक्टरांचा संभाजी रंगभूमिवर आला आणि संभाजीच्या भूमिकेसाठीच
डॉक्टरांचा जन्म झालेला आहे असे सगळे म्हणायला लागले. हा मा.
दत्ताराम यांचा विजय त्यांनी भूमिका अप्रतिम बसवली म्हणून, तसाच
तो डॉक्टर घाणेकरांचाही त्यांनी रागालोभाची पर्वा न करता जिद्दीने,
नटाने संभाजी उभा केला म्हणून ! कसबी सोनार असला तरी सोने
हे कसदार हवेच की, दत्ताराम -काशिनाथ हा मणिकांचन योग जमून
आला आहे.

पान नं. - 13

'माते तुला काय हवंय' ह्या नाटकातील डॉ. घाणेकरांची भूमिका पाहून
नटवर्य केशवराव दाते इतके प्रसन्न झाले होते की, ते आपण होऊन डॉ. घाणेकर
यांना 'हॅम्लेट' ची भूमिका शिकवायला तयार झाले होते.

'रायगड' मधील डॉ. घाणेकरांचा संभाजी पाहिल्यावर मात्र डॉ. घाणेकरांच्या
आराध्य दैवताने नटसम्राट नानासाहेब फाटक यांनी तर "डॉक्टरडया
काम चांगल केलंस. खूप मोठा हो." असा अगदी त्यांनी मनापासून आशीर्वाद
दिला.

"काशिनाथने काम चांगलं केलं तर नवल नाही. तोच आहे तो. " असे
मिश्लीलपणे आत्माराम भेंडे म्हणत.

समाजातील इतर क्षेत्रांतील मान्यवरांनीही 'रायगड' नाटकाचे आणि डॉ.
घाणेकर यांच्या संभाजीचे उदंड कौतुक केले.

कवी यशवंत म्हणाले--"प्रयोगाला मध्यंतर ठेवूच नका."
प्रा. ना. सी. फडके यांनी वसंत कानेटकरांना कळविले की-
"माझ्यातर्फे डॉ. घाणेकरांची पाठ थोपटावी."
ले. ज. थोरात म्हणाले, "दत्ताराम-घाणेकर जोडी चंद्र-सूर्यासारखी
शोभते."

एका चिपळूणकरांनी लिहिले- "डॉ. काशिनाथ आपली गरूड भरारीने होत
असलेली प्रगती आणि तेजाने तळपणारा यज्ञसूर्य पाहून आम्ही दिपून गेलो.
आमच्या सद््भावना आपल्या पाठीशी आहेत. उत्तरोत्तर यशसूर्य झळाळू दे हीच
ईशचरणी प्रार्थना."

प्रत्यक्ष नाटककार वसंत कानेटकर यांनी अभिप्रेत असलेला संभाजी
वेळोवेळी आपल्याला समजावून दिला. नाटकाच्या पुस्तकात शेवटी जोडलेल्या
पार्श्वभूमीचाही खूप उपयोग झाला असे डॉ. घाणेकर आवर्जून सांगत 'रायगड'
नाटकाच्या देदीप्यमान यशात डॉ. घाणेकरांचा सिंहाचा वाटा जाणून रायगडाची
पुस्तकप्रत घाणेकरांना सप्रेम भेट देतांना To my Sambhaji (माझ्या संभा ~
जीस ) असा त्यांचा गौरव केला , आणि डॉ. घाणेकरांना आभाळ ठेंगणे झाले.

डॉ. घाणेकरांच्या मते रायगडातील संभाजीने त्यांचे एक सर्वात मोठे अवघड
काम सुरू केले होते. ते म्हणजे त्यांची दुरावलेली घरची मंडळी त्यांच्या पुन्हा
जवळ आली होती. नाटकात काम करणे म्हणजे वेळेचा अपव्यय असे

पान नं. - 14

म्हणणाऱ्या घाणेकर यांच्या वडिलांनी आपले शब्द मागे घेतले . थोरल्या बंधूंशी
असलेला बऱ्याच दिवसांचा अबोला सरला होता. नाटक पाहताना लहान मुला ~
सारखे रडणारे आणि "मला क्षमा कर, मी चुकलो" असे मोठया मनाने म्हणणारे
वडील बंधू आठवून डॉ. घाणेकर गहिवरत होते.

आणखी एक अपूर्वाईची गोष्ट म्हणजे सहसा डॉ. घाणेकरांच्या नाटकाला न
येणाऱ्या डॉ. घाणेकरांच्या मातोश्री 'रायगड' च्या पहिल्या प्रयोगाला आवर्जून
उपस्थित राहिल्या, आणि नाटक सुरू होण्यापूर्वी विंगेमध्ये जाऊन डॉ. घाणेकरांना
अंत:करणापासून आशीर्वाद देऊन आल्या . मातृभक्त घाणेकरांच्या मते आईचा
आशीर्वाद म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद, आणि हे सर्व त्याचेच फळ मिळाले
आहे. डॉ. घाणेकर यांच्या नाटकाच्या नादाबद्दल नाराज असणाऱ्या त्यांच्या पत्नीही
'रायगड' पाहिल्यावर आपली नाराजी व्यक्त करायच्या बंद झाल्या.

सर्वाहून महत्वाचे म्हणजे 'रायगड' नाटकाने डॉ. घाणेकर यांच्या व्यावसा ~
यिक यशाचा पाया घातला , आणि तोही फार मजबुतीने. यापूर्वीही डॉ. घाणेकर
नाटकं करीतच होते. आपले सर्वस्व त्यात ओतीत होते. पण 2-4 प्रयोगा ~
मध्येच नाटक बंद पडत होते. ललितकलाकेंद्राने विजय तेंडूलकरलिखित
'माणूस नावाचे बेट' हे नाटक रंगभूमिवर आणले होते. त्यातील नायक
'काशिनाथाची' अवघड भूमिका मोठया कौश्यल्याने डॉ. घाणेकरांनी वठविली
होती. पण ते नाटक पाहायला कुणी फारसे आलेच नाही. तीच कथा इंडियन
अकादमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टस या संस्थेतर्फे गो. नी. दांडेकरलिखित शितू'
या नाटकाची झाली. विजया जयवंत (विजया मेहता) दिग्दर्शित आणि अभिनीत
या नाटकातील नायक विसू डॉ. घाणेकरांनी साकार केला होता. अरविंद
देशपांडे, माधव वाटवे यांची साथ होती. पण याही नाटकाचे फारसे प्रयोग
झाले नाहीत.

इंडियन नॅशनल थिएटरच्या 'फोन नं. 33333' या नाटकातील डॉ.
घाणेकरांची प्रंशसनीय भूमिका पाहून दिग्दर्शक आत्माराम भेंडे यांनी विश्राम
बेडेकरलिखित 'नरो वा कुंजरो वा' या नाटकातील डॉ. घाणेकरांना प्रमुख भूमिका
दिली. या नाटकाच्या निमित्ताने विश्राम बेडेकरांचा सहवास आणि मार्गदर्शनही
लाभले. डॉ. घाणेकरांच्या याही भूमिकेची तारीफ झाली. पण नाटक मात्र लोकप्रिय
होऊ शकले नाही. रक्ताचे पाणी करून घेतलेल्या श्रमावर पाणी पडत होते.

पान नं. - 15

सर्वस्व ओतून केलेल्या श्रमाला व प्रयत्नांना यशाची पावती मिळत नव्हती.

6

'रायगड' मुळे केवळ रंगमंचाच्या यशाचे द्वार उघडले असे नाही तर चित्रपट
ह्या अभिनयाशी संबंधित आणखी एका माध्यमाचे द्वार खुले झाले. 'पाहूरे
किती वाट', 'सुखाची सावली' ,'मराठा तितुका मेळवावा' या तीन-तीन
चित्रपटांचे करार डॉ. घाणेकरांच्या खिशात होते. या तीनही चित्रपटांचे दिग्दर्शकही
मातब्बर होते. राजा ठाकूर, गजानन जहागिरदार आणि भालजी पेंढारकर. ह्या
तिघांनाही डॉ. घाणेकरांच्या चित्रपट ह्या माध्यमाच्या अभिनयाच्या जाणिवा
अधिक विस्तारित केल्या.

बाबांनी (भालजी पेंढारकर) 'मराठी तितुका मिळवावा' ह्या चित्रपटाची
तयारी सुरू केली आणि जिजाबाईच्या भूमिकेसाठी आत्तीची (माझी आई )
निवड केली. दोन महिने आधी संपूर्ण संवादांची वही तिच्या हाती देण्यात
आली होती. वजनही कमी करायला सांगितले होते. संवादांची घोकंपट्टी ,
डाएटिंग आणि इतर शुटिंग अशी तारेवरची कसरत आत्ती करत
होती. पूर्वीचा काळ असता तर बाबांनी नेहमीसारख्या आधी तालमीच घेतल्या
असत्या. पण मुंबईतील शूटिंगमुळे आत्तीला इतके दिवस कोल्हापूरला जाऊन
राहणे शक्य नव्हते. पण बाबांनी तसा आग्रहच धरला असता तर मुंबईतील
सगळे चित्रपट नाकारून कोल्हापूरला जाऊन राहिलीही असती. पण बाबां
नीही तसा दुराग्रह धरला नाही. मात्र संवाद चोख पाठ करण्याची बाबांनी तंबी
दिलेली होती.

आत्तीही सभिनय संवाद पाठ करावे लागत होते. कारण मुंबईमध्ये तिची
तालीम दादा (राजा परांजपे) घेत होते. दादाही बाबांचे शिष्य. त्यामुळे तेही
स्वत:चे पूर्ण समाधान होईपर्यंत आत्तीकडून तालीम करून घेत होते. ह्या
दोन्ही अभिजात कलावंताचे शिकणे आणि शिकवणे (शिकणारा स्वत:ही
अभिनेता आणि प्रतिभावान दिग्दर्शकही होता) पाहणे म्हणजे अपूर्व योग होता.

बाबांनी शिवाजीच्या भूमिकेसाठी प्रख्यात मराठी दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी

पान नं. - 16

यांच्या मुलाची - आल्हादची निवड केली होती. आल्हाद पूर्वी चिमणी पाखरं,
अबोली, ओवाळणी अशासारख्या चित्रपटांतून उत्कृष्ट बालनट म्हणून गाजला
होता. बाबांना डॉ. घाणेकरांच्या डोळ्यामुळे त्यांना शिवाजीच्या भूमिका देता
आली नाही. पण बाबांनी त्याच चित्रपटातील 'भाव्या' ह्या काल्पनिक पात्राच्या
भूमिकेसाठी डॉ. घाणेकरांची निवड केलीच. चारुकाकांचा आनंद तर आता
गगनात मावत नव्हता. चारुकाका मला पत्रातून बाबा डॉ. काशिनाथ घाणेकरांचे
कसे 'स्पेशल' लाड करतात, त्यांच्याकडे कसे विशेष लक्ष पुरवतात याचे रस ~
भरीत वर्णन करीत.

7

मे महिन्याच्या शेवटचा आठवडा जवळ यायला लागला तशी छातीमध्ये
धडधड सुरू झाली. कारण एस्. एस्. सी चा रिझल्ट कधीही जाहीर
झाल असता. आत्तीचे कोल्हापूरला 'मराठा तितूका मिळवावा' चे शूंटिग
सुरू होते. त्यामुळे इच्छा असूनही मी माझ्या रिझल्टच्या वेळी मुंबईत थांबू शकली
नाही. रिझल्टच्या आदल्या दिवशी रात्री आत्तीचा कोल्हापूरहून ट्रंक-कॉल आला,
आणि तिने मला मी पास झाल्याची बातमी दिली. मला आश्चर्य वाटले. हिला
कसे समजले ? आणि तिने जे सांगितले ते ऐकून मी थक्कच झाले. कारण त्या
दिवशी दिवसभर आत्ती व सौ . माई ( सौ. लीलाबाई पेंढारकर ) यांचे चिंतातूर
चेहरे आणि ऑक्सीजनवर असल्यासारखी अवस्था बघून बाबा (भालजी पेंढार ~
कर ) स्वत: एका दैनिकाच्या कार्यालयात रात्री गेले आणि त्यांनी माझा रिझल्ट
काढून आणला.

मला मात्र त्या रात्री फारच एकटं वाटत होतं. घरात फक्त माझी आजी आणि
माझ्या मामेबहिणी होत्या. माझ्या दिवंगत वडिलांची, आत्तीची तिव्रतेने आठवण
येत होती. पण आत्तीचाही नाइलाज होता, शूंटिग तर होतेच. पण त्याशिवाय
बाबांच्या चिरंजीवांचा श्री. प्रभाकर पेंढारकर यांचा विवाह होता. रिझल्टमुळे मला
त्या विवाहाला जाण्याची खूप इच्छा असूनही जाता आले नाही. हा विवाह खूप
गाजला चो हळदी खेळण्यामुळे. आमच्या कोल्हापूरला हळदी खेळण्याची हौस

पान नं. - 17

जरा जास्तच असते. अगदी रंगपंचमीसारखी लग्नात हळद खेळतात. प्रभा ~
दादांच्या लग्नात हळद खेळविण्याचे प्रमुख सुत्रधार होते बाबूराव काका (नटवर्य
बाबूराव पेंढारकर-बाबांचे वटील बंधू. ) स्वत: अलिप्त राहून त्यांनी हळद
खेळण्याची अशी काही झुंबड लावून दिली म्हणे की, डॉ. घाणेकरांसारखे
मुंबईकरही त्यातून सुटू शकले नाहीत. बाबूराव काका या खेळाचे सूत्रधार
आहेत कळल्यावर तर भडकणाऱ्या मंडळींची अधिकच पंचाईत झाली.

माझ्या एस्. एस्. सी. चा रिझल्ट जाहीर झाला त्यादिवशी तर आत्तीने
किलोने साऱ्या स्टुडिओला पेढे वाटले. इतका आनंद झाला होता. स्वत:च्या
अपुऱ्या शिक्षणाची पूर्तता ती आमच्या शिक्षणामध्ये पाहात होती. मुंबईला
येताच तिने मला त्या वेळी फॅशनमध्ये एफ्. वाय. आर्टस््ला ऑडमिशन घेतली.
कॉलेज सुरू व्हायला अवकाश होता. पण एक नवे अनोळखी जग पाहण्याची
उत्सुकता वाढली होती.

अशातच एक दिवस माझ्या नावे जरासे जाडजूडच लागणारे एक पाकीट
पोस्टाने आले. मला आलेले पण पाहून घरातील सगळ्यांच्या भुवया उत्सुकतेने
ताणलेल्या होत्या. मीही मोठया उत्सुकतेने ते पत्र फोडले . ते पत्र पाठविणाऱ्यैचे
नाव, त्यामध्ये असलेला एक छोटासा त्या व्यक्तीचा फोटो हे सर्व पाहून माझा
माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना . कारण ते पत्र चक्क डॉ. काशिनाथ घाणेकर
यांनी मला पाठविले होते. पत्र पुढीलप्रमाणे होते 
श्री

4-6-63

प्रिय कांचन,
अ.आ.

तू एस्.एस्. सी पास झाल्याचे मला राजाभाऊ परांजप यांनी कोल्हापूरला
सांगितले. त्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी हे पत्र लिहीत. अभिनंदन
करून पुढे असे वाटते की तू खूप खूप शिकावे व असेच यश मिळवावे. तुझी
पुढे काय होण्याची इच्छा आङे मला माहीत नाही. पण तू डॉक्टर व्हावे अशी
मी इच्छा करतो.

'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकाच्या 50 व्या प्रयोगाला तू मला एक

﻿
दत्ता जी . कुलकर्णी
03-07-25
Marathi
एकूण पाने : - 18
From 1 TO 18

पान नं . - 1

महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेशस्थाने

महाराष्ट्रातील धार्मिक स्थानांचा विचार करता मुख्यतः गणेश स्थानांचा
क्रम सर्वांत प्रथम लावावा लागतो , कारण महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात श्री .
गणेशाची प्रसिद्ध स्थाने आहेत . ह्या सर्व स्थानांचा नुसता उल्लेख करणे हे
सुद्धा तसे अवघड काम आहे , पण त्यातील काही महत्वाच्या गणेश स्थानांचा
येथे परिचय देत आहोत .

गणेश स्थानांचा विचार करतांना सर्वात प्रथम अष्टविनायकांची आठ
स्थाने नजरेसमोर येतात .

1 . मोरगावचा मयुरेश्वर : -

पुणे जिल्ह्यातील भिमखडी तालुक्यात मोरगाव आहे . सिंधू राक्षसाला
ठार मारणारा तो हा मयुरेश्वर होय . या मंदिराच्या चारही बाजूला 50 फूट
उंचीचा कोट आहे . मयुरेश्वरच्या डोळ्यात व बेंबीत खरे हिरे बसविलेले
आहेत . मस्तकावर नागाची फणी आहे . देवळाचे तोंड उत्तरेकडे आहे . त्याला
11 दगडी पायऱ्या आहेत . देवळात प्रवेश केल्यावर चौकातच दोन दिपमाळा
आहेत . चौकातच गणपतीकडे तोंड केलेला उंदीर आहे . सभामंडपाला दोन
मोठी प्रवेशद्वारे आहेत . देवळाजवळ नगारखान्याची इमारत आहे . मोरगावला
एस . टी . किंवा खाजगी बसने जाण्याची सोय आहे . रेल्वेने नाही .

पान नं. 2

2 . सिद्धटेकचा सिद्धीविनायक : -

दौंड रेल्वे स्टेशनपासून जलालपूर एस . टी . फाटा आहे . त्या
फाटयाजवळ सिद्धटेक नावाचे लहानसे गाव आहे . तेथे सिद्धीविनायकाचे
मंदिर आहे . या मंदिराचा गाभारा 15 फूट उंच आहे . गणपतीचे मखर
आणि महिरप पितळेचे आहे . सिंहासन दगडी आहे . आतील गाभारा
अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे , हे मंदिरही अहिल्याबाईंनीच बांधले
आहे . बाहेरचा मोकळा सभामंडप बडोद्याच्या नारायण मैराळ यांनी बांधला
आहे . चिंचवडचे मोरया गोसावी यांनी येथे प्रथम तपश्वर्या केली . भाद्रपद
आणि माघ महिन्यात येथे उत्सव होतात . कै . न . वि . उर्फ काका गाडगीळांचे
आजोळ येथे आहे . म्हणून त्यांनी काही वर्षांपूर्वी येथे येणाऱ्या प्रवाशासाठी
धर्मशाळा बांधली आहे . भगवान विष्णूला सिद्धी देणारा असा हा सिद्धीविनायक
होय .

3 . बल्लाळेश्वर किंवा पालीचा बल्लाळ विनायक : -

रायगड जिल्हयात सुधागड तालुक्यात पाली हे गाव आहे . अगदी
देवळाच्या जवळच सरसगड आहे . बाल बल्लाळाला प्रत्यक्ष दर्शन देणारा
विनायक म्हणून बल्लाळेश्वर किंवा बल्लाळ विनायक होय . चिमाजी अप्पा
पेशवे यांनी येथील मंदिराला एक मोठी घंटा दिली आहे व येथील मंदिराचा त्यांनी
जीर्णोद्धार केला . सध्याच्या या मंदिराचा गाभारा पंधरा फूट उंच आहे .
उंदराची मूर्ती हातात मोदक घेऊन उभी आहे . सभामंडप चाळीस फूट लांब
आहे . देवळासमोर दोन उत्तम प्रकारे बांधलेली तळी आहेत . पण या तळ्यांकडे
दुर्लक्ष झाल्यामुळे तळी पाण्याने भरलेली असूनसुद्धा त्यांचा फारसा उपसा
होत नाही व वापरही होत नाही . विनायकाची मूर्ती तीन फूट उंच आहे .
सिंहासन दगडी आहे . विनायकाच्या डोळ्यात व बेंबीत खरे हिरे आहेत .
विनायकावर ऋद्धिसिद्धीच्या मूर्ती चौऱ्या ढाळीत आहेत . सभामंडपात दोन
मोठाले हत्ती आहेत . माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . येथे एस . टी . नेच
जाता येते .

4 . पालीचा वरद विनायक : -

रायगड जिल्ह्यात खालापूर तालूक्यात झाडीत उंचावर बसलेले
लहानसे महड गाव आहे . या गावी गणपतीमुळे गृत्समदचा गृत्समदचा
गणनांत्वा हा गणपतीचा मंत्र सुचला . त्यात गृत्समद मुनीने येथे सर्व प्रथम
गणपतीचे मंदिर बांधले होते . त्यानंतर स्थित्यंतरे होत होत प्राचीन काळापासून
आजपर्यंत काळाच्या ओघात अस्तित्व टिकून असलेले हे मंदिर भोवतालच्या
झाडीमुळे जरा वेगळे आणि निसर्गाला जवळ असलेले वाटते . मंदिराच्या
मागील बाजूस एक मोठे तळे आहे . ते पाण्याने भरलेले असते . तेथे असंख्य
कमळे फुललेली असतात . पण तळयाकडेसुद्धा मंदिर चालक किंवा गावकरी
लक्ष देत नसल्याने हे उत्तम तळे तसे उपेक्षितच राहिले आहे . येथील
गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची आहे . सिंहासन दगडी आहे . सभामंडप
दोन असून आतील सभामंडप आठ फूट लांबी - रुंदीचा चौरस आहे आणि बाहेरचा
सभामंडप चाळीस फूट लांब - रूंद आहे . या भागात पाऊस भरपूर पडत
असल्याने या मंदिराची वास्तू लांबून एखाद्या कौलारू घऱासारखी दिसते . हल्लीची
मूर्ती मंदिरामागील तळ्यात 1690 साली पौडकर नावाच्या गुरवाला
सापडली . ती तेथे पेशव्यांचे सरदार बिवलकर यांनी मंदिराच्या स्वरूपात
स्थापन केली आणि मंदिर संपूर्णपणे पुन्हा बांधले . 1892 सालापासून या
देवळातील नंदादीप अखंडपणे तेवत आहे . येथे फक्त एस . टी नेच जाता येते .
रेल्वेची सोय नाही .

पान नं . - 3

5 . थेऊरचा चिंतामणी : -

पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात थेऊर हे गाव आहे . तेथील गणपती
चिंतामणी म्हणून ओळखला जातो . दुष्ट इंद्राला गौतम मुनींच्या शापामुळे जी
हजार छिद्रे अंगावर निर्माण झाली होती त्या छिद्राचे हजार डोळ्यांत रुपांतर
येथील गणपतीने इंद्रावर केलेल्या कृपेमुळे झाले होते . इतक्या प्राचीन
काळापासून हे गणेशस्थान प्रसिद्ध आहे . देवळाचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे
आहे . पण गणेशाची मूर्ती पूर्वेकडे तोंड केलेली आहे . तेथील गणपती डाव्या
सोंडेचा आहे . थोरले माधवराव पेशवे या गणपतीच्या दर्शनास वारंवार येत
असत . त्यांनी आपल्या काळात या मंदिराचा सभामंडप बांधला आणि देवाचे
सानिध्य लाभावे म्हणून देवळाजवळच राहण्यासाठी एक वाडाही त्यांनी बांधला
होता . तेथे माधवराव आले म्हणजे मराठीशाहीचा दरबारच भरत असे . माधवराव
अकालीच थेऊर मुक्कामीच वारले . त्यांची पत्नी रमाबाई येथेच सती गेली
तिची समाधीही नदीकाठी आहे . मोरया गोसावी यांनी तेथेच गणपतीची
तपश्यर्या केली . येथील गणपतीच्या व्यवस्थेसाठी या गावचा महसूल थोरले
माधवराव पेशवे यांनी देवस्थानला इनाम म्हणून दिला होता .

6 . लेण्याद्रीचा गिरिजात्मक : -

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याद्री नावाच्या डोंगरावर हे
गणेश स्थान आहे . प्रत्यक्ष पार्वतीला प्रसन्न झालेला हा येथील गणपती होय .
या देवळाचे दार दक्षिणेला आहे . हे देऊळ डोंगरात असल्याने , यास कोणी
लेणीही म्हणतात . देवळाच्या बाजूला ओवऱ्या कोरलेल्या आहेत . सभामंडप
ओलांडून आपण जरा बाहेर गेलो की आठ कोरीव खांब आहेत . थोडेस
चालून पायऱ्या उतरून गेल्यावर दगडात कोरलेली भीमाची गदा दिसते .
गदेवर वाघ , सिंह वगैरे प्राण्यांची तोंडे कोरलेली आहे . जवळच पाण्याच्या
दोन टाक्या आहेत . येथील मखर लाकडी असून ते अगदी अलीकडील
काळातील आहे , माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . येथूनच जवळच
शिवनेरी किल्ला आहे . शिवाजी महाराज आपल्या बालपणी आपल्या
सवंगडयासह वारंवार या भागात येत असत .

7 . ओझरचा विघ्नहर : -

पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात ओझर नावाचे गाव आहे . येथील
गणपतीला विघ्नहर असे म्हणतात . हे मंदिर अती प्राचीन आहे . काळाच्या
ओघात स्थित्यंतरे होत होत आज असलेल्या अवस्थेत दिसते . येथील गणपतीची
स्थापना भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्राचीन देवांनी केली असे म्हणतात . हे मंदिर

पान नं . - 4

गावात असून देवळाचे तोंड पूर्वेकडे आहे . येथील गणपती डाव्या सोंडेचा
आहे . गणपतीच्या डोळ्यात दोन तेजस्वी रत्ने आहेत आणि कपाळावर हिरा
बसविलेला आहे . त्यामुळे गणपतीचे तेज अधिकच झळकते . गणपतीच्या
दोन्ही बाजूला पितळीच्या ऋद्धिसिद्धीच्या मूर्ती आहेत . सभामंडप आठ बाय
दहा फूट मापाचा आहे . दरवाजापाशी असलेला काळा उंदीर जणू पळतो आहे
असे वाटते . देवळात दोन दिपमाळा आहेत . त्रिपुरी पौर्णिमेपासून काही दिवस
त्या पाजळत असतात . वसई जिंकून परत येत असताना चिमाजी अप्पांनी
या गणेशाचे दर्शन घेतले आणि येथील मंदिराचा जीर्णोद्धार केला होता .

8 . रांजणगावचा श्री . गणपती : -

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव हे एक लहानसे गाव
पुणे नगर रोडवर लागते . रस्त्यापासून जवळच गणेशाचे मंदिर आहे . मंदिराचे
दगडी पोत आणि आसपासच्या ओवऱ्या यांची बरीच पडझड झालेली आहे .
हल्लीच्या देवस्थान कमिटीने या गोष्टीकडे लक्ष घालून जीर्णेद्धार करावयाचे
काम हाती घेतले आहे . प्राचीन काळी त्रिपुरासूराला ठार मारण्याची शंकराला
प्रेरणा देणारा हा श्री गणपती होय . या मंदिराचा दरवाजा पूर्वेकडे आहे .
देवळाचा मुख्य गाभारा आणि मंडप अजूनही चांगल्या स्थितीत आहे . मराठे
शाहीतील अनेक सरदारांनी या देवळाला इनामे दिली होती . या मंदिरातील
दोनही गाभारे थोरले माधवराव पेशवे यांनी बांधल्याची नोंद आहे . हा गणपती
उजव्या सोंडेचा आहे . असे सांगितले जाते . की , अगदी प्राचीन काळी मूर्ती खाली
तळघरात आहे . तिला दहा तोंडे आणि वीस हात आहेत . छत्रपती शाहू
महाराजांनी या मंदिराला व्यवस्थेसाठी पहिली सनद दिली आणि थोरले
माधवराव पेशवे यांनी हा गाव व्यवस्थेसाठी इनाम दिला . येथे फक्त एस . टी . नेच
जाता येते . रेल्वेने नाही .

या शिवाय इतरही गणेशस्थाने महाराष्ट्रात आहेत . प्राचीन
कालापासून या स्थानांचे महात्म्य सांगितले आहे .

9 . चिंचवडचा श्री . मंगलमूर्ती : -

पुणे शहरापासून 11 मैंलावर असलेल्या चिंचवड या गावी हे गणेश
स्थान आहे . येथील उत्तम व्यवस्थेमुळे मंदिराचा सर्व परिसर काळाच्या ओघातही
उत्तम प्रकारे सांभाळलेला दिसत आहे . मंदिर 30 बाय 20 फूट आकाराचे
असून ते 40 फूट उंच आहे . ते दगडी आणि साध्या बांधणीचे आहे .
सभामंडपाच्या मागे गणेशभक्त श्री . मोरया गोसावींची समाधी घेतली आहे . मोरया
गोसावी यांनी 1655 मध्ये जिवंत समाधी घेतली होती . त्या समधीवरच
1659 मध्ये चिंतामणी गोसावींनी जे मंदिर बांधले तेच आजचे मंदिर होय .

पान नं . - 5

हे देवस्थान इतके श्रीमंत होते की , त्या काळी चिंचवडचा रुपया असे स्वतःचे
नाणेही पाडले जाई आणि ते व्यवहारात चालतही असे . भाद्रपद माघ महिन्यात
येथे उत्सव असतो . येथे जायला रेल्वे मार्ग असला तरी पुण्यापासून बसने
जाणे अधिक सोयीचे आहे .

10 . शिव गणेश : -

भोर तालुक्यात आंबवडे गाव आहे . तेथून धूर गंगेवरील झुलता पूल
ओलांडून जरा पुढे गेले की , एक पडके देऊळ दिसते . ते शिवगणेशाचे मंदिर
या गणेशाची स्थापना शिवाजी महाराजांनी केली म्हणून याला शिवगणेश
असे म्हणतात . हे स्थान उपेक्षित राहिले आहे .

11 . पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणेश : -

हे मंदिर 1636 साली माता जिजाबाई यांनी बांधले . ह्या मूर्तीच्या
डोळ्यांत दोन हिरे बसविलेले आहेत आणि बेंबीत माणिक बसवलेले आहे .
हे मंदिर मोठे प्रशस्त , सभामंडप व भोवती धर्मशाळाही आहे .

12 . सारसबागेतील सिद्धिविनायक : -

पुणे शहरातील हे गणेश स्थान माधवराव पेशव्यांनी 1784 साली
स्थापन केले . हैदरअलीवर स्वारी करायला जाण्यापूर्वी येथील तळ्यात
माधवरावांनी थेऊरच्या गणेशाची प्रतिकृती स्थापन केली होती . ह्या मंदिराचा
परिसर पुणे महानगरपालिकेने अलिकडे बाग बगीचा निर्माण सुशोभित
केला आहे . मंदिराची सर्व व्यवस्था मात्र देवदेवेश्वर संस्थान पाहते .

13 . त्रिशुंड गणेश : -

पुण्याच्या सोमवार पेठेत हे गणेश स्थान आहे . काळ्या दगडाचे
मंदिर 1784 साली बांधण्यात आलेले आहे . गणेशाची मूर्ती मोरावर बसलेली
असून त्याला सहा हात , तीन मुखे आणि तीन सोंडे आहेत . हे मंदिर दत्तगुरू
गोस्वामी यांनी बांधले होते . त्यांची समाधी तळघरात आहे .

14 . नांदगावचा सिद्धिविनायक : -

गेल्या सहाशे वर्षापासून हे गणेशस्थान या भागात प्रसिद्ध आङे .
येथे फक्त एस . टी . नेच जाता येते . नानगाव हे रायगड जिल्ह्यातील मुरुड
जंजिऱ्यापासून पाच मैलावर आहे . या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार
करण्यात आला आहे . येथील मूर्ती इतकी उंचावर बसवली आहे की तिचे
कोणत्याही बाजूने दर्शन घेता येते .

पान नं . - 6

15 . श्री . राम सिद्धीविनायक : -

रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात कनकेश्वर गावाचे गाव आहे .
या गावी हे देवस्थान आहे . साधारण दोन अडीचशे वर्षापूर्वी बापटांनी हे
मंदिर स्थापन केले . ते परशुरामाचे भक्त होत . या मंदिराशेजारी लंबोदर
स्वामींची समाधी आहे . या मंदिरात स्थापन केलेली मूर्ती बडोद्याचे श्रीमंत
मैराळ यांचेकडील होय . कनकेश्वराला मुंबईहून रेवसपर्यंत सागरमार्गे जाता
येते , रेवस ते कनकेश्वर अशी एस . टी . आहे . अलिबाग धरमतर एस . टी . नेही
कनकेश्वरला जाता येते .

कनकेश्वर हे गाव डोंगरावर झाडीत वसलेले आहे . मंदिराकडे
गावापासून साडेसातशे पायऱ्या चढत जावे लागते . त्या ठिकाणी शंकराचे
स्वयंभू स्थान आहे . शंकराच्या मंदिराजवळच गणेशाचे देऊळ आहे .
देवळाजवळ तलाव आहे . तलावापासून जवळच देवालयाचा धार लागतो .
येथील उंदीर सुद्धा एक लहान स्वतंत्र मंदिरात आहे . या गणेशाचा चोहो
बाजूला ऋद्धिसिद्धी यांच्या पांढऱ्या संगमरवरी पाषाणाच्या मूर्ती आहेत .
येथील नंदादीप सतत तेवत असतो .

वैशाख आणि जेष्ट महिन्यात येथे उत्सव असतात . येथे धर्मशाळा
बांधलेल्या आहेत . त्या ठिकाणी राहण्याची व उतरण्याची सोय ट्रस्टने केलेली
आहे . तेथे भांडीही भाडयाने मिळतात .

16 . उरण येथील विनायक : -

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात उरण हे गाव आहे . या गावी
मुंबईहून लाँचने मोरा बंदरापर्यंत जाऊन तेथून टांग्याने जाता येते . पनवेलहून
एस . टी . बसनेही जाता येते .

हे मंदिर सात आठशे वर्षापूर्वीचे आहे . थोरले माधवराव पेशवे
याठिकाणी येऊन गेले असे म्हणतात . या गणपतीच्या नावावरूनच येथील
गावाला विनायक हे गाव पडले आहे . मंदिराजवळ एक तळे आहे . मंदिर
चिरेबंदी आहे . ते पांढऱ्या रंगाचे आहे . मंदिराचे काम आकाशी रंगाचे आहे .
येथील सभामंडप दुमजली आणि चौरस आहे . गाभाऱ्यातील भिंतीवर कमळ
आणि स्वस्तिक कोरलेले आहे . गाभारा मात्र चौकोनी आहे . विनायकाची
मूर्ती चार फूट उंचीची आणि साधारण साडेतीन फूट रुंदीची आहे . हा
विनायक डाव्या सोडेंचा आहे . विनायकाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना ऋद्धी
सिद्धीच्या मूर्ती आहेत . माघ महिन्यात येथे मोठया प्रमाणात उत्सव होत
असतो . बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी मंदिरातच राहण्याची सोय आहे .

पान नं . - 7

17 . दिंगबर सिद्धीविनायक : -

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कडाव या गावी हे स्थान
आहे . कर्जत रेल्वे स्टेशनपासून सहा मैलावर हे ठिकाण आहे . कर्जतपासून
येथे जायला एस . टी . बसची सोय आहे .

हे मंदिर फार प्राचीन असून नाना फडणीसांनी या प्राचीन मंदिराचा
जीर्णोद्धार केला असे सांगतात . येथील गणपतीची मूर्ती मोठया आकाराची
आणि दगडाची आहे . ती एकदंत , शिल्पकर्ण आणि दिंगबर अशी आहे .
माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . या मंदिराला पेशव्यांकडून तीन एकर
जमीन इनाम म्हणून मिळालेली आहे .

18 . महा गणपती : -

ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यात टिटवाळा नावाचे गाव आहे .
त्या ठिकाणी हे स्थान आहे . माधवराव पेशव्यांनी तलावाच्या काठी त्या
तलावातच सापडलेल्या गणपतीचे मंदिर बांधले . यालाच महा गणपती किंवा
वड विनायक असे म्हणतात .

या ठिकाणी जाण्याचा मार्ग रेल्वेचा आणि एस . टी . या असा दोन्ही
आहे . टिटवाळा हे रेल्वे स्टेशन आहे .

हे मंदिर लांबून एखाद्या कौलारू घरासारखे दिसते . देवळाच्या मागील
बाजूला तलाव आहे . गाभाऱ्याजवळचा सभामंडप प्रशस्त आहे , मंदिराचा
प्रवेश दरवाजा चांगला रुंद आहे . मंदिरात विजेची सोय आहे . सभामंडपात
300 ते 400 माणसे सहज बसू शकतात . मंदिराला 3 कमानीचे प्रवेशद्वार
आहे . गणेशाची मूर्ती 3 ते 4 फूट उंचीची आहे आणि तेवढीच ती रुंद
आहे . मूर्ती चतुर्भुज आहे . डोळ्यांची जागी दोन लाल माणके आहेत .
बेंबीच्या ठिकाणीही एक लाल माणिक बसवलेले आहे . हा गणपती डाव्या
सोंडेचा आहे . मूर्ती आसनस्थ आहे . माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो .
येथील पुजाऱ्याकडे राहण्याची व्यवस्था होऊ शकते .

19 . कमल चक्राधिष्टित गणेश : -

ठाणे जिल्ह्यातील मोरबाड या गावी असलेले हे स्थान साधारण 100
वर्षापूर्वीचे जुने आहे . हा गणपती शुभ्र संगमरवरी दगडाचा असून तो
कमलचक्रावर अधिष्टित झालेला आहे . माघ महिन्यात येथे उत्सव होतो .

पान नं . - 8

20 . मुंबईतील प्रभादेवीचा सिद्धीविनायक : -

मुंबईतील दादर भागातील सावरकर मार्गावर प्रभादेवी भागात हे
गणेशस्थान आहे .

साधारण दोनशे वर्षापूर्वीचे हे स्थान आहे . मूळ मंदिर फार लहान
होते . मुंबईकरांच्या गणेशभक्तीमुळे या मंदिराचा परिसर आता खूपच वाढला
आहे . मंदिराचा आतील गाभारा फक्त 15 बाय 15 फूटाचा आहे आणि
बाहेरचा सभामंडप 12 बाय 30 फूटांचा होता . श्री . फाटक या
गणेशभक्तामुळे गेल्या सुमारे 15 वर्षामध्ये या मंदिराचा कायापालट होत
गेला . देवळाला लागूनच पुजाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आता करण्यात आली
आहे . देवळाच्या डाव्या बाजूला पुष्कळ मोठी जागा आहे . देवळासमोर तीन
दगडी दीपमाळा आहेत .

गणेशाची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे पण आता मूळच्या काळ्या
पाषाणाच्या मूर्तीला रंग दिल्यामुळे ती वेगळीच दिसते . साधरणपणे तीन फूट
उंचीची ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे . मूर्तीला चार हात आहेत . मूर्तीच्या
दोन्ही बाजूंना ऋद्धि सिद्धी आहेत . मार्गशीर्ष , चैत्र , भाद्रपद महिन्यात येथे
मोठे उत्सव होतात . तथापि दर महिन्यात संकष्टी चतुर्थीला दर्शनासाठी येणाऱ्या
भक्तांच्या गर्दीमुळे या परिसरास जत्रेचेच स्वरूप येते .

21 . मुंबईतील गणेशवाडीतील श्री . गणेश : -

साधारणपणे तीन चारशे वर्षापूर्वी हे मंदिर बांधण्यात आले . सुंदर
बाबाजींनी बांधलेले हे मंदिर आहे . गणेशाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे .
गणेश मूर्ती तीन फूट उंच आहे . गणेशाच्या मूर्तीच्या एका बाजूला दोन
शिवलिंगे आहेत . प्रदक्षिणेची वाट वीस फूट परिघाची आहे . सभामंडप संपूर्ण
संगमरवरी आहे . येथील एका दीपमाळेवर इ . स . 1700 असे कोरलेले आहे .
त्यावरून ही दिपमाळा हरबाजी भिकाजी यांनी बांधल्याची समजते . येथील
नंदादीप सतत तेवत असतो . भाद्रपद आणि माघ महिन्यात येथे उत्सव
होतात .

22 . गणपतीपुळे येथील गजानन : -

रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी असलेले गणपतीपुळे हे गणपतीचे
प्रसिद्ध स्थान आहे . मुंबईहून बोटीने किंवा एस . टी . ने गणपतीपुळ्याला जाता
येते . बंदरात उतरून एस . टी ने गणपतीपुळ्याला जाता येते .
पुण्याहून , कोल्हापूरहून रत्नागिरीला येऊन तेथून गणपतीपुळ्याला जाता येते .
छत्रपती शिवाजी महाराज या गजाननाचे दर्शन घेऊन गेले आहेत . माधवराव

पान नं . - 9

पेशवे यांनी येथे धर्मशाळा बांधली आहे . हरभट पटवर्धन यांनाही पेशवेकाळात
या गणेशाच्या कृपेने उत्कर्ष प्राप्त झाला होता . सांगलीच्या राजांनी येथील
सभामंडप बांधला आहे . छत्रपती राजाराम महाराज व बडोद्याच्या गायकवाड
सरकारने या देवालयाला मोठया देणग्या दिल्या आहेत .

हे मंदिर समुद्रकिनारी असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आहे .
घुमटावरच कळस सोन्याच्या मुलाम्याचा आहे . सभामंडप सात नंदादीप
तेवत असतात . येथील मूर्ती संपूर्ण दिसत नाही . फक्त पुढे आलेली दोन
गंडस्थळे खालील नाभी व पुढे आलेले दोन दात दिसतात .

भाद्रपद व माघ महिन्यात प्रत्येकी पाच दिवस येथे उत्सव होत
असतो . चैत्र महिन्यात पाडव्यापासून संध्याकाळी देवालयात वसंत पूजा सुरू
असतो . त्याचप्रमाणे आश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत येथे रोज
दीपोत्सव होत असतो . येथील पुजाऱ्यांकडे राहण्याची व्यवस्था होऊ शकते .

23 . गलबतवाल्यांचा गणपती : -

हे स्थान रत्नागिरी जिल्ह्यात अगरगुळे येथे आहे . हे मंदिर सुमारे
चारशे वर्षांपूर्वी बांधले गेले आहे . रत्नागिरीपासून दहा मैलावर रणपाल
बंदराजवळ हे स्थान आहे . येथे एस . टी ने व बोटीनेही जाता येते .

मंदिराचा चौथरा डोंगरकडेला धरून 40 फूट उंच आहे . मंदिरात
जायला दारे आहेत . त्यांना झडपा नाहीत . पुढील बाजूच्या उघडया दालनाला
दोन दरवाजे आहेत . दोन्ही दालनांना जोडणारी एक 11 फूट उंचीची प्रचंड
शीळा आहे . ही शीळा म्हणजेच गणपती आहे असे समजून त्याची पूजा
करतात . देवळानजीक 70 फूट खोदलेली एक विहीर आहे . भाद्रपद महिन्यात
एक उत्सव होतो .

24 . खोदवी येथील लक्ष्मी गणेश : -

हे स्थान रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात खोदवी या गावी
आहे . हे मंदिर पेशवेकालीन आहे . येथे जाण्यास मुंबई दाभोळ बोटीने
दाभोळला उतरून तरीने खाडी ओलांडून वेलदूर येथे जावे लागते आणि
वेलदूर खोदवी असा एस . टी . प्रवास करावा किंवा मुंबई ते खोदवी असे
एस . टी . ने ही जाता येते .

हे मंदिर एका टेकडीवरील उपवनात आहे . सात फूट लांब आणि
चाळीस फूट रुंद आणि पन्नास फूट उंच असे हे मंदिर आहे . गाभाऱ्यासमोरचा
सभामंडप तीस फूट लांबी रुंदीचा आहे . मंदिरासभोवती दगडाचा भक्कम

पान नं . - 10

तट आहे , आवारातच दगडी दीपमाळ आहे . सुमारे तीस वर्षापूर्वी या मंदिराचा
जीर्णोद्धार करण्यात आला . देवळाच्या आजूबाजूला उंच उंच डोंगर आहेत .

सिंहासनावर बसलेली लक्ष्मी गणेशाची साडेतीन फूट उंचीचा दहा
हात असलेली मूर्ती आहे . मूर्ती संगमरवरी असून डाव्या सोंडेची आहे . सोंडेत
अमृतकलश घेतलेला आहे . मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे . भाद्रपद
आणि माघ महिन्यात येथे यात्रा आणि दीपोत्सव होतो . देवळाच्या जवळच
धर्मशाळा बांधलेली आहे . या धर्मशाळेत कुटुंबाला स्वयंपाक करण्याला योग्य
असे सर्व साहित्य मिळते .

25 उफराटा गणपती : -

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात गुहागर येथे हे स्थान आहे
गुहागरला एस . टी . ने जाता येते .
सुमारे तीनशे वर्षापूर्वीचे हे गणपती स्थान आहे . या संबंधी अशी
एक कथा सांगितली जाते की , एकदा समुद्राचे पाणी वाढून सर्व गुहागर गाव
बुडायची वेळ आली असता , गावकऱ्यांनी गणेशाची प्रार्थना केली . त्या वेळी
चमत्कार असा झाला की , गणेशाने आपले पूर्वेकडे असलेली तोंड पश्चिमेकडे
केले आणि समुद्राचे पाणी हटविले . तोंड उफराटे केले म्हणून याला उफराटा
गणपती असे म्हणतात .
मूर्ती पांढऱ्या सुभ्र वर्णआची चतुर्भुज आहे . ती डाव्या सोंडेची असून
ती अडीच फूट उंच आहे .

26 . परशुराम गणेश :

रत्नागिरी जिल्हाय्ताली चिपळूण तालुक्यात चिपळूणपासून सुमारे 12
कि . मी . अंतरावर परशुरामक्षेत्री हे गणेश मंदिर आहे . येथे बसने किंवा
टॅक्सीने जाता येते . 1785 साली ही मूर्ती स्थापन केली गेली आहे . तत्पूर्वीची
मूर्ती मोगलांच्या हल्यात भ्रष्ट झाल्याने ती वशिष्ठी नदीत विसर्जीत केल्यावर
सध्याची ही नवीन मूर्ती बसविली आहे .

परशुराम मंदिराच्या गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला हे स्थान आहे .
मूर्तीच्या समोर लहान सभामंडप आहे . मूर्ती उकिडव्या मांडीच्या उजव्या
सोंडेची आहे . ती शुभ्र पाषाणाची आहे . ती सिहांसनावर बसलेली असून
तिची उंची तीन फूट आहे . भाद्रपद महिन्यात चार दिवस उत्सव चालतो
आणि माघ महिन्यातही स्थापना उत्सव होतो .

पान नं . - 11

27 . गणेशवाडीचा गणपती : -

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालूक्यातील कागवाडपासून जवळच
गणेशवाडी येथे हे स्थान आहे . हे मंदिर हरभट बाबा पटवर्धन यांनी बांधले
हे स्थान 56 विनायक स्थानांपैकी आहे . येथे एस . टी . ने जाता येते .

हे मंदिर कृष्णा नदीच्या तीरावर आहे . गाभाऱ्यापुढे 3 दालनांचा
सभामंडप , दगडी अष्टभुज खांबाचा आहे . मंदिर हेमाडपंती असून पूर्वेकडील
दारावर नगारखाना आहे .

गणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची असून उकडवी बसलेली पूर्वेकडे
तोंड केलेली आहे . येथे पाच नंदादीप आहेत . भाद्रपद महिन्यात येथे पाच
दिवस उत्सव होतो . हे देवस्थान सध्या पब्लिक ट्रस्टकडे सोपविलेले आहे .

28 . जोशीराव गणपती : -

हे गणेशस्थान कोल्हापूर शहरातच आहे . 1882 साली बांधलेले हे
गणेश मंदिर आहे . यातील मूर्ती फार प्राचीन आहे . यालाच बिनखांबी गणेश
मंदिर असे म्हणतात . कारण हे मंदिर खांबाशिवाय उभारलेले आहे .

भाद्रपद महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . छत्रपती राजाराम महाराज
यांनी हे मंदिर जोशी कुटुंबाला इनाम म्हणून दिले . ताराबाईच्या कारकिर्दीत
कोल्हापूरचे छत्रपती जोशीराव म्हणून हे जोशी कुटुंब राहत असे .

29 . शिलाहारांचा गणपती : -

कोल्हापूर जिल्ह्यातील बीड कसबा येथे हे गणेश स्थान आहे . हे
गणेश स्थान सुमारे नऊशे वर्षापूर्वीचे असावे . शिलाहार राजांच्या
काळातील हे गणेश मंदिर आहे .

शिलाहार राजा झाला . त्याने गणेशाच्या नावाने सोन्याचे नाणे पाडले
होते . त्या नाण्याच्या एका बाजूवर गणेशाची आकृती व दुसऱ्या बाजूवर
त्रिशूळ होते .

हे स्थान कोल्हापूरच्या नैऋत्येस दहा मैलावर भोगावती व तुलसी
या नद्यांच्या संगमावर आहे . कोल्हापूरपासून तेथे एस . टी . ने जाता येते .

ही गणेशाची मूर्ती चार फूट रुंद व सहा फूट उंच आहे . तिला
चार भुजा असून ती डाव्या सोंडेची आहे . मंदिराजवळ तलाव आहे . तलावात
शेषशायी विष्णूची मूर्ती आहे .

पान नं . - 12

30 . गणपती पचायतन : -

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे हे स्थान आहे . येथे रेल्वेने किंवा
एस . टी . ने जाता येते .

परशुरामभाऊ पटवर्धन या तासगावच्या संस्थापकाने हे मंदिर 1785
साली स्थापन केले आहे .

या गणपती पंचायतनात मध्यभागी सिद्धीविनायकाची मूर्ती आहे .
तिच्या उजव्या बाजूला उभा रामेश्वर व डाव्या बाजूस श्री . विष्णू यांची मंदिरे
आहेत . प्रदक्षिणेच्या वाटेवर सूर्यनारायणाचे व उमा देवीचे मंदिर आहे .
मंदिराची रचना अशी आहे की , ही पाचही मंदिरे एकत्र असून सर्व देवतांची
मुखे पूर्वेकडे आहेत . घडीव काळ्या पाषाणांचे नक्षीकाम केलेले हे मंदिर
आहे . मंदिरात प्रवेश करताना कमानीची वेस लागते . ही वेस इतकी प्रचंड
आहे की त्यातून हत्तीसुद्धा जाऊ शकतो . या वेशीवर नगारखाना आहे .
वेशीतून आत गेल्यावर मोठा चौक लागतो आणि नंतर सात मजली गोपुराची
मंदिराची आतील इमारत आहे . आतील आवार प्रशस्त आहे . सभामंडपही
मोठा आहे . त्याची तीन दालने आहेत . या मंडपात सुंदर नक्षीकाम केलेले
आहे . मंडपातून पायऱ्या चढून गेल्यावर गणेशाचे दर्शन होते . मंदिराच्या
आवाराभोवती दहा फूट उंचीचा व चार फूट लांबीचा तट आहे , देवालय व
तट यामधील जागेत बाग आहे .

गणेशाची मूर्ती सोनेरी सिंहासनावर बसलेली उजव्या सोंडेची आणि
शुभ्र गारेची आहे . ती दीड फूट उंच असावी . तिच्या दोन्ही बाजूला दोन
उंदीर आहेत . ती चतुर्भुज आहे . प्रत्येक चतुर्थीला गणेशाची पालखी निघते
फाल्गुन शुद्ध द्वितीयेला येथे उत्सव असतो . भाद्रपद महिन्यातही उत्सव असतो .
भाविकांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था होऊ शकते . हे देवस्थान ट्रस्ट
कायद्याखाली नोंदवलेले आहे .

31 . सांगलीचा गणपती : -

1843 साली या गणेशाची स्थापना पटवर्धनांनी केली . गणेशाच्या
मंदिरात शंकर , सूर्यनारायण , चिंतामणेश्वरी व श्री . लक्ष्मी नारायण अशा
देवतांची मंदिरे आहेत . हे मंदिर अत्यंत भव्य आणि काळ्या दगडांनी बांधलेले
आहे . देवळाचा गाभारा , पुढे पाच खणी ओटा , मोठा सभामंडप आणि
नगारखाना ह महत्वाचे भाग आहेत . या मंदिराची लांबी 90 फूट आणि
रुंदी 60 फूट आहे . हे कृष्णा नदीच्या काठावर आहे . गणपतीची पूजा मूर्ती
सिंहासनावर बसलेली तांब्याची आणि लहान आहे . उत्सव मूर्ती खूप मोठी

पान नं . - 13

आणि सुंदर आहे . गाभाऱ्यात मध्यभागी आहे . ती चार भुजेची आणि डाव्या
सोंडेची आहे . मूर्तीच्या दोन्ही बाजूला ऋद्धिसिद्धी आहेत . भाद्रपद उत्सव
मोठया उत्साहाने साजरा केला जातो . श्रावण ते माघ महिन्यात येथे उत्सव
होत असतात .

32 . ढोल्या गणपती : -

हे गणेशस्थान सातारा जिल्ह्यात वाई येथे आहे . वाईला एस . टी ने
जाता येते .

हे मंदिर 1762 साली सरदार रास्ते यांनी कृष्णा नदीच्या काठावर
बांधले आहे . हे मंदिर उत्तम घडीव दगडाचे आहे . गाभाऱ्यापुढे सभामंडप
भव्य आहे . गणपतीची मूर्ती अखंड पाषाणाची आणि रेखीव आहे . ती दहा
फूट उंच आणि आठ फूट रुंद आहे . मूर्तीच्या ह्या आकारामुळेच लोक तिला
ढोल्या गणपती म्हणतात . हा डाव्या सोंडेचा गणपती आहे . वैशाख महिन्यात
व भाद्रपद महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . हे मंदिर देवस्थान ट्रस्ट म्हणून
नोंदलेले आहे .

33 . अंगापूरचा कालीन गणपती : -

सातारा जिल्ह्यातील अंगापूर ह्या गावच्या देशमुखांनी हे मंदिर
छत्रपती शाहूंच्या काळात बांधले आहे . येथे एस . टी . ने जाता येते .

हे मंदिर शिल्पकलेचा एक उत्तम नमुना होय . याच्या बांधकामात
कोठेही लाकडाचा वापर केलेला नाही . ह्या मंदिराचा सभामंडप दोनशे फूट
लांब व दिडशे फूट रुंद आहे . त्याला एकही खांब नाही . ह्या गणपतीची
मूर्ती 3 फूट उंचीची आहे . भाद्रपद महिन्यात येथे मोठा उत्सव होतो .
या देवस्थानचा ट्रस्ट झालेला आहे .

34 . खिंडीचा गणपती : -

हे गणेशस्थान सातारा शहरात आहे . ते फार प्राचीन असून शिवाजी
महाराजांनी अजिंक्यतारा जिंकला तेव्हा या मंदिरात सभामंडप बांधल्याचा
उल्लेख आहे , हल्ली मंदिरात असलेली मूर्ती मेण , शेंदूर आणि राळ यांनी
बनवलेली आहे . ती बसलेल्या स्थितीत आहे .

35 . ढोल्या गणपती : -

हे स्थानही सातारा शहरातील ग्राम दैवत होय . हे स्थान फार प्राचीन
म्हणजे शिलाहार राजांच्या कारकीर्दीतील आहे . राजा भोज याने सातारा

पान नं . - 14

किल्ला बांधला त्या वेळेस गावच्या व किल्ल्याच्या रक्षणासाठी त्याने
गणेशाची स्थापना केली ही गणेशाची मूर्ती 12 फूट उंच असल्याने ह्याला
ढोल्या गणपती म्हणतात .

36 . अक्षत्या गणपती : -

हे स्थान अहमदनगर येथे आहे . येथे रेल्वेने किंवा एस . टी . ने जाता
येते .

हे मंदिर दोनशे वर्षापेक्षा जास्त काळापूर्वीचे आहे . गणेशाची मूर्ती
उजव्या सोंडेची असून ती 3 फूट उंच आहे . देऊळ तसे फार मोठे पण
ह्या गणेशाला विवाहप्रसंगी अक्षता देतात म्हणून अक्षत्या हे नाव पडले

37 . मोदकेश्वर : -

हे स्थान नाशिक शहरी आहे . 56 गणेश स्थानांपैकी हे एक
गणेशस्थान आहे . गणेशाची ही प्राचीन मूर्ती मोदकाच्या आकाराची आहे ती
पाषाणाची आहे .

38 . पद््मालयाचा गणपती : -

हे स्थान जळगाव जिल्ह्यात आहे . एरंडोल येथे जायचा मार्ग रेल्वे
आणि एस . टी . चा आहे . एरंडोलला जाणाऱ्या पॅसेंजर गाडीने म्हसावड
स्टेशनावर उतरावे लागते . या म्हसवाद पासून एक मैलावर पद्मलयाचा
डोंगर आहे . एस . टी . नेही येथे जाता येते .

हे स्थान अत्यंत प्राचीन आहे . गणेशाच्या अडीच पीठापैकी हे अर्धे
पीठ आहे . गणेश पुराणातही या स्थानासंबंधी कथा आलेली आहे . हा प्रवाळ
गणेश आहे . गाभाऱ्यात गणेशाच्या दोन स्वयंभू मूर्ती आहेत . , एक उजव्या
व एक डाव्या सोंडेची आहे . दोन्ही मूर्तींना चांदीचे मुकूट आहेत . भाद्रपद
आणि कार्तिक या दोन महिन्यात आणि माघ महिन्यातही येथे उत्सव होतो
यात्रेकरुंकरता येथे धर्मशाळेची सोय आहे . बाजीराव पेशव्यांनी काही उत्पन्नाची
गावे या गणेशाला इनाम दिली होती . शिवाय या गणेश संस्थानच्या मालकीची
काही शेतीही आहे .

हे मंदिर डोंगर माथ्यावर आहे . डोंगर माथ्यावर पद्मालय तलाव
आहे . त्यात कमळे भरपूर असतात . एका सिद्ध पुरुषाने या जुन्या देवालयाचा
19 व्या शतकाच्या आरंभी जीर्णोद्धार केला . एका प्रचंड घंटा देवळात आहे .
सभामंडप मोठा आहे . सभामंडपात साधारण चार फूट उंचीचा दगडी उंदीर
गणेशाच्या समोर आहे , मंडपाच्या पुढे गाभारा आहे .

पान नं . - 15

39 . चिंतामणी गणेश : -

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात कळंब नावाच्या गावी हे गणेश
स्थान आहे . 21 गणेश क्षेत्रांपैकी हे एक होय . थेऊरच्या गणेशाची जी कथा
आहे तीच कथा या गणेशाची आहे .

येथे जाण्यासाठी मोटार मार्ग आहे . वर्धा - नागपूर रोडवर असलेल्या
कळंब गावातच हे मंदिर आहे .

मंदिर जमिनीखाली 33 फूट खोल आहे . मंदिराची बांधणी साधी
पण सुबक आहे . मंदिरातील गणेश चार मुखाचा आहे . एकाच दगडात
चारही बाजूंना चार गणेश मुर्ती कोरल्या आहेत . तेथे पोहचल्यावर पुन्हा 29
पायऱ्या उतरुन गेले म्हणजे एक चौकोनी कुंड लागते . हे जिवंत झरे असलेले
पावन तीर्थ आहे . समोरच्या गाभाऱ्यात मुख्य चिंतामणीची मूर्ती आहे . त्याच्या
दोन्ही बाजूंना गाभाऱ्यात शंकराच्या दोन पिंडी आहेत . जमिनीवर खाली
गणेश मंदिरात येण्यासाठी पायऱ्यांचे 3 मार्ग आहेत . मंदिराच्या चारही
बाजूंना मजबूत दगडाच्या भिंती आहेत . मंदिर जमीनीखाली असून
सुद्धा ते हवेशीर आहे . चिंतामणीजवळच अनूसयेची काळ्या पाषाणाची सुंदर
मूर्ती आहे .

माघ महिन्यात सहा दिवस येथे मोठा उत्सव होतो . त्यावेळेस होणारा
दहीहंडीचा कार्यक्रम हे येथील वैशिष्टय होय . या मंदिराला काही शेते
देणगीदाखल मिळालेली आहेत . शिवाय वार्षिक रु . 2000 उत्पन्न
सरकारकडून मिळते .

40 . एकचक्र गणेश : -

वर्धा जिल्ह्यात केळघर येथे स्थान आहे . येथे वर्ध्याहून बस जाते .
सडकेला लागूनच केळघर गाव आहे .

हे मंदिर पांडवकालीन आहे असे म्हणतात . पूर्वी हे मंदिर किल्ल्यात
होते असे म्हणतात व ते पांडवांनी स्थापन केले असे म्हणतात .

केळघर गावच्या उत्तरेला पण जरा उंच ठिकाणी हा एकचक्र गणेश
आहे . पूर्वी तेथे किल्ला असावा असे म्हणतात . मंदिराच्या मागील बाजूस
एक चौकोनी पुष्करणी भक्कम दगडात बांधलेली आहे . गाव फारच प्राचीन
आहे . कारण येथे अनेक प्राचीन मूर्ती व अवशेष उत्खननात सापडत असतात .
एकचक्र गणेशाची ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे . भाद्रपद आणि माघ
महिन्यात येथे यात्रा भरते . धर्मशाळेत उतरण्याची सोय आहे .

पान नं . - 16

41 . शमी विघ्नेश : -

नागपूर जिल्ह्यात आधासा नावाचं गाव आहे . या ठिकाणी हे गणेश
स्थान आहे .

येथे जाण्यासाठी रेल्वेने नागपूर छिंदवाडा गाडीने जाऊन
पाटणसावंगी स्टेशनावर उतरावे लागते .

मुदगल पुराणातील वर्णनाप्रमाणे येथील गणेश आहे . 21 गणेश
स्थांनापैकी हे एक होय . प्राचीन काळापासून हे गणेश स्थान प्रसिद्ध आहे .
या गणेशाची आराधना प्रत्यक्ष विष्णूने केली होती . शमी विघ्नेशाच्या जवळच
वक्रतुंड नावाचा गणेश आहे . त्याची स्थापना प्रत्यक्ष वामनाने केली होती
असे म्हणतात .

विघ्नेश गणेशाची मूर्ती फारच मोठी आहे . ती उजव्या सोंडेची व
काश्मिरी दगडापासून बनविलेली आहे . ती 11 फूट उंच , 7 फूट रुंद आहे .
तिला दहा हात आहेत . ती सिंहासनावर बसलेली आहे . हे मंदिर टेकडीवर
आहे .

42 . सिताबर्डी येथील गणेश : -

नागपूर शहर सिताबर्डी भागात हे मंदिर आहे . सिताबर्डी
किल्ल्याच्या पूर्व उतारावर हे देऊळ आहे . हे मंदिर नागपूरकर भोसल्यांच्या
काळातील असावे असे म्हणतात . हा भाग लष्काराच्या ताब्यात असल्याने
येथे पक्के बांधकाम होऊ शकले नाही . त्यामुळे पाऊणशे वर्षापासून
एका पत्र्याच्या खोपीतच हा गणेश आहे . पूर्वी येथे मंदिर असावे , मुसलमानी
काळात ते उध्वस्त झाले असावे कारण त्याचे अवशष आजही दिसतात .

येथील गणेश उजव्या सोंडेचा आहे , दोन पाय , चार हात . सोंड
असे या गणेशाचे स्पष्ट रूप दिसत आहे , पण शेंदराच्या पुटामुळे ही मूर्ती
झाकलेली आहे . ही मूर्ती 5 फूट उंच आणि 3 फूट रुंद आहे . या मूर्तीच्या
बाजूला ऋद्धिसिद्धी नाहीत . हा गणेश ट्रस्ट खाजगी म्हणून नोंदला आहे .
देवासमोर येणाऱ्या उत्पन्नातूनच येथील खर्च चालतो .

43 . गणेश लेणी : -

औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा येथे जगप्रसिद्ध लेणी आहेत . यात
गणेश लेणीही आहेत .

येथे औरंगाबादहून एस . टी . बसने जाता येते .

पान नं . - 17

ही तीन हजार वर्षापूर्वीची लेणी असावीत . 850 फूट उंचीच्या
अखंड दगडात ही गणेश लेणी आहेत . लेण्याच्या वरच्या भागातून पाण्याची
धार सतत खाली पडत असते . लेण्याच्या तळाशी कमलकार तीर्थकुंड
आहे . वरील धबधब्याचे पाणी या कुंडात येऊन पडते .

हे लेणी चंद्राकार असलेल्या दरीत आहे . काही पायऱ्या उतरून
बोगद्यातून आत गेले की या लेण्याते प्रवेशद्वार लागते . ते बारा फूट उंचीचे
आहे . येथून आत गेले की ही लेणी दिसते . लेण्यात प्रवेश करताच 50
फुटांचा एक सभामंडप लागतो . त्या मंडपात मध्यभागी भिंतीत चार फूट
उंचीवर हा गणेश आहे . मूर्तीच्या उजव्या खांबावर नरसिंहाचे व डाव्या
खांबावर नटराजाचे शिल्प आहे . ही गणेश मूर्ती सिद्धासन घातलेली आणि
डाव्या सोंडेची आणि पाच फूट लांबी रुंदीची आहे . येथे दर संकष्टी चतुर्थीला
लोक दर्शनासाठी येतात . हे गणेश स्थान निसर्गरम्य परिसरात आहे .

44 . लक्ष विनायक : -

औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ येथे हे स्थान आहे . येथे औरंगाबादहून
एस . टी . ने जाता येते .

हे स्थान अत्यंत प्राचीन आहे . शिवपुत्र स्कंदाने याची स्थापना केली .
21 गणेशास्थांनापैकी हे एक स्थान होय .

45 . द्वादस हस्त गणेश : -

औरंगाबाद जिल्ह्यातच सातारा नावाचे गाव आहे .

येथे एस . टी . ने जाता येते . पहिले बाजीराव पेशवे यांनी ही मूर्ती
तयार करून घेतली होती . ती ही मूर्ती होय . ही मूर्ती पंचरथी धातूची आहे .
तिला 12 हात आहेत व ती डाव्या सोंडेची आहे .

46 . वैरण्य पुत्र गणपती : -

औरंगाबाद जिल्ह्यात राजूर नावाचे गाव आहे तेथे हे स्थान आहे .
भारतातील साडेतीन गणेशपीठांपैकी हे एक पूर्ण पीठ होय . या गणेश
स्थानाबद्दल पुढीलप्रमाणे कथा सांगितली जाते .

वैरण्ये नावाच्या राजाचा एक वाडा होता . त्या वस्तीला मूर्ती राजापुरी
व नंतर राजूर असे म्हणू लागले . या राजाने तपश्चर्या केली व त्याला
गणेशकृपेने मुलगा झाला . पण तो दिसायला विचित्र असल्याने राजाने तो
टाकून दिला . जवळच्या जंगलातील साधूंनी त्याचे संगोपन केले . पुढे राजाला
आपली चूक कळून आली आणि त्याने त्या विचित्र पण हयात असलेल्या

पान नं . - 18

मुलाला आपल्याजवळ राहण्याचे विनवले , तोच हा राजूरचा गणपती होय .
आजही या मंदिरात गणेशमूर्तीसमोर वरैण्य राजाची मूर्ती आहे .

हे मंदिर गावाजवळ एका उंच टेकडावर आहे . 60 पायऱ्या चढून
गेल्यावर हे मंदिर दिसते . मंदिर संपूर्ण दगडी बांधणीचे आहे . या मूर्तीसमोर
100 ते 125 समया नेहमी तेवत असतात . या समया नवसाच्या असतात .
या समयांना लागणारे तेल नवस बोलणारे लोक तेथील टाकीत आणून
टाकतात . या गणेशाच्या मस्तकावर रुप्याचा मुकूट , खाली अरुंद कपाळ
आणि दोन डोळे एवढाच भाग मूर्तीचा दिसतो म्हणून यास स्वयंभू गणेश
असेही म्हणतात .

भाद्रपद महिन्यात आणि माघ महिन्यात येथे उत्सव असतात .
यात्रेकरुंना उतरण्यासाठी गावात धर्मशाळा आहे . गणेशाच्या भक्तांनी
त्याला अनेक जमिनी अर्पण केलेल्या आहेत . पंच मंडळ या गणपतीची
व्यवस्था पाहते .

49 . भालचंद्र गणेश : -

परभणी जिल्ह्यात गंगामसले या गावी हे स्थान आहे . मनमाड
काचीगुडा रेल्वेने शिरूर स्टेशनवर उतरले असता या ठिकाणी जाता येते .

हे स्थान गणेशाच्या 21 पवित्र स्थानांपैकी एक होय . पूर्वी याला
सिद्धाश्रम क्षेत्र म्हणत असत . या ठिकाणी चंद्राने येऊन गणेशाची तपश्चर्या
केली असे म्हणतात . आपला भक्त म्हणून चंद्राला आपल्या माथ्यावर धारण
केली म्हणून त्याला भालचंद्र गणेश म्हणतात .

48 . त्रिकूट गणेश : -

मराठवाडयातील नांदेड येथे हे गणेशस्थान आहे .
अष्टविनायकाइतके हे प्रसिद्धही आहे . राजभ्रष्ट झालेल्या त्रिकूटाने
गणेशाची आराधना केली आणि त्याला पुन्हा राज्यलाभ झाला अशी प्राचीन
कथा आहे .

हे स्थान गोदावरीच्या पाण्यात आहे . ह्या गणपतीच्या जवळपास
त्रिकूट नावाचे एक लहानसे गाव आहे . नदीच्या पात्रात असलेले हे गणेश
देऊळ दगडी व भक्कम बांधणीचे आहे . जवळजवळ संपूर्ण वर्षभर हे मंदिर
पाण्यात असते . येथे गोदावरीचा प्रवाह रुंद व खोल आहे . त्यामुळे पाण्यात
जलचर प्राणी आढळतात . नागपूरकरराजे भोसले यांनी दिलेल्या देणगीतून
हे मंदिर बांधले गेले असे सांगतात .
*
.
"
"
"

﻿
माधव गडकरी
03-07-25
Marathi
एकूण पाने : - 14
FROM 1 TO 14

+
पान नं . 1

" माझी आठवण ठेवा "
दिनांक 6 - 4 - 78

" माझी ओळख ठेवा , एक बऱ्यापैकी गाणारा , बऱ्यापैकी अभिनय करणारा , एक नट
होता म्हणू म्हणून माझी आठवण ठेवा , " अशा विनम्र व भावपूर्ण शब्दात ज्यांनी मराठी
रंगभूमीची कीर्तीशिखराबर असताना निरोप घेतलवा त्यांनी मंगळवारची ती रात्र आपल्या
गंधर्वी गाण्याने इतकी जागविली की , प्रेक्षकांनी त्यांचा निरोप घेण्यास जणू नकारच दिला .
जगण्यासारखे जोपर्यंत जवळ आहे , तोपर्यंत मरण्यात मौज असते ; देण्यासारखे जापर्यंत
कलावंताकडे काही असेत तोपर्यंत जवळ आहे , तोपर्यत मरण्यात मौज असते ; देण्यासारखे जोपर्यंत
कलावंताकडे काही असते तोपर्यंत निरोप घेण्यात अर्थ आहे हे सारे खरे असले तरी , छोटा
गंधर्वांचा निरोप कोण घेणार वयाने साठी गाठली आहे असे ज्यांच्या आवाजावरून ,
गाण्यावरून , अभिनयावरून पटत नव्हते , त्या बालगंधर्वाचे लडिवाळ गाणे गाणाऱ्या गायक
नटाला निरोप कसला . ?
निरोप घेण्यासाठी त्यांनी नाटक कोणते निवडले तर ` सौभद्र ' ! मराठी रंगभूमीचे सर्वात
लोभसवाणे लेणे . ब्रिटिश आपले साम्राज्य देतील , परंतु आपला शेक्सपीयर कधी दुसऱ्याला
देणार नाहीत . या चालीवरचे श्री . पु . लं . देशपांडे यांचे एक वाक्या आहे , " आम्ही भारता -
मधील सारे जडजवाहिर , सारे अलंकार देऊ , परंतु ` सौभद्र ' कुमाला देणार नाही . " अशा
नयनरम्य व सुश्राव्य नाटकाचा मंगळवारचा प्रयोग म्हणजे मराठी रंगभूमीने साजरा केलेला

एक दीपोत्सव वाटला . हा दीपोत्सव रंगभीमीवरील एका सेवकासाठी होता . दारव्हेरकर म्हणाले
त्याप्रमाणे सत्कारासाठी प्रयोग होता . त्याचप्रमाणे सत्कारासाठी हा दीपोत्सव होता .

मराठी नाटकाइतके सुसंस्कृत असे दुसरे काही नाही , असे अशा वेळी वाटते . ` सौभद्र ' -
मधील सुभद्रा व रूक्मिणीच शालू व अलंकारांनी नटत नाहीत , तर त्यांचा विरह , त्यांता
शृंगार पाहण्यासाठी येणारे प्रेक्षकही नटूनथटून येतात . मोगऱ्यांचे गजरे तेथे स्वागत

पान नं . 2

करीत होते , व आता दरबारात जेव्हा दरबारात जेव्हा गंधर्व निरोपाचे गाणे गाण्यासाठी उभे राहिले तेव्हा
मराठी रंगदेवतेच्या काळजात कालवाकालव झाली .

छोटा गंधर्वांची भूमिका कृष्णाची . ` सौभद्र ' त कृष्ण दुसऱ्या अंकात येतो व शेवटच्या
अंकापूर्वी निरोप घेतो . पहिल्या अंकानंतर छोट्या गंधर्वांचा सत्कार झाला . रूक्मिणीच्या
महालात श्रीकृष्णाच्या वेषातच छोटा गंधर्व आपल्या खऱ्या रूक्मिणीसह बसले होते व
त्यांच्यावर सुवासिनी फुले उधळत असतानाच पडदा वर गेला . छोटा गंधर्वांच्या गायकीत
गंधर्वता आहे असे समारंभाचे अध्यक्ष श्री . वसंत शांताराम देसाई यांनी सांगितले , तर
नाटय परिषेदेचे अध्यक्ष श्री . वसंत शांतारम देसाई यांनी सांगितले तर ,
नाटया परिषेदेचे अध्यक्ष श्र पुरूषोत्तम दारव्हेकर आपल्या शैलीत म्हणाले , " छोटा गंधर्व हे
गायकीत बालगंधर्व आहेत , अभिनयात धैर्यधर आहेत व माणसात चारूदत्त आहेत . "

समारंभ संपला आणि श्रीकृष्णाने प्रवेश केला . क्रिकेटच्या मैदानावर एखाद्या शतक -
वीराने सहजपणे व आत्मविश्वासाने पावले टाकीत उतरावे तशी सहज एंट्री छोटा गंधर्वानी
घेतली . आज ते खरोखरच फॉर्मात होते . श्रीकृष्णाचा खोडकरपणा त्यांच्या चेहऱ्यावर सतत
प्रकट होत होता . ` कोण तुजसम सांग मज गुरूराया ' ने त्यांनी सलामी दिली व
या पहिल्याच गाण्याने वसंत शांताराम देसाई यांनी वर्णन केलेल्या गंधर्वतेची ग्वाही
मिळाली . बालगंधर्वाच्या गाण्यातील सारा लडिवाळपणा व मृदू स्वरांची तितकीच मुलायम
पाखर जी सुरू झाली ती शेवटपर्यंत कायम होती . वयाची साठी उलटल्याने आवाजाची
गोडी कमी झाली आहे , त्याची ताकदही कमी झाली आहे असे कुठेही जाणवले नाही .
स्वरांच्या पायघडयांवरून विविध रागांच्या पऱ्यांनीा पदन्यास करीत आणवे तसे त्यांचे
गायन चालले होते . षण्मुखानंदचे तिन्ही मजले स्वरासुरांनी भरून गेले होते . ` सौभद्र '
नाटकातील गाणी प्रेक्षकांनी सदैव पाठ असल्याने गाणे सुरू होताच प्रतिसाद येई व प्रत्येक
तुकडयाला हुंकार मिळे . मोगऱ्यांची एकेक कळी दंवबिदूंनी फुलत जावी तशी एकामागून
एक ` सौभद्र ' ची गाजलेली गाणी येत होती . लोक त्या गाण्यांनी भिजून गेले होते .

कीर्ति शिलेदारपणे त्यांना फारच चांगली साथ दिली . " वद जाऊ कुणाला शरण " त्यांनी
अतिशय बहारदारपणे म्हटले व नाटक तेथून चढतच गेले . " किती किती सांगू तुला " ने
तर सर्वांत अधिक टाळया मिळविल्या . रूक्मिणीच्या महालातील श्रीकृष्णाचा प्रवेश हा
` सौभद्र ' मधील सर्वोकृष्ट प्रवेश होय . कै . अण्णासाहेब किर्लोस्करांनी श्रृंगाररसाचे अतिशय
मनोहारी दर्शन या प्रवेशात घडविले आहे . ते पाहताना वासना आणि श्रृंगार यांची मराठी
साहित्यात जी गल्लत चालू आहे त्याचा विचारही मनात चमकून जातो . " बहुत दिन नच
भेटलो सुंदरीला " ही सुप्रसिध्द दिंडी छोटा गंधर्वांनी खुलवून म्हटली व रसराजांच्या या
बादशाहाचे आगमनच जणू घोषित केले . रूसलेल्या रूक्मिणीच्या दरबारात शिरताच तेथील
वातावरण पाहून मल्हार रागातील " नभ मेघानी आक्रमिले " हे घराघरांत गुणगुणले
जाणारे गीत सुरू केले व जो रंग भरत गेला त्याने श्रृंगाराचे सप्तरंगी इंद्रधनुष्यच क्षितिजा -

पान नं . 3

वर पडले . त्या सप्तरंगांची उधळण चालू असतानात " नच सुंदरि करू कोपा , मजवरि
धरि अनुकंपा " हे सुरू झाले व श्रृंगार जणू रथातून उतरला . " तू माझ्याकडे कानच
केलास नं " या वाक्याने सारे मोहरले . श्रीकृष्ण - रूक्मिणीच्या श्रृंगारातप्रेक्षकही रंगले होते .
तो सर्वच प्रवेश किर्लोस्करांनी किती बहारदारपणे लिहिला आहे . छोटा गंधर्वांनीही तो प्रवेश
रंगविताना आपले वय जाणवू दिले नाही आणि या सर्व श्रृंगारोत्सवाचा , दीपोत्सवाची ,
कलावंताच्या सत्काराचा , प्रयोगाच्या उत्तुंगतेचा क्षण आला तो " प्रिये पाहा " या
गाण्यानेच . " अरूण पसरि निज महा " ही ओळ म्हणताना पूर्वीच्या काळी रात्रीचा
समय सरूनि उषःकाल येत असे . मध्यरात्र उलटून गेली होती . परंतु हे भव्य सभागृह
खरोखरच मंत्रमुग्ध होऊन जणू जागच्या जागी खिळले होते . " सुखदुःखा विसरूनिया , गेले
जे विश्व लया , स्थिती निज ती सेवाया , " असे म्हणत छोटा गंधर्व आत गेले . " प्रिये
पाहा " चे सूर चालूच होते . मराठी रंगभूमीवरील एक नामवंत , संगीत नट निरोप घेताना
मी समोर पाहात होतो . गाणे चालूच होते , सूर कानात घुमत होते , अजूनही तो लडिवाळ
आलाप कानात आहे . आणि जे जे रात्री तेथे होते , त्यांच्या कर्णसंपुटातून तो कधीच
जाणार नाही .

अलौकिक कादंबरीवरील ह्दयभंग नाटक ` रथचक्र '

दिनांक 8 - 3 - 80

` रथचक्र ' पुन्हा उद्धरले !

श्री . श्री . ना . पेंडसे यांच्या साहित्य अकादमी विजेत्या ` रथचक्र ' कादंबरीवरील एक
चांगले नाटक पाहण्याचा योग नुकताच आला . श्री . कमलाकर सारंग यांनी ते नाटक
दिग्दर्शित केले आहे व तेच त्याचे निर्माते आहेत . श्री . पेंडसे यांची कोकणच्या जीवनावरची
हीशंभर नंबरी कादंबरी . सारंगांचे दिग्दर्शनही त्यांच्या कीर्तिला साजेसे आहे , परंतु नाटक
शेवटी उचलले आहे ते त्या ` ती ' च्या भूमिकेत काम करणाऱ्या लालन सारंग यांनी .
तिन्ही अंकांतील त्यांचे अभिनयकौशल्य , संवाद उंचावण्याची ताकद आणि तरलतम
भावनाविष्कार प्रकट करण्याचे सामर्थ्य यांच्याभोवतीच नाटक फिरते व रंगते .

प्रत्येक नाटकाचे अगर ग्रंथाचे स्वतःचे असे नशीब असते . एखादी कादंबरी खूप
चांगली असली तरी ती नावलौकिक मिळावतेच असे नाही . श्री पेंडसे यांच्या ` रथचक्र ' या
कादंबरीचेच उदाहरण घ्या . महाराष्ट्र सरकारच्या पारितोषिक योजनेत या कांदबरीला बक्षीस
मिळाले नाही . त्या वेळी डॉ . कोलते परीक्षक मंडळाचे सदस्य होते . या कादंबरीत खाणावळ
चालविणाऱ्या बाईचे जे रंगेल व्यक्तिचित्र श्री . पेंडसे यांनी रंगविले आहे , व तिचा ` ती ' च्या

पान नं . 4

हुशार मुलाबरोबरचा जो प्रसंग आहे तो डॉ . कोलते यांना अश्लीलतेकडे झुकणारा
वाटला . हाच प्रवेश नाटकात रोहिणी हतंगडी व मुलगा विराज चिटणीस इतका जबरदस्त
पणे सादर करतात की लेखकाचा त्या प्रलंगाबद्दलचा मनोव्यापार प्रभावीपणे व्यक्त व्हावा .
वासना व विचार यांचे सुंदर द्वंद्व त्या प्रसंगात श्री . ना . पेंडसे यांनी रेखाटले आहे . कुशल
दिग्दर्शकाने ते रंगमंचावर प्रभावीपणे उभे केले आहे व परीक्षकांना हवा म्हणून नव्हे ,
परंतु लेखकाने निर्माण केलेल्या त्या मुलाला हवा म्हणून विचाराचा विजय दाखविला आहे .
ह्या मुलाला सर्वात कमी संवाद आहेत . आईच्या उद््गारांबद्दलची प्रतिक्रिया चेहऱ्यावर
दाखविण्यापलिकडे तो काही करीत नाही . अशा कोंडमारा झालेल्या मुलाची वासनेशी झालेली
ओळख व त्याच्यावर असलेला वडिलांचा प्रभाव यांच्या द्वंद्वात झुंजणारा तो मुलगाच
लोकांना जवळचा वाटतो . तो त्या प्रसंगातून सुटावा असेच प्रेक्षकांना तो प्रवेश पाहताना
वाटते .

आश्चर्य असे की या प्रवेशामुळे महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार न लाभलेली ही कादंबरी
साहित्या अकादमीचे पारितोषिक मिळवून गेली . 1964 मध्ये ` रथचक्र ' ला सन्मान
मिळाला व आज 1980 मध्ये तब्बल 16 वर्षांनी त्यावरचे नाटक रंगभूमीवर येत आहे .
उशिरा का होईना ते आले हे आपले भाग्य व जे आले आहे ते डौलात आले आहे व
इताहास घडविणार आहे .

लालन सांरग यांची कमाल

सुरूवातीस म्हटल्याप्रमाणे लालन सारंग यांनीच हे नाटक आपल्या अभिनयाने व आवाजाने उचलले
आहे . चढया आवाजातील अनेक संवाद बोलून त्या दमत कशा नाहीत
याचेच आश्चर्य वाटते . कोकणातील हे चित्पावन ब्राम्हणाचे घर आहे . त्या चित्पावन दिसत
नाहीत . सखाराम बायंडरमधील ` टोन ' एकदोन वाक्यांत प्रकटही झाला , परंतु या सर्वांना
उजळून टाकणारा अभिनय या स्त्रीने तिथे उभा केला आहे . पहिल्या प्रवेशापासून शेवट -
पर्यंत ` बेअरिंग ' मध्ये कुठेही ढिलेपणा नाही . शुक्रवारी श्री . श्री . ना . पेंडसे यांच्याशी थोडे
बोलणे झाले . तेही म्हणाले , ` ती ' च्या भूमिकेतील लालनचे काम तिला दाखविले .
तिचे नेसणे , पदर घेणे , पदर सावरणे , हे सर्व कोकणातील चित्पावन घराप्रमाणे होते की
नाही हे पाहण्यासाठी श्री . ना . नी तिला बोलविले होते . परंतु बहीणच शेवटी म्हणाली की ,
हिला मी काय सांगणार ? हीच कोकणातील स्त्रियांना आता शिकवू शकेल ! भूमिकेशी ही
समरसता व त्यासाठी घेतलेले कष्टच अखेर त्यांच्या यशाला कारणीभूत झाले आहेत .

नाटकात काम करण्याचे ठरल्यावर श्रीमती सारंग यांनी नाटक वाचून काढले , तेव्हा
त्यांना उत्तमोत्तम वाक्य नाटकात ` श्री . ना . ' नी घेतली नाहीत असे आढळले . " ती वाक्ये

पान नं . 5

का नाहीत , " अशी पृच्छाही केली . परंतु कादंबरीतील सर्वच सोने तीन अंकात उधळणे हे
कठीण होते . कोकणच्या जीवनावर अनेकांनी कांदबऱ्या लिहिल्या . परंतु त्यात ` रथचक्र '
ही अग्रेसर . परंतु तीच रंगभूमीवर आली नव्हती . ही कादंबरीच त्या ` ती ' भोवती आहे .
त्या ` ती ' ला ` श्री . ना . ' नी नावही दिलेले नाही . एकापरीने कोकणातील स्त्रीचे सारे दुःख
तिच्या रूपाने उभे केले आहे . जगाशी व्यवहार करताना ती मानी आह , मुलांसाठी तडजोड
स्वीकारताना ती लाचार आहे , नवऱ्यापासून मनाने ती दुरावलेली आहे , ती दोन मुले
तिच्या रथाची दोन चाके आहेत . दोन्ही चाके शेवटी जगाच्या कोलाहलात रूतलेली पाहून
ती बेफाम बनते . ` विश्लेषण ' व ` मृगजळ ' या मुलाच्या पत्रातील दोन शब्दांना ती
अडखळते व आयुष्यातही एकापरिने उताराला लागते व त्याच वेळी 12 वर्षे निघून गेलेला
पती घरी येतो .

श्री . पेंडसे म्हणाले त्याप्रमाणे या कांदबरीत व नाटकात सर्व येतात ते तिच्याच
निमित्ताने तिच्यासंबंधीच बोलण्यासाठी अगर ठरविण्यासाठी . त्यामुळे नाटकाचा ती केंद्रबिंदू
शेवटपर्यंत राहते . अशी भूमिका वठविणे हे एक असामान्य काम आहे . श्रीमती लालन सारंग
यांच्या नाटयजीवनातील ` ती ' ची भूमिका म्हणजे एक सोनेरी पान आहे . उत्कृष्ट कांदबरी -
तील नायिकेचे प्रभावी दर्शन पाहण्यासाठी तरी हे नाटक प्रत्येकाने पाहायलाच हवे .

ती दोन चाके
ननाटक व दूरदर्शनच्या प्रसारामुळे असेल रंगमंचावर जे तरूण येत आहे , हे खूपच
चांगली कामे करताना दिसतात . या नाटकातील पुंडया व गुंड्याची जोडी अगदी योग्य
अशी मिळाली आहे . पुंडया नाटकात खूप भाव खाऊन जातो तो त्याला मिळालेल्या संवादा -
मुळे . गुंडयाचे काम अधिक कठईण आहे . कारण त्याला संवादच फासरे नाहीत . तरीही
पुंडयाचे काम करणाऱ्या विजय कदमचा चेहरा अतिशय बोलका आहे . चालणे , पाहणे
सारेच मिस्किल असल्याने त्या भूमिकेत चपखल बसला आहे . रागावण्यासाठी आवश्यक
डोळेही असल्याने तो शिव्याही चोखपणे देतो . अशा नाटकाकडे पाहताना आपण समाज -
जीवनाचे फार मोठे दृश्य पाहतो आहोत असे वाटत राहते . ` रथचक्र ' या कादंबरीत
इतके प्रसंग आहेत , की ते सर्व नाटकात आणणेही कठीण . शेवटी ती माणसांची कांदबरी
आहे . स्वार्थ , लोभ , विकार , विचार , अविचार , हौस साऱ्यांचा मिळून माणूस बनतो . त्याला
छेद देऊन एखादा माणूस कुठेतरी जातो . मानवी जीवनाच्या चिरंतन अशा संघर्षाचे हे
एका कालखंडातील चित्रण . तेही चिरंतन स्वरूपाचे , चिरंतन राहणारे . म्हणून ते पाहावेसे
वाटते . अभिनय उतकृष्ट असला की आपण खिळून राहतो . वृध्द सात्विक वहिनीचे व छटेल
खआणावळवालीचे अशी दोन्ही परस्परविरोधी कामे एकाच नाटकात करणाऱ्या रोहिणी हतंगडीही
टाळ्या घेऊन जातात . सुंदर कला ही अष्टकोनी हिऱ्यासारखी असते . पुरूषाची संवाद
स्त्रिया खिंडक्यांतून ऐकत , ते दाखविणारे दिग्दर्शन , खाणावळवालीचा नवरा दारात विडी

पान नं . 6

ओढीत बसलेला दाखवून आतील प्रवेश सादर करू शकणारे नेपथ्य , हे सारे त्या अपूर्व
लेखनाचे कलात्मक आविष्कार आहेत . ` गारंबीच्या बापू ' पेक्षा अधिक यश ` रथचक्र '
मिळवून देईल असे प्रयोग पाहताना वाटले . त्या नाटकाचे रूतलेले चाक बाहेर काढून ते
लोकांसमोर सादर केल्याबद्दल अभिनंदन श्री . कमलाकर सारंग यांचे .

गीतरामायणाचा सोहळा
दिनांक 27 - 3 - 80

गेल्या रविवारी रात्री पुण्यास जाऊन गीत रामायणाचा रौप्य महोत्सवी सोहळा पाहण्याची
संधी मिळाली . न्यू इंग्लिश स्कूलच्या ( टिळक रोड ) पटांगणात उभारलेल्या त्या अयोध्या -
नगरीत खरोखरच प्रचंड जनसमुदाय जमलेला होता . जवळ जवळ ` हजार लोक तिथे
जमलेले होते . मैदान तुडुंब भरलेले होते व मी तिथं प्रवेश केला तेव्हा महाराष्ट्र बँकेचे
श्री . पटवर्धन यांचे भाषण चालू होते . कर्ज , चेक , वसुली यात गुंतलेल्या व्यक्तीने अतिशय
रसभरित भाषण केले . त्या दिवशी समारंभाच्या अध्यक्षा होत्या श्रीमती विद्या माडगूळकर ,
अण्णाच्या पत्नी व प्रमुख पाहुण्या होत्या ललिता फडके . गीत रामायणाचे कवी व गायक
यांच्या पत्नींना आज व्यासपीठ दिले होते व बाबूजी उर्फ सुधीर फडके विशेष
निमंत्रितांच्या खुर्च्याजवळ मंडपात अगदी पुंडलिकासारखे उभे होते . बाबूजी हे भावप्रधान
गृहस्थ . व्यासपीठावरील एकेक वक्ते कवी व गायक यांच्यावर स्तुतिसुमने उधळत होते व
खांबाला टेकून उभे राहिलेले बाबूजी रूमालाने अश्रू पुसत होते .

रविवारी गर्दी सर्वात जास्त होती असे कुणी सांगितले . सुटीचा दिवस हे त्याचे एक
कारण असावे . विद्याताई व ललिताताई यांची भाषणे ऐकण्यासाठीही लोक आले असावेत .
कवी व गायक यांच्या कौटुंबिक जीवनाची महती या दोन स्त्रियांनी त्या दिवशी गायली .
भारतीय स्त्रीचे आजचे जीवन , त्यांच्या मर्यादा , पतीच्या स्वैर कल्पनाविलासात व सुखात
आनंद घेण्याची स्त्रीची वृत्ती याचेच दर्शन दोघींनी आपल्या भाषणात घडविले . माडगूळकर
व फडके हे दोघेही तापट स्वभावाचे असा निर्वाळा सर्व श्रोत्यांना त्यांनी दिला . एकूण
हो दोन्ही वीर संभाळण्याची करसत त्यांनी कशी केली हा त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य
विषय होता . एका कौटुंबिक वातावरणात सर्व चालले होते . ललिता फडके तसं पुष्कळ
बोलल्या , तरी एक बोलण्याचे राहिले म्हणून त्या सर्व संपल्यावर पुन्हा माईकवर आल्या
" िबाबूजींच्या आवाजात थोडा दोष निर्माण झाला होता . तेव्हाही तुम्ही
त्यांना सांभाळून घेतले . यापुढेही त्यांना तुम्ही सांभाळून घ्या अशी मी आपल्याला विनंती
करते " बाबूजी नुकतेच साठ वर्षाचे झाले . यापुढे किती वर्षे ते गाऊ शकतील , कसे गाऊ

पान नं . 7
शकतील याची चिंता त्या गृहिणीच्या शब्दांत होती .

या सर्व कार्यक्रमात शेवटी भाषणे फार झाली . कुणीही आटपते घेत नव्हते . बॅ . विठठल -
राव गाडगीळ यांनी रामायणाचा आपला अभ्यास नाही अशी भूमिका का घेतली कोण जाणे ?
परंतु तरी त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या . ब्राम्हण कितीही पंडित व धर्मपरायण असेल तरी
त्याने वाईट मार्ग पत्करला तर लोक त्याला स्वीकारत नाहीत हे रावणाच्या उदाहरणाने
स्पष्ट झाले आणि त्याऐवजी पराक्रमी क्षत्रियाचा ते स्वीकार करतात हे रामावरून सिध्द
झाले ही त्यापैकी एक . दादा कोंडके यांनी सांगितले की , अर्धे आयुष्य माझे दांडगाईत गेले ,
अर्धे चावटपणात चालले आहे . रामायणाशी संबंध नसलेल्या अनेक व चावट गोष्टीच त्यांनी
सांगितल्या . लोक कंटाळले होते . काही बंडखोर टाळ्या वाजवू लागले होते . तसे करू नका
असे संयोजक बाबा पुरंदरे सांगत होते , परंतु सांगताना तेही भाषण देत होते . शेवटी 12
वाजले . आणि धीरगंभीर आवाजात रामायण सुरू झाले . बाबूजींनी पेटीचा सूर लावला
तेव्हा 15 - ` हजार लोक तेथे जमलेलेच नाहीत असे वाटावे इतकी शांतता पसरली .
एक अपूर्व उत्सव पुण्यात झाला , मुंबईत तसे काही घडावे .

शिवछत्रपतींच्या डिचोलीत
दिनांक 1 - 4 - 80

1667 , 1668 व 1680 असे तीन वेळा शिवाजी महाराज व नंतर संभाजी महाराज
ज्या डिचोलीत काही महिने राहिले त्या डिचोलीत गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे
सोळावे अधिवेशन शुक्रवारी सुरू झाले व तो सोहळा पाहण्यासाठी गावच्या वेशीवरून सुरू
झालेल्या दिंडीत मी सामील झालो . गोव्यात सध्या उन्हाळा आहे . त्या तत्प रस्त्यावरून
पंडित महादेवशास्त्री जोशी मराठी साहित्याची दिंडी नादनिनादात घेऊन निघाले . सोमवारीच
शिवछत्रपतींची तीनशेली पुण्यतिथी असल्याने त्या ऐतिहासिक घटनेच्या छायेतच संमेलन
सुरू झाले व संपले .

दुसऱ्या दिवशीच्या परिसंवादात श्री . नानासाहेब गोरे यांचे फार सुरेख भाषण झाले
व त्या वेळी त्यांनीही शिवाजीचा उल्लेख केला . शिवाजी हा एक अपघात होता , असे श्री . नाना -
साबेह गोरे म्हणाले . इतक्या अलौकिक व्यक्तिमत्वाची अतिशय पराक्रमी व सर्व क्षेत्रांत
निपुण अशी व्यक्ती त्यानंतर झालीच नाही . श्री गोरे . यांनी त्याच्या पुष्टयर्थ एक चांगली
मल्लीनाथी केली . श्री . गोरे म्हणाले की संतांनी आधी भूमी तयार केली व नंतर शिवाजीने
राज्य स्थापन केले ही गोष्टही खोटी आहे . जिजामातेने शिवाजीला रामायण महाभारता -
मधील उत्कृष्ट कथा सांगून त्याचा मनोविकास घडवून आणला हेही खोटे आहे . शिवाजीला

पान नं . 8

जिजामातेने चांगल्या गोष्टी सांगितल्या , मग तिने संभाजीला का सांगितल्या नाहीत ?
संभाजीची ती आजी होती व आजीनेच नातवाला चांगल्या गोष्टी सांगायच्या असतात .
शेवटी आईच्या किंवा आजीच्या केवळ गोष्टींना माणसे मोठी होत नाहीत . शिवाजी हा
अद्वितीयच पुरूष होता व त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याची ती स्थिती राहिली नाही .
पेशव्यांनी अटकेवर झेंडे लावले असतील , परंतु शिवछत्रपतींच्या राज्याची शान त्याला
नव्हती .

या डिचोलीच्या परिसरातच सत्पकोटीश्वराचे मंदिर असल्याने व शिवाजी राजाने ते
दुरूस्त केले असल्याने तेथील कुंडातील तीर्थ घेऊन गोव्यातील तरूण रायगडाकडे या
संमेलनातून निघाले . शिवकाळात डिचोली ही मोठी बाजारपेठ होती . 1683 मध्ये संभाजी
डिचोलीत असताना मोगल सैन्य त्याच्यावर चालून आले त्या वेळी त्याच्या सैन्यात 45
हजार घोडेस्वार , 60 हजार पायदळ , 19 ` हत्ती व ` हजार उंट होते असा पोर्तुगीज
दप्तरात उल्लेख आहे . त्या आठवणी काढत नवे डिचोलीकर दिंडीत चालत होते . कोकणीत
डिचोलीली डिवचल म्हणतात . या डिवचलकरांनी साहित्य संमेलन मोठया उत्साहाने साजरे
केले . येथे आज उत्तम अनेक पाकळ्यांच्या पितळी समया बनतात . परंतु पितळ इतके
महाग झाले आहे की , घेण्याऱ्याचे पितळ उघडे पडते . डिचोलीला इतिहास आहे , परंतु
भवितव्याचे निश्चित मार्ग खाणीने गाव आज वेढले असले तरी सपडलेले नाहीत . कारण
खाणीतील उत्तम सामग्री परदेशी जाते व जे उरते ते शेतात पडते व शेते निकामी
बनतात . खाण तशी माती हे खरे , परंतु ही माती मती गुंग करते .

इंदिरा - दादा - अंतुले प्रीतीसंवाद

दिनांक 14 - 6 - 80

शुक्रवार दि . 6 जून रोजी मुख्यमंत्रिपदाच्या निवडीचा सर्व गोंधळ उडाला . शनिवारी
बॅ अंतुले व श्री . वसंतदादा पाटील दिल्लीस गेले ? नेतेपदाच्या निवडीचे अखेरचे पर्व
तेथे सुरू झाले . गुरूवारपर्यंत दिल्लीत घडलेल्या घटनांचा आढावा रविवारच्या ` पडद्या -
आडचे राजकारण ' या लेकात मी घेतला होता . परंतु शनिवारी व त्यानंतर दिल्लीत जे
घडले त्याची मनोरंजक माहिती आज हाती आली आहे . राजकारण हे कटू असतेच . परंतु
त्याचबरोबर माणसाचा स्वभाव हा त्याचा मित्र किंवा शत्रू म्हणून वावरत असतो . दादा
व श्रीमती गांधी यांच्या भेटीत जो संवाद झाली त्याचा हा तपशील . त्या वेळी श्री . कमला -
पती त्रिपाठी हे हजर असलेले तिसरे गृहस्थ होते .

श्रीमती गांधी : तुम्हाला नाराज करावे लागत आहे याचे मला वाईट वाटते .

पान नं . 9

दादा : ( नुसतेच ) ` हं ' !
गांधी : मी तुम्हाला एक गोष्ट सुचवते . केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून तुम्ही
या . तुम्हाला हवे ते खाते देते . कुणाला दिलेले खातेही हवं असेल तरी देते . तुमचे
सहकार्य मला हवे आहे .
दादा : मला मुख्यमंत्रिपद देऊ शकत असाल तर ते द्या . त्या खेरीज मला काहीही
नको .
गांधी : ते शक्य नाही . हवे तर एक दुसरी सूचना करते . तुम्ही कॅबिनेटमध्ये नंबर
दोनचे मंत्री म्हणून या . कोणताही ` पोर्टफोलिया ' नाही . No . 2 without port -
folio .
दादा : हं . . . हं . . ते जमायचे नाही .
गांधी : यामुळे लोकसभेत तुमम्हाला कोणत्याही खात्याची उत्तरे द्यावी लागणार नाहीत .
भाषेची अडचण येणार नाही .
दादा : ( पुन्हा फक्त ) हं . . त्या पेक्षा एका दिवसापुरते जरी तुम्ही मला मुख्यमंत्रिपद
दिले तरी मला चालेल .
त्रिपाठी : दादा , यह कैसे हो सकता है ! यह बच्चे का खेल थोडाही है ! यह सुझाव
आपको मान लेना चाहिये . !
गांधी : मी आणखी एक गोष्ट करीन . शालिमीताई विधानसभेत निवडून आल्या आहेत .
त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद देते .
दादा : मला हे काही नको . माझ्या पत्नीच्या वतीने मी आताच सांगतो की हे पद ती
स्वीकारणार नाही .
गांधी : और तो कुछ हो नहीं सकता !
दादा : काही हरकत नाही .
गांधी : अंतुलेको आप आशीर्वीद दीजिये !
दादा : हा . उनको मेरा आशीर्वाद होगा !
येथे चर्चा संपली . दादा बाहेर आले . एकाने विचारले , " तुम्ही नाही का म्हटले , हा तोडगा चांगला
होता ! "
" बाई मला पेश्ननर बनवायला पाहते आहे "
" म्हणजे का ? "
" खाते नसलेला क्रमांक दोनचा मी मंत्री . एकही फाईल येणार नाही . - पाठविली जाणार
नाही . मला नुसते बसून ठेवले जाईल . " - दादा
" शालीनिताईना उपमुख्यमंत्रिपद दिले जात होते ? " दादा काही बोलले नाहीत

पान नं . 10

विमानातील प्रश्नोत्तरे

बॅ . अंतुले व दादा यांची शनिवारी सकाळी दिल्लीस जाताना विमानात जी प्रश्नोत्तरे
झाली त्यांनी दादांच्या आकांक्षेवर खरे पाणी टाकले .
सीताराम केसंरीच्या उपस्थितीत बॅ . अंतुले यांनी दादांना विचारले . " तुम्हाला मुख्य -
मंत्री व्हायचे आहे , हे मी समजू शकतो . तुम्ही शेवटपर्यंत तुमच्याच नावाला चिकटून
बसला असता तर ते चूक नव्हते . परंतु मी होणार नसेन तर प्रतिभा पाटील यांना करा ,
असे तुम्ही सुचवता ? मग मी का नको ? मला करीत नसाल तर अंतुलेंना करा असे का
सुचवत नाही ? "

यामधील " मी का नको " या प्रश्नावर दादांकडे तोंडावर उघडपणे द्यायला उत्तर
नव्हते . दिल्लीस गेल्यावर बॅ . अंतुले यांनी ही विमानातील प्रश्नोत्तरे श्रीमती गांधीच्या काना -
वर घातली . अंतुले म्हणाले " मॅडम , केसंरीना विचारा . त्यांच्या समोर मी हे दादांना
विचारले . "

दादांच्या भेटीआधी बॅ . अंतुले श्रीमती गांधीशी चर्चा झाली होती . परंतु दादांनी
बंडखोरीचे राजकारण करू नये , त्यांनाही सामावून घ्यावे म्हणून तो तोडगा निघाला .
दादांनी तो फेटाळला .

दादांचा निर्णय बरोबर की चुकीचा ? दादांच्या गोटात आज हा एकच चर्चेचा विषय
आहे . परंतु एका परिने दादांनी तडजोड फेटाळून आपला . बाणेदारपणा दाखविला , हे
कुणालाही नाकारता येणार नाही . आपले मुख्यमंत्रिपद विश्वासघाताने गेले , त्या पदावर
पुन्हा आरूढ होऊन झालेला अवमान भरून काढणे यापलीकडे दादांना काही नको आहे व
त्याला ते शेवटपर्यंत चिकटून राहिले . बाई आपल्याला पेन्शनर बनवू पाहात आहे , हे
ओळखण्याची धूर्तताही त्यांनी दाखविली . ` श्रीमती गांदीच्या केवळ इच्छेप्रमाणे तेथे वागावे
लागेल ' हेही गणित त्यांनी मनात मांडले . स्वतःबाबत घेतलेला निर्णय स्वाभिमानाला धरून
होता , व्यवहाराला धरून नसेलही !

दादांचा निर्णय कार्यकर्त्यांना निराश करणारा आहे , शालिनीताईंच्या राजकीय कारकीर्दीला
अडवणूक करणारा आहे , पण दादांची मान ताठ ठेवणारा आहे .

पान नं . 11
श्रीमती गांधीनी जेव्हा काही चांगले देऊ केले तेव्हा ` नाही ' म्हणणारा एक महाराष्ट्राचा
वीर निघाला हे पाहून बरे वाटले . महाराष्ट्राच्या अस्मितेचे दिल्लीत थडगे बांधले गेले ,
त्याचे एक दार आज उघडले आहे .
` सत्तेला नाही ' म्हणणाऱ्यांचे नेहमी आधी अबिनंदन करालयास हवे . ती संधी आपण
घेऊ या .

लोकप्रतिनिधींना सूचना

दिनांक 17 - 6 - 80

लोकसभेत निवडून येणारे खासदार म्हणजे देशाचे वरिष्ठ नेते . हे जनतेसाठी कायदे
करतात . वागणुकीचे आदर्श उभे करतात . अशा ` महान ' व्यक्तीसांठी लोकसभेच्या कार्या -
लयाने एक सूचनापत्रक काढले आहे . त्यात पुढील सूचना आहेत .
1 . हजेरी रजिस्टमध्ये नियमितपणे खासदारांनी सह्या कराव्यात . घटनेच्या 1ठ
( 4 ) कलमाप्रमाणे परवानगीशिवाय 60 दिवसपर्यंत लोकसभेत गैरहजर राहिल्यास
सदस्यत्व रद्द होते व ती जागा रिकामी झाल्याचे जाहीर करता येते .

अनेक खासदार 60 दिवसांपेक्षा अधिक दिवस गैरहजर राहतात व मागाहून येऊन
सह्या करण्याचा प्रयत्न करतात , अशा तक्रारी झाल्या . सरकारी कचेऱ्यातील कारकून असे
करतात अशी आपली समजूत होती . परंतु कारकुनांचेही खासदार बनल्याने येथील सवयी
तेथे पोहोचल्या असाव्यात .
2 . प्रत्येक दिवसाच्या कामकाजाचे कागदपत्र प्रत्येक खासदारास सकाळीच घरी
मिळतात . ते त्यांनी सांभाळून ठेवावेत व लोकसभेत येताना घेऊन यावेत अशी दुसरी
सूचना आहे . अनेक खासदार सकाळी आलेले कागदपत्र उघडतही नाहीत . वाचण्याची
गोष्टच सोडा , आणि लोकसभेकडे येताना आणीतही नाहीत . ` उगाच ओझे कशाला ? '
असी त्यांची प्रामाणिक समजूत असते . पुन्हा रद्दी जमविणे हा प्रापंचिक प्रश्न त्यात गुंतलेला
असतो . त्यामुळे कागद आले की ते रद्दीच्या गठठयावर नीट लावून ठेवणे हेही महत्वाचे
असते . काही कासदार लोकसभेत आल्यावर पुन्हा प्रती मागतात . त्यामुळे छपाईचा खर्च
वाढतो .
3 . तिसरी सूचना खासदारांसाठी करण्याची वेळ लोकसभा कार्यालयावर यावी ही
खेदाची गोष्ट आहे . सिगारेटस््ची थोटके खाली टाकू नका . त्या करिता अँश ट्रेजचा वापर
करा अशी सूचना करण्यात आली आहे . लोकसभागृहात व सेंट्रल हॉलमध्ये सर्वत्र गालिचा -
सारखी आवरणे आहेत . त्यांचे स्वरूप बदलत जात असावे . सभापतींच्या परवानगीशिवाय

पान नं . 12

परिपत्रके लोकसभागृहाच्या आवारत वाटणे हे अयोग्य आहे याकडेही सदस्यांचे लक्ष
वेधले आहे . एकूण खासदारांनी आपल्या वागणुकीत बदल करावा अशी अपेक्षा आहे . आता
खासदार हीसुध्दा माणसेच त्यांना काही वाईट सवयी असणे अपरिहार्य आहे .

या सर्वापेक्षाही एक सक्ती खासदारांवर असावी . ती म्हणजे तोंड उघडण्याची . 7 दिवस
हजर राहून एकदाही तोंड उघडले नाही , तर काय " पाच पाच वर्षांत तोंड उघडण्याऱ्यांचे
नाव जाहीर करण्याची प्रथा लोकसभा सचिवालयाने ठेवावी . त्यामुळे मतदारांपुढे भली
भाषणे करणारा दिल्लीत गेल्यावर कसा गप्प बसतो हे कळून येईल . इंग्रजी किंवा हिंदी
यापैकी एकातरी भाषेत चार वाक्ये नीटपणे बोलण्याइतकी क्षमता नसलेल्यास लोकसभेत
पाठविणे हे मुळातच चुकीचे आहे . कार्यकर्ते व प्रतिनिधी यांची पुढील 25 वर्षांकरिता
साखळी निर्माण करणे हे चांगल्या राजकिय पक्षाचे काम असते . परंतु ते कुणीही करीत
नाही . मग सिगारेटस््ची थोटके जमत राहतात . गैरहजेरी वाढते . जांभयांत दिवस जातात .
रद्दी फक्त जमा होते .
यशवंतराव कलंक ?

दिनांक 10 - 9 - 80

महाराष्ट्राचे धडामधूम मुख्यमंत्री बॅ . अंतुले यांची कदाचित मुक्यमंत्रिपदावर फार दिवस
राहण्याची इच्छा दिसत नाही . कोकणचे ते काही भले करतील अशा अपेक्षेत मी होतो .
परंतु रोज आपल्याभोवती मोहोळ उठविण्याचा उद्योग त्यांचा इतक्या वेगाने चालू आहे
की , " अहो जरा धीराने घ्या , " असे सांगण्याची सोयही राहिलेली नाही .

सातारा येथे सोमवारी त्यांचे सव्वातास जाहीर सभेत भाषण झाले . ` छत्रपतींच्या
साताऱ्यांच्या पवित्र भूमीत यशवंतरावांच्या रूपाने एक कलंक निर्माण झाला आहे . ' असे
उद््गार मुख्यमंत्री श्री . अंतुले यांनी जाहीर सभेत काढले . महात्मा गांधी , नेहरू , यशवंत -
राव चव्हाण , शरद पवार , मोरारजी देसाई , चरणसिंग , राजनारायण , वाजपेयी , पालखी -
वाला या सर्वांचा त्यांनी ` अरेतुरे ' पध्दतीने उल्लेख केला व भाषणात त्यांनी अनेकांना
चप्पल - जोडे देऊन वेशीबाहेर हाकलावेत , चाबकाचे फटकारे मारावेत अशी भाषा केली .
पाकिस्तानमध्ये ज्या शिक्षा इस्लामी कायद्याखाली जनरल झियांनी प्रत्यक्षात दिल्या आहेत
त्याच शिक्षा जहॉपनाह अंतुले यांनी तेथे अनेकांना ठोठावल्या .

श्री . यशवंतराव चव्हाण यांनी साताऱ्याला कलंक लावला हे त्यांचे विधान तमाम मराठा
समाज त्यांच्याविरूध्द एकत्र करण्यास पुरेसे आहे . श्री . चव्हाणांच्या ठायी अनेक दोष
असतील . त्यांनी तडजोडीचे राजकारण केले व ते श्रीमती इंदिरा मांधीसाठी केले अशी

पान नं . 13
खरी तक्रार आहे . परंतु त्यांना कलंक म्हणणे कुणीही खपवून घेणार नाही . बॅ . अंतुले यांनी
महाराष्ट्रासाठी अजून काहीही केलेल नाही . यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रासाठी ज्या
असंख्य गोष्टी केल्या त्या महाराष्ट्र विसरलेला नाही . छत्रपती शिवाजी महाराजामचे नाव
घेण्याचा या सर्वांचा अधिकार नाही असे मुख्यमंत्री अंतुले म्हणतात . परंतु खुद्द त्यांना
शिवछत्रपतींच्या नावाचे व कार्याचे भांडवल करण्याची सनद कुणी देऊन ठेवलेली आहे .
हेही एकदा कळले तर बरे होईल . संभाजी मध्येच मोगलांना मिळाला होता , तेव्हा ही सनद
अंतुले घराण्याला दिली होती काय "

श्री . अंतुले यांचा दुटप्पीपणा लोकांना कळत नाही असे त्यांना वाटते . ` कुठे यशवंतराव
आणि कुठे श्रीमती गांधीना निष्ठा देणारे आनंदराव चव्हाण ' असे ते म्हणाले आणि पत्र -
कारांशी कराडमध्ये बोलताना श्री . अंतुले म्हणाले , " प्रेमलाबाई चव्हाण यांना प्रदेश अध्यक्ष -
पदावरून दूर केले जाणार आहे . प्रदेशाची गोष्ट बाजूलाच ठेवा परंतु स्वतःच्या गावातही
त्यांची ताकद नाही हे दिसून आले " म्हणजे त्या आनंदरावांच्या पत्नीला कराडात हे
जोडे आणि साताऱ्यात ` कुठे ते आनंदराव ! ' कारण आनंदराव वर गेले आहेत आणि
प्रेमलाबाई खाली भूतलावर आहेत . भूतलावर आहेत त्यांची हाकालपटटी व वर गेले आहेत
त्यांची भलावण ! आज आनंदराव चव्हाण असते तर तेच निश्चितपणे मुख्यमंत्री झाले
असते . परंतु तितक्याच निष्ठेने राहिलेल्या त्यांच्या पत्नींना प्रदेशचे अधयक्षपद नाही !
मुख्यमंत्र्यांनी कसे प्रतिष्ठेने बोलावे याचेही भान श्री . अंतुले यांना उरलेले नाही . हा कलंक
त्यांच्यावरच उलटण्यास वेळ लागणार नाही .

प्रेमलाबाई शाब्बास

दिनांक 6 - 10 - 80

श्री . यशवंतराव चव्हाणांचा अवमान करणे हे कृतघ्नपणाचे आहे , असेच केवळ उद््गार
श्रीमती प्रेमलाबाई चव्हाण यांनी काढले नाहीत तर यशवंतराव हे महाराष्ट्राचे भूषण आहेत
असेही त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले . या राज्याचे मुख्यमंत्री श्री . अंतुले यांचे मत व महाराष्ट्र
कॉग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती प्रेमलाबाई चव्हाण यांचे यशवंतरावांबद्दलचे मत हे पूर्णपणे वेगळे
आहे , ही स्थिती आशाजनक आहे . येथे यशवंतरावांना न्याय देण्याचा मोठा प्रश्न नाही .
त्यांची तरफदारी करण्याचीही तशी गरज नाही . काळ ते पाहून घेईल . परंतु
महाराष्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या भाषेत बोलावे याबद्दलच्या काही परंपरा आहेत , त्या
पंरपराच जंजिरा - मुरूडच्या समुद्रात बुडविण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर त्यांचा
हात धरणारा कुणी आहे की नाही हे पाहण्यासाठी मी उत्सुकतेने थांबलो होतो . महाराष्ट्र

पान नं . 14

राज्याचाच नव्हे तर या देशातील कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री इतक्या शिवराळ भाषेत
बोलल्याचे ऐकिवात नाही . पुन्हा आपण लोकांच्या भाषेत बोलतो अशी घमेंड मारली जाते .
या घमेंडीला रोखण्याची काम प्रेमलाबाईनी केले आहे . या महाराष्ट्र राज्यात कोण कलंक ,
कोणाला शरम वाटते , कोण बेशरम आहे , याची शहानिशा करण्याची सुरूवातच श्रीमती
प्रेमलाबाईंनी केली आहे . शेवटी प्रेमलाबाईच्या अंतःकरणातील सभ्यता , असभ्य भाषा
वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरूध्द उभी राहिली हे चांगले झाले . अशोभनीय भाषा वापरू नये
असे या राज्यातील पक्षाच्या अध्यक्षा , राज्याच्या मुखयमंत्र्यांना सांगतात यावरून संघटनेत
केवढी वैचारिक तफावत आहे हे दिसून येते .

मुंबईच्या कोणत्याही रस्त्यावर जर कुणी कुणाची शरम काढली तर जोडाजोडीच होते .
आमचे मुख्यमंत्री शरमही काढतात व जोडे मारा असेही सांगतीत . कॉलेजच्या निवडणुकीत
विद्यार्थी संघटनांचे पदादिकारी साधारण या भाषेत बोलतात . महाराष्ट्र या राज्याच्या
नावातच साधे राष्ट्र नाही तर ? महा06 राष्ट्र आहे . त्या महाराष्ट्राचा मुखयमंत्री कुणाची तरी
शरम काढतो याचीच माझ्यासारख्याला शरम वाटते . भारदस्तपणा , सभ्य भाषा , अनुदार -
तेचा अभाव ही राज्यकर्त्यांची पहिली लक्षणे असावयास हवीत . 80 टक्के लोक आपल्या
बाजूला आहेत असे म्हणणाऱ्याजवळ ती अधिक हवीत . त्या सर्वांची आठवण प्रेमलाबाई
चव्हाणांनी करून दिली आहे . शिवछत्रपतींच्या नावाचा रोज उच्चार करणाऱ्याबद्दल
लोकांना आता अधिक संशय येऊ लागला आहे . शिवाजी राजाचे नाव घेणाऱ्याने कुणाची
शरम काढल्याची व कुणाला कलंक म्हटल्याची अजून नोंद नव्हती . अशी भाषा वापरण्याचा
कलंक माहाराष्ट्राला लागला होता , तो धुऊन काढण्याचा प्रयत्न प्रेमलाबाईनी करावा यात
त्यांचे धैर्य व मोठेपणा दिसून येतो . महाराष्ट्राने क्षुद्रता , खंडीभर मिजास आणि अरेरावी
भाषा यांची कधीच गय केलेली नाही ; म्हणूनच प्रेमलाहाईचे कौतुक वाटते . महाराष्ट्राची
संस्कृतीच शरमिंदी झाली होती , तिची शान इंदिरा कॉग्रेसच्या राज्य अध्यक्षांनीच आज
राखली .

समाधीचे राष्ट्रीयकरण

दिनांक 10 - 11 - 80

अरविंद घोषांच्या समाधीचेही शेवटी राष्ट्रीयकरण झाले . दिवाळे फुंकलेला मारूती
कारखाना किंवा गैरव्यवहारमुळे अडचणीत आलेला . ` अरबिंदो आश्रम ' यांचे शेवटी
राष्ट्रीयकरण करावे लागले . सरकारने त्याचे व्यवस्थापन आपल्या हाती घेणे म्हणजे राष्ट्रीयी -
# करणच ! केंद्रीय मंत्रिमंळाने त्यास मान्यता दिली . आर्थिक गोंधळ फार झाल्यामुळे केंद्रीय

*
﻿
प्रा.डॉ.भा.पं. जोशी
03-07-25
Marathi
एकूण पाने :- 16
FROM 77 TO 97
किंमत :- 45 रूपये

+
पान नं. 77

वनस्पतिजन्य कीटकनाशके

मनुष्याच्या बाबतीत औषधाचे दुष्परिणाम दिसू लागलेत व
आता सर्व जग पुन्हा आयुर्वेदीय औषधी किंवा वनस्पतिजन्य औषधां-
कडे वळू लागले आहे. कारण त्याला साईडइफेक्ट नाहीत म्हणून. तद्वतच
शेतीतही रसायनांमुळे (रासायनिक खते) परिणाम दिसून आले व त्याचे
विपरीत परिणाम मनुष्य, पशु-पक्षी या सर्वावर दिसू लागले. कारण
संपूर्ण जीवसृष्टी ही जमिनीत निघणाऱ्या- होणाऱ्या किंवा निर्मिल्या
जाणाऱ्या घटकांवर अवलंबून असते. हे जसे खरे तसेच आपण जमिनीत
जी पिके घेतो व त्यांच्यावर पडणाऱ्या रोग-किडींच्या बंदोबस्तासाठी
जी औषधे मारतो त्यामुळेसुद्धा मनुष्य-पशु-पक्षी या जीवसृष्टीवर
अहितकारक परिणाम होत असतो. तो एवढा भयानक आहे की, काही
विद्वानांच्या मते, अणुबॉबची विध्वंसकता त्यापेक्षा कमी स्वरूपाची आहे.
या एवढ्या एकाच उदाहरणावरून कीड-रोग नाशकांच्या फवारणी-
मुळे किती महायभंयकर परिणाम होतात याची आपल्याला कल्पना
येऊ शकेल.

मी शेतकीखाते व कृषि विद्यापीठात जवळ जवळ 28 वर्षे नोकरी
केली आहे. या काळात काही संशोधन केंद्रावरही काम केलेले आहे.
अनेक प्रकारची कीड रोगनाशके मारताना मजुरांना चक्कर आल्याचे,
त्यांचे डोके दुखल्याचे इत्यादी प्रकार मी जवळून बघितले आहेत.

1962 मध्ये अमेरिकेत रॅचेल कार्सन या शास्त्रज्ञाने `सायलेंट
स्प्रिंग' या नावाने कीटकनाशके, तणनाशके यांनी होणाऱ्या विध्वसांची

डायरी लिहिली व न्यूयॉर्क' या मासिकाने ते छापू नये म्हणून फार
मोठे दबावतंत्र वापरले गेले. परंतु 1963 सुमारास डॉ. जेरोम वाइजनर

पान नं. 78

या जॉन केनेडी यांच्या वैज्ञानिक सल्लागाराने, ब्रुसेल्स वर्ल्ड फेअर
विजेते रसायन शास्त्रज्ञ अमेरिगो मॉस्को या इटालियन शास्त्रज्ञाने
म्हणजे या दोघांनी जाहीरपणे सांगितले की कीटकनाशकांचे परिणाम
अणुस्फोटापेक्षाही भयंकर आहेत. अमेरिकेने तर स्पष्ट कल्पना दिली
की, सेंद्रिय बुरशी नाशके (झिनेन,कपतान, फलटन) 14 मेगॅटनच्या
29 हायड्रोजन बॉबइतकीच विनाशकारी आहेत.

अधिक धान्य निर्माण करण्याच्या मोहिमेतून बऱ्याचशा घातक
उपायांना अखिल मानव जात आणि प्राणिमात्र नाहक बळी पडत
आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या 11 डिसेंबरच्या अंकात अशीच एक
खळबळजनक माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच नैरोबीहून
प्रकाशित झालेल्या बातमीनुसार दरवर्षी एक कोटी लोकांना विषमय
फवारणीमुळे विविध आजार होतात. शास्त्रज्ञांनी प्रकाशित केलेल्या या
बातमीत सांगण्यात आले आहे की, 5 टक्के लोक तात्काळ मृत्युमूखी
पडतात. तर उर्वरित लोक असाध्य आजाराने खितपत पडतात.
विशेषतः मुलांना मूत्रपिंडाचे विकार, कॅन्सर, प्रतिकारशक्ती कमी
होणे, आदी लक्षणांना सामोरे जावे लागते. आणि हा प्रभाव मुलांवर
पडतो. कारण त्यांच्या रोजच्या आहारात फवारणीयुक्त भाज्या व
फळांचा जास्ती समावेश असतो. विषमय फवारणी (मेणयुक्त) असल्याने
खाद्य पदार्थ धुवून घेणे अवघड जाते, अशा फवारणीचे प्रमाण सर्व
जगात वाढतच चालले आहे. 4 वर्षात खूपच कीटकनाशकांचा असाच
व्यापक वापर होत राहिला तर अँटमबॉबची आवश्यकताच राहणार
नाही. सर्व आपोआप शांत होईल.

दुसरीकडे शेतजमिनीची होणारी वार्षिक धूप हाही आटोक्या-
बाहेरील प्रश्न आहे. दरवर्षी 26 अब्ज टन मातीचा थर वाहून जात
असतो. सुपीक मातीच जर वाहून गेली तर पिके हाती येणार कशी ?
अशी ही माती तयार करणारे सूक्ष्म किटाणूच जमिनीतून जर नष्ट

पान नं. 79

झाले तर दगड व खडकांपासून माती तयार करणारे गांडूळ व इतर
कीटक आणणार कोठून ? बातमीत शेवटी म्हटले आहे, शास्त्रज्ञांनी
यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे जरूरीचे आहे. मदुराई-
तील कामराज युनिव्हर्सिटीत बायोकेमिस्ट्री विभागातर्फे डॉ. जयकुमार,
डॉ. जयरामन यांनी कीटकनाशकांचे दुष्परिणाममापक यंत्र बनविले
आहे.

1970 पासून या औषधांमुळे मतिमंद नवजात बालकांचे प्रमाण
15 टक्क्यांनी वाढले आहे. शिवाय वनस्पती, धान्य, जमीन यांची
झालेली हानी आणि पाण्याचे प्रदूषण याची तर मोजदादही करता
येणार नाही DDT, PCB यांसारख्या कीटकनाशकांमुळे कॉलेजवयीन
25 टक्के मुलांमध्ये नपुंसकत्व आले आहे. या परिस्थितीचा विचार
केला तर आणखी एका पिढीच्या काळातच अमेरिकन लोक नाश
पावतील असे तेथील तज्ज्ञांचे मत आहे.

अनेक अती विषारी रासायनिक कीटकनाशके वापरण्यास
अमेरिकेत कायद्याने बंदी आहे. भारतात अशा प्रकारचा कायदा नाही.
मात्र अमेरिकेत अशा प्रकारची औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांना ती
औषधे बाहेरच्या देशात पाठविण्याचे बंधन नव्हते, म्हणून अमेरिकेतल्या
व्यापाऱ्यांनी औषधे निर्मिती व निर्यात चालूच ठेवली. त्यात
ब्राझील, फिलीपीन्स, लॅटिन अमेरिका इत्यादी देशांत वरील औषधे
पाठविली जात होती व त्या देशांतून काही अन्न-धान्ये आयात केली
जात होती. त्या आयात केलेल्या अन्नधान्यात वा विषारी कीटकनाश-
कांचा अणुरेणू रहात असे, असे अमेरिकन सिनेटच्या कृषि समितीचे
अध्यक्ष सिनोटर पॅट्रीक लिही यांना आढळले व त्यांनी एक `बिल' या
निर्यातीविरूद्ध अमेरिकन सिनेटमध्ये मांडले आहे.

इजिप्तमध्ये तर अशा कीटकनाशाकांमुळे शेकडो म्हशी मेल्या
होत्या. हांडूरसमधून आयात केलेल्या गुरांच्या मांसात क्लोरडेनचे अवशेष
निर्धारित प्रमाणाच्या 3 ते 8 पट आढळले. यापुढे अमेरिकन कारखान-

पान नं. 80

दारांना तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या लेखी संमतीशिवाय त्या देशात
विषारी कीटकनाशके पाठविता येणार नाहीत. शिवाय निर्यातदारांना
अशा निर्यातीची माहिती इपीए ( Environment Protection Agency)
ह्या शासकीय संस्थेला द्यावी लागते. ह्या अमेरिकन कायद्यामुळे आता
अमेरिकेतून विषारी कीटकनाशके भारतात आयात करता येणार
नाहीत, पण ह्या कंपन्या आता इतर देशांत ती बनवून भारतात
पाठवितील आणि अमाप नफा कमविण्याचे सोडणार नाहीत. क्लोरडने
व हेप्टाक्लोर ही कीटकनाशके अमेरिकेत वापरण्यास बंदी आहे, परंतु
1987 ते मध्य 1990 पर्यत ती निर्यात होत होती.

डच सरकार कीटकनाशके फवारणीवर बंदी आणणार

प्रदूषणाचे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे डच सरकारने रासा-
यनिक कीटकनाशकांना हळूहळू सुट्टी देऊन त्या ऐवजी वनस्पतिजन्य
कीटकनाशके वापरण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करावयास
सुरूवात केली आहे. याप्रमाणे केले तर शासनाला असे वाटते की
1995 पर्यत 35 टक्के व 2000 सालापर्यत 50 टक्के रासायनिक
खतांचा वापर कमी झालेला असेल. हॉलंडच्या कृषिमंत्रालयाने असा
निष्कर्ष काढला आहे की जवळजवळ दररोज 19 किलो रसायने प्रति
हेक्टरी प्रति दिवशी फवारणीसाठी वापरली जातात. त्यामुळे हॉलंडची
प्रदूषण समस्या इतर पाश्चिमात्त्य देशांपेक्षा अधिक गंभीर आहे. शिवाय
हॉलंडला भू प्रदेशसुद्धा कमी आहे. आहे तो फार महाग आहे. सेंद्रीय
खतांची कमतरता आहे म्हणून हॉलंडचा शेतकरी आहे त्या जमिनीतून
व पशुधनातून जास्तीत जास्ती उत्पन्न निर्माण करीत असतो. म्हणूनच
रासायनिक कीटकनाशके व खते अधिक वापरली जातात. व त्यातूनच
प्रदूषणाची गंभीर समस्या उभी राहिली आहे.

आणि म्हणूनच वनस्पतिजन्य कीटकनाशके रोगनाशके वापरा-
वीत. आपल्या देशात भरपूर वनस्पती आहेत, `India itself is
botanical garden.' भारत हा निरनिराळ्या वनस्पतींचा बगीचा

पान नं. 81

आहे त्यात अशा काही वनस्पती आहेत की ज्याच्याने कीड मरते.
त्यांत कडूनिंब, सिताफळ, तंबाखू, वेखंड, लसूण, पिवळी कन्हेर, मिरची,
हळद. सब्जा, वनएरंड, निलगिरी, शेवगा, पपई, टोमॅटो, खराटा,
शिवण अशा अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. गोमूत्र सुद्धा वापर-
ण्याची प्रथा आहे.

1) कडूनिंब - महाराष्ट्रात कडूनिंबाची झाडे सर्वत्र आढळतात.
कडूनिंबापासून कीटकनाशके ही आता आंतरराष्ट्रीय बाब झालेली आहे.
पश्चिम जर्मनी, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स व इस्त्राईल सारख्या विकसित
देशांत आता वनस्पतिजन्य कीटकनाशकांच्या संशोधनावर व वापरावर
भर देण्यात येत आहे. `कडूनिंब' या विषयावरच आतापर्यत तीन
जागतिक परिषद भरल्या आहेत. श्री चंद्रशेखर महादेव केतकर यांनी
1977 साली `कडूनिंब व त्यापासूनच्या पदार्थाचे उपयोग ', या
विषयावर शोध-निबंध सादर केला. 1980 व 1983 मध्ये पश्चिम
जर्मनीत भरलेल्या दोन जागतिक कडूनिंब परिषदा तसेच अमेरिका व
कॅनडा देशात गेली तीन वर्ष दूरदर्शनवर दाखविण्यात येत असलेली
श्री. विष्णू माथुर यांनी कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनसाठी तयार
केलेल्या `उत्कृष्ट कडूनिंब झाड' ह्या फिल्ममुळे अमेरिकेत कडूनिंब
संशोधन मोठ्या प्रमाणावर चालू झाले आहे.

आशियाई विकास बॅकेनेही वनस्पती कीटकनाशकांच्या संशोधन
व प्रत्यक्ष वापरासाठी रू. 39 लाखांची मदत केलेली आहे. या मदती
मुळे कडूनिंबपेंड मिश्रित युरियाचा वापर, कडूनिंब तेल, कडूनिंब मगज,
कडूनिंब अर्काची भातशेतीत कीटकनाशक म्हणून फवारणी भारत,
फिलिपिन्स, बांगलादेश व चीनमध्ये त्यानुसार करण्यात येणार होती.
आंतरराष्ट्रीय भातसंशोधन संस्था लॉस बेनॉस (फिलीपीन्स) येथील
प्रसिद्ध कीटकशास्त्रज्ञ डॉ. रमेश सक्सेसांनी 4-5 वर्षे मोठ्या प्रमाणावर

पान नं. 82

कडूनिंब पेंड, तेल, मगजाचा वापर करून त्याचा फायदा भातशेतीला
होतो हे सिद्ध केले आहे.
तिसरी जागतिक परिषद नैरोबी (केनिया) येथे जुलै 1986
मध्ये आंतरराष्ट्रीय कीटक इंद्रिय विज्ञान केंद्रात भरली होती. व त्यासाठी
21 राष्ट्रांतील 75 शास्त्रज्ञ हजर होते.

मिसेन विश्वविद्यालयाचे (पश्चिम जर्मनी) प्रो. डॉ. स्मूटरर हे
तर आंतरराष्ट्रीय कडूनिंब परिषदा घडवून आणण्यात प्रमुख. त्यांनी
वरील परिषदेत सुरूवातीपासून आतापर्यत झालेल्या कडूनिंब संशोधनाचा
आढावा घेतला. व तो कीटकनाशक म्हणून एकमेव उपाय नसला तरी
लहान शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वस्त कीटकनाशकाचा पर्याय आहे.

नैरोबो येथे जे शोध-निबंध सादर झालेत. त्यांत सगळ्यांत
चांगला व उत्कृष्ट प्रबंध, केंद्रीय तंबाखू केंद्र राजमहेंद्री, आंध्र प्रदेश येथील
कीटक शास्त्रज्ञ श्री. बी. जी. जोशी यांचा होता. श्री जोशी 1972
पासून सातत्याने कडूनिंबावर संशोधन करताहेत त्यांचे संशोधनाचे
निष्कर्ष तर महत्त्वाचे आहेत परंतु आर्थिक दृष्ट्याही फार कमी खर्चाचे
आहेत.
1) कडूनिंब बियांच्या अर्काच्या तंबाखूवरील `सोडोपटेरा
लिटूरा',आळीस अन्नखाण्यापासून प्रतिबंध ( Antifeedand) करण्याची
( oviposition deterrent) करणारा म्हणून उपयोग, तंबाखूच्या नवीन
फुटणाऱ्या अंकुराचा नाश करण्याची कडूनिंब तेलाची ताकद, खाण्यास
वापरावयाच्या तंबाखूच्या लागवडीच्या वेळेस कडूनिंब पेंडीचा खत
म्हणून वापर व कडूनिंब सालीचा तंबाखूला मोझाईक व्हायरस होण्या-
पासून अटकाव करण्याची ताकद सिद्ध केली. श्री. जोशी यांनी आपल्या
संशोधनाचा फायदा आंध्र व तामीळनाडू मधील तंबाखू लागवड
करणाऱ्यांनाही दिला. व आता मोठ्या प्रमाणावर तंबाखूच्या रोप-
वाटिकेत कडूनिंब अर्काचा सर्रास वापर केला जातो. त्यांच्या संशोधनाने
असे सिद्ध केले की, 0.5 टक्के कडूनिंब मगज अर्काचे द्रावण हेक्टरी

पान नं. 83

5.62 किलोप्रमाणे फवारल्यास फक्त रू. 22 खर्च येतो. ( 1982 च्या
किंमतीप्रमाणे). तर रासायनिक कीटकनाशके, इंडोसल्फान, 33 टक्के
इ.सी. कार्बारिल 50 टक्के डब्ल्यू. पी. क्लोरोपायरोफॉस 20 टक्के
मोनोक्रोत्तेफॉस 40 टक्के यांना अनुक्रमे रू. 119, 120, 138 व
165 खर्च येतो, म्हणजे 5 ते 7 पटीने अधिक खर्च येतो.

तिसऱ्या जागतिक कडूनिबाच्या परिषदेने खालील मजकुराचा
ठराव एकमताने मंजूर केला. 1983 च्या (दुसऱ्या जागतिक) कडूनिब
परिषदेनंतर निरनिराळ्या देशांत शेतीवरील प्रयोगांत कडूनिंबाचा
कीटकनाशक म्हणून गुणधर्म जास्त प्रकर्षाने सिद्ध झाला आहे, असे
1986 च्या जुलैत नैरोबीत (केनिया) भरलेल्या तिसऱ्या आंतर-
राष्ट्रीय परिषदेत उपस्थित असलेल्या 21 राष्ट्रांतील शास्त्रज्ञांचे
एकमत आहे. या निष्कर्षामुळे परिषदेने जगातील विकसित व विकसन-
शील देशातील राज्यकर्ते, निर्णय घेणारे अधिकारी तसेच रोममधील
जागतिक अन्न परिषदेला खालील निर्णय कळविला आहे.

1) अविकसित देशात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कडू-
निंबाची झाडे आहेत तेथील शेतकऱ्यांना कीटकापासून संरक्षण देण्या-
साठी कडूनिंबाच्या मगजाचे पाणीमिश्रित अर्काचे द्रावण वापरण्याबद्दल
माहिती देणे.
2) सोपे औद्योगिक कलाशास्त्र उपलब्ध असलेल्या भागात
जोड प्रकल्प तसेच गावपातळीवर छोटे उद्योग उभारावे व त्यातूनच
कडूनिंब मगज अर्काचे साधे द्रावण देण्याची व्यवस्था करावी.
3) निरनिराळ्या देशांतील विस्तार योजनेमार्फत कडूनिंबाच्या
विविध घटकांपासून केलेल्या पदार्थाची प्रात्यक्षिके घ्यावीत. (कडूनिंब
बी अर्क, पाण्यातील द्रावण, ग्रॅन्यूल्स, तेल)
4) कडूनिंबापासून वरीलप्रमाणे पदार्थ बनविण्यासाठी केवळ
चांगलेच बी गोळा करण्यासाठी विस्तार योजनेतील अधिकारी वर्गाने
शेतकरी बंधूंना प्रवृत्त करावे.

पान नं. 84

5) ही परिषद, जळणाचे लाकूड, इमारतीचे लाकडू,
जमिनीची धूप रोखण्यासाठी, जमिनीचे पोत सुधारण्यासाठी तसेच
जमिनीची वाऱ्यामुळे होणारी धूपप्रतिबंधक अशा इतर कडूनिंबाच्या
उपयोगी गुणांना प्राधान्य देत आहे.
6) जेथे हवामान अनुकूल आहे तसेच आफ्रिकेच्या कमी
पावसाच्या भागात त्याची लावगड करण्याची विशेष जरूरी.
7) कडूनिंब संशोधन व त्या संशोधनाचा वापर करणाऱ्यां
सर्व प्रकल्पांना मदत देणाऱ्या संस्थांनी सर्वतोपरी अर्थसहाय्य करण्याची
जरूरी आहे.
वरील परिषदेच्या वेळेस एका इंग्लिश भित्तीपत्रकाने सगळ्यांचे
लक्ष वेधून घेतले होते. त्याचा मराठी अनुवाद असा. `आता परत
भोपाळसारखी दुर्घटना नको. परिणामकारक, निरूपद्रबी, स्थानिक,
अनेक प्रयोगांनी सिद्ध, स्वालंबी, निसर्गाचे संतुलन राखण्यास योग्य
तर उपद्रवी व रासायनिक विषारी कीटकनाशकाला पर्याय असलेले
कडूनिंबाचे झाड लावा.'

निंबोळी अर्क

निंबोळी अर्क (पाण्यातील अर्क) तूर व हरबऱ्यावरील घाटे
आळीकरिता एक `स्वस्त मस्त' कीडप्रतिबंधक वनस्पतिजन्य
कीटकनाशक आहे. निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत (पाच किलो
बीचे प्रमाण उदाहरण म्हणून घेतले आहे.)
1) कडूनिंबाच्या आपोआप जमिनीवर पडलेल्या, पिवळ्या
व तजेलवार अशा बिया घ्या त्या स्वच्छ करा. चांगल्या वाळवा.
2) वाळलेल्या बियांची भुकटी करा. व ती पातळ कपड्यांना
सैल बांधा.
3) बादलीत 10 लिटर पाणी घ्या. त्यांत वरील कापडाची
पुरचुंडी भिजत ठेवा.

पान नं. 85

4) हे काम फवारणीपूर्वी एक दिवस आधी करा. म्हणजे 12
तासांच्या अवधीत भुकटीला व भिजण्याला व पाण्याशी एकजीव
होण्याला पूर्ण संधी द्या. फवारणीच्या वेळेस पुरचुंडी काढताना ती
जोरदार पिळा म्हणजे पुरचुंडीत तयार झालेला अर्क बादलीतील
पाण्यात पडून एक चांगले रसायन तयार होईल. आयुर्वेदात आपण
काढे करतो त्यातलाच हा एक परंतु निराळ्या पद्धतीने करावयाचा
प्रकार आहे. व कापडातील चौथा शेतामध्ये फेकावा.
5) वरील बादलीत जे रसायन तयार झाले आहे ते गाळा
(वस्त्रगाळ करावे) व त्या वस्त्रगाळ केलेल्या द्रावणात 200 ग्रॅम
वनस्पतिजन्य साबण टाकावा. (निंबोळी साबण ) त्यामुळे द्रावण
झाडावर चिकटेल व इष्ट परिणाम दिसतील. वरील द्रावणात 100
लिटर पाणी घालावे म्हणजे 5% क्षमतेचे होईल. घाटे अळीचे नियंत्रण
करण्याकरिता हे द्रावण हेक्टरी 500 लिटर लागते.
टोगो देशात या अर्कचा वापर गवती टोळांसाठी केला आहे.
कडू चवीमुळे ते पीक खात नाहीत.

जॅकोबसन (1975) कीटकशास्त्रज्ञ, शेतकीखाते अमेरिका 500
ग्रॅम कडूनिंबाच्या बियांचा अर्क 400 लिटर पाण्यात काढण्याची
शिफारस केली आहे. हे द्रावण एक एकरास पुरेसे असते. रेडनॅप
(1981) गॅम्बियातील या शास्त्रज्ञाने 15 लिटर पाण्यात 2 किलो
निंबोळी अर्क मिक्स वापरून तयार केला व एक आठवड्याच्या अंतराने
फावरणी केली. या द्रावणाचा वापर केल्याने फ्ली बीटल, पाने खाणारे
ठिपक्यांचे भुंगेरे व लिंबावरील फुलपांखरे (लेमन बटरफ्लाय) यांची
वाढ थांबल्याचे आढळून आले. हे द्रावण 3-4 दिवस अंधाऱ्या जागी
ठेवल्यास ते परिणाणकारक राहते.

महाराष्ट्रात प्रा. शिवचरण ठाकरे, श्री. रमेश गोहोकार, प्रा.
प्रकाश धवधवे, या कृषि शास्त्रज्ञांनी तूर व घाटेआळीवर या द्रावणाचे
यशस्वी प्रयोग केलेले आहेत.

पान नं. 86

फवारणी केव्हा करावी ?

वरील पद्धतीनुसार तयार केलेले द्रावण तूर व हरभरा या
पिकांवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्या तसेच घाटे आळी यांच्या नियंत्र-
णार्थ फवारल्यास ह्या किडींच्या नुकसानीस आळा बसून उत्पादनात
लक्षणीय वाढ झाल्याचे लक्षात येईल.

पीक कळ्यावर असताना (bud formation) पहिली फवारणी
करावी. दुसरी फवारणी पीक साधारणपणे 50 प्रतिशत फुलोऱ्यायावर
असताना व तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर पंधरा दिवसांच्या
अंतराने दाणे भरत असताना करावी. अशा प्रकारे कमीत कमी तीन
वेळा निंबोळी अर्काचे द्रावण फवारल्यास किडीचा नाश होऊन उत्पा-
दनात हमखास वाढ होईल.

निंबोळी तेल

निंबोळी तेल हिरवट. तपकिरी रंगाचे, न सुकणारे, तीव्र वासाचे
असून त्यांत ओलेईक आम्लाचे प्रमाणे 50 ते 60 टक्के असते. या
तेलाचा मुख्यत्वे करून साबण तयार करण्यासाठी वापर होतो.

धान्य व बियाणे कडूनिंब तेल लावून साठविल्यास त्यांच्यावरील
सोंडे, खापरा, पिठातील लाल भुंगे, वगैरे कीटकांपासून संरक्षण
मिळते. 100 किलो धान्य अथवा बियांना फक्त 800 मि.ली.
निबोळी तेल लावल्यास पुरते. प्रमाण 6.39 टक्के, प्रथिने 16.00
तोथा 24.20, पिष्ठमय पदार्थ 35.10, राख 15.00, तेल 2.31
टक्के असते. गंधक इतर पेंडीपेक्षा थोडे अधिक असते. कडू पेंडीत 1
टक्का गंधक खनिज असते.

100 किलो धान्य अथवा बियाला फक्त 800 मि.ली.
निंबोळी तेल लावल्यास हे धान्य 210 दिवस कीटकांपासून पुष्कळ
प्रमाणात सुरक्षित राहते. निंबोळी तेल विरहीत साठविलेला मका,
ज्वारी, वाटाणा, हरभरा यांत अनुक्रमे 28,19,12 व

पान नं. 87

13 टक्के नुकसान आढळून आले तर याउलट निंबोळी तेल
लावल्यानंतर हेच प्रमाण अनुक्रमे 12,11,12 व शून्य असे होते.
याचा अर्थ निंबोळी तेला उपयोग केल्यास धान्य व बी-बियाण्यात
अनुक्रमे 5 व 12 टक्के निश्चित फायदात होतो असे आढळून आले
आहे. भारतीय कृषि अनुसंधान, कोईमतूर शाखेने कपाशीवरील
पांढऱ्या माशीपासून कडूनिंब तेलाच्या वापराने संरक्षण मिळते अशीही
शिफारस केलेली आहे. 1 लिटर पाण्यात 5 मि.ली. निंबोळीचे तेल
मिसळावे. त्यामध्ये 1 ते 2 मि.ली. `टिपॉल' (द्रव साबण) मिस-
ळावे. हाय व्हॉल्युम स्प्रेअरने ह्या द्रावणाची कापसाच्या पिकावर
फवारणी करावी. त्यामुळे 80 ते 85 टक्के पांढरी माशीची पिले
मरतात, निंबोळी तेलाचे 10 टक्के द्रावण वापरल्यास तंबाखूच्या
डिप्या (Suckers) वाढत नाहीत त्यामुळे हेक्टरी 130 वाळलेल्या
पानांचे अधिक उत्पादन मिळते. प्रति हेक्टरी 75 लिटर मिश्रण
लागते.

अशा प्रकारे सोयाबीन, सूर्यफूल, कडधान्ये, वांगी, भेडी इत्यादी
पिकांवरही यांचा उपयोग करता येईल.

कडूनिंब भुकटी

कडू निंबाच्या निंबोळ्या वाळल्यानंतर जी भुकटी करतात
तीच कडुनिंब भुकटी. भुकटी म्हणजेच पावडर 150 ते 300 ग्रॅम
कडूनिंब भुकटी, 300 ते 600 लिटर पाण्यात मिसळून पिकांवर
फवारळ्यास 15 ते 20 दिवसांत टोळांपासून संरक्षण होते. भाजीपाला
व फळांवर हे विशेष परिणामकारक ठरते.

शास्त्रज्ञांनी असे संशोधित केले आहे की, निंबोळी भुकटी
पिकांवर फवारल्यानंतर टोळ, भुंगे व अळ्या पिकांवर किंवा साठ-
विलेल्या धान्यावर बसतात, परंतु पिके व धान्ये ते खात नाहीत. कारण
त्या कडूपणाला टिकू शकत नाहीत. त्यामुळे त्या मरतात काही
कीटक जीवंत राहिले तर ते अपंग बनतात. त्यांची अंडी नष्ट होतात.

पान नं. 88

पिले व राहिलेली अंडी वांझ असतात. प्रजोत्पादन होत नाही. कीटकात
दोष निर्माण होतात.

अशा रीतीने आयुर्वेदाने गौरविलेला हा कल्पवृक्ष आता. `राज-
वृक्ष'ही ठरला आहे. श्री.च.म.केतकर यांनी 1977 साली जगात
प्रथम कडूनिंब व त्याचे उपयोग `हा संशोधनाचा रिपोर्ट अखाद्य तेल
व साबण उद्योग, खादी ग्रामोद्योग, आयोग, पुणे यांच्यासाठी प्रसिद्ध
केला. त्यांत गेल्या 100 वर्षातील कडूनिंबाबाबतच्या जगातील सर्व
संशोधनांचा आढावा घेतला आहे.

कडूनिंब पेंड (ढेप)

कडूनिंबाच्या बियांच्या वरचा गर काढून नंतर टरफल वेगळे
काढल्यावर मगज घाणीत किंवा एक्स्पेलरमध्ये गाळल्यावर 30 ते 40
टक्के तेल मिळते. घाणीत एक्स्पेलपेक्षा 4-5 टक्के तेल कमी मिळते.
त्याचप्रमाणे घाणीतून काढलेल्या पेंडीत 4-5 टक्के तेल जास्ती राहते.
कडूनिंब पेंडीत राहिलेले तेल सॉलव्हंट एक्स्ट्रॅशन प्लॅन्टमध्ये गाळ-
ल्यास 7 ते 9 टक्के तेल मिळते. कडूनिंबाच्या पेंडीत (ढेपीत) तेल व
नत्राचे प्रमाण कडूनिंब, निंबोळ्या, बी, मगज यातील तेल कोणत्या
पद्धतीने उदा. घाणीतून एक्स्पेलर व सॉलव्हंट काढतात यावंर अवलंबून
असते.

कडू पेंड हे सेंद्रिय खत आहे. या पेंडीत 2 ते 3 टक्के नत्र, 27
टक्के स्फुरद, व 20 टक्के पालाश असते. कडूनिंब पेंडीं अर्काची लिंबू
वर्गीय फळझाडांच्या पानांवर फवारणी केल्यास पाने पोखरणाऱ्या
अळीचे नियंत्रण होते. एक लिटर पाण्यात 300 ग्रॅम निंबोळीची पेंड
भिजत घालून त्या अर्काची फवारणी केल्याने सूर्यफुलातील बी आणि
मक्याचे कणसातील दुधावर असलेले दाणे पोपट व कावळे खात
नाहीत.

पान नं. 89

ह्या सर्व संशोधनाचा परिणाम म्हणजे जगातील पहिले कडू
निंबापासून बनविलेले कीटकनाशक `मार्गोसान' अमेरिकेत तयार झाले.
त्याला इ.पी.ए.ने. मान्यता दिली. भारतातील एन.सी.एल.
पुणे, हैद्राबादमधील आर.आर. एल.सारख्या राष्ट्रीय प्रयोग संस्था
तसेच कित्येक खाजगी कंपन्या कडूनिंब संशोधनावर पैसा खर्च करून
कीटकनाशके निर्माण करीत आहेत.

महाराष्ट्र राज्य शेती खात्याने तुरीच्या पिकांवर कडूनिंबाच्या
अर्काचा वापर करून कीटकापासून संरक्षण मिळविण्यासाठी अर्क किती
व केव्हा वापरावयाचा त्याची मे 1985 मध्ये प्रसिद्ध केलेली शिफारस
पत्रिका, तसेच भारतीय कृषि अनुसंधान, कोईमतूर व महाराष्ट्रातील
पंजाबराव कृषि विद्यापीठ अकोला यांचे बाबतीत संशोधन चालू
आहे.

कडूनिंबाचे अर्थशास्त्र

महाराष्ट्रात कडूनिंबाची झाडे भरपूर आहेत. कडूनिंबाची लागवड
इतर कुठल्याही वृक्षापेक्षा फायदेशीर आहे.

झाड लावल्यानंतर 5 ते 6 वर्षानी त्यास फलधारणा होते.
एका झाडापासून मिळणारे उत्पन्न :
1) निंबोळ्या - 40 किलो.
2) त्यापूसन निघणारे तेल- 2.5 किलो( 35 ते 45 टक्के).
3) कडूनिंब ढेप- 10 ते 12 किलो.
4) कडूनिंब तेली ढेपेचा प्रतिकिलो भाव रू (1990) रू.
1 ते 1-50
5) उपयुक्त भाग-पंचाग. परंतु निबोंळीत कीटकनाशकाचे
( अझाडिराक्टीन) प्रमाण जास्त असते.

पान नं. 90

कडूनिंब कीटकनाशक, किडीला अप्रिय ( Repellent), अखाद्य
( Antifeed effect) वाढ थांबविणारे, बुरशीनाशक व सूत्रकृमिनाशक
गुणधर्माने युक्त आहे. याची लागवड दक्षिणपूर्व आशिया, पूर्व आफ्रिका,
साहेल, फिजी, मॉरिशस व मध्य अमेरिकेत करतात. या प्रमाणे
सीतापळाची पाने, कच्ची फळे. व मुळ्या यांत कीटकनाशक
गुणधर्ण आहेत. लाला मिरचीतही कीटकनाशकाचे गुणर्धम आहेत.
तसेच लसूण, वेखंड, हळद, शेवगा, पपई, टोमॅटो इत्यादी वनस्पतींतही
ते आहेत. परंतु कडूनिंबाच्या बिया जशा विपुल व स्वस्त मिळतात
तशा प्रकारात वरची एकही वनस्पती बसत नाही. म्हणून या वनस्पतींची
फक्त नावेच दिली आहेत.

सब्जा - सब्जा तेलाचे 2 टक्के इमल्शन पिकावर फवारल्याने
मावा, कोलोरागो, भुंगेरे, माशा, मशांच्या अळ्या, डास, बटाटाच्यी
पाकोळी, स्पायडर माईट ह्या किडींचे नियंत्रण होते.

जमाल गोटा- ( Croton tighum) जमाल गोट्याचे बी वाटून
पाण्यात अर्क काढावा. ह्या द्रावणाच्या फवारणीने मावा किडींचे नियंत्रण
होते.

जमाल गोटा ही वनस्पती सर्रास आढळत नाही. कोकणात
वगैरे ठिकाणी नैसर्गिक अवस्थेत ही झाडे तुरळक प्रमाणात आढळतात.
आयुर्वेदात उत्तम रेचक म्हणून त्याचा उपयोग होतो. परंतु जमाल
गोटा वर्गातील दुसरी प्रजाती `वनएरंड' ही, ज्याची सध्या मोठ्या
प्रमाणावर लावड सुरू झालेली आहे. खाद्य तेलांचा अपुरा पुरवठा
भासू लागल्यानंतर मुंबई मेथील गोद्रेज कंपनीने, वनएरंडाचे बी विकत
घ्यावयाचे ठरविले व नासिक जिल्ह्यातील निफाड येथील सामाजिक
कार्यकर्ते व माजी मंत्री व निलगिरी वृक्ष लागवडीला ज्यांनी मोठ्या
प्रमाणावर चालना दिली ते मा. विनायकरावजी पाटील यांनी वन-
एरंडाची मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू केली. शिवाय ही झाडे, कुंपणे
म्हणून लावण्यासाठी पूर्वीपासून आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर

पान नं. 91

उपयोगात आणत आहेत. शिवाय ही झाडे नाला-नदी-पाणथळाच्या
काठीही आढळतात. तात्पर्य ही झाडे म्हणजे जाट्रोपा-इंद्रज्योत-वनएरंड
आपल्याकडे भरपूर आहेत व त्यांची पाने जंतुनाशक आहेत. त्यांची
पावडर करून ती पिकांवर जमाल गोट्याऐवजी वापरावी. मात्र
वनएरंडास जमाल गोटा म्हणून काहीजण संबोधितात ते पूर्णपणे
चुकीचे आहे. जमाल गोट्यास जयपाळ असेही म्हणतात. तर वनएरंडास
मोगली, एरंड, चंद्रज्योत व इंग्लिश मध्ये Jatropa असे म्हणतात.

निलगिरी - एक कि.ग्रॅ. कडधान्यात 10-12 निलगिरीची पाने
मिसळावी. कडधान्याचे किडीपासून संरक्षण होते. निलगिरीच्या पाना-
वर बटाटे साठवावे म्हणजे पाकोळीपासून संरक्षण होते.

शेवगा - पेरणीपूर्वी एक आठवडा आधी वाफ्यातील जमिनीत
शेवग्याची पाने मिसळावी म्हणजे नर्सरीतील (वाफ्यातील) रोपांचे
बुरशी रोगांपासून संरक्षण होते.

पपई- एक ग्रॅम पपईची पाने बारीक करून एक लिटर पाण्यात
मिसळून चांगली हलवावी. नंतर कापडात रस पिळून काढावा. एक
लिटर रसात 4 लिटर पाणी मिसळावे (अडीच लिटर पाण्यात 10
ग्रॅम साबण मिसळावे) ह्या द्रावणाची कॉफीचे झाडावर फवारणी
केल्याने तांबेरा व भूरी रोगाचे नियंत्रण होते.

टोमॅटो टोमॅटोच्या खोडाचे बारीक तुकडे करावे आणि
तेवढ्यात पाण्यात( वजनाने) पाच तास भिजत ठेवावे. हे द्रावण
कापडातून पानकोबी पिकावर फवारावे चौकोनी ठिपक्यांचे पतंग
पिकावर उडताना दिसले की, फवारणी करावी त्यामुळे पतंगाच्या
शरीराची आग होते आणि मादी पिकावर अंडी घालत नाही.

पुदिना- वाटलेल्या पानांची भुकटी भुंगेरे नियंत्रणासाठी
वापरावी. तेलाचाही उपयोग होतो.

हळद - हळदीच्या कंदाचा उपयोग पीकसंक्षणासाठी होतो.
पेरीज या शास्त्रज्ञाने 1985 साली श्रीलंकेत पुढील प्रयोग केला.

पान नं. 92

हळदीच्या मुळ्या कुटून त्यात गोमूत्र मिसळले. या मिक्षणात 1:2
आणि 1:6 प्रमाणात पाणी मिसळले. त्यापासून अळ्यासाठी फवारणी
करून पीक संरक्षण केले.

`अँग्रिकोल' ही स्वित्झर्लंड ह्या देशातील विकासशील शेतक-
ऱ्यांची सेवा करणारी संस्था आहे. त्या संस्थेतील एक कार्यकर्ते श्री.
गॅबी स्टोल यांनी अनेक देशांतील शेतकऱ्यांच्या अनुभवांची माहिती
गोळा करून ती Natural Crop Protection in the Tropics (उष्ण
कटिबंधातील नैसर्गिक पीक संरक्षण) ह्या पुस्तकात प्रसिद्ध केलेली
आहे. विकासशील देशातील गरीब शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशके
महाग पडत असल्याने ती ते वापरत नाहीत. त्यांना ह्या पुस्तकातील
वरील माहितीचा उपयोग होईल. डॉ.बा.ब राहुडकर यांनी बळीराजा
जुलै 1990 च्या अंकात `वनस्पतिजन्य कीटकनाशके' हा पान नं.
40 ते 45 वर लिहिलेला लेख व श्री. च.म. केतकर यांची वर्तमान-
पत्रातील लिखाणे यांचा मला वरील लेख लिहिताना फारच फायदा
झाला आहे.

*
"
﻿
प्रमोद दामले
03-07-25
Marathi
किंमत - 50/- रुपये.
एकूण पाने :- 26
FROM 8 TO 81

पान नं. - 8

प्राथमिक माहिती

आजकाल वर्तमानपत्र चाळताना बऱ्याच वेळा 'हवामानाच्या अंदाजासाठी
संगणकाचा वापर', 'संगणकाच्या चुकीमुळे बिल शुन्य रुपये' अशा अनेक
मथळ्यांमधून संगणक (computer) हा विषय आपले लक्ष वेधून घेतो.
कंपन्यांची लाभांशपत्रे ( dividend warrents) विद्यापीठाच्या गुणपत्रिका
( Mark-sheets) इ. संगणकांद्वारा छापलेल्या कागदपत्रांमुळे आपला
संगणकाशी अप्रत्यक्ष संबंध येतो, तर मुंबई-दिल्ली अशा शहरात रेल्वेचे तिकीट
काढण्याच्या निमित्ताने काहीजणांनी संगणक पाहिलाही असेल. परंतु या
साऱ्यामुळे संगणकाविषयी काही बोध न होता आपली जिज्ञासा अधिकच वाढते.
व संगणक म्हणजे नेमके आहे तरी काय, त्याचे कार्य व रचना कशी आहे इ.
प्रश्न अनुत्तरितच राहतात.

या विषयाची माहिती वाढत्या तपशिलाने घेण्यापूर्वी इतर साऱ्या यंत्राच्या
तुलनेत संगणकाचे वेगळेपण जाणून घेणे आवश्यक आहे. दोहांमधील ठळक
फरक हाच की, अन्य यंत्रे ही शारीरिक हालचालींना पर्याय म्हणून अस्तित्वात
आली, तर संगणक हा मानवी मनाच्या विविध क्षमतांना डोळ्यासमोर ठेवून
बेतण्यात आला. चालण्याला पर्याय म्हणून वाहने तयार करण्यात आली,
शेतकामातील बैलांच्या वापराऐवजी ट्रॅक्टरची योजना करण्यात आली, अशी
कितीतरी उदाहरणे बाकी यंत्रांच्या बाबतीत देता येतील . संगणक मात्र
आकडेमोड, तुलना, स्मरणशक्ती अशा बुद्धीच्या पैलूंची प्रतिकृती म्हणून
विकसित करण्यात आला. शरीराच्या तुलनेत मनाचे कार्य जसे अमूर्त व बहुविध
क्षमतांनी युक्त आहे, तसे संगणकाचे कार्यही अमूर्त व बहुगुणी आहे.

पान नं. - 9

साहजिकच संगणकाचा उपयोग सुद्धा जीवनातील नानाविध क्षेत्रांत अनेक
तऱ्हांनी करून घेता येतो.

सुरुवातीच्या काळात संगणकाचा वापर लष्करी कारवायांपुरता मर्यादित
होता. दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या द्रुतगतीने जहाजांवर तोफा डागताना
दिशा, वेग व अंतर या साऱ्या गोष्टींची आकडेमोड करून तोफेचा कोन
साधेपर्यंत जहाडज बरेच दूरवर निघून जाई . तेव्हा चटकन गणिते सोडवण्यासाठी
प्रथमच संगणकाचा वापर करण्यात आला. युद्धोत्तर काळात कार्यालयीन
हिशेबासारखे अन्य कामकाजही संगणकाकडे सोपवण्यात आले आणि
लष्कराप्रमाणे मुलकी व्यवहारांमध्ये संगणकाचा प्रवेश झाला.

संगणकाचे दोन मुख्य प्रकार म्हणजे ऑनालॉग व डिजिटल हे होत. यापैंकी
ऑनलॉग संगणक हा विद्युतदाब, तपमान इं. विविध घटकांवर लक्ष ठेवून
त्यानुसार अन्य घटकांचे नियंत्रण करण्याकरिता उपयुक्त असून तो केवळ
कारखान्यामधील उत्पादनप्रक्रियांच्या नियंत्रणासारखा काही विशिष्ट
कामांपुरताच वापरला जातो, तर डिजिटल प्रकारचा संगणक हा फक्त
आकडयांवरच आपले कार्य करू शकत असूनसुद्धा दैनंदिन जीवनात अनेक
प्रकारे व मोठया प्रमाणात वापरला जातो. ऑनलॉग संगणकापेक्षा हा दुसरा
प्रकार इतक्या बहुसंख्येने आढळतो की, नुसते संगणक म्हटल्यास त्याचा अर्थ
सहसा डिजिटल संगणक असाच घेतला जातो. यापुढे येणारी सारी माहिती
डिजिटल संगणकाविषयी आहे आणि म्हणूनच त्याचा उल्लेख यानंतर केवळ
'संगणक' असा केला आहे.

फक्त आकडे हाताळू शकणारी ही यंत्रणा यच्चयावत साऱ्या प्रकारचे कार्य
पार पाडण्याइतक्या बहुद्देशीय रीतीने कशी काय वापरता येते, हा प्रश्न आता पुढे
येणे स्वाभाविक आहे. त्याची उकल करण्याकरता आपण संगणकाच्या मूलभूत
क्षमता नेमक्या काय आहेत ते पाहू या.

1. माहिती (data) स्वीकारणे , जतन करणे. त्यात सूचनेनुसार बदल करणे
व जरूर तेव्हा ही माहिती पूर्णतः अथवा अंशतः उद््धृत करणे,

2. बेरीज, वजाबाकी , गुणाकार आणि भागाकार ही आकडेमोड करणे आणि

3. दोन संख्यांची तुलना करून त्यायोगे दोन पर्यांयामधून एक पर्याय
निवडणे.

पान नं. - 10

या केवळ तीन तऱ्हेच्या कार्यशक्तींच्या जोरावर प्रत्यक्षात मात्र
थक्क करून सोडणाऱ्या करामतींनी हरतऱ्हेची कामे करतो, यावर प्रथमदर्शनी
विश्वास बसणार नाही, परंतु अकौंटन्सी इमला जसा तीन सर्वज्ञात
साध्या नियमांवर आधारला आहे किंवा चराचरातील सर्व चलवस्तूंची गती
न्यूटन या विख्यात शास्त्रज्ञाने जशी फक्त तीन सूत्रांत समाविष्ठ केली आहे
तसाच काहीसा प्रकार आहे. उदाहरणादाखल आपण रेल्वे स्थानकावरील
आरक्षणाचा एक भाग घेऊन त्याची फोड कशी करता येते, ते बघू या.

समजा , राजधानी एक्सप्रेस दि. 14-5-92 चे एक आरक्षण आपल्याला
करायचे आहे. व्यवहारातील या क्रियेचे रूपांतर छोटया छोटया मूलभूत
क्रियांमध्ये असे सुलभ करता येईल.

क्रमांक कामाची फोड मूलभूत क्षमता

1. सर्व रेल्वे गाडयांची नावे, क्रमांक माहिती स्वीकारणे व
आणि उपलब्ध जागांची संख्या जतन करणे.
इं तपशील संगणकात भरणे.

2. दि. 14-5-92 रोजी सुटणाऱ्या माहिती भागशः
राजधानी एक्सप्रेसमधील शिल्लक उद््धृत करणे.
जागांची संख्या दर्शवणे.

3. शिल्लक जागा शून्य का अधिक ? दोन संख्यांची तुलना.

4. शून्य असल्यास नकार दर्शवणे दोनपैकी एका पर्यायाची
अन्यथा शिल्लक जागांची संख्या निवड, आकडेमोड,
एकाने कमी करून ती माहिती सूचनेप्रमाणे माहितीत
पुन्हा जतन करणे. बदल करणे.

क्लिष्ट अशी प्रक्रिया पायरीपायरीने छोटया व सोप्या क्रियांमध्ये कशी
विभागता येते, हे तर यावरून समजेलच, शिवाय अजून एक मुद्दा आपल्या
लक्षात येईल की, कामाच्या दृष्टीने जरूर ती सारी माहिती बिनचूकपणे
पुरवल्याखेरीज संगणकास अर्थपूर्ण काम करता येणार नाही. रेल्वे गाडीच्या
उपलब्ध जागांची संख्या जर चुकीची पुरवली गेली , तर आरक्षणाच्या कामात
काय सावळा गोंधळ उडेल त्याची कल्पनाच केलेली बरी. दिलेली माहिती
चुकीची असल्यास संगणकाद्वारे संकलित होणारी माहितीदेखील चुकीचीच

पान नं. - 11

असणार. यालाच इंग्रजीत 'Garbage In, Garbage out, अथवा , GIGO
म्हणतात.

आणखी एक गोष्ट या उदाहरणावरून स्पष्ट होईल . ती अशी की, रेल्वेच्या
आरक्षणाचे कामकाज कसे चालते त्याविषयी म्हणजेच जे काम संगणकाकरवी
करून घ्यायचे त्याचे नियम , रीत या गोष्टी संगणकास कुणीतरी सूचनांच्या रूपाने
द्यावयास हव्यात. या अनेकवचनी सूचनांना सूचनावली किंवा आज्ञावली
म्हणतात. एका सूचनावलीस इंग्रजीत program म्हणतात, तर एकंदरीत साऱ्या
सूचनावलींना समूहवाचक असा Software हा शब्द वापरला जातो.
माहितीप्रमाणे या सूचनावलीसुद्धा संगणकावर जतन केल्या जातात.

सूचनावली व माहिती या दोन्ही अमूर्त / अदृश्य स्वरूपाच्या आहेत.
याउलट संगणकाची उर्वरित अशी दृश्य स्वरूपातील उपकरणे आहेत. त्यास
यंत्रसामग्री (Hardware) म्हणतात. थोडीश दुर्बोध होत चाललेली ही संकल्पना
ध्वनिफीत ( Casette ) व टेपरेकॉर्डर यांच्या उदाहरणाने स्पष्ट करता येईल.
ध्वनिफीत व टेपरेकॉर्डर ही यंत्रसामुग्री म्हणता येईल व उपमा द्यायची झाल्यास
त्यावरील अदृश्य अशा गाण्यास सॉफ्टवेअर म्हणता येईल.

सूचनावलीविषयी एक ठळक वैशिष्टये असे की, त्यातील सूचना अतिशय
सविस्तर व इतक्या बारकाव्यानिशी द्याव्या लागतात. की जगातील सर्वात
रेम्याडोक्या माणसालासुद्धा त्या तितक्या तपशिलात सांगाव्या लागणार नाहीत
या सूचनांची भाषा आपल्या बोलीभाषेपेक्षा खूपच निराळी असून त्याविषयी
आपण योग्य ठिकाणी (प्रकरण 11) माहिती घेणार आहोतच, पण सांप्रत
बोलीभाषेचा स्पष्टीकरणापुरेसा आधार घेतल्यास असे म्हणता येईल की,
'एखादा अहवाल छापताना प्रत्येक पानावर 50 ओळीच घ्या.' इतपत सरळसोट
सूचनेने '50 ओळी पूर्ण झाल्यास अन्य काही लिहिण्यापूर्वी पुढच्या पानाकडे
जा ' , 'तेथे सर्वप्रथम पान क्रमांक एकने वाढवून लिहा ', 'मजकूर छापण्यापूर्वी
शीर्षकाच्या ओळी लिहा.', ओळींच्या संख्येसाठी वापरावयाची चल संख्या परत
वापरण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यातील 50 हा आकडा काढून त्याऐवजी शून्य
आकडा भरा . असे छोटे घास करून मगच ते आदेश संगणकास देता येतील.

महाग अशी यंत्रसामुग्री (Hardware) आणि बराच वेळ, बुद्धिकौशल्य
खर्ची घालून केलेल्या सूचनावली, या दोन घटकांनी बनलेला संगणक

पान नं. - 12

खरोखरीच किफायतशीर आहे, का त्यामुळे आर्थिकदृष्टया नफ्यावर निष्कारण
ताण पडणार, अशी शंका येणे स्वाभाविक आहे. या बाबतीत संगणकाची तुलना
रबरी शिक्क्याशी करता येईल. शिक्का रबरातून कोरून काढणे हे जसे वेळ
घेणारे काम आहे, तसेच सूचनावली लिहिण्याचे. एकदा शिक्का तयार झाल्यावर
तो जास्तीत जास्त कागदांवर मारून त्याची किंमत जशी वसूल करता येते.
तद््वत संगणकही माहितीचे संस्करण ( Data processing ) करण्याकरिता जितका
अधिकाधिक उपयोगात आणला जाईल तसतशी वेळ व पैशाची गुंतवणूक
हळूहळू सत्कारणी लागेल व एका विशिष्ट टप्प्यानंतर त्याची खरी फळे चाखता
येतील. पाच-पंचवीस रुपयांचा शिक्का टेबलाच्या खणात पडूल राहिला तर
फारसे बिघडणार नाही. या उलट संगणक धूळ खात पडल्यास होणारे नुकसान
लाखाच्या घरात सहज जाईल, हे मात्र आवर्जून ध्यानी घेतले पाहिजे.

प्रास्तविकाच्या या प्रकरणाचा अखेरीस आता संगणकाची व्यवच्छेदक
लक्षणे म्हणावीत, अशा गुणविशेषांकडे एक दृष्टिक्षेप .

1. माहिती-संस्करणाचा विद्युत वेग

तोफा डागण्यासारख्या कारवायामंध्ये वेळेची बचत करण्यासाठी
निर्मिलेला संगणक आता प्रक्षेपणास्त्र भेटण्याइतकी दुष्कर कामे निमिषार्धात
करण्याइतका वेगवान बनविण्यात येतो. नागरी जीवनातील उदाहरण द्यायचे
झाल्यास एखाद्या मोठया संस्थेतील हजारो लोकांचे पगारपत्रक करण्याचे काम
संगणक एका दिवसात , किंबहुना काही तासातच हातावेगळे करू शकतो. इतका
त्याचा वेग जबरदस्त आहे.

2. विस्तृत माहिती साठवणे व त्यातील सर्व वा वेचक भाग उद््धृत करणे

काही लाखांच्या संख्येने येणाऱ्या विदेशी पर्यटकांची माहिती ( देश,
पासपोर्ट- व्हिसा तपशील ) मोठया संगणकावर सहजगत्या ठेवता येते व
त्यातून एखाद्या विशिष्ट देशातून येणाऱ्यांची नावे वा संख्या किंवा एका विवक्षित
प्रवाशाची माहिती मिळवणे संगणकाद्वारे सुलभ झाले आहे.

पान नं. - 13

3. बिनचूकपणा

सूचनावलीच्या चाचण्या घेऊन मगच ती वापरात आणली जाते.
मनुष्यमात्राकडून चूक होण्याची शक्यता बऱ्यापैकी असली, तरी सूचनावली व
यंत्राकडून होणारे काम 99.99% अचूक आहे असे म्हणता येईल.

4. सातत्य

माणसाच्या कामातील उत्साह व कार्यक्षमता या दोन्ही बाबी वेळ काढत
जाईल तसतशा घसरणीला लागतात. यास्तव शंभर गणिते एका बैठकीत आपण
सोडवल्यास एक ते शंभर या गणितांमध्ये चुकांचे प्रमाण हळूहळू वाढत जाईल.
याउलट संगणक हे यंत्र असल्यामुळे त्याच्याकरवी सोडवलेल्या गणितामध्ये
पहिल्या गणिताइतकेच शंभरावे व लाखावे गणित बिनचूक असेल.

5. व्यावसायिक कौशल्याचे व ज्ञानाचे वितरण

चमत्कारिक वाटणाऱ्या या वैशिष्टयाची अभूतपूर्वता मननीय आहे. निष्णात
अशा हिशोबनिसांनी लिहिलेल्या सूचनावलीच्या प्रती बाजारातून आणून व
आपल्या संगणकात वापरून हिशोबातील विशेष माहितगार नसणारे अनेक
व्यापारी आपल्या कीर्द, खतावण्या, ताळेबंद जमवू शकतात. तसेच विशेषज्ञ
डॉक्टरांच्या शल्यचिकित्सेचा अभ्यास करून त्याचे सार सूचनावलीद्वारे
सर्वसामान्य वैद्यकीय व्यवसाय कऱणाऱ्या अनेक डॉक्टरांना उपलब्ध होऊ
शकते. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील.

6. माहितीचे अनेक छोटे अंश एकाच वेळी अनेकांना उपलब्ध करून देणे

यापूर्वी अशक्य कोटीतील अशा या सध्याच्या क्षमतेमुळे अगणित लोकांचा
वेळ वाचतो. या प्रकरणाच्या सुरुवातीचे राजधानी एक्सप्रेसचे उदाहरण घ्या.
इतके दिवस अशा गाडयांच्या आरक्षणाचे एकगठ्ठा अशा वही वा पुस्तकाच्या
स्वरूपातील सारे तपशील एका वेळी एकाच खिडकीपुरते व एकाच प्रवाशापुरते
सीमित राहत असत. आता संगणकाच्या प्रयोगाने कोणत्याही गाडीचे आरक्षण
कोणत्याही खिडकीतून करता येते. त्यामुळे खोळंबा होण्याची शक्यता नाममात्र

पान नं. - 14

राहते.

7. जागेची बचत

दुसऱ्या क्रमांकातील प्रवाशांच्या माहितीचे उदाहरण घ्या. लक्षावधी
प्रवाशांची सर्व तपशिलासह माहिती साठवण्यासाठी लगणाऱ्या कपाटांची
संख्या एरवी शेकडयात सहज जाईल, पण आता तीच माहिती बाळगणारा
संगणक जेमतेम एका कपाटाएवढा लहान असू शकतो, प्रति चौरस फूट जागेचे
भडकणारे भाव बघता संगणक खरेदीपूर्वी नियोजित, अपेक्षित नफ्या-तोटयाचे
जे आर्थिक समीकरण मांडून पडताळले जाते, त्यात या मुद््दयाचा समावेश असू
नये काय ?

पान नं. - 15

प्रकरण 2

व्यवहारातील वापर

आजच्या आधुनिक युगात संगणकाचा प्रसार इतक्या झपाटयाने व इतक्या
विविध क्षेत्रांत होत आहे की, औद्योगिक क्रांतीप्रमाणे आता माहिती-क्रांती
(Information Revolution ) म्हणावी इतक्या वेगाने संगणक साऱ्या
मनुष्यजीवन पद्धतीत उलथापालथ करील, असा तज्ज्ञांचा कयास आहे.
एवढी खळबळ माजवणारा संगणक जेथे वापरात आणला जातो, त्यातील
महत्वाचे असे ठळक उपयोग या प्रकरणात समाविष्ट करण्यात आले आहेत, हे
उपयोग सर्वसमावेशक नव्हे , तर प्रातिनिधीक असून जागेअभावी सर्व उपयोग
नमूद केलेले नाहीत.

1. आर्थिक व्यवहार : लौकिकदृष्टया सगळे व्यवहार अखेरीस पैशापायी
येत असल्यामुळे खाजगी जमाखर्चापासून ते राष्ट्रीय आर्थिक योजनेपर्यंत साऱ्या
पातळ्यांवर हिशेब-ठिशेबाचे महत्व व व्याप्ती अनन्यसाधारण आहे. एखादी
व्यक्ती वा छोटीशी संस्था वा पेढी जरी हे आर्थिक व्यवहार पांरपरिक पद्धतीने
पार पाडत असली, तरी मध्यम व मोठया अशा अगणित व्यापारी संस्था आपले
आर्थिक व्यवहार व व्यापारी उलाढाल सांभाळण्यासाठी संगणाकांची मदत
घेतात. त्याविषयीची अधिक माहिती विभाग तीनमध्ये तपशिलाने दिली
असल्याकारणाने येथे फारसे खोलात आपण जाणार नसलो तरी बँकासारख्या
ज्या संस्थांच्या कामकाजाचा गाभाच पैसा हा आहे. अशा वित्तसंस्थांच्या दैनंदिन
कामात संगणक कसा उपयोगी ठरतो ते मात्र जरूर जाणून घेऊ.

एखाद्या बँकेचे कामकाज ग्राहकाभिमुख व कार्यालयीन असे दोन ढोबळ
विभाग करता येतील. यांतील पहिल्या प्रकारामध्ये बचत, चालू, आवर्त, मुदत

पान नं. - 16

अशी ठेव-खाती, अनेकविध कर्जखाती आणि ड्राफ्ट वा अन्य मार्गानी
पैसे इकडून तिकडे पाठविणे यांचा समावेश होतो, तर दुसऱ्या प्रकारात
कार्यालयीन हिशेबासाठी चालवलेली व्याज, सेवा-शुल्क ,दलाली
(Commission ) वगैर खाती अंतर्भूत होतात. ग्राहकांच्या हजारो खात्यांतील
जमा/खर्च आकारणे व या सर्व गोष्टींचा अचूकपणा दुसऱ्यापद्धतीत पडताळणे अशा
प्रचंड कामासाठी बऱ्याच बँकामध्ये संगणक राबवण्यात येतो. त्यामुळे सर्व
कारभार बिनचूकपणे व वेळच्या वेळी उरकता येतो. तसेच ग्राहक-सेवेची
गुणवत्ता सुधारण्यास थोडा हातभारही लावता येतो.

2. यंत्रांचे उत्पादन : रेडिओसारख्या साध्या यंत्रापासून ते
रणगाडयांसारख्या अवजड वाहनापर्यंत सर्व यंत्रांच्या उत्पादनासाठी आराखडा
काढणे, पहिले नमुना यंत्र तयार करून चाचण्या घेणे व अखेरीस मोठया
प्रमाणावर उत्पादन सुरू करणे अशा तीन टप्प्यांत कामे केली जातात.

निरनिराळी अभियांत्रिकी उपकरणे वापरून कागदावर पेन्सिलने आराखडा
काढण्याच्या जुन्या पद्धतीत वेळ बराच मोडतो, तसेच आराखडयातील चुकांची
दुरुस्ती वा एखाद्या सुधारणेसाठी नव्याने पुन्हा एकदा तेवढाच वेळ व श्रम खर्ची
घालावे लागतात. या कामी संगणकाची मंदत घेऊन अत्यल्प वेळेत बिनचूक
आराखडा काढता येतो. दूरदर्शनसंचाप्रमाणे बारकाव्याने सर्व रेषा दर्शविणारा
पडदा ( Graphic Terminal ) वापरून त्याचे अवलोकन करता येते व योग्य
तेवढेच बदल करून आराखडयात लगेच सुधारणा करता येते. या प्रक्रियेला
इंग्रजीत (Computer Aided Design) अथवा CAD म्हणतात.

प्रत्यक्ष उत्पादनाला सुरूवात करण्यापूर्वी नमुन्यादाखल एक यंत्र Prototype
तयार करून त्यावर चाचण्या घेतल्या जातात. एखाद्या यंत्रावर उष्णता,
दाब, ताण यामुळे काय परिणाम होतील. याचे संपूर्ण प्रयोग आता या यंत्रावर
प्रत्यक्ष न करता त्यांपैकी काही बाबतीत संगणकाचे साहाय्य घेऊन पडद्यावरील
आराखडयावरच काय फरक पडतात ते पाहणे शक्य झाले आहे. सादृशीकरण
(Simulation ) म्हणता येईल. अशा या तंत्राने वेळ , श्रम व पैसा या साऱ्याची
बचन साधता येते.

व्यापारी तत्त्वावर मोठया प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यानंतर स्वयंचलित

पान नं. - 17

उपकरणे वापरण्याकडे पूर्वीपासून कारखानदारांचा कल होताच. त्यात संगणक
ही अभिनव भर पडली आहे. जिथे माणसाने वावरणे अत्यंत धोकादायक आहे
किंवा जिथे मिलिमीटरच्या हजाराव्या हिश्शाइतपत बारकाईने काम व तेही
एकसलगपणे तासन््तास , वर्षानुवर्षे करणे माणसाला शक्य नाही, अशा विवक्षित
उत्पादन परिस्थितीत संगणकाची योजना उचित ठरते.

3. हवामानविषयीचे अंदाज : राष्ट्रीय अंदाजपत्रकातील अपेक्षित तूट
(Budget Deficit) प्रत्यक्षात वर्षअखेरीस अवाच्या सवा वाढली, तरी त्याबद्दल
मूग गिळणारे अनेक लोक हवामानाच्या अंदाजाविषयी मात्र असा उदारपणा न
बाळगता काहीतरी टोमणा मारतात. हा खरोखऱ अत्यंत उथळपणा होय. एकतर
आपल्या अपेक्षेला हुलकावणी देणाऱ्या विराट निसर्गाचा संपूर्ण कार्यकारण भाव
अद्यापही विज्ञानाच्या आवाक्यात येऊ शकलेला नाही. व दुसरा महत्वाचा मुद्दा
असा की हवामानाचे जे निकष आतापर्यंत प्रस्थापित झाले आहेत त्यांचीच
संख्या, वैविध्य व आकडेमोड मुळी इतकी जगड््व्याळ आहे की, त्यामुळे
बऱ्यापैकी क्षमतेचा संगणकही या कामी कमी पडतो.

उपग्रहाद्वारे देशाची घेतली जाणारी छायाचित्रे दूरदर्शनवरील बातम्यांचा
अखेरीस आपण पाहतो. दिवसाकाठी प्रचंड संख्येने येणाऱ्या या चित्रांचा अर्थ
लावणे हे आकडेमोडीपेक्षाही अत्यंत जिकीरीचे काम आहे. त्याखेरीज आपल्या
खंडप्राय देशातील नाना ठिकाणांहून येणाऱ्या तपमान, आर्द्रता, हवेचा दाब
पावसाचे प्रमाण , वाऱ्याची गती अशा अनंत नोंदी स्वीकारणे, संकलित करणे
त्यांचे विविध संख्याशास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करणे व हवामानाचा शास्त्रातील
कार्यपद्धती वापरून हवामानाचा अंदाज वर्तविणे ही अतिशय खडतर अशी
प्रक्रिया आहे, त्यातच हे भाकीत आगामी दिवसाकरिता असल्याकारणाने ही
सारी दीर्घ प्रक्रिया काही तासांतच उरकण्यावर सारा भर असतो. 'मेनफ्रेम'
संगणकाऐवजी महासंगणकाची निकड भासावी या एकाच गोष्टीवरून
संगणकाची या प्रांतातील कामगिरी किती बहुमोल आहे, याची कल्पना येईल.

4. बँकामधील धनादेशांचा बटवडा व हिशोब ( Clearing of Bank
Cheque ) : या प्रकरणात प्रारंभी बँकाचे काही व्यवहार संगणकाद्वारे कसे
सुलभ होतात, ते यापूर्वी आपण पाहिले असले तरी ते विशिष्ट काम बुद््ध्या
स्वतंत्र मुद्दा म्हणून विशद करण्याचे कारण म्हणजे त्याचे स्वरूप व व्याप्ती.

पान नं. - 18

स्वरूप वेगळे अशासाठी की, आपापल्या खात्यात ग्राहकांनी भरलेले सारे
धनादेश गोळा करून , ते ज्या ज्या बँकांवर काढले असतील त्या त्या
बँकांना देणे इतर साऱ्या बँकांनी अशाच पद्धतीने आणलेले धनादेश स्वीकारणे व
त्यानंतर देणे अगर येणे, बाकी चुकती करणे अशी पद्धत येथे अवलंबिली जाते.
यासाठी साऱ्या बँकांचे स्थानिक प्रतिनिधी प्रत्येक शहरातील 'क्लिअंरिग हाऊस'
नावाच्या मध्यवर्ती ठिकाणी दिवसातून किमान एकदा एकत्र येऊन धनादेशांची
देवाणघेवाण करतात. स्वीकारलेल्या धनादेशांची वटवणूक अपुऱ्या
शिलकीमुळे वा अन्य कारणास्तव होऊ शकत नसेल , तर असा धनादेश परत
पाठविण्याची मुदत काही तासांची वा जेमतेम एका दिवसाची असते. एकीकडे
कामाची तऱ्हा अशी क्लिष्ट, तर दुसरीकडे भरीस भर म्हणून कामाचा व्याप प्रचंड
मोठया प्रमाणावर. एकटया मुंबई शहरात धनादेशांची रोजची आवक-जावक
दहा लाखाच्या घरात आहे, ही धक्कादायक वस्तुस्थिती ध्यानी घेतल्यास या
कामाच्या व्याप्तीची कल्पना येईल.

यासाठी Magnetic Ink Character Recognition अथवा MICR या
नावाने ओळखले जाणारे तंत्र वापरले जाते. चुंबकीय गुणधर्मांनी युक्त अशी
शाई वापरून प्रत्येक धनादेशाच्या तळाशी ( खास या कामासाठी राखीव अशा
आडव्या पट्टीसारख्या भागात) बँक व खातेदारांचा क्रमांक, रक्कम वगैरे बाबी
एका यंत्राद्वारे लिहिण्यात येतात. क्लिंअरिंग हाऊसमधील संगणकास या शाईने
लिहिलेला कूटक्रमांक वाचता येईल. असे विशेष उपकरणे जोडलेले असते. हा
सुसज्ज संगणक , दर मिनिटाला दोन हजार धनादेश अशा राक्षसी वेगाने सर्व
हिशेब व धनादेशांची बँकवार वर्गवारीसुद्धा करतो. राखीव जागेवर न लिहणे
आणि धनादेशाच्या घडया घालणे अशी पथ्ये मात्र जनतेने पाळली पाहिजेत,
अन्यथा संगणकाच्या कामात अडथळा संभवतो.

5. बंदरावरील मालाची चढउतार : वरवर पाहता क्षुल्लक वाटणाऱ्या या
कामाचे महत्व व कठीणपणा प्रत्यक्षात मात्र अधिक आहे. हवाईमार्ग अत्यंत
खर्चिक , तर खुष्कीच्या मार्गाची उपलब्धता यामुळे आंतरराष्ट्रीय
मालवाहतुकीस जलमार्ग हाच एकमेव व्यवहार्य पर्याय होय. बंदरांची संख्या
अल्प असल्यामुळे जहाज व किनाऱ्यावरील गोदाम या दरम्यान होणारी मालाची
उलाढाल कल्पनातीत असते. विविध आकाराची मोठया संख्येने ये-जा करणारी

पान नं. - 19

खोकी अशा खोक्यांनी भरलेली व रिकाम्या गोदामांच्या प्रतीक्षेत असणारी
जहाजे व त्याउलट योग्य जहाजाची प्रतीक्षा करत खोकी सांभाळणारी
गोदामे यांची सांगड घालणे हे काम आधीच अवघड त्यात मालट्रक व यारी
वापरून होणाऱ्या या वाहतुकीस एकीकडे वेळ जास्त लागतो, तर दुसरीकडे
नाशवंत स्वरूपाचा काही माल , गोदामाचे वाढते भाडे ( Demurrage) अशा
कारणांमुळे कमीत कमी वेळात चढ-उतार पार पाडून संबंधित आयातदारास
त्याविषयी त्वरित सूचना देणे जरुरीचे असते.

अशा परिस्थितीत वेळेची बचत करू गेल्यास प्रत्यक्ष माल हलवण्यासाठी
लागणाऱ्या वेळेमध्ये अशक्यच, कारण माल अतिशय अवघड असतो. पर्यायाने
जहाज व गोदाम यांच्या उचित जोडया लावण्याचा निर्णय चटकन घेणे व तो सर्व
संबंधितांना -म्हणजेच जहाज, गोदाम, ट्रक व यारी येथीस कर्मचाऱ्यांना
तत्काळ कळविणे एवढेच करण्याजोगे असते.असा निर्णय अल्पावधीत घेणे हे
मनुष्यमात्रास अशक्यप्राय असते ते दोन कारणांमुळे , एक तर बहुसंख्येने
असणारी गोदामे , जहाजे , त्यातील मालाचे जाण्याचे ठिकाण , प्रत्येक ठिकाणी
किती माल मावेल हे दर्शवणारी उर्वरित क्षमता हे सारे तपशील मानवी
स्मरणशक्तीच्या आवाक्याबाहेर असतात व दुसरे म्हणजे उपलब्ध असणाऱ्या
पर्यायातून सर्वात चांगल्या पर्यायाची निवड क्षणार्धात करणे हे केवळ
संगणकासच शक्य आहे.

माणसाने आपल्या अक्कलहुशारीने घालून दिलेली पद्धत सूचनावलीच्या
माध्यमातून चुटकीसरशी अनुसरणे, जहाज-गोदामांचा पूर्ण तपशील स्मरणात
ठेवणे, त्यात मालवाहतुकीमुळे होणारे बदल नोंदणे व हा तपशील उद््धृत करणे
हे सारे संगणकास सहजशक्य असल्यामुळे त्याचा वापर अशा ठिकाणी अत्यंत
समर्पक ठरतो. बंदरातील एका संगणकास ही सारी माहिती व सूचनावली
पुरवल्यानंतर आवश्यक ते निर्णय निमिषार्धात घेता येतात. आलेल्या मालाची
सूचना आयातदाराला देण्याकरिता कागदपत्र त्वरीत करता येतात,
येणाऱ्या-जाणाऱ्या मालीची किंमत (त्यावरील विविध कर, गोदामाचे भाडे व
वाहतूक शुल्क यांसह) ठरवता येते व सर्वात महत्वाचे म्हणजे जहाज, यारी, ट्रक
व गोदाम येथील संबंधितांना बिनतारी यंत्रांद्वारे निर्णय कळवून
अंमलबजावणीस लगेच सुरुवात होते.

पान नं. - 20

वरील उदाहरणाखेरीज जीवनातील आणखी काही महत्वाच्या क्षेत्रांतही
संगणकाचा उपयोग औचित्यपूर्ण आहे. त्याचा तपशीलवार ऊहापोह विषयाच्या
ओघात अन्य प्रकरणांमध्ये केला आहे, यास्तव येथे फक्त त्यांचा नामोल्लेख
कसांतील संबंधित प्रकरण क्रमांकासह केला आहे.

6. रेल्वे आरक्षण : (प्रकरण 7)
7. लष्करी कारवाया : (प्रकरण 13)
8. शिक्षण : (प्रकरण 19)
9. कचेऱ्या,कार्यालये : (प्रकरण 18)
10. व्यावसायिक सल्ला : (प्रकरण 15)
11. व्यापार : (प्रकरण 16)

पान नं. - 33

प्रकरण 5

शैक्षणिक अभ्यासक्रम

आयुष्य नीटपणे व्यतीत करण्यासाठी चांगल्याप्रकारे नोकरी किंवा व्यवसाय
आणि पर्यायाने योग्य त्या शिक्षणाचे पाठबळ आवश्यक असते. हे आजकल
प्रत्येकास कळून चुकले आहे. जीवनातील महत्वाचे वळण ठरणाऱ्या या
शिक्षणशाखांपैकी अभियांत्रिकी व वैद्यकीय या दोन्हींची अमाप लोकप्रियता
गेली दोन-चार दशके आपण पाहत आलो आहोत. अलीकडील आठ-दहा वर्षांत
सामील झालेली आणि झपाटयाने वाढणारी शाखा म्हणजे अर्थातच
संगणकविषयक अभ्यासक्रम होय. मुळातच क्लिष्ट व दुर्बोध वाटणाऱ्या
संगणकाचे अभ्यासक्रम विविध तऱ्हेचे आणि अनेक संस्थांनी चालवलेले
असल्याखेरीज विद्यार्थी तर बुचकळ्यात पडतातच पण त्याखेरीज या
अभ्यासक्रमांची फी व अन्य खर्च इतर शिक्षणाच्या मानाने फार जास्त
असल्याकारणाने पालकसुद्ध अभ्यासक्रम व संस्था निवडताना दिडःमूढ होऊन
जातात. अशा वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत व्हावी म्हणून या प्रकरणात
शिक्षणक्रमासंबंधी जरूर ती माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

एकेकाळी संगणक ही इतकी नवी चीज होती की, त्यासाठी कोणताही
स्वतंत्र पाठ्यक्रम अस्तित्वात नव्हता. साहजिकच संगणक निर्मितीसाठी पायाभूत
अशा गणित व विद्युत अभियांत्रिकी या विषयांमध्ये शिक्षण घेतलेले लोक या
प्रांतात आढळून येत. तद््नंतर हळूहळू संगणकाचे महत्त्व ओळखून फोर्ट्रान
भाषेचा अंतर्भाव अभियांत्रिकी शाखेत होऊ लागला, तर माहिती संस्करण
(Data Processing) व कोबोल भाषा यांचा एक विषय म्हणून सी.ए.आय.सी

पान नं. 34

डब्ल्यू ए. अशा परीक्षांमध्ये समावेश झाला. खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान
संस्थेत (I.I.T) संगणक अभियांत्रिकी हा स्वतंत्र व परिपूर्ण अभ्यासक्रम
विकसित झाला. आज संगणक शाखेच्या अनेकविध पोटशाखांचे शिक्षणक्रम
आपल्याला प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अशा पातळ्यानंतर
दिसून येतात. त्यांचा तपशील असा :

1) तांत्रिक / अभियांत्रिकी शिक्षणक्रम (Technical/ Engineering Courses)

या शिक्षणासाठी गणित व विद्युत अभियांत्रिकी अशा विषयांची आवड व
अभ्यास असणे आवश्यक आहे. संगणक निर्मितीसाठी उपयुक्त असे हे शिक्षण
पदवी व त्यापुढील पातळीवरील असते, पदविका पातळीवर ते क्वचितच
उपलब्ध आहे, तर प्रमाणपत्र पातळीवर अजिबात नाही. यासाठी उच्च माध्यमिक
परीक्षा (10+2) ही अर्हता आवश्यक आहे 4-5 वर्षाच्या यशस्वी
अभ्यासानंतर बी.ई /बी.टेक् तर आणखी दोन वर्षाच्या पदव्युत्तर शिक्षणानंतर
एम्.ई / एम.टेक. अशा पदव्या विद्यापीठे,सरकारी विद्यालये वा विना -अनुदान
तत्त्वावरील खाजगी संस्थाकडून मिळवता येतात. या शिक्षणास अनुरूप नोकरी
म्हणजे संगणक निर्मिती करणाऱ्या कारखान्यात अभियंत्याची जागा किंवा हाच
अभ्यासक्रम शिकवण्यासाठी प्राध्यापकी पेशा- याखेरीज संगणकविषयक
अन्य पोटशाखांमध्ये नोकरी मिळवणे शक्य असले, तरी तिकडे वळणारे या
शाखेतील विद्यार्थी तसे कमी असतात.

2 संगणक विज्ञान शिक्षणक्रम (Cpmputer Science Courses) :

तर्कशुद्ध विचारसरणी आणि बिनचूक व पद्धतशीर काम करण्याचा कल या
गोष्टी अशा शिक्षणक्रमास अत्यंत जजरूरीच्या आहेत. प्रणाली सूचनावली
(System Software) लिहिण्यास उपयुक्त असे हे शिक्षण प्रमाणपत्र वगळता
अन्य तीनही पातळ्यांवर (म्हणजेच पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी) दिले
जाते. हा पाठ्यक्रम उच्च माध्यमिक परीक्षेनंतर करता येतो. 2-3 वर्षाच्या
कालावधीनंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बी.सी.एस्.बी एस्सी(संगणकशास्त्र) एम.
सी.ए.एम.एससी. (संगणकशास्त्र) यापैकी एखादी पदवी मिळते. भारतातील
बऱ्याचशा विद्यापीठातून आणि राष्ट्रीय पातळीवरील नावाजलेल्या संस्थातून

पान नं. 35

(उदा. बंगलोर येथील भारतीय विज्ञान संस्था) हा उपक्रम चालवला जातो. नोकरी
व्यवसायाच्या दृष्टीने याची उपयुक्तता दोन प्रकारे आहे. एक : संगणक निर्मिती
करणाऱ्या कारखान्यात प्रणाली सूचनावली लिहिणारे म्हणून किंवा संगणक
संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून व दोन : सूचनावली सल्ला (Software
Consultancy) व्यवसाय स्वतंत्रपणे चालविण्याकरिता.

3. संगणक व्यवस्थापन शिक्षणक्रम (Computer Management Courses)

विश्लेषक व चिकित्सक बुद्धी, कल्पकता व तऱ्हेतऱ्हेच्या लोकांशी
वागण्याबोलण्याचे कौशल्य हे या शाखेच्या विद्यार्थ्यास आवश्यक भांडवल
होय. उपयोजन सूचनावली (Application Software) लिहिण्याकरता उपयुक्त
असे हे शिक्षण सर्व पातळ्यांवर उपलब्ध आहे. शिक्षणक्रमाच्या आवाक्यानुसार
कालावधी 2 महिन्यांपासून ते 2 वर्षापर्यत असू शकतो. छोट्या पाठ्यक्रमात
कोबोल किंवा बेसिक भाषा, डिबेस वा लोटस अशा मोठ्या प्रमाणात वापरल्या
जाणाऱ्या सर्वसमावेशक सूचनावली(Software Packages) असा एखादा
दुसराच विषय शिकवला जातो, तर मोठ्या शिक्षणक्रमात प्रणाली विश्लेषण
(Systems Analysis) व्यवस्थापन इत्यादी अनेक विषय हाताळले जातात.
संख्येने पाहिल्यास विद्यापीठांहून कितीतरी जास्त संस्था असे पाठ्यक्रम
चालवतात. त्यांच्या गुणवत्तेविषयी या प्रकरणाच्या उत्तरार्धात लिहिले आहे
अशा शिक्षणानंतर प्रणाली विश्लेषक, सूचनावली लेखक अशा पदावरील
नोकरी करता येते किंवा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करता येतो.

याशिवाय डेटा एट्री ऑपरेशन्स हा आणखी एक अल्प मुदतीचा पाठ्यक्रम
उपलब्ध आहे. यात प्रामुख्याने टंकलेखन व लवचिक तबकडी (Flooy Disk)
हाताळणे एवढीच माहिती देण्यात येते. संगणकाचा उपयोग करण्यापूर्वी
कागदावरील मजकूर वाचून तो तबकडीवर टंकलिखित करावा लागतो हे
एंट्री म्हणून हे काम ओळखले जाते. अशा स्वरूपाची नोकरी मिळवण्यासाठी
पाठ्यक्रम उपयोगी पडतो. या कामासाठी चमकदार बुद्धीची गरज नसते
अतिसामान्य वकूबाच्या विद्यार्थ्याना तो योग्य होय.
या वर्णानंतर आता पाठ्यक्रमाच्या निवडीच्या निकषांकडे वळू या.

1. विद्यार्थ्याची आवड व कुवत : संगणक हे सध्याचे

पान नं. 36

एकमेव मुद्यावर विसंबून आजकाल काही पालक संगणकविषयक शिक्षण
आपल्या मुलांच्या माथी मारतात. वस्तुतः एखाद्या विषयात रस व गती नसेल, तर
त्या प्रांतातले शिक्षण मुलाला अशक्यप्राय होऊन बसते. यास्तव शिक्षणक्रम निश्चित
करण्यापूर्वी या मुद्यावर विचार करावयास हवा. संगणकाविषयी अजिबात माहिती
नसेल, तर त्यावरील एखादे पुस्तक नजरेखालून घालावे. या क्षेत्रात काम करीत
असलेल्या एखाद्या ओळखीच्या माणसाकडून अभ्याक्रमाचा परिचय करून
घ्यावा. तेही शक्य नसल्यास आणखी एक वाट धुंडाळता येईल, ती म्हणजे दीर्घ
मुदतीचा व खर्चिक पाठ्यक्रम निवडण्यापूर्वी तशाच स्वरूपाचा एखादा छोटासा
अभ्यासक्रम पूर्ण करून पाहणे. उदा. दोन-तीन वर्षाचा संगणक व्यवस्थापन हा
पदव्युत्तर शिक्षणक्रम सुरू करण्यासाठी एक-दोन महिन्यांचा बेसिक वा कोबोल
भाषेचा प्रमाणपत्र पातळीवरील अभ्यासक्रम घेणे. या तऱ्हेने शिक्षणाची निश्चिती
केल्यास हजारात मोजावी लागणारी फी व आयुष्यातील सोन्यासारखी एक-दोन
वर्षे वाया जाण्याची धास्ती राहणार नाही.

2 उपशाखेची निवड : या प्रकरणाच्या पूर्वार्धात संगणकशास्त्राच्या विविध
उपशाखा, त्यांची समर्पकता व नोकरी व्यवसायाच्या संभाव्य दिशेबद्दल विवेचन
केले आहे. त्या अनुषंगाने आपणास या क्षेत्रात नेमका कुठे प्रवेश करायचा आहे
ते शिक्षणाआधी ठरवणे इष्ट होय.

3 शिक्षणाचा कालावधी : संगणकाचे शिक्षण हे विविध प्रकारचे व
कमी-अधिक तपशिलात उपलब्ध असल्यामुळे कालावधी एक-दोन महिने ते
तीन-चार वर्षे इतपतच असू शकतो. यास्तव आपली कौटुंबिक व आर्थिक
परिस्थिती ध्यानात घेणे हे पालक व विद्यार्थी दोघांनाही हितावह ठरेल.

4. शिक्षक शुल्क (फी) : अन्य शाखांमध्ये या शाखेतील शिक्षण अनेक
पटीने महागडे असते. त्यातच संस्था जर विनाअनुदान तत्त्वावरील असेल, तर
शिक्षणक्रम फार खर्चिक असतात. प्रसंगी सुमारे पंधरा हजार रूपयांपर्यतचा खर्च
केवळ वर्षभराच्या शिक्षणापोटी करावा लागतो. यास्वत शिक्षणशुल्काखेरीज
वाचनालय, ववर्गणी संगणक प्रयोगशाळेचे वेगळे पैसे, परीक्षा फी. इ. विविध
कारणांपोटी एकूण किती रक्कम भरणे अपेक्षित आहे, याचा स्पष्ट खुलासा
संबंधित संस्थेकडून करून घ्यावा. अन्यथा वारंवार वेगवेगळ्या बाबींवर होणारा
आवाक्याबाहेर जाणे शक्य आहे.

पान नं. 37

5. शिक्षणक्रम चालवणारी संस्था व तिचा दर्जा : हा अर्थातच सर्वाधिक
महत्त्वाचा मुद्दा होय. इतर क्षेत्रांप्रमाणे या नव्या प्रांतातही काही संस्था अगदी
सुमार दर्जाच्या आहेत. तसेच काही संस्थांमध्ये तज्ज्ञ शिक्षकवर्ग व आवश्यक
तेवढे संगणक नाहीत, असे सुद्धा आढळून येते. केवळ संस्थेच्या नावाला न
भुलता प्रत्यक्ष अभ्याक्रम, संस्थेचा दर्जा, अध्यापकांची विद्वत्ता व तेथे सध्या
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीची मते हे सारे अजमावून पाहावे. भारत सरकार व या
प्रांतातील व्यावसायिकांची संघटना (M.A.I.T) यांनी काही संस्थांची पाहणी
करून त्यांच्या दर्जाबद्दल प्रमाणपत्रे देण्यास सुरूवात केली आहे. अशा
प्रमाणपत्राबद्दल संस्थेत चौकशी करता येईल. आणखी एक विशेष मुद्दा म्हणजे
संस्थेच्या माजी विद्यार्थ्याना नोकरी व्यवसायात उपलब्ध झालेल्या संधी जाणून
घेणे. याची शहानिशा करण्यासाठी केवळ एखाद दुसऱ्या माजी विद्यार्थ्याचा
अनुभव प्रातिनिधीक मानता येणार नाही. कारण त्यात त्याच्या वैयक्तिक
गुणदोषांचा वाटा मोठा असू शकतो. यासाठी अधिकाधिक माजी विद्यार्थांना
गाठून त्यांच्या उत्कर्ष कितपत झाला आहे, याची खातरजमा करून घ्यावी.

6 विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता व वेळेचे बंधन : डेटा एंट्रीचे शिक्षण
दहावीनंतर लगेच घेता येईल, किंबहुना त्यापूर्वीसुद्धा घेण्यास हरकत नाही. इतर
शिक्षणक्रमांपैकी पूर्ण वेळ म्हणआवेत असे शिक्षणक्रम दिवसाकाठी सुमारे चार
तास वा त्याहून अधिक वेळ चालतात. त्यासाठी उच्च माध्यमिकनंतरची पूर्ण
वेळ विद्यार्थिदश योग्य होय. अर्धवेळ शिक्षणक्रम हे दिवसातून 2-3 तासांपुरते
मर्यादित असल्यामुळे ते करताना अन्य एखाद्या पदवीचा अभ्यास वा नोकरी
करणे शक्य आहे. विशेषतः नोकरदार वर्गाला आपआपल्या संस्थेत उन्नती
साधण्याच्या दृष्टीने हे अर्धवेळ अभ्यासक्रम मोलाचे आहेत.

प्रकरणाच्या अखेरीस एक खुलासा आवर्जून केला पाहिजे, तो असा की,
संगणकाच्या प्रांतात तांत्रिक प्रगती वेगाने होत आहे, तसेच शिक्षणविषयक
पात्रता, कालावधी, खर्च व उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना दिले जाणारे प्रमाणपत्र,
पदवी. इ. बाबींमध्ये बदल होणे हे अपरिहार्य आहे. यास्वतव या प्रकरणातील सूचना
व निकष हे बदलत्या वास्तवांशी तंतोतंत जुळणे अपेक्षित नाही, मात्र
ढोबळमानाने पाहू जाता त्यांचा मार्गदर्शनपर उपयोग होईल एवढे निश्चित.

पान नं. 52

रचना व कार्य

आतापर्यतच्या सर्व प्रकरणांमधून आपण संगणकाचा इतिहास विकास
उपयोग, शिक्षण, नोकरीधंद्याचा वाव अशी विविध माहिती घेतली, परंतु
संगणकाची रचना व कार्य मात्र अद्याप पाहिले नाही.आता आपण संगणकाच्या
अंतर्यामी ठाव घेऊन नेमक्या याच गोष्टी जाणून घेणार आहोत. प्रस्तुत प्रकरणी
ही माहिती संक्षेपाने दिली असून मुख्य भर संगणकाच्या सर्व घटकांकडून
एकोप्याने काम कसे तडीस नेले जाते, हे स्पष्ट करण्यावर आहे. यंत्रसामग्री व
सूचनावली या घटकांचे स्वरूप तपशिलात विशद करण्याकरता यानंतर तीन
स्वतंत्र प्रकरणांची योजना केली आहे.

संगणक म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर जरी चटकन केवळ यंत्रसामग्री
(Hardware) येत असली, तरी सूचनावली (Software) हा सुद्धा संगणकाचा
तितकाच आवश्यक घटक आहे, हे आपण लक्षात घ्यावयास हवे.
यंत्रसामग्रीमध्ये मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र आणि तदनुषंगिक उपकरणे असे दोन
पोटविभाग आहेत. तसेच संगणकाचे कार्य ज्या माहितीवर चालवले जाते त्या
माहितीचे अंतर्यामी माहिती(Data) व संगणकाकडून संकलित होऊन येणारी
माहिती (Information) असे दोन प्रकार पडतात.

पहिल्या संगणकाची उभारणी जरी दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास करण्यात
आली असली, तरी अशा प्रकारे संगणक तयार करता येईल हे स्पष्ट करणारा
आराखडा मात्र इ.स. 1833 मध्ये-म्हणजे सुमारे दीडशे वर्षापूर्वी - चार्ल्स
बॅबे या गणितज्ञाने मांडला होता, हे आपण प्रकरण दोनमध्ये पाहिले आहेच.
आजसुद्धा हा यंत्रसामग्रीचा आराखडा प्रमाणभूत मानला जातो, यास्तव आकृती

पान नं. 53

क्र. 8-1 मध्ये तो दर्शवला आहे. ही आकृती अर्थातच संकल्पनात्मक असून
संगणक प्रत्यक्ष उघडून बघितल्यास अशा मोजक्या व ठोक गोष्टींऐवजी
अगणित छोटेछोटे भाग व त्यांची विद्युतमंडले अशी रचना नजरेस पडेल.

अंतर्यामी उपकरणे(Input devices) ही संगणकास माहिती व सूचना
देण्यासाठी उपयोगी पडतात. संगणकाकडून संकलित होणारी माहिती बहिर्गामी
उपकरणांद्वारे (Output devices) संगणकाबाहेर आणली जाते. दरम्यानच्या
काळात आपण निर्देश केलेल्या सूचनावली व माहिती दुय्यम स्मरणिकेतून
(Secpndary Staorage) मध्यवर्ती प्रक्रिया केंद्रात आणली जाते व तेथे
माहितीवर आवश्यक ते संस्करण केले जाते.

एखाद्या कचेरीतील कर्मचाऱ्यांचे पगारपत्रक तयार करण्याचे काम

पान नं. 54

संगणकाद्वारे कसे पार पाडता येईल. ते पाहिल्यास वरील कार्यपद्धती समजणाऱ्यास
सोपे जाईल. यासाठी आपण दोन-चार गोष्टी गृहित धरू त्या अशा:
1) प्रत्येक कर्मचाऱ्याचे नाव व मूळ पगार (Basic Pay) एका ओळीवर-
म्हणजेच एका रेकॉर्डमध्ये- अशा अनेक ओळींनी वा रेकॉर्डस््नी तयार
झालेल्या `अ' या फाईलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची माहिती असून ती फाईल दुय्यम
स्मरणिकेत उपलब्ध आहे. रेकॉर्ड (Record) हा शब्द ग्रामोफोनसदृश्य तबकडी
या अर्थाने नव्हे, तर अभिलेख वा नोंद या अर्थाने वापरला आहे.

2. घरभाडे भत्ता 10 % दराने द्यावयाचा असून, महागाई भत्ता दर
माहिन्याला बदलत असून तो आयत्या वेळी संगणकास पुरविला जाईल.

3. आवश्यक ती सूचनावली `स' या फाईलमध्ये दुय्यम स्मरणिकेवर असून
या सूचनावलीचा अर्थ असा :

पायरी 1+ अंतर्यामी उपकरणाद्वारे महागाईभत्त्याचा चालू दर देण्याची विनंती
करून व तो स्वीकारून `द' या चलसंख्येत जतन करा.
(`द' तसेच यापुढील अन्य चलसंख्या म.प्र. केंद्रात राहतील.)
पायरी 2 = दुय्यम स्मरणिकेतील `अ' फाईल उघडा.
पायरी 3 = एका वेळी एक ओळ अशा रीतीने `अ' फाईल वाचा.
पायरी 4 = `अ' फाईल वाचून संपल्यास पायरी 10 कडे जा, अन्यथा पायरी 5
कडे जा.
पायरी 5 = हातातल्या ओळीतील कर्मचाऱ्याच्या मूळ पगारावरून
महागाईभत्त्याची रक्कम `म ' ठरवा.
(म = मूळ पगार द / 100)

पायरी 6 = मूळ पगारावरून घरभाडे भत्त्याची रक्कम `घ' निश्चित करा.
(घ = मूळ पगार / 10)
पायरी 7 = एकूण पगार `प' ठरवा.
(प = मूळ पगार + म + घ)

पायरी 8 = हातातत्या ओळीतल्या माणसाचे नाव व त्यापुढे मूळ पगार,म,घ
आणि प या रकमा छापा.
पायरी 9 = पायरी 3 कडे जा.
पायरी 10 = फाईल बंद करा आणि काम थांबवा.

पान नं. - 55

वरील गृहितकांवरून प्रथम हे समजावून घेणे उचित आहे की,
सूचनावलीच्या पहिल्या दोन पायऱ्या एकदा पूर्ण झाल्या की, तद््नंतर
नऊ या सात पायऱ्यांच्या समूह प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी एकदा, याप्रमाणे एकूण
कर्मचाऱ्यांच्या संख्येइतक्या वेळा त्याची आवर्तने होतील व अखेरीस दहावी
पायरी पूर्ण सूचनावलीचा वापर संपेल.

आणखी एक मुद्दा वरील गृहितकांवरून स्पष्ट होतो तो असा की, आकाराने
मोठया स्वरूपात असणारी माहिती व सूचनावली - जसे `स' सूचनावलीची
फाईल व `अ' ही सर्व कर्मचाऱ्यांच्या माहितीची फाईल - दुय्यम स्मरणिकेत
जतन केल्या जातात, तर सूचनावली अमलात आणण्याचा आदेश व
महागाईभत्त्त्याचा दर अशा छोटया गोष्टी संगणकास अंतर्यामी उपकरणाद्वारे ही
संगणकाचा वापर करताना पूर्णपणे म.प्र. केंद्रात आणली जाते. तर महत्वाची
फाईल मात्र एकावेळी एक वेळ अशा रीतीने क्रमशः म.प्र. केंद्रात संस्करणार्थ
आणली जाते.

आता थोडया चिकाटीने आणि बारकाईने आकृती क्र. 8.2 मधील तक्ता
अभ्यासल्यास संगणकाच्या पूर्ण कार्यपद्धतीचे सिंहावलोकन आपणास करता
येईल, खेरीज पहिल्या प्रकरणात नमूद केलेल्या संगणाकाच्या तीन मूलभूत
कार्यक्षमता कशा साध्य केल्या जातात, याचाही उलगडा होईल. ( येथील तक्ता
पुढील पानावर आहे.)

रचना व कार्य याविषयी स्थूलमानाने आपण पाहिले, आता माहिती
संगणकात कशी जतन केली जाते त्या पद्धतीने थोडेसे.

संगणकामध्ये शून्य ते नऊ या सर्व अंकाची व त्या अंकाची एकापुढे एक
मांडणी करून होणाऱ्या मोठया संख्यांची साठवणूक करता येत असली, तरी
अशा संख्या `A' पासून `Z' पर्यंतची अक्षरे जतन करण्यासाठी संगणकात
अंतर्यामी केवळ शून्य व एक या दोन चिन्हांचा वापर केला जातो. शून्य व एक
यापुढे तिसरे चिन्ह नसल्यामुळे त्या दोन्ही अंकांना द्विमान संख्या ( Binary
Digit वा Bit ) म्हटले जाते, माहितीचा हा सर्वात लहान अंश , एका द्विमान
अंकामुळे माहितीचे थोडेदेखील प्रतिनिधित्व होऊ शकत नाही, मात्र असे आठ
द्विमान अंक एकापुढे एक लिहून तयार होणारी द्विमान संख्या ( Byte) अर्थवाही

पान नं. - 57

ठरते. अशा संख्येची दशमान पद्धतीतील किंमत ठरवून त्याप्रमाणे त्या संख्येचा
वापर व्यवहारातील एक अंक वा अक्षरास पर्याय म्हणून केला जातो. उदा.
1000001 या द्विमान संख्येची दशमान पद्धतीतील किंमत 65 येते. ( द्विमान व
दशमान गणितीसंबंधी 'A' या अक्षरासाठी वापरली जाते. अशा पद्धतीने A पासून Z
पर्यंत सर्व अक्षरे , शून्य ते नऊ या संख्या आणि +,- , *, {,[ अशा इतर
चिन्हांकरता वेगवेगळ्या द्विमान संख्या (Byte) उपयोगात आणल्या जातात.

या पुढील अक्षरांपासून शब्द किंवा अंकापासून संख्या तयार करण्याचा
टप्पा गाठण्यासाठी योग्य त्या द्विमान संख्या एकापुढे एक लिहिल्या जातात. दोन
शब्दांमधील रिकामी जागा दर्शविण्यासाठी 32 ही दशमान किंमत असलेली
0100000 ही द्विमान संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रस्तुत
प्रकरणातील पगारपत्रकाच्या उदाहरणात कामगाराचे नाव व शब्दसमूह, मूळ
पगार ही संख्या , इ. अर्थवाही घटकांना इंग्रजीत Field म्हणतात. अनेक Fields
मिळून तयार होणाऱ्या एका कामगाराच्या माहितीस record ही संज्ञा आहे.
यालाच आपण ओळ असे म्हटले आहे कारण record हे सहसा एका ओळीत एक
असे ठेवले जाते. फाईल म्हणजे अशा अनेक एकसमान रेकॉर्डस््चा समूह होय
संगणकात जतन करण्याच्या दृष्टीने फाईल म्हणजे केवळ शून्य व एक यांची एक
प्रचंड मोठी साखळी होय. मात्र अंतर्गामी व बहिर्गामी उपकरणाद्वारे आपणाशी
संवाद साधताना जरूर ते रूपांतर करून नेहमीच्या अक्षरामध्ये आपणास माहिती
दर्शविण्याचा सारा खटाटोप संगणकातील प्रणाली सूचनावलींकडून संभाळला
जातो, आपणास त्यासाठी डोके शिणवावे लागत नाही.

फाईल वाचण्याचे तंत्र पाहिल्यास असे दिसून येते की, एका वेळी एक
ओळच संगणकाकरवी वाचली जाते, म्हणजे तेवढीच माहिती दुय्यम
स्मरणिकेतून म. प्र. केद्रांत एका एका वेळी येते. या ओळीची लांबी म्हणजे पर्यायाने
तीमधील शब्दसमूहाच्या लांबीची बेरीज होय, समजा, नावासाठी 20 अक्षरे व
मूळ पगारासाठी 5 अंक अशी रेकॉर्डची रचना असेल , तर रेकॉर्डची लांबी 25
भरेल. ओळीची लांबी 25 आहे, पैकी पहिली 20 अक्षरे घेऊन नाव बनले आहे,
तर पुढच्या 5 अंकानी मूळ पगार बनला आहे. हे सारे संगणकास सूचनावलीच्या
माध्यामातून निर्देशित करावे लागते. कारण बिनचूक काम करत असणाऱ्या

पान नं. - 58

संगणकास स्वतःची अशी समजूत वा तारतम्य अजिबात नसते. यामुळेच इंग्रजीत
ह्या आधुनिक यंत्रास कधीकधी Perfect Idiot असे संबोधले जाते.

पान नं. - 81

प्रकरण 12

संगणकाशी संबंधित गणित

संगणक हाताळणाऱ्या प्रत्येकाला गणित विषयाची माहिती आवश्यक
नसली, तरी ज्यांना थोडेसे खोलात जाऊन ह्या यंत्रातील कार्यकारणभाव जाणून
घ्यायचा आहे त्यांनी मात्र गणित व तर्कशास्त्र यांची निदान जुजबी तोंडओळख
करूण घेणे क्रमप्राप्त होय. या प्रकरणात आपण त्या दृष्टीने थोडी वाटचाल
करणार आहोत. गणित व तर्कशास्त्र या दोन्ही विषयांमध्ये उच्च कोटीचे नैपुण्य
मिळवलेल्या बर्ट्रांड रसेल या विश्वविख्यात विद्वानाने त्याच्या प्रिन्सिपिया
मॅथेमॅटिका या ग्रंथात सदरच्या दोन विषयांचा परस्परसंबंध प्रस्थापित करून
दाखविला आहे. इ.स्. 1910 मध्ये त्याने मांडलेली ही तत्त्वप्रणाली प्रसिद्ध
झाल्यानंतर सुमारे पाव शतकानंतर अगदी वेगळ्या संदर्भात पुन्हा एकदा गणित
व तर्कशास्त्र ही दुक्कल एकत्र आली. ती अर्थातच संगणकाच्या रुपाने अतिशय
व्यावहारिक पातळीवर .

आकडेमोड करताना संख्या मोजण्यासाठी प्राचीन काळापासून मानव
हातांच्या दहा बोटांचा चिन्ह म्हणून वापर करीत आला आहे. साहजिकच
एक-अंकी संख्येला शून्य ते नऊ अशा दहा चिन्हांची वा अंकाची मर्यादा पडली
नऊपुढील दहा या संख्येस स्वतंत्र चिन्ह नसल्यामुळे ती शून्य मिळून -
एकावर शून्य दहा अशी- लिहिली जाते. दहा ही संख्या पायाभूत मानणाऱ्या या
रीतीला दशमान पद्धत म्हटले जाते.

आता घटकाभर गृहित धरू की, आपणास एकाच हाताची बोटे लक्षात
घेऊन काही आकडेमोड करायची आहे. ती जास्तीत जास्त पाच बोटांचा स्वतंत्र
चिन्ह म्हणून उपयोग करता येईल व म्हणूनच शून्य ते चार या पाच संख्यांनंतर

पान नं. - 82

येणारी पाच ही संख्या एक- अंकी संख्येने दर्शविता येणार नाही, तर त्यासाठी
एकावर शून्य पाच असे म्हणून दोन अंकी संख्या वापरावी लागेल. दशमान
पद्धतीमधील 948 या संख्येची खरी किंमत कळण्यासाठी जसे 9 ला दहाच्या
वर्गाने म्हणजे शंभराने गुणावे लागेल व 7 ला दहाने गुणावे लागेल, तद््वत या
औटघटकेच्या पंचमान पद्धतीतील 324 या संख्येची खरी किंमत कळण्यासाठी
3 ला पाचचा वर्ग पंचवीसने , तर 2 ला पाचने गुणावे लागेल.

पंचमान पद्धतीतील 324
= 3 गुणिले पाचचा वर्ग + 2 गुणिले पाच + 4
= 3 25 + 2 5 + 4
= 75 + 10 + 4
= 89 दशमान पद्धतीमधील

प्राथमिक शाळेपासून अंगवळणी पडलेल्या दशमान पद्धतीच्या गणितात
आपण इतके मुरलेलो असतो की, त्याशिवाय एखादी पद्धत आपण पटकन
कल्पनेतही आणू शकत नाही, मग त्यातील आकडेमोड तर मुष्कीलच. याच
कारणाने उपस्थित होणारा पुढचा प्रश्न म्हणजे प्रचलित दशमान पद्धतीस
अनुसरून सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू असताना आणखी काही पद्धतींची
मुळी गरजच काय ? इथे नमूद करणे अगत्याचे आहे की, महाराष्ट्रात मराठी
भाषा रूढ असली तरी पश्चिम बंगालमध्ये बंगाली भाषेत सर्व व्यवहार होत
आहेत, हे जसे भाषेच्या बाबतीत, त्याप्रकारे मानवी जगतातील सर्व व्यवहार
दशमान पद्धतीवर आधारित असले तरी संगणकाच्या अंतर्यामी मात्र व्यवहार
व्यवहार दोन ही संख्या पायाभूत घेऊन म्हणजेच द्विमान पद्धतीत होत असतात.
यापूर्वी वानगीदाखल घेतलेल्या पंचमान पद्धतीचे प्रयोजन फक्त स्पष्टीकरणार्थ
आहे, त्याचा संगणकाशी काहाही संबंध नाही.

संगणकात द्विमान पद्धत वापरण्यात औचित्य आहे. दशमान पद्धत
ज्याप्रमाणे दहा बोटांचा चिन्ह वापरून करण्याच्या प्रघातामुळे स्थिरावली
आहे, तसे संगणकात केवळ दोन चिन्हे वापरणे शक्य असल्यामुळे द्विमान
पद्धत संयुक्तिक ठरते. एखाद्या विद्युत््मंडलात वीज वाहत आहे वा नाही, या
दोनच शक्यता संभवतात, चुंबकीय पदार्थामध्ये दक्षिण व उत्तर असे दोन ध्रुव
वगळता तिसरा पर्याय नाही, तर विद्युत चुंबकीय ( Electro-magnetic) पदार्थ

*
﻿
'्षीरसा"र व इतर
03-07-25
Marathi
एकूण पाने :- 16
FROM 1 TO 17

पान नं. 1

प्रकरण 1 ले

मानवी भूगोल : व्याख्या व व्याप्ती

सर्व मानवजात एकच असली तरी जगातील नाना देशांत नाना प्रकारचे लोक
राहतात. त्यांचा आहार, विहार, निवारा, वस्त्रप्रावरण या गोष्टी भिन्न असतात.
या सर्व जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी ते विविध प्रकारचे व्यवसाय करतात.
मुंबईतील मलबारहिलसारख्या भागातील लोक गगनचुंबी इमारतीत राहातात, हॉकी
क्रिकेट, चित्रपट इत्यादींनी आपली करमणूक करतात, तर मुंबईपासून 120 कि.मी.
अंतरावरील डहाणू, बोर्डीसारख्या खेड्यांतील आदिवासी शाकारलेल्या झोपड्यांत
राहातत व तारपे( एक वाद्य) वाजवून आपली करमणूक करतात. त्याचप्रमाणे
एखाद्या महाविद्यालयीन प्राध्यापकाचे जीवन हे भटकळ पशुपालकापेक्षा वेगळे असते.
हा फार जैविक आहे. लोकांना तो जन्मतः प्राप्त होतो. थोडक्यात, पर्यावरणाच्या
भिन्नतेमुळे अशाच प्रकारची विसंगती अनेक ठिकाणी आढळून येते. उदा, कोकणात
आर्थिकदृष्ट्या किफायतशीर रीतीने सफरचंदाच्या वाड्या करता येणार नाहीत.
पुण्या-मुंबईच्या लोकांचा रेल्वे किंवा बसस्थानकानजीक अगर मध्यवर्ती बाजारपेठे-
नजीक राहण्याची जागा पसंत करण्याकडे कल राहील तर राशीनसारख्या(नगर
जिल्हा) गावी अक्षय पाणीपुरवठा असणाऱ्या ठिकाणीच कायमची वस्ती केली जाईल.
अशी विविधता आणि तिची कारणमीमांसा यांचा अभ्यास मानवी भूगोलात करतात.

व्याख्या
मानवी भूगोलाची व्याख्या तयार करताना त्यातील विविध दृष्टिकोण लक्षात
घेतले पाहिजेत. या विषयाच्या अभ्यासकांनी जसे हे विविध दृष्टिकोण विकसित केले
तसा या विषयाचा आशय व व्याख्या बदलत गेली. या विविध व्याख्या समजून घेताना
एक मध्यवर्ती कल्पना निश्चितपणे सांगता येईल. `मानव व निसर्गसंबंधांचा
मानवी विकसनाच्या दृष्टिकोणातून केलेला अभ्यास म्हणजे मानवी भूविज्ञान.' ही ती
कल्पना होय. निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या पुढे दिलेल्या आहेत :

पान नं. 2

रॅटझेल : "मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणाच्या घटकांचा
अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय." रॅटझेल हे जर्मन भूवैज्ञानिक मानवी भूगोलाच्या
अभ्यासात मानव हा केंद्रबिंदू मानून पर्यावरणाच्या परिणामांची गुंतागुंत समजून
घेण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादन केली,

कु. सेंपल : "अविश्रांत मानव व अस्थायी पृथ्वीवरील बदलत्या पर्यावरण
यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल." कु. सेंपल या रॅटझेल
यांच्या शिष्या. पृथ्वी आणि मानव या दोघांचा परामर्श मानवी भूगोलात घेणे कसे
आवश्यक आहे हे त्यांनी पटवून दिले.

हंटिंग्टन यांच्या मते "भौगोलिक पर्यावरण व मानवी व्यवसायगुण यांचे
स्वरूप व परस्परसंबंध यांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल."

हंटिंग्टन यांच्या मते मानवी भूगोलाच्या अभ्यासात नैसर्गिक परिस्थितीच्या
घटकांना खूपच महत्त्व आहे. भू-रूप, समुद्रापासूनचे अंतर, जमिनी, हवामान इत्यादी
नैसर्गिक परिस्थितीचे घटक मानवाच्या आर्थिक जीवनावर व मानवी संस्कृतीच्या
दर्जावर आपले नियंत्रण ठेवतात. विविध भागांत नैसर्गिक परिस्थिती भिन्न असल्याने
तेथे राहाणाऱ्या मानव समाजांना सारख्याच प्रकारचे यश आर्थिक विकासात येत नाही.

डेव्हिस यांच्या मते, मानवी भूगोल म्हणजे नैसर्गिक पर्यावरण व मानवाची
भौतिक प्रगती यांमधील कार्यकारणभावाचे संशोधन होय.

प्राध्यापक इभ्रे जोन्स यांनी पुढीलप्रमाणे मानवी भूगोलाची व्याख्या केलेली
आहे. : "मानवी जीवनाच्या बहुविध अंगांपैकी जी अंगे सतत बदलणाऱ्या मानव व
निसर्ग यांच्यातील परस्परसंबंधामुळे एखाद्या प्रदेशात एक विशिष्ट प्रकारचे चित्र
निर्माण करतात, त्यांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय. "

कॉक्स यांच्या मते, "भूपृष्ठावरील मानवनिर्मित स्थिर व अस्थिर घटनांच्या
स्थानिक आकृतिबंधनाचे वर्णन व विश्लेषण म्हणजे मानवी भूगोल."

या सर्व व्याख्यांचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून येईल की,

1) मानव हा नैसर्गिक पर्यावरणाचा आविष्कार आहे.
2) मानवी भूगोलाच्या अभ्यासात मानव हा केंद्रबिंदू मानून मानवी
हिताच्या दृष्टीने अभ्यास करणे आवश्यक आहे.( हे विदाल द ला ब्लाश यांनी पटवून
दिलेले होते.)

3) मानवी कार्यासही महत्त्व असल्याने व सभोवताच्या परिस्थितीत मानवी
कर्तृत्वाचे परिणाम दिसून येत असल्याने त्याचाही अभ्यास मानवी भूगोलात करणे
आवश्यक आहे. हे डेमान जिऑन यांचे म्हणणे पटते.

4.) व्हाईट व रेनर यांच्या मते, मानवी भूगोल म्हणजे परिस्थितीविज्ञान.
विविध प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीशी एकरूप होत असलेल्या मानव-समूहांचा
अभ्यास म्हणजे मानवी भूगोल.

पान नं. 3

5) डिकन्स व पिटस यांच्या मते मानव आणि त्याचे कार्य यांचा अभ्यास
म्हणजे मानवी भूगोल.
6) लेबॉन यांच्या मते मानवी भूगोल म्हणजे साकलीय भूगोल.
7) जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या काळी व स्थळी झालेली मानवी प्रगती
म्हणजे स्थानिक नैसर्गिक परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्याची प्रक्रिया होय, असे जीन्स
ब्रून्स म्हणतात. मानवी संस्कृतीचा विकास व ऱ्हास या मानवी घटना किंवा क्रिया-
प्रक्रिया क्रियाप्रक्रिया स्थलकालरूप असतात, कारण निश्चित अशा ठिकाणी
त्या वेगवेगळ्या काळी घडलेल्या असतात, त्यामुळे स्थळाच्या प्राकृतिक व सांस्कृतिक
वैशिष्ट्याचे मानवी विकासावर झालेले परिणाम मानवी भूगोलात अभ्यासले जातात.
अशा अभ्यासात पर्यावरणाच्या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम पाहाणे हा प्रमुख
उद्देश असतो. त्यालाच स्थलीय एकता( Terrestrial unity) असे म्हणतात.

मानवी भूगोलाच्या अभ्यासाची आवश्यकता

प्रचंड वेगाने होणाऱ्या पृथ्वीच्या `मानवीकरणा' मुळे पर्यावरणाच्या म्हणजे
परिसराच्या संरक्षणाची गरज जगात वाढत आहे. मानवाच्या विविध
आकृतिबंध पर्यावरणाची कळत-नकळत हानी करीत असतात. मानवाच्या विविध
क्रियाप्रकिया सुरू असताना त्याच्या परिसराच्या संरक्षणाचे स्मरण त्याला करून
देणे, त्याबद्दल जागृती निर्माण करणे हे मानवी भूगोलतज्ज्ञांचे अंतराळयुगातील
महत्त्वाचे कर्तव्य आहे.

अनेक प्राचीन संस्कृतींनी आपल्या परिसराचा नाश केला. चुकीच्या पद्धतीने
शेती केल्याने जमिनींचा कस व पाणीपुरवठा यांचे नुकसान झाले. अशा प्रकारचे
दुरूपयोग किंवा अतिरिक्त उपयोग टाळण्यासाठी मानवी भूगोलातील संशोधनाचे
निष्कर्ष सामान्य जनतेपर्यत नेणे हेदेखील आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भूपृष्ठाचा
दुरूपयोग केल्यामुळे निर्माण झालेले परिसरविषयक दोष टाळणे, सुधारणे व निसर्ग-
व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे यासाठीही मानव, निसर्ग-सहजीवनाचा अभ्यास
व संशोधन यांची आवश्यकता आहे.
तंत्रविज्ञानावर भर असणाऱ्या समाजात निरूपयोगी घन पदार्थाचे साठे जमतात.
त्यांचा दुरूपयोग करणयाचे तंत्र अजून अवगत नाही. अनेक औद्योगिक देशांत घन
अवशेषांचा प्रश्न गंभीर झाला आहे. विकसनशील देशांतही मुंबई-कलकत्त्यासारख्या
शहरांत त्याने उग्ररूप धारणे केलेले आहे. आपण पूर्वीपेक्षा अधिक अवशेष तयार
करतो, त्यांपैकी बरेच नैसर्गिक परिस्थितीरचनात न आढळणारे असे रासायनिक
घडणीचे असतात. उत्क्रांतीच्या इतिहासात अशी पूर्वीची उदाहरणे नव्हती. त्यामुळे
त्यांच्याशी कसा मुकाबला करायचा हे निसर्गाला ठाऊक नाही. त्यासाठी नवीन
तंत्रपद्धती हव्यात व स्थलकालपरत्वे त्यांचा विविध घटकांशी असलेला संबंध
अभ्यासणे आवश्यक आहे. हे कार्य मानवी भूगोलात केले जाते.

पान नं. 4

निसर्ग-संरक्षण ही एक नवी चळवळ निर्माण झालेली आहे. ती एक काळाची
गरज श्रीमंत व गरीब अशा दोन्ही देशांत आहे. भारतासारख्या अर्धविकसित देशात
दारिद्र्य व प्रदूषण अशा दोन्बी बाजूंनी पर्यावरणाची किंवा स्थानिक परिसराची
अवनती होते. तिचा अभ्यास करून हानीचे प्रमाण कमी करण्यासाठीही मानवी
जीवनाच्या प्रत्येक अंगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपली संस्कृती
कोणतीही असो, आपण जीवन कसे जगतो, आपल्या स्थानिक परिसराच्या बाबत
आपली कर्तव्ये आपण पार पाडतो की नाही हे समजणे आवश्यक आहे. आपल्या
भोवतालच्या सृष्टीशी आपण असा चैतन्यपूर्ण व अभिनव समतोल साधला पाहिजे.
आपल्या सांस्कृतिक व सामाजिक वागणुकीची पर्यावरणाच्या संदर्भात खोलवर
तपासणी केली पाहिजे. अमेरिकन माणसाने मोटारगाडी व प्लॅस्टिक यांवरचे आपले
प्रेम कमी करणे आवश्यक आहे. तर भारतीयांनी गाईची अतिरिक्त पैदास व तिचे
वाजवीपेक्षा जास्त धार्मिक, भावनिक लाड करणे व झाडांचा जळण म्हणून बेसुमार
उपयोग करणे या गोष्टी हळूहळू कमी करायला हरकत नाही.

आपल्या देशात ग्रामीण भागांची पुनर्रचना सुरू आहे. परंतु परिसराबद्दल जर
आपण विधायक व मिशनरी वृत्ती ठेवली तरच आपल्या ग्रामीण भागांचा उद्धार
होईल.

निसर्गसंरक्षणात लोकांची संस्कृती व चालीरीती यांचाही अंतर्भाव हवा.
कारण आपले हे आकर्षक करण्यात त्यांचाही वाटा आहे. तांत्रिक प्रगतीमुळे व
प्रचंड औद्योगीकरणामुळे प्राचीन काळापासून मानवसमूहांनी जोपासलेली अनेक
कौशल्ये व कला यांचा ऱ्हास होत आहे, कारण त्यांना बाजारात मागणी नाही. त्याच-
प्रमाणे अनेक पारंपारिक रीतींनाही आपण मुकत आहोत. कारण त्यांचे मोल आपण
शास्त्रीय दृष्टीने कधीच तपासून पाहिलेले नाही. म्हैसूरपरमधील उपलिग व कुर्शबा जमाती
व जुन्या काळची पक्कीन जमात जनावरांच्या खुरावरून त्यांचा जंगलात मागोवा
काढण्यात पटाईत होती. आजच्या निसर्गाभ्यासकांना त्यासाठी यंत्रांची मदत घ्यावी
लागते. यंत्रविज्ञानातील प्रगतीमुळे माणसाच्या इंद्रियांची संवेदनाशक्ती क्षीण झाली
तर संपूर्ण मानवजातीची त्यामुळे हानीच होणार आहे. अनेक पारंपारिक कौशल्यांचा
त्यांच्या परिसराच्या संदर्भात अभ्यास करणे हे मानवी भूगोलतज्ञांचे कर्तव्य आहे.
या अभ्यासाचे उद्दिष्ट आपल्या भूतकाळाची महती गाणे हे नाही. जुन्या चालीरीतींची
शास्त्रीय चिकित्सा करून त्यांचे तत्कालीन पर्यावरणसंबंधांचे परीक्षण करणे हे आहे.
त्यातूनच बदलत्या काळानुसार या संबंधांत कशा प्रकारे बदल करता येईल याचे ज्ञान
होते.

ग्रामीण भागांचा विकास करताना शहरातील विकासाचे अंधानुकरण टाळणे
आवश्यक आहे. विकासाची दिशा ठरविताना ग्रामीण भागांतील उपलब्ध नैसर्गिक

पान नं. 5
साधनांचा विचार करून त्यांचा विनियोग कशा प्रकारे करता येईल हे अभ्यासणे
जरूरीचे आहे, यामुळेच तेथील निसर्ग वा परिसर सुरक्षित राखणे सोपे जाईल.

या अभ्यासाचे उद्दिष्ट आपल्या भूतकाळाची महती गाण्याचे नसून, जुन्या
चालीरीतींची शास्त्रीय चिकित्सा करून त्यांचे तत्कालीन पर्यावरणसंबंधांचे
परीक्षण करणे हे आहे. त्यातूनच बदलत्या काळानुसार या संबंधात कशा प्रकारे बदल
करता येईल याचे ज्ञान होऊ शकेल.

मानवी क्रिया-प्रक्रिया चालू असताना निसर्ग-मानव संबंध बदलत जातात.
जलचक्र, नत्रचक्र इत्यादी निसर्ग-नियमांच्या विरूद्ध दिशेने मानवी क्रिया चालू
असतात. त्यामुळे त्या निसर्गचक्रांत अडथळे येतात, यालाच प्रदूषण असे म्बणतात.
प्रदूषणामुळे एकेकाळी अनुकूल असलेला निसर्ग प्रतिकूल बनू शकतो. तेव्हा असे
प्रदूषण टाळून, निसर्गसंवर्धन करून मावनी विकास कसा साधता येईल याचा विचार
करणे हे मानवी भूगोलाचे महत्त्वाचे अंग आहे.

विविध वाद:- मानवी भूगोलाचा अभ्यास विकसित होत असताना त्यात
अनेक दृष्टिकोण व वाद यांची भर पडत गेली. या विषयाचा अर्थपूर्ण अभ्यास
करण्यासाठी हे विविध वाद, त्यांचे विविध शास्त्रज्ञांनी सांगितलेले दृष्टिकोण आणि
त्यांतील संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. मानवी भूगोलाच्या अभ्यासकांच्या
दृष्टीने आधुनिक काळाच्या सुरूवातीपासूनच मानव-निसर्ग संबंधांच्या संदर्भात
दोन प्रश्न महत्त्वाचे ठरले.

1) मानवी विकास सर्वस्वी नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून आहे का ?
2) मानवी विकास घडविण्यामध्ये मानवी कार्याचे महत्त्व आहे का ?

या दोन्ही प्रश्नांची होकारार्थी उत्तरे दोन वेगवेगळ्या गटांतील शास्त्रज्ञांनी
दिलेली आहेत. त्यातून निसर्गवाद व संभववाद या दोन प्रमुख विचारप्रणाली
मानवी भूगोलामध्ये रूढ झाल्या. त्यांचा सविस्तर विचार आपण आता करू.

निसर्गवाद : मानवी विकास सर्वस्वी निसर्गावरच अवलंबून असतो असे
मानणारी ही विचारसरणी होय यामध्ये मानवी विकासावर नैसर्गिक पर्यावरणाचा
केवळ परिणामच होतो असे न मानता मानवी विकसनामध्ये कार्यरत असलेल्या
`मानवा'ची इच्छा व स्फूर्तीसुद्धा निसर्गावर अवलंबून असते असे मानले जाते.
अगदी टोकाची भूमिका म्हणजे मानव हा निसर्गाचाच अविभाज्य भाग असून
इतर प्राणिमात्रांप्रमाणेच त्याच्या सर्व हालचाली नैसर्गिक घटकांनुसार होत असतात
ही होय. याच विचारांना निसर्गावाद असे म्हणतात. ही विचारसरणी 19 व्या
शतकाच्या सुरूवातीच्या काळात प्रचलित झाली. त्या काळात सभोवतालची
परिस्थिती म्हणजे केवळ नैसर्गिक पर्यावरण असेच समीकरण मानले जात होते.
म्हणूनच निसर्गवादास पर्यावरणवाद (Environmentalism) असेही संबोधले
गेलेले आहे.

पान नं. 6

निसर्गवाद किंवा पर्यावरणवाद खऱ्या अर्थाने 19 व्या शतकामध्ये सांगण्यात
आलेला असला तरी या प्रकारचा दृष्टीकोण अगदी प्राचीन काळातही मांडलेला
दिसून येतो. इ.स. पूर्व पाचव्या शतकामध्ये हिपोक्रॅटस या शास्त्रज्ञाने मानवी
डजीवन नैसर्गिक घटकांवर कसे अवलंबून आहे हे सांगितले. त्याच्या `On Airs,
Wzters and Places' चा विवेचनामध्ये त्याने आशियातील व युरोपमधील
मानवी जीवनांची तुलना केली. पर्वतमय प्रदेशात उंच, धिप्पाड व वीर पुरूष
असतात तर सपाट प्रदेशात बुटके, आळशी, अकार्यक्षम लोक असतात. आशिया
व युरोप यांच्या मध्यस्थ स्थान असलेल्या ग्रीक लोकांमध्ये दोन्ही प्रदेशांतील गुण
आढळतात. या व अशा अनेक गोष्टी त्याने आपल्या विवेचनात मांडून मानवी
जीवनावर निसर्गाचा कितपत व कसा परिणाम होतो हे सांगितले. याच प्रकारची
उदाहरणे अँरिस्टॉट्लनेही सांगितली. त्याने नाईल नदीच्या ईजिप्तवर होणाऱ्या
परिणामांची शास्त्रीय चिकित्सा केली. स्टॅबोच्या लिखाणामध्येसुद्धा निसर्गाचा
मानवावर कसकसा परिणाम होतो हे दर्शविणारी तुलनात्मक उदाहरणे आढळून
येतात. उदा, इटलींचा आकार, उंचसखलता, हवामान इ. घटकांचा रोमच्या उत्था-
पनावर व शक्तीवर कसा परिणाम होत गेला याचे विवेचन. अशा तऱ्हेने प्राचीन
काळातील शास्त्रज्ञांनी निसर्गवादामध्ये सामाविष्ट होऊ शकतील असे विचार त्या
काळातील निरीक्षणाद्वारे मांडले.

19 व्या शतकामध्ये निसर्गावाद किंवा पर्यावरणवाद एक विशिष्ट वाद म्हणून
प्रथम मांडला, तो रॅट्झेल (1844-1904) या शास्त्राने. अर्थात त्याच्या
अगोदर आधुनिक भूगोलाचे आधारस्तंभ मानले जाणारे रिटर व बुम्बोल्ट
यांनी पृथ्वीवरील अनेक घटकांचे `कार्यकारणसंबंध' अभ्यासले होते. अशा कार्य-
कारणसंबंधाची मीमांसा करताना रॅट्झेलला नैसर्गिक घटकांचे मानवी जीवनावर
होणारे परिणाम अतिशय महत्त्वाचे वाटले. त्यातूनच पर्यावरणवादाची विचार-
प्रणाली उदयास आली. भूगोलाचा विविध अंगी अभ्यास करणाऱ्या या जर्मन
प्राध्यापकाने पर्यावरण मानवी जीवन कसे घडविते हे स्पष्ट केले. त्याने भूगोलाच्या
अनेकविध शाखांचा अभ्यास केलेला असला तरी त्यात एक महत्त्वाचे सूत्र होते,
ते म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील घटकांचा मानवाशी असलेले संबंध पाहाणे
हे होय. उदा, प्राकृतिक रचनेचा अभ्यास त्याच्या अगोदर अनेक शास्त्रज्ञांनी केलेला
होता. परंतु रॅट्झेलच्या कार्याचे महत्त्व म्हणजे विविध प्राकृतिक रचना असलेल्या
प्रदेशांत मानवी जीवनाची वैशिष्ट्ये त्याने अभ्यासली व मानवी घटनांचे संबंध
उंची, उंचसखलता, हवामान, वनस्पति-जीवन यांसारख्या प्राकृतिक घटकांशी
कसा आहे हे स्पष्ट केले. त्याच्या अँथ्रोपोजिओग्राफी ( भाग 1) या ग्रंथामध्ये
त्याने पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मानवीसमूहांचे वितरण नैसर्गिक शक्ती कशा
प्रकारे नियंत्रित करतात हे सांगितले. अर्थात या ग्रंथामध्ये रिटरने सांगितलेलीच
संकल्पना आपण नव्या शास्त्रीय पद्धतीनुसार विकसित केलेली आहे हे त्याने कबूल

पान नं. 7

केले. रिटरपेक्षा रॅटझेल यांच्या विचारांमध्ये दोन मूलभूत फरक होते. एक
म्हणजे, मानवी भूगोलाचा सूत्रबद्ध पद्धतीने अभ्यास करणे रॅट्झेलला जास्त
सयुक्तिक वाटत होते, दुसरा डार्विनचा उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोणावर आधारित
होता. रिटरच्या मते, मानव व निसर्ग एकमेकांवर अवलंबून आहेत, परंतु रॅट्झेलने
मानव हा उत्क्रांतीचा अंतिम आविष्कार आहे हा विचार मांडला डार्विनच्या
सिद्धान्तानुसार उत्क्रांती घडत असतानाच निसर्गनिवडीच्या पर्यावरणाशी मानव
जुळवून घेत घेतच विकसित होत असतो म्हणूनच मानव हा पर्यावरणाचा गुलाम
आहे. पर्यावरणाच्या अनेकविध शक्तींनुसार तो घडत असतो. या शक्तींबरोबर
योग्य अशी सांगड घातली तरच मानवाचे अस्तित्व अबाधित राहू शकेल. अशा
तऱ्हेने मानवाची उत्क्रांती व त्यानुसार टिकून राहिलेले मानवी अस्तित्व सर्वस्वी
पर्यावरणावर अवलंबून आबे. रॅट््झेलच्या विचारप्रणालीचा हा भाग होय.

19 व्या शतकाच्या उत्तरार्धात जीवशास्त्राचा झालेला विकास व डार्विनच्या
सिद्धांतांना मिळालेली शास्त्रीय मान्यता यांचा भूगोलाच्या अभ्यासकांवर मोठा
परिणाम झाला. त्यामुळे पर्यावरणवादी दृष्टिकोणास विज्ञाननिष्ठता लाभली. याच
काळात हेकेलने या सिद्धांतांचा अभ्यास करून Ecology हे नवीन शास्त्र सांगितले.
त्यामध्ये प्रामुख्याने एकाच जागी राहाणाऱ्या अनेक सजीवांमधील परस्पर संबंध
व पर्यावरणाशी असलेले नाते यांचा अभ्यास केला जातो. याच काळामध्ये समाज-
शास्त्राचाही विकास बऱ्याच अंशी झालेला होता. मानवी समाजामध्ये घडणाऱ्या
गोष्टींचा सांख्यिक अभ्यास मांडण्यास सुरूवात झालेली होती. त्यातूनच पर्यावरण-
वादास पोषक असा एक सिध्दांत उदयास आला. तो म्हणजे "मानव त्याच्या
प्रत्येक कृतीच्या बाबतीत मुक्त नसून तो पूर्णपणे नैसर्गिक आणि आर्थिक नियमांचा
गुलाम आहे." अशा तऱ्हेने नवीन शास्त्रीय पद्धतींच्या साह्याने हेकेलप्रमाणे इतर
शास्त्रज्ञांनी विविध घटनांचा अभ्यास करून, मानव कृतिशील (Active) नसून
अकृतिशील (passive ) आहे हे सिद्ध केले.

बकल या शास्त्रज्ञाने इंग्लंडमधील सांस्कृतिक इतिहास (History of
Civilization in England) या विषयावरील दोन ग्रंथांमध्ये पर्यावरणवादाचीच
कास धरलेली आढळते. त्याच्या मते, मानवाच्या विविध क्रिया त्याच्या इच्छा-
शक्तीनुसार होतात. परंतु हीच इच्छाशक्ती मुळात विशिष्ट नियमांवर अवलंबून
असते. निसर्गातील विविध घडामोडींचा मानवी मनावर व मानवी मनाचा या
घडामोंडीवर परिणाम होत असतो. अशा तऱ्हेने प्रत्येक मानवी घटना ही निसर्गा-
मुळे बदलेले जाणारे मन व मानसिक क्रियांमुळे बदलला जाणारा निसर्ग यांच्या
दृढसंबंधाचे द्योतक आहे. मानवी प्रगती किंवा अधोगती, सुख किंवा दुःख इ.
या दुहेरी क्रियांचेच फळ मानावे लागेल. म्हणूनच सभोवताली एका विशिष्ट
प्रकारची परिस्थिती जेथे जेथे आहे त्या प्रत्येक ठिकाणी मानवी विकसनामध्ये
साम्य आढळते. हे साम्य उपलब्ध माहितीच्या व शास्त्रीय पद्धतींच्या साह्याने

पान नं. 8

शोधून काढणे ही पर्यावरणवाद्यांची प्रमुख जबाबदारी होय. या प्रकारच्या सैद्धांतिक
विवेचनानंतर बकलने मानवाच्या वांशिक गुणधर्मावर हवामान, अन्न, जमीन
आणि निसर्गाचा सर्वसाधारण दृष्टिकोण या चार घटकांचा कसा परिणाम होतो
हे स्पष्ट केले. पहिले तीन घटक परस्परांवर परिणाम करून प्रामुख्याने संपत्तीचा
संचय व वितरण यांच्याशी निगडीत आहेत. अर्थात प्रत्येक घटकाच्या परिणामांचे
महत्त्व व प्रमाण वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळे असते. उदा. आफ्रिका व आशिया-
तील सांस्कृतिक विकासावर सुपीक जमिनींचा परिणाम जास्त महत्त्वाचा ठरतो,
तर युरोपमध्ये हवामान हा घटक जास्त महत्त्वाचा आहे. हवामानाचा मजुरीच्या
दरांवर कसा परिणाम होतो हेही त्याने यात सांगितले. निसर्गाच्या सर्वसाधारण
दृष्टिकोणामुळे सामाजिक मन घडत असते व त्यातूनच राष्ट्रीय मतप्रवाह निश्चित
होतात म्हणूनच विकासाची एकूण दिशा ठरविण्याच्या दृष्टीने हा चौथा घटक
अतिशय महत्त्वाचा आहे हे बकलने स्पष्ट केले. जेथे निसर्ग कमकुवत असतो
तेथे मानवी मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो व तो क्रियाशील बनवण्यास उद्युक्त
होतो. याउलट जेथे निसर्ग अत्यंत सामर्थ्यशाली असतो तेथे मानव नैसर्गिक
चमत्करांपुढे नतमस्तक होतो. त्यामुळे तो अंधश्रद्ध बनतो. आत्मविश्वासाचा अभाव
असल्याने विकासाची गतीही कमी असते. यावरून हे स्पष्ट होते की, कोणत्याही
प्रकारचे पर्यावरण असो, त्याचा मानवावर सतत वरचष्मा असतो. म्हणूनच
इतिहासाचा अभ्यास करताना जड विश्वाचा विचार करणे अटळ आहे. शेवटी
निसर्ग-मानव एकमेकांवर परिणाम करतात हे मान्य करून बकल आवर्जून सांगतो
की, मानव केव्हा व कसा क्रियाशील बनतो हे सर्वस्वी निसर्गाधीन आहे.

20 व्या शतकाच्या सुरूवातीस पर्यावरणवादाच्या विचारसणीमध्ये मौलिक
भर टाकणारा शास्त्रज्ञ म्हणजे एडमंड डेमॉलिश हा होय. याने लेप्ले (1807 ते
1882 ) या तज्ज्ञाने सांगितलेले विचार विकसित कले. लेप्लेने पर्यावरणाचा
मानवी जीवनावर होणारा परिणाम स्पष्ट करण्यासाठी जागा, कार्य व समूह असे
सूत्र सांगितले. जागा म्हणजे पर्यावरण, कार्य म्हणजे मानवी कार्य आणि समूह
म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकसनानुसार अस्तित्वात असलेला मानवी समाज
होय. या सूत्राचा विचार करून डेमॉलिन्सने पर्यावरणातील अनेक शक्तींच्या
अभ्यासावर लक्ष केद्रित केले. त्याच्या ग्रंथामध्ये त्याने विविध मानवी समूहांचे
स्थलांतराचे मार्ग कसे निर्माण झाले हे स्पष्ट केले. त्याच्या मते, स्थलांतराचे मार्ग
म्हणजे केवळ स्थलांतर कोणत्या प्रदेशातून मार्गक्रमण करते हे नसून कालांतराने
मानवी समूह आपणास योग्य अशी जागा कोणती निवडतात याचाही विचार
ध्यानात घेतला पाहिजे. ज्या विविध मार्गानी आपले पूर्वज भटकत होते त्यानुसार
आजच्या स्कॅन्डेनेव्हियन,जर्मन, ग्रीक इटालीयन, स्पॅनिश इ. प्रदेशांतील लोकांमध्ये
विविधता आढळते. याच्याही पुढे जाऊन तो म्हणतो, "जर पृथ्वीचा पृष्ठभाग
बदलला गेला नाही आणि त्यवर मानवी इतिहास पुनश्च घडण्यास सुरूवात

पान नं. 9

झाली तर त्या इतिहासाची पुनरावृत्तीच होईल" यावरून पृथ्वीच्या पृष्ठभागा-
वरील घटकांना डेमॉलिन्सच्या दृष्टीने किती महत्त्वाचे स्थान आहे हे स्पष्ट होते.
त्याने आपल्या विचारांना पुष्टी देणारी अनेक उदाहरणे सांगितली. स्टेप प्रकारचे
हवामान गवत निर्माण करते. या गवताळी प्रदेशामध्ये एका विशिष्ट प्रकारचे
मानवी जीवन आढळून येते. गवतावर आधारित घोड्यांची पैदास व घोड्यांचे
महत्त्वपूर्ण सहकार्य असलेले मानवी जीवन तेथे दिसून येते. मानवाचा आहार
प्राणिजीवनावर अवलंबून असतो. हे प्राणिजीवन पर्यावरणावर अवलंबून असते.
त्याचप्रमाणे मानव ज्या वस्तूंचे उत्पादन करतो त्या वस्तूंचा कच्चा माल ही
निसर्गाचीच देणगी आहे. अशा तऱ्हेने मानवाच्या आहार-विहारावर निसर्गाचे
प्रभुत्व आहे.

निसर्गवादी किंवा पर्यावरणवादी विचारसणीच्या विकसनातील शेवटचा
टप्पा म्हणजे एलन सेंपल या बिदूषीचे कार्य होय. तिने 1911 मध्ये `भौगोलिक
पर्यावरणाचे परिणाम' हा ग्रंथ सादर केला. रॅट्झेलची विद्यार्थिनी असल्याने तिने
त्याच्या विचारांचीच कास धरली. अर्थात शास्त्रीय प्रगतीनुसार रॅट्झेलच्या कल्पनां-
मध्ये थोडा बदल करण्याची आवश्यकता तिने मान्य केली. मानवाची संपूर्ण जडण-
घडण सर्वस्वी निसर्गानुसार होत असते." ही तिच्या विवेचनातील मध्यवर्ती कल्पना
होय. अगदी टोकाची भूमिका घेताना मानवास लाभलेली बुद्धी, स्फूर्ती आणि
कार्यक्षमता नैसर्गिक घटकांवरच अवलंबून असते असे तिने आवर्जून सांगितले.
तिच्याच शब्दांत सांगायचे तर "मानव हा पृथ्वीच्याच धूलिकणांतील एक कण
आहे (dust of her dust) " असे म्हणावे लागेल. पृथ्वीने मानवाला जन्म
देऊन त्याचे पालनपोषण केले. एवढेच नव्हे तर पृथ्वीनेच मानवनापुढे जलसिंचन
किंवा जलवाहतूक यासारखे प्रश्न निर्माण केले आणि पृथ्वीनेच त्यांची उत्तरे
शोधण्याच्या दृष्टिने मानवास सामर्थ्य व बुद्धी बहाल केली. पर्वतमय प्रदेशात तिने
मानवास डोंगर चढण्यासाठी जसे जास्त शक्तिशाली पाय व स्नायू दिले तसे
किनारपट्टीच्या प्रदेशात त्यास होडी चालविण्यासाठी भरदार छाती आणि ताकदवान
हात दिले. तेव्हा मानवाचे विविध प्रकारचे सामर्थ्यसुद्धा निसर्गाची देणगी आहे.
एखाद्या साच्यातून जशी प्लॅस्टिकची खेळणी तयार केली जातात त्याप्रमाणे विविध
नैसर्गिक प्रदेशांतून विविध प्रकारचे मानवी समूह तयार केले गेले आहेत. अशा प्रकारे
निसर्गवाद आवर्जून सांगणाऱ्या या विदूषीने धर्म धार्मिक, कल्पना व रूढी यांवरही
निसर्गाचा परिणाम कसा होतो ते स्पष्ट केले. पर्यावरणाच्या घटकांचे हे मानस-
शास्त्रीय परिणाम किरशॉफ (Kirchoff) या रॅट्झेलच्याच विद्यार्थ्यानेही
सांगितलेले आहेत. त्याच्या मते, जंगलातील आणि सागरी विभागातील लोक अनेक
देवतांची पूजा करतात तर वाळवंटामध्ये प्रामुख्याने एकाच देवाची उपासना केली
जाते. सेंपलच्या ते, वाळवंटी प्रदेशात मैलौमैल पसरलेल्या वाळूमुळे प्रदेशास
तोच तोपणा लाभतो व त्यामुळेच एकाच देवाची उपासना करण्याकडे मानवाचा

पान नं. 10

कल असतो. अशा तऱ्हेने शेती, उद्योग, व्यापार धर्म इत्यादींबाबत निसर्ग,
मानवावर कसे प्रभुत्व गाजवीत असतो हे युरोप, आफ्रिका, स्टेप प्रदेशांतील
उदाहरणे देऊन तिने निसर्गवाद सांगितला.

रॅट्झेलपासून किर््शॉफपर्यत निसर्गवादी विचारसरणी कशी विकसित होत
गेली हे वरील विवेचनावरून स्पष्ट होतेच. या तत्त्वज्ञाना मानवी भूगोलाची
व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. किंबहुना या विचारसरणीमुळेच
मानवी भूगोल या विषयास आधुनिक काळात स्वतंत्र स्थान लाभले, असे म्हटल्यास
वावगे ठरणार नाही निसर्ग मानवी जीवनांचा अभ्यास करून समान नैसर्गिक
तत्त्व शोधून काढण्याचे शास्त्रीय कार्य मोठ्या प्रमाणात घडू लागले. यामध्ये
मानवी सामर्थ्यास दुय्यम स्थान दिले देले असले तरी निसर्गाची नियमनशक्ती
समजून घेण्याचे आव्हान संशोधकांपुढे ठेवले गेले. त्यामुळे निसर्गताली शक्तींची
जाणीव आपणास झाली. आजच्या प्रगत मानवाचे सामर्थ्य वाढलेले आहे, तो
प्रतिकूल परिस्थितीशी समर्थपणे झुंज देऊ शकतो, व निसर्गास आपल्या फायद्यासाठी
वाकवू शकतो असे चित्र आज आपण पाहतो. त्यामुळे निसर्गवादी दृष्टिकोणाचे
महत्त्व यत््किंचितही कमी लेखून चालणार नाही.

निसर्गवादावरील आक्षेप
निसर्गवादामध्ये नैसर्गिक क्रियांना महत्त्व दिले जाते. परंतु नैसर्गिक
क्रियांमध्ये दिसून येणाऱ्या विरोधाभासाचे निरीक्षण करून निसर्गवाद अनेकांनी
अमान्य केला.

1. निसर्गात शिस्त नाही. शिस्त व कल्पकता मानवाने आणलेली आहे.
सजीव पदार्थाच्या संख्यावाटणीत बदल करून, निर्जीव जमिनीतून अनेक प्रकारची
पिके घेऊन मानवाने पृथ्वीवर विविधता निर्माण केलेली आहे.

2. निसर्गाला अनेक पदार्थाचा पुनरूपयोग करता येत नाही. कोळसा, तेल
ग्वानोचे साठे यांच्यावरून ही गोष्ट दिसून येते. या पदार्थाचे साठे जमलेले
आहेत. याचा अर्थ हा की, पुनरूपयोगाची प्रक्रिया त्यांच्याबाबत झालेली नाही.
मानव ही प्रक्रिया पुरी करतो. तेल, कोळसा जळण म्हणून वापरतो. ग्वानो
गोळा करून शेतात मिसळतो. आणि तेथे ते वनस्पतिपोषक म्बणून पुन्हा एकदा
उपयोगात आणता येते.
ज
3. निसर्ग हा एकसुरी आहे. त्यातील विविधता मानवाने निर्माण केलेली
आहे. माणसाचा हात लागेपर्यत पृथ्वीचा बहुतेक भूभाग जंगलांनी आणि
दलदलींनी व्यापलेला होता. त्या हिरव्या पाणथळ आवरणात भव्यता होती, पण
विविधता नव्हती. प्राचीनकाळी जंगलांनी पृथ्वीतील विविधता जवळजवळ

पान नं. 11

झाकून टाकली होती. मानवाने पृथ्वीवर जी सृजनशील परिवर्तने घडवून आणली
त्यामुळे विविधता निर्माण झाली. सर्वात चित्तवेधक भू-प्रदेश म्हणजे प्राचीन
अरण्ये किंवा मानवस्पर्शविरहित निसर्ग नव्हे, तर माणसाने फुलबागा, पायवाटा,
कुरणे, उद्याने, शेते, तलाव यानिशी `मानवीकरण' केलेली दृश्ये. काश्मीर-
मधील `दाल सरोवर, '`उटकमंड येथील `उटीबाग' अशी पृथ्वीच्या मानवीकरणाची
उत्कृष्ट उदाहरणे आहेत. निसर्गातील अनेक वैभवे जेथे माणसाचा स्पर्श झालेला
आहे अशा प्रदेशात नजरेला आली आहेत.

4. निसर्गनिर्मिती जग हे आदर्श नाही, कारण गारांचा पाऊस, पूर, अवर्षम,
वादळे, भूकंप, ज्वालामुखी असले अनर्थ वारंवार होतात. या अनर्थाना मानव
जबाबदार नसतो.

5. मानवनिर्मित परिसर निकोप ठेवणे हे निसर्गाला जमत नाही. पृथ्वीचे
मानवीकरण प्रचंड वेगाने झाल्यामुळे परिसराचे आरोग्य माणसाने घेतलेल्या
काळजीवरच अवलंबून असते. शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास हजारो वर्षे उत्पन्न
देणाऱ्या शेतजमिनी तणांनी आणि झुडपांनी व्यापून जातात. दलदली साफ न
ठेवल्यास मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. म्हणजेच निसर्ग माणसाने लक्ष दिल्याशिवाय
आपली गुणवत्ता राखू शकत नाही.

कुटुंबनियोजनाबद्दल पक्ष्यांत उपजत प्रवृत्ती असतात. ग्रे जंगल, फाउलसारखे
पक्षी विशिष्ट फुलांची संख्या कमी झाली की कमी अंडी घालतात, तर मॅगवाय-
रॉबिन पक्षी `लग्ना'चा हंगाम चुकवितो. परंतु मानव मात्र दारिद्रय वाढले की,
प्रजोत्पादनही वाढवतो. पक्ष्याच्या उलट क्रिया माणसात घडते. या निसर्गाच्या
लहरीचे आकलन होत नाही.

ज्या दोन प्रदेशांत निसर्गातील साम्य खूपच आढळते. परंतु त्याच दोन प्रदेशां-
तील मानवी जीवनात साम्य आढळत नाही. कांगोखोऱ्यातील पिग्मी व जावा-
मधील इंडोनिशिय यांच्या सांस्कृतिक दर्जात बराच फरक आढळतो.

शक्यतावाद ( Possibilism)
मानवी प्रयत्नामुळे निसर्गाची बंधने खूपच शिथिल होऊन जीवन सुसह्य
होऊ शकते. निसर्गात अनेक सुप्त घटक आहेत. त्यांचा योग्य प्रकारे अभ्यास करून
आपल्या अग्रक्रमानुसार विकास घडविणे हे सर्वस्वी मानवी प्रयत्नावर अवलंबून
असते अशी मतप्रणाली म्हणजे शक्यतावाद.

1. शक्यतावाद्यांनी स्थलीय एकतेच्या तत्त्वापासून आपले भौगोलिक तत्त्व
प्रतिपादन करण्यास सुरूवात केली. स्थलीय एकता या तत्त्वानुसार (Principal

पान नं. 12

of terrestrial unity) सर्व पृथ्वी ही एकच आहे व पृथ्वीवरील जडवादी
व सजीव पदार्थाचा परस्परसंबंध आहे. भूस्तरीय रचनेचा परिणाम भूपृष्ठाच्या
ठेवणीवर व भूपृष्ठाचा परिणाम हवामान, जमीन, वनस्पतीवर होतो. याचा
परिणाम मानवाची शेती आणि इतर व्यवसाय यांवर होतो. त्यामुळे मानवाची
आर्थिक व सांस्कृतिक प्रगती ही स्थलीय एकतेशी निगडीत आढळते. ब्रून्स यांनी
वरील सिद्धांताचा आधार घेऊन असे प्रतिपादन केले- मानव वस्ती असलेली पृथ्वी
किंवा तिचे विविध भाग यांवर मानवी भूगोलात संशोधन व्हावे. निसर्गवादी
प्रामुख्याने विविध भागांतील नैसर्गिक पर्यावरणाचा अभ्यास करीत असत.

2. शक्यतावादी पुढे असे म्हणतात की वारे, नद्या, हिमनद्या याप्रमाणे
मानव हा भूपृष्ठावर प्रचंड वेगाने बदल घडवून आणणारा घटक आहे. इतर
घटकांपेक्षा मानवी क्रिया-प्रक्रियांमुळे फार वेगाने भूपृष्ठावर बदल घडून येत
असतो. आदिमानवाने पृथ्वीवर बदल घडवून आणण्यास सुरूवात केली. अंतराळ-
युगातील मानवाने प्रचंड वेगाने हा बदल चालू ठेवलेला आहे.

3. मानव निसर्गाच्या सहकार्याने त्याच्याबरोबर जोडीने काम करतो.
पृथ्वीवरील उंचसखलपणा व त्यामुळे आढळणारा गुरूत्वशक्तीतील फरक यांचा
वापर मानवाने जलविद्युतनिर्मितीसाठी केला. डोंगरउतारावरील जमीन काही
ठिकाणी चहा, कॉफीच्या मळ्यांसाठी वापरली. अशी अनेक उदाहरणे मानव-
निसर्ग यांच्या सहकार्याच्या संदर्भात देता येतील.

4. मानवी विकासाला निसर्ग बंधनकारक नाही. उलट त्याची अनुमती
आहे असेही शक्यतावादी म्हणतात. निसर्ग हा सल्लागाराची भूमिका बजावतो.
मानवाने आधुनिक तंत्र वापरून वनस्पति-पिकांच्या अनेक संकरीत जाती निर्माण
केलेल्या. काचगृहातील शेतीचे तंत्र सैबेरियासारख्या अतिशीत प्रदेशात वापरून
तेथेही गहू, सफरचंद यांसारखी पिके घेतली. सैबेरियात उन्हाळा 60 ते 75 दिवस
असला तरी प्रकाशमान सुमारे 18 तासांपेक्षा जास्त असते. त्याचा वापर मानवाने
करून घेतला. हा एकप्रकारचा निसर्गाशी केलेला सहकारच आहे. अशा प्रकारच्या
सहकार्यामुळे मानवाची वनस्पती निर्माण करण्याची कक्षा वाढवली.

5. नैसर्गिक परिस्थिती मानवाला अनेक ठिकाणी संधी उपलब्ध करून
देते. परंतु तिचा फायदा कसा करून घ्यायचा किंवा कोणत्या नैसर्गिक परिस्थितीच्या
घटकांची निवड आपल्या आर्थिक लाभासाठी करायची हे ठरविणे संपूर्णपणे
मानवाच्या हातात असते. या संदर्भात ब्रून्स, या फ्रेंच भूगोलवेत्त्याचे वचन
लक्षात ठेवण्याजोगे आहे. गारगोटीपासून विस्तव तयार करता येतो. गारगोटीचे
दोन खडे जवळजवळ आहेत, परंतु त्यातून माणूसच विस्तव निर्माण करू शकेल.
त्याचप्रमाणे सर्व माननिर्मित घटकांची निर्मिती व शेवट या गोष्टी सर्वस्वी
माणसावरच अवलंबून आहेत. मानवच आपल्या नशिबाचा मालक आहे व तोच
खरा शक्तिमान आहे.

पान नं. 13

6. मानवाला इतर प्राण्यांपेक्षा बुद्धी, कल्पकता, धैर्य या गोष्टी जास्त
असल्याने प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही त्याने आपल्या संस्कृतीचा प्रसार
केलेला आहे.

6 नैसर्गिक परिस्थिती संपूर्णपणे मानवी समाजाचे स्वरूप नियंत्रित करू
शकत नाही तर त्यांस सशर्त विकास घडवून आणते. निसर्गाची पकड ढिली
करणे हे मानवाच्या हाती असते.

8. शक्यतावाद्यांचे अमेरिकेमधील प्रवक्ते बोमन असे म्हणतात की,
"निसर्गनियमांना अनुसरून मानव आपले जीवन व्यतीत करीत असतो, परंतु
निसर्गनियमांचा प्रभाव स्थल-कालदृष्ट्या बदलता असतो. निरनिराळ्या ठिकाणी
एखाद्या नियमाचा परिणाम कमीजास्त दिसून येतो."

9. मानवाची तंत्रविद्येत सतत प्रगती चालू असली तरीदेखील निसर्गाचे
नियंत्रण सर्वस्वी झुगारून देण्याइतपत मानव समर्थ बनणे कठीण आहे, हे
शक्यतावादी नेहमीच आवर्जून सांगत आलेले आहेत.मानवी सामर्थ्याच्या मर्यादा
त्यांनाही मान्य आहेत. अशा रीतीने शक्यतावादी पर्यावरणाची दखल घेतात,
परंतु त्याचे नियंत्रणकारक सामर्थ्य मान्य करीत नाहीत.

10 मानवी भूगोल हे निसर्ग व मानव यांमधील तडजोड करण्याचे शास्त्र
आहे. पृथ्वीवर एका विशिष्ट मर्यादेपर्यत मानवी विकासाला वाव आहे. ही मर्यादा
अक्षांश, उंचीव खोली यांनी तयार झालेली असते. त्यापलीकडे मानवी जीवन
सुस्हय नसते. उदाहरणार्थ, 70 अंश अक्षांशापलीकडे मानवी जीवनास योग्य असे
हवामान नाही, तर जास्त उंचीवर प्राणवायू विरळ होतो, आणि मानवी वस्ती
घनरूप पृथ्वीवरच आढळते. अक्षांश, उंची व खोली यांनी घातलेल्या मर्यादेपर्यतच
सापेक्ष रीतीने मानवी विकास होऊ शकतो. सर्व निसर्गनियमांचे योग्य रीतीने
पालन करूनच विकासयोजना मानव कार्यवाहित करतो.

11. मानवाच्या क्रिया-प्रक्रियांमुळेच स्थळांच्या पर्यावरणात मानवनिर्मित
वाढ झालेली आढळते. जगातील विविध भागांचा एकमेकांशी संपर्क वाढल्यानंतर
स्थळांच्या संदर्भातील विचारसंगती वाढली, आचारविचारांची देवाणघेवाण वाढली.
मानवाने नवीन तंत्र आत्मसात केल्याने अर्थकारण बदलले. बटाटे व मका हे
पदार्थ कोलंबसाने मेक्सिको व अमेरिकेतून युरोप खंडात आणले. त्यामुळे युरोपचे
अर्थकारण बदलले. महाराष्ट्रातील सोलापूर-नगरच्या काही भागात उसामुळे
सुबत्ता निर्माण झाली. राजस्तान कालव्यामुळे थरच्या वैराण वाळवंटात अनेक
ठिकाणी गहू व कापूस यांच्या शेतीस सुरूवात झालेली आहे. थोड्या कालानंतर
तेथे यावर आधारित असे उद्योगधंदे निघतील. त्यामुळे तेथील सांस्कृतिक पर्यावरण
बदलेल. महाराष्ट्रातील पाझरतलावामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना
दिलासा मिळालेली आहे. पाझरतलावाभोवती झाडी, हिरवळ असलेले निसर्गदृश्य
तयार होत आहे.

पान नं. 14

12. निसर्ग नेहमी मूलभूत गरजा भागवितो असे नाही तर भौतिक
विकासाला योग्य असे अनेक सुप्त घटक मानवाला उपलब्ध करून देतो. या सुप्त
गुणावर संपूर्णपणे मानवाचेच स्वामित्व असते. भारत स्वतंत्र होईपर्यत अंदमान
द्वीपसमूहात जाणे म्हणजे `काळ्यापाण्या'ची शिक्षा भोगण्यासाठी जाणे असा
अर्थ होता. राजबंदी, गुन्हेगार व निग्रोवंशीय आदिवासी यांची तेथे वस्ती होती.
स्वातंत्र्योत्तर काळात विशेषतः गेल्या दहा वर्षात अंदमानमधील निसर्ग व
सांस्कृतिक दृश्य झपाट्याने पालटले आहे. भारताच्या संरक्षणव्यवस्थेत अंदमानला
अद्वितीय स्थान प्राप्त झालेले आहेच, पण हळूहळू अंदमानमध्ये वर्गविरहित समाज
तयार होत आहे. भारताच्या अर्थकारणातही अंदमानला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त
होत आहे.

13. मानव व पर्यावरण यांच्या गतिमानतेचे तत्त्व हे शक्यतावादाचे महत्त्वाचे
अंग आहे. मानवी संपर्कामुळे पर्यावरणाच्या विविध घटकांची स्थल, काल यांच्या
संदर्भात उपयुक्तता बदलत असते. एखाद्या ठिकाणचे नैसर्गिक पर्यावरण व त्याचे
घटक स्थिर असल्यासारखे वलाटत असले तरी मानवी जीवनाच्या संदर्भात त्यांचे
महत्तव कमीजास्त होते.

गंगेच्या मैदानात पूर्वी सुबत्ता होती. परंतु लोकसंख्या वाढल्याने तेथील
नैसर्गिक साधने अपुरी पडतात. त्यामुळे आता बहुसंख्य लोकांचे जीवन दारिद्रय-
रेषेखाली आढळते.

पूर्वापारपासून अरब देशात खनिज तेल होते. परंतु जेव्हा तेलाचा उपयोग
करण्याचे तंत्र अवगत झाले तेव्हाच अरब देशाला महत्त्व आले व तेलाचा
व्यापार वाढला. जगात फारच थोड्या ठिकाणी मानव निसर्गाधीन आहे. अमेझॉन,
कांगो खोऱ्यासारख्या भागांतच मानवी समाजाची घडण पूर्णपणे निसर्गाच्या
मुशीत झालेली आढळते.

टेलर यांचा थांबा आणि पुढे जा निसर्गवाद
( Stop and Go Determinism -Taylor)

ग्रिफिथ टेलर हे निसर्गवादी. त्यांनी थांबा आणि पुढे जा असा निसर्ग-
वादाकडे झुकलेला सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मानव व निसर्ग
यांच्यातील संपर्काची तुलना गजबजलेल्या रस्त्यावरील वाहतुकीच्या तांबड्या,
हिरव्या दिव्यांशी केली, वाहतूक म्हणजे मानवी हालचाली, मानवाच्या क्रिया-
प्रतिक्रिया, मानवी विकासयोजना. हिरवा दिवा निसर्गाने दाखविल्यानंतरच
मानवाला आपल्या योजनांची पूर्तता करता येते. हिरवा दिवा याचा अर्थ अनुकूल
निसर्ग, सुपीक जमीन, भरपूर पाऊस, वर्षभर हंगामकाल, सुगम प्रदेशातील खनिजे

पान नं. 15

यांद्वारा निसर्गाची अनुकूलताच दिसते. तांबडा दिवा असताना म्हणजे निसर्ग प्रतिकूल
असताना मानवाला मन मानेल ते उद्योग, व्यवसाय करता येत नाहीत.

टेलर पुढे म्हणतात की, निसर्गाने घालून दिलेल्या चौकटीतच मानवाला
मुक्तपणे विकास करता येतो. जेथे नैसर्गिक साधनांची भरपूर उपलब्धता असते
तेथे ही चौकट मोठी असते. मानवाला त्यामुळे विकासाचा वेग वाढविता येतो.
अनेक पर्याय या ठिकाणी उपलब्ध होतात. परंतु निसर्गरूपी नियंत्रकाचे इशारे न
पाळल्यास गंभीर अपघात होण्याचा संभव असतो.

टेल यांच्या मते, मानव हा काही कमी महत्त्वाचा घटक नाही, परंतु जेथे
मानवाने आपल्या बुद्धिचातुर्याने विकास करून घेतलेला आहे तेथे त्याला निसर्गाची
साथ मिळालेली आहे. निसर्गाने काही योजना तयार केलेल्या असतात त्याचीच
कार्यवाही मानव करतो. कॅनडाच्या प्रेअरी प्रांतात, मानवी प्रयत्नांमुळेच गव्हाचे
कोठार निर्माण होऊ शकले, परंतु प्रेअरीतील सपाट, सुपीक प्रदेश व उन्हाळ्यात
गहू घेता येईल अशी योजना मूलतः निसर्गाची. म्हणूनच मानवी प्रयत्न तेथे यशस्वी
झाले.

टेल यांचे निष्कर्ष जरी निसर्गवादास जवळचे असले तरी त्यांनी
मानवी पसंती, निवड ही संकल्पना मांडली. विकासातील उद्दिष्टे गाठताना विविध
पर्यायांनी ती गाठता येतात. ती गाठण्यासाठी अनेक पर्याय निसर्गाने काही ठिकाणी
दिलेले असतात, परंतु त्यातला कोणता पर्याय निवडायचा हे मानव ठरवितो.

प्रत्येक विभागात नैसर्गिक बंधने असतात. त्यांच्याशी ही निवड, उद्दिष्टे
संलग्न असतात. या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कॅनडा,ऑस्ट्रेलिया व अटांर्टिका
येथील उदाहरणे दिलेली आहेत. ह तिन्ही भाग विस्तृत, ऑस्ट्रेलिया उष्ण वाळवंटी
तर कॅनडा थंड जंगलव्याप्त, आणि अंटार्टिका बर्फाच्छादित. या सर्व ठिकाणी
निसर्ग अतिप्रबळ,. मानवी प्रयत्नांना या ठिकाणी यश मिळणे कठीण. अजूनही
येथे मानवस्पर्शविरहित अनेक भाग आहेत. अशा ठिकाणी संभववादाचा पुरस्कार
करण्यात काहीच स्वारस्य नाही.

अंटार्टिकातील हिमगिरी ऑस्ट्रेलिया, अरेबियासारख्या रूक्ष प्रदेशांत नेऊन
तेथे शुद्ध पाणी पुरविले व अंट्रार्टिकामधील खनिजे आणि कॅनडामधील वन व
पशुसंपत्ती यांच्या सहाय्याने कितीही विकास घडवून आणला तरी तेथील अनेक
भाग उजाड राहणाराच. म्हणजे ज्या प्रमाणात निसर्गाची अनुकूलता असते त्याच
प्रमाणात मानवी प्रयत्न यशस्वी होण्यास वाव असतो. जेथे निसर्गाची थोडी
अनुकूलता दिसते अशाच ठिकाणी मानवी मन थोडा विचार करू लागहते. प्राप्त
नैसर्गिक परिस्थितीत कोणते तत्र वापरून आपला विकास साधता येईल. याबद्दल
विचार चालू होतात. निसर्गामुळेच मानवी प्रयत्नांना चालना मिळते.

पान नं. 17

मानवी भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती

प्रा. हंटिंग्टन यांनी मानवी भूगोलाच्या मूलत्त्वांची चर्चा करीत असताना
त्याची व्याप्तीही सांगितली आहे. त्यांच्या मते, मानवी भूगोलाच्या व्याप्तीचा
अभ्यास पुढील दोन मुद्यांना धरून होणे आवश्यक आहे :

1. प्राकृतिक घटक. 2 मानवी प्रतिसाद.
हंटिंग्टन यांच्या मते, मानवी भूगोलाच्या अभ्यासात नैसर्गिक परिस्थितीच्या
घटकांना खूपच महत्त्व आहे. स्थान, भू-रूप, जमिनी, समुद्रापासूनचे अंतर, हवामान
हे नैसर्गिक परिस्थितीचे घटक मानवाच्या आर्थिक जीवनावर व मानवी संस्कृतीच्या
दर्जावर आपले नियंत्रण ठेवतात. निरनिराळ्या प्रदेशांत नैसर्गिक परिस्थिती भिन्न
असल्यामुळे तेथे राहाणाऱ्या मानवसमाजांना सारख्याच प्रकारचे यश आर्थिक
विकासात येत नाही. भारतीय, इजिप्शियन, चिनी, ग्रीक, रोमन- या सर्व
संस्कृतींची उगमस्थाने मध्य अक्षवृत्तीय विभागात किंवा त्याजवळील आयनिक
प्रदेशातच होती.

प्रा. हंटिंग्टन यांनी सुचविलेल्या मूलतत्त्वांचा स्तंभ वर दिला आहे. त्याचा
अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येईल की,
1. मानवी भूगोल हे अतिशय व्यापक असे शास्त्र आहे.
2. मानवाचे स्तंभात दर्शविलेले जे आठ प्रमुख व्यवसाय आहेत त्यांच्यावर
भौगोलिक परिस्थितीचा आणि मानवसमूहांनी गाठलेल्या सांस्कृति दर्जाचा
परिणाम होतो. अंदमान बेटे व अमेझॉन खोऱ्यातील आदिम जमाती अजूनही कंदमुळे
गोळा करून, शिकार करून उपजीविका करतात, तर लक्षद्वीप व लॅब्राडोरसारख्या
ठिकाणी मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आढळतो. कारखानादारी, मोठ्या प्रमाणावर
विविध वस्तूंचा व्यापर हे व्यवसाय त्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात. उत्तर
समुद्रावरील ऱ्हाईनच्या त्रिभुज प्रदेशात पूर्वी वाहतूक व व्यापार हे दोन प्रमुख
व्यवसाय होते. आता त्याच्या जोडीला दुग्धोत्पादन आणि कारखानदारी हे दोन
प्रमुख व्यवसाय आलेले आहेत. हे विविध व्यवसाय म्हणजे निसर्गाला मानवाने
दिलेला प्रतिसाद. मानसमूहांनी संस्कृतीचा जो टप्पा गाठलेला असतो त्यावर हा
प्रतिसाद अवलंबून आहे. निसर्गाशी तडजोड करण्याचे तंत्र जेथे प्रगत असते तेथे
विविध प्रकारची अवजारे, यंत्रे, आयुधे मानवाने तयार केलेली असतात. तेथे निसर्गाचा
पगडा कमी आढळतो. जेथे ती कमी असतात तेथे मानव निसर्गाधीन असतो.

मानवसमूहांनी कार्यक्षमता , त्यांचे गुणदोष, त्यांच्या विभागात असलेल्या
साधनांचा पूर्ण उपयोग करण्याची त्यांची पात्रता किंवा निष्क्रियता या गोष्टी
मानवी उत्साह व शरीरसंपदा यांवर अवलंबून असतात. मानवी आरोग्य व उत्साह

*
